माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'प्रॉपर्टी विकायला आहे' सदरातली जाहिरात:
सुंदर लोकेशन, खेळती हवा, शाळा, बसस्टॉप सर्व 2 मिनिटाच्या अंतरावर
प्रॉपर्टी एज : 1 वर्षं
विकण्याचे कारण: राजमा शिजत नाहीये Happy

मला हे राजमा, छोले प्रकरण फारशी नाही आव्डत. म्हण जे रेडिमेड कोणी दिले तर खाइन पण बनवायचे बोअर होते. मटकी , वाटाणा, मूग मिक्स कडधान्ये व काळा हरबरा बारका इतकेच जमते. दिल्ली एअर्पोर्ट वर मस्त राजमा चावल खाल्ले होते. छोले कुलचे पण बेस्ट. रेडिमेड. एकदा एका पुणेकरणीने केलेले छोले खाल्ले रात्रीचे पण पचले नाही. त्यात ते घर लॉक करून वर गच्चीत झोपायला गेलेले मग दर वेळी रेस्ट रूम वापरायची तर गृहिणी कडे किल्ली मागा. असा अनवस्था प्रसंग आला. ते जोडपे रोमांटिकली मुलींना तारे मोजुन दाखवत होते व मी फेर्‍या मोजत होते. मोस्ट एंबरासिन्ग.

पुण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असावा. जसे अमृत सरी कुलचे छोले मध्ये सायन वाले स्वैपाकी तिथलेच पाणी मागवून वापरतात तसे.

काश्मिरी बारका राजमा व तिथलाच बासमती वापरून केलेला जिराराइस भारी काँबिनेशन.

शेती करायला ट्रैक्टर / बैल भाड्याने देतात तसे राजमा उत्कृष्ट शिजवायला आमच्या येथे कुकर भाड्याने मिळेल ही जाहिरात जस्ट डायल मध्ये द्यायला हवीय.

आमचे येथे राजमा भिजवायला तांब्याचे भांडे भाड्याने/विकत मिळेल.

राजमा शिजवण्यास वाफेचा दाब, तपमान आणि शिजवण्याचा कालावधी यांचा आलेख काढल्यास तिन्ही रेषा जिथे छेदतात त्याला राजमाचा पॉईंट म्हणतात.

छेदतात त्याला राजमाचा पॉईंट म्हणतात. >> या तीन रेषा लोणावळ्या जवळ एकत्र मिळतात असं ऐकून आहे. ते ही कधी मनात आलं की ... आलं मनात गेलो पिंढारी... किंवा आलं मनात गेलो हिमालयात असा सोपा प्रकार नाही. फक्त पावसाळःयातच हा पॉईंट सर होतो आणि तेव्हाच तिकडे जायची परंपरा आहे. Wink

काय चर्चा, काय चर्चा ...अशी चर्चा पुर्वी फ्लॅक्स सिडस वर झालेली....तस्मात माबो गोल आहे...फिरुन त्या थाब्याला येतेच.
सोड्याच सोडत्व तुफान होता...
काळे वाटाणे म्हणजे कुठले?हरभरे का?

भारी चर्चा...हहपूवा
सोडत्व>> एकदम LoL.
<<<काळे वाटाणे म्हणजे कुठले?हरभरे का?>>> या प्रश्नात प्रचंड पोटेन्शियल आहे... बहुतेक Flaxseed इतकंच..

सोडत्व Lol

रेडी टू इट राजमा खायचा, ते परवडेल.

Btw मी पटेल आर मार्ट मधून मिक्स कडधान्ये आणते त्यात माफक राजमाही असतो, मी उसळ डायरेक्ट भाजीच्या कुकरमध्ये करते, तीन शिट्या करते. मूग मटकी गळून जातात, राजमा, काळा वाटाणा किंचित कमी शिजतो, चालतं आम्हाला .

एवढी चर्चा वाचुनही मला प्रामाणीक प्रश्न पडलाय 'एवढ काय सन्कट येणार आहे चिमुटभर सोडा घातला तर ?'.... इनोचे आक्खे सॅशे घालुन ढोकळे करतात रिळातल्या सुगरणी.

सोडत्व
राजमाचा पॉईंट
>>> Lol

जबरी चर्चा चालू आहे इथे! धमाल!! कात्रीने पाव वाचावंसं वाटायला लागलं आता पुन्हा Wink

एक शंका - राजमा आणि करवंटी एकत्र शिजवताना जर राजमा शिजला नाही परंतु करवंटी शिजली तर काय करायचे?

राजमा फेकून द्यायचा आणि करवंटी खायची?

सोड्याचे सोडत्व Happy

एकदा सोडे आणून त्याची सोडे-खिचडी केली होती तेव्हा तिला काही सोड्याचा स्वाद आला नाही (सोडे भेसळयुक्त असावेत). वरचे सगळे प्रतिसाद वाचले आणि लक्षात आले की सोडयांमध्ये सोडेत्व नव्हते !!

मुळात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्यात काय फरक असतो?

भारी चर्चा,खुप हसले. राजमा शिजवण्याचे १०१ उपाय असं पुस्तक प्रसिद्ध करायला हवंय. त्यात कडधान्य शिजवताना करंवटिचा तुकडा टाकून ते (न शिजल्यामुळे ) फेकुन करवंटी खायची हा उपाय सगळ्यात भारी आहे:)

वर कुणीतरी लिहलय तसं मांस शिजवताना कच्ची पपई मदत करते तो उपाय चालणार नाही कारण कच्च्या पपई मध्ये असणारे पॅपेन हे एंझआइम प्रोटीन्स मधले केमिकल बॉन्ड तोडण्यासाठी आणि पर्यायाने ते शिजण्यास उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. तो उपाय राजम्याच्या बाबतीत कामाचा नाही कारण राजम्यात प्रोटीन्स चे प्रमाण एकत्र कमी आहे (~‌ १००% ऐवजी २०% ) आणि दुसरे म्हणजे राजम्याच्या भोवती जे फायटेट (फायबर) चे आवरण आहे ते तोडायला पॅपेन ची काही मदत नाही. राजमा २४ तास पुर्ण भिजवुन मग भिजण्यासाठी वापरलेले पाणी काढून टाकून उकळते पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवणे हा एक उपाय करुन बघता येईल. ह्यामध्ये फायटेट चे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी २४+ तास पाण्याचा संपर्क आणि मग भिजलेल्या फायटेट वर वाफेचा परिणाम हे घटक मदत करतील. बेकिंग सोडा ही मदत करु शकेल फायटेट चे आवरण तोडायला. जास्त प्रमाणात सोडा पोटात जायला नको हा कन्सर्न असेल तर शिजलेला राजमा दोन तीन वेळा पाण्यात धुवून घ्यायचा, जास्तीचा सोडा निघून जाईल.
करवंटिच्या सहवासात कडधान्य का शिजत असेल ते मात्र लक्षात येत नाहीये कुणाला शास्त्रीय कारण माहिती असेल तर प्लीज लिहा.

<<<मुळात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्यात काय फरक असतो?>>>
बेकिंग सोडा म्हणजे अल्कली (सोडियम बाय कार्बोनेट) आणि बेकिंग पावडर म्हणजे आम्ल (क्रीम ऑफ टार्टर) आणि अल्कली (सोडियम बाय कार्बोनेट) ह्यांच मिश्रण. बेकिंग सोडा आम्लधर्मी पदार्थांच्या संयोगात आल्यावर कार्बन डाय ऑक्साईड वायू निर्माण होतो आणि पदार्थ जाळीदार होतो पण ही क्रिया तपमान वाढल्यावर (साधारण १७० डिग्री फॅ.) बंद पडते. बेकिंग पावडर मधील दोन घटक हे त्यापेक्षा जास्त तापमान एकमेकांशी संयोग पावु शकतात ( केमीकली ऍक्टिव राहु शकतात) त्यामुळे उच्च तापमान सातत्याने कार्बन डाय ऑक्साईड ची निर्मिती करु शकतात. म्हणून केक्स बनवताना बेकिंग पावडर वापरली जाते.

मस्त माहिती पर्णीका.मागे एकदा चुकून राजमा 24 तास भिजवला गेला तर त्याला जरा वास येत होता आणि बुळबुळीत झाला होता.
पण आता हे राजमा आव्हान घेतलेलं आहे.दर आठवड्यात एक प्रयोग(24 तास, करवंटी,सोडत्व शिल्लक असलेला सोडा) करून इथे निष्कर्ष लिहिला जाईल.

राजमा-चर्चा वाचायला मजा आली. माझ्याकडे चक्राता (उत्तराखंड) मधून आणलेला राजमा आहे तो चांगला शिजतो. ( अधूनमधून त्या बाजूला एखादा ट्रेक करावा आणि राजमा आणावा हाही एक उपाय आहे!)
पर्णीका, मस्त माहिती.
शिजायला मदत म्हणून करवंटीचा तुकडा टाकतात हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा माझ्या मनात अशी कल्पना आली होती की ती करवंटी शिजेपर्यंत पदार्थ शिजवायची मानसिक तयारी होते आणि मग त्या मानाने तो पदार्थ लवकर शिजल्यासारखा वाटत असेल Wink

Pages