माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(जरा वेगळा विचार)
डिंक भरपूर तुपात तळून कुरकुरीत करून मिक्सर ला भुर्रर्र करून ती पावडर या चिकि मिश्रणात मिक्स करा
(दुसरा महाग पर्याय: बदाम आणि आक्रोड चा बारीक कूट मिक्स करा)
(तिसरा ओके पर्याय: शेंगदाणे तीळ भाजून बारीक कूट करून मिक्स करा).
(चौथा बोअर पर्याय: सोया चंक किंवा मखाने भाजून बारीक पावडर करून मिक्स करा)

वजन gain sathi seeds +ड्राइफ्रूट ची पाउडर घेतलीये karyala गरम असताना mixture ला लावली गूठल्या झाल्यात , काय करू

चिक्कीत आधीच बदाम, काजू, मनूके, बेदाणे, शेंगदाणे, मध खजूर घातलेला आहे.....:)
खोबरे लावून फरक पडतोय...तेच करते..धन्यवाद मैत्रिणींनो Happy

पाईनॅपल शिरा करताना ताज्या अननसाचे तुकडे थोडे पॅनवर भाजून पाण्यात शिजवून घेतले व नेहमीसारखा त्यात रवा साखर इत्यादी घालून शिरा केला पण अननसाची चव काही आलीच नाही. जर अननस खाल्ला तरच जाणवले की ह्यात घातला आहे. नाहीतर रेगुलर शिराच वाटला. मग पाईनॅपलची चव यायला काय करावे ? प्युरी करून घालायची का ?
your फूड लॅबची रेसिपी फोल्लो केली होती

निशा मधुलिकाची रेसिपीही चांगली आहे. अननसाचे अर्धे तुकडे साखर आणि पाणी घालून शिजवायचे आणि अर्ध्या तुकड्यांची प्युरी करायची.

अननसाचे प्रमाण कमी झाले असेल,
मी परवा गोडाच्या शेवया केल्या होत्या,थोडा मँगो फ्लेवर यावा म्हणून आंब्याचा बिनसारखेचा रस घालू म्हटलं,थोडा थोडा म्हणता जरा जास्तच पडला तो रस,इतका की थोडासा फ्लेवर न येता खाताना आमरसात शेवया बुडवून खातोय असं झालं, Rofl

इतका की थोडासा फ्लेवर न येता खाताना आमरसात शेवया बुडवून खातोय असं झालं, Rofl
ही एक खान्देशी डेलिकसी आहे. पारावर नवरदेवाला जेव्हा सवाषिणी खाद्यपदार्थांचे ताट घेवुन येतात (५/११/२१/५१ ...) त्यात हे असु शकते. आणी लग्ना नंतर नवजोडप्याला घरी बोलवुन दुध शेवया किंवा आमरस शेवया एकत्र खायला लावणे हे सुद्धा.

हा धागा बरेच दिवस वर आलाच नाही. सब लोग शेफ बन गऐं क्या???
माझ्याकडे जूना नॉनस्टिक तवा आहे. तसा थोडा पातळच आहे. त्यावर घावणे करायला घेतले. एकही घावणा तव्यावरून नीट उतरला नाही. सगळे चिकटले. पीठ बरोबर होतं. तवा मुद्दाम आधीच नीट तेल लावून घेतला होता. ३ केले, तीनही पूर्णपणे चिकटले. ३ वेळा तवा घासावा लागला.
नक्की काय चुकलं? डोशासाठी करतो तसा गॅस कमी केला की जाळी पडत नाही, जास्त केला की चिकटतो.

डोसे अगदी व्यवस्थित होतात त्यावर. चिकटत नाहीत. घावणे करताना काही वेगळे नियम असतात का? म्हणजे डोसा टाकताना तवा फार गरम नसावा, बॅटर फार घट्ट वा पातळ नसावं. घावणेच जमत नाहीयेत. टिप्स असतील तर प्लीज शेअर करा.

नॉनस्टिक कोटिंग खराब झालं आहे का किंवा निघायला लागलं आहे का? तर टाकून द्या तवा - आरोग्यासाठी चांगला नाही तो.
तसं नसेल तर मध्यम आचेवर तवा गरम करा, कांदा अर्धा कापून त्याने गरम तव्यावर तेल पसरा, मिनिटाभराने आच बंद करून पेपर टॉवेलने तेल पुसून टाका. (सीझनिंग).
नॉनस्टिक तवा फार हाय फ्लेमवर तापवायचा नाही, आणि गरम असताना कधीही धुवायचा नाही. धूताना हार्श स्क्रबर वापरायचा नाही. या तव्यावर स्टीलचा कालथा/उलथणं वापरायचं नाही. लाकडी किंवा सिलिकॉनचंच वापरायचं, नाहीतर कोटिंग खरवडलं जातं.
घावणे घालताना सुरुवातीला थोडं जास्तीच तेल घाला, आणी आधी एकदोन छोटेच घावन घालून बघा.

खाऊगल्लीचा धागा बघता इथे हल्ली कुणी का येत नाही ते कळतं म्हणा. पण माझ्यासारखे घोळ घालणारे असतातच.
पनीर ६५ करायला घेतलं. बॅटर, पनीर क्युब्स सगळे नीट झाले. बॅटरमधे टाकले. पहिला छोटा तुकडा नीट तळून आला. नंतर २ तुकडे टाकले आणि जे काही तेल उडायला लागलं की बापरे. तेलात पाणी उडाल्यावर जे होतं तेच व्हायला लागलं.
अर्धा ओटा तेलाच्या शिंतोड्यांनी भरला, तोंडावर, हातावर पण उडाले. मग सरळ गॅस बंद केला. प्लॅनच कॅन्सल.
काय चुकलं? भजी कधी फसत नाहीत मग हे का फसले? पनीर तळायचा काही वेगळा प्रकार असतो का?

हा प्रश्न खरं तर मला ही आहे.... पालक पनीर किंवा मटार पनीर बनवताना पनीर तळून घ्यायचं सांगतात... पण त्यातील पाणी उडून ओटा खराब होतो....
मी मग सपाट पॅन मध्ये अगदी चमचाभर तेल घेऊन मग त्यात पनीर शॅलो फ्राय करते....
पण बॅटर मधले पनीर कसं तळायचं ते मला ही माहीत करून घ्यायला आवडेल

थोडं कॉर्नफ्लोअर आणि मीठ चोळून तळता येईल.अर्थात हेल्दी भाग कमी होईल.
शॅलो फ्राय किंवा उघडा सँडविच मेकर (ज्याला ऑन व्हायला दाबलेलं झाकण बंद व्हायची अट नाही असा, किंवा पनींनी मेकर) असेल तर त्यात ग्रील करून घेता येईल

पनीरमधे पाणी राहीले तर तळताना तेल उडते. पनीरचे तुकडे कॉर्न स्टार्च, मैदा आणि सुके मसाले याच्या मिश्रणात आधी घोळवून घ्यायचे. पनीर मधे जर पाणी राहिले असेल तर ते हे मिश्रण शोषून घेईल. मग त्यात थोडे थोडे पाणी घालत बॅटर बनवायचे.
भाजीत घालायचे पनीरचे तुकडे मी शॅलोफ्राय करते. तसे करतानाही पनीरमधे पाणी राहिले असल्यास तेल उडते म्हणून तुकडे थोडावेळ पेपर नॅपकिनवर ठेवायचे म्हणजे आद्रता शोषली जाते. हाताशी जास्त वेळ असेल तर पनीरचे तुकडे फ्रीजमधे ताटलीत काढून ठेवायचे, फ्रीझच्या गारठ्याने कोरडे होतात.

Pages