भाकरी - अ लेसन फॉर लेमन्स

Submitted by तृप्ती आवटी on 18 February, 2016 - 13:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन छोट्या (आमटीच्या वाटीपेक्षा जरा लहान) वाट्या ज्वारीचं पीठ, एक चमचा कणीक, एक चमचा तेल, एक-सव्वा वाटी कढत पाणी

क्रमवार पाककृती: 

भाकरीचा विषय निघाला की भूक खवळत असेल, स्वतःला करता येत नाही आणि करून देणारं कुणी नाही म्हणून जीव कळवळत असेल, दीपभावोजींकडचा भाकरी नामक बोटभर जाडीचा पुठ्ठा खाल्यावर कर्त्याला सुस्थळी रट्टे घालण्यासाठी हात सळसळत असेल आणि छान पापुद्रे पडलेल्या पाsतळ भाकरीच्या आठवणीनं जीव अजूनच कळवळत असेल तर तर तर ...मेहरबान, कदरदान, आप की खिदमत मे पेश है...लेसन फॉर लेमन्स...चांदकीsss फॉर चमन्स्स्स्स्!!!

दोन्ही पिठं एकत्र करून त्यात तेल आणि पाणी घालून नीट मळावं. साधारण एक आणि सव्वाच्यामधलं माप पाणी लागतं. सगळं पीठ नीट बांधलं जात नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावावा. हे तयार झालेलं पीठः

n2upkki.JPG

साधारण दोन छोट्या चांदक्या होतील एवढ्या पिठाचे छोटे मुटके करून एस आकाराचं ब्लेड लावलेल्या फूडप्रोसेसरमध्ये टाकावेत. मी ब्लॅक अ‍ॅन्ड डेकरचा चॉपर वापरला आहे.

d1dswwb.JPG

फूडप्रोसेसर सुरू करून अर्धा मिनिट पीठ चांगलं मळून घ्यावं. सुरूवातीला भगराळ होउन मग एकसारखा गोळा तयार होईल. साधारण दोन भाकरी होतील एवढं पीठ एका वेळी मळून घ्यावं. पहिल्यांदा प्रयोग म्हणून आणि आता त्या यशस्वी प्रयोगानंतर सुखाचा जीव दु:खात का लोटा या विचारानं सगळं पीठ एकदम मळून घेतलं नाही कधीच.

rbodh4s.JPG

त्या पिठातून एक चांदकी होईल एवढा जरा लहानसाच गोळा काढून, हातावर मळून, त्याला लाटीसारखा आकार द्यावा. एका स्वच्छ कोरड्या ताटात किंवा परातीत थोडं ज्वारीचं पीठ पसरवून त्यावर ती लाटी ठेवावी. तळहाताला व्यवस्थित ज्वारीचं पीठ लावून चांदकी थापावी. थापताना तळव्यानं मधली आणि बोटांच्या खालच्या पेरांनी कड असं आलटून-पालटून थापल्यास एकसारख्या जाडीची भाकरी थापली जाईल. पीठ नीट मळलं गेल्यामुळे तुटातूट न होता भाकरी थापली जाते.

lbtp1ax.JPG

भाकरी उचलून पिठाची बाजू वर येइल अशा हिशेबानं उचलून तव्यावर टाकावी. उचटण्यानं कड जराशी उचलली तर पटकन भाकरी हातावर घेता येते. भाकरीवर पाण्याचा हात फिरवावा. तवा मध्यम तापलेला हवा. माझ्याकडे ग्लासटॉप असल्यानं तवा तापायला वेळ लागतो म्हणून मी पीठ मळायला घेतलं तेव्हाच तापायला ठेवला होता. शेजारच्या बर्नरवर पापड भाजायची जाळी पण तेव्हाच गरम करायला ठेवली.

ijashde.JPG

भाकरीला लावलेलं पाणी सुकेपर्यंत खालची बाजू पुरेशी भाजली जाते. मग दुसरी बाजू पूर्ण भाजून भाकरी जाळीवर सरकवावी.

ucalvq5.JPG

फुलली का नाय?

bdcllyz.JPG

घ्या अन् काय मग ताटात....

sk5ft1g.JPG

वाढणी/प्रमाण: 
चार चांदक्या होतात
अधिक टिपा: 

* 'बक्कळ' हा पर्याय उपलब्ध नसल्यानं लागणारा वेळ ३० मिनिटे घेतला आहे.
* भाकरी नीट होण्यासाठी पिठास विरी असणे आणि पीठ नीट मळले जाणे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कणिक, तेल आणि फुड प्रोसेसर ह्यांचं टीमवर्क हा कणिकांचन योग साधतं.
* ढाई किलो का हाथ हो या ठाकुर के हाथ, फूडप्रोसेसर से इन का कोई मुकाबला नही....
* घरात वास्तव्यास असलेल्या दुष्ट शक्तींनी चांदक्या कच्च्या राहिल्या, जाड झाल्या, जळाल्या ह्यापैकी का-ही-ही निदर्शनास आणून दिल्यास 'खायच्या असतील तर खा, नाही तर खा माझी हाडं' हा 'मानेस्मृती'तला पवित्र श्लोक मोठ्या आवाजात म्हणावा.
* डाव भरून कच्चं तेल घातल्याशिवाय पिठलं खाणं पाSप हो..पाSप!

माहितीचा स्रोत: 
आई, कणीक घालायची टिप: विद्याक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रस्तावना मस्त, खुसखुशीत .. Happy

आणि तयार भाकरी, आपलं चांदकी सुरेख दिसत आहे ..

रेसिपीचं चं नाव ज्या प्रकारे लिहीलं आहे ते मिसलिडींग आहे .. Wink

दुष्ट लोकांचा निषेध . ग्लास टॉप सार्ख्या सर्वात भंगार कुकींग इक्विपमेंट वर देखील अशा देखण्या भाकरी करता येतात हे पुराव्यानिशी शाबित करणार्‍यांचा त्रिवार निषेध. आता मी लेमन पण नाही आणि चमन पण. कुठली एक्सक्यूझ शोधू मी : हताश बाहुली:

कणिकांचन योग लवकरच जुळवणार.
माझ्या भाकऱ्याWink चांगल्या होतात पण भावोजींच पीठाच बेक्कार असतं. जे गेल्या विकांताला भाकरीच हवी वाटून घरात आलं आहे. आता सद्गती मिळणार त्याला. Happy

>>ग्लास टॉप सार्ख्या सर्वात भंगार कुकींग इक्विपमेंट वर

मला तर सगळ्यात बेस्ट वाटायला लागला बा ग्लास्टॉप. फक्त व्यवस्थीत वापरता यायला हवा. सुरवातीला स्वयंपाकासाठी बराच इनएफिशिअंट वाटणारा स्टोव्ह आता गेल्या १२ वर्षांपासून कन्व्हिनिअंट वाटायला लागला. भाज्या, कुकर, आमट्या किती आधी बंद केल्यावर उरलेल्या आचेत सुरेख शिजतील ह्याचा अंदाज आल्यापासून तर आता गॅसचा स्टोव्ह नको वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसटॉपइतकं बाकी काही लख्ख होत नाही.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसटॉपइतकं बाकी काही लख्ख होत नाही. >> याच्या इतकं आई लॉजिक जगात नसेल. गॅसका वापरायचा? तर स्वच्छ करता यावा म्हणून. जेवण का पटपट जेवायचं तर भांडीघासायला येणाऱ्या बाई ला भांडी मिळावी म्हणून. आंघोळ का करायची तर मशीन लावायचंय म्हणून. Lol

अमित, Lol आईच्या लॉजिकला हसू नये. तिनेच तुम्हाला लहानपणी 'ते हे का धुवायचं तर त्यानंतर ते करायचं असतं म्हणून' लॉजिक शिकवलंय. Proud

एनिवेज, गॅसटॉप स्वच्छतेचा मुद्दा कन्व्हिनिअन्सच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. Proud

>> सशल, फुटवा का माप निकालो तो तनिक

चँडलर चा आपल्या टीम मेम्बर्स ना स्पँक करणारा बॉस आठवला मला ..

(चँडलर ला ते अजिबात आवडत नसतं पण बाकी लोकांनां वरचेवर हे स्पेशल गिफ्ट मिळत नसल्यामुळे त्यांनां लेफ्ट आऊट वाटत असतं .. मग हे बॉसच्या कानावर पडल्यावर तो सगळ्यांनां नेमाने स्पँक करायला लागतो .. :हाहा:)

>> ज्चारीच्या पीठाचा ब्रँड काय आहे?

हो ना .. हा महत्वाचा प्रश्न राहूनच गेला .. हे पीठ भारतातून आयात केलेलं आहे की इकडे मिळणारं , लाडक्या दीपचं वगैरे .. Wink

एकदम ढासू स्टाईल आहे लिहायची.

मी बराच वेळ लेमन कुठल्या स्टेपला घातलंय का ते शोधत होते Wink आमच्या भाकरी पाहिल्या तर या वरच्या फोटोतल्या चमन्सच्या वगैरे वाटत नाही बरं का? Proud

मला तर चांदक्या कशाला म्हणतात हेही माहित नाही ? लहान भाकरी म्हणून की तेल घातलेली म्हणून ? त्या ह्यांच्यासारखं सरळ सोपं लिहायचं ना, तेल घातलेली भाकरी, फेकलेली, उडवलेली ,ओतलेली वगैरे Happy

चांदकी म्हणजे लहान भाकरी. तेलाबिलाचा संबंध नाही.

सशल, इथे चँडलर कोण आणि लेफ्ट आउट कोणाला वाटतंय हे कळलं तर पुढे काही म्हणता येइल.

भारतातून आयात केलेलं आहे की इकडे मिळणारं , लाडक्या दीपचं वगैरे >>> असे अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नयेत Proud

Lai bhaari livhalay...
Chandki tarrrr 1ch number.

हो

खूप छान !
सॉफ्ट भाकरी कशी करायची , कोणी सांगेल का ?

Pages