खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझे मन आणि अमुपरी धन्यवाद.
अमुपरी उकडीचे मोदक पाहून भाद्रपदातले दिवस आठवले
मस्त दिसतायेत उकडीचे मोदक.

थंडी संपत आली म्हणजे निरनिराळ्या भाज्यांचेही दिवस संपत आले ना… म्हणूनच ही वांगी, मेथी आणि पावट्यांची मिश्र भाजी आणि गाजर हलवा….
IMG_8401.jpegIMG_8408.jpeg

20210217_102746.jpg

तो नाचणीचा टोस्ट (नाचणी+गहू) आहे, चीज आहे, अंडा भुर्जी आहे आणि चमचा आणि प्लेट आणि खाली टेबल, त्याखाली फरशी.

@ पार्वती - भाजी आणि हलवा १ नं..!
@ मानवजी - सकस न्याहारी
@ मृणाली - आज काय खास बेत..! ताट मस्तच..!
@ देविका - मोदकांचे ताट सुंदर..!

थँक्यू सर्वांनाच! माझेमन - भाजीची रेसिपी काही खास नाही. नेहेमीसारखीच वांग्याची भाजी करून त्यात कुकरमध्ये शिजवलेले पावटे घालायचे. मेथी सर्वात शेवटी घालायची म्हणजे छान हिरवी राहाते. गूळ विसरायचा नाही.

पार्वती भाजी छान दिसतेय.. मिक्स भाजी जर अशी चमचमीत दिसत असेल तर त्यात बरेच नावडत्या भाज्याही खाल्ल्या जातात. Happy

अंडा बुर्जी, वेज राईस, खुब्यांचे सांबार मस्त

मृणाली : रेशमी पनीरची रेसिपी टाका.

@amupari हो..
तिसरे जास्त बेटर लागतात टेस्टला Happy ते त्रिकोणी टाइप मध्ये असतात. आणि आतून जास्त भरलेले असतात.
मम्मी सांगत होती की गावी पहिलं शेरावर विकत मिळायचे तिसरे.
लिंक मध्ये जे फोटो आहेत, त्याच मास थोड चिवट असतं.
आमच्याकडे गावी खुबे हे खाडीतून काढतात.
त्यांना अजून काहीतरी वेगळं नाव आहे गावी.. मावशीला विचारून सांगते मग.

ऋन्मेश खुबे म्हणजे शिवले.

@रानभुली रेसीपी मम्मीला विचारून सांगते.. Happy

धन्यवाद @mazeman आणि mrunali.samad _/\_

ऋन्मेश खुबे म्हणजे शिवले.
>>>>
ओह वॉव.. आता तर आणखी पाणी सुटले तोंडाला. मला तसा डाऊट होताच.. हे नुसतेच जास्त खाऊ शकत नाही मी.. पण याची चव छान उतरते कालवणात

Pages