अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा.आ.
पुढे काय झालं सांगा ना..नारळाच्या झाडावर बसल्यावर भूत आले होते त्याचे.>>>>>
मी भरपूर डोकं खाजवून पाहीलं तरी मला काही आठवेना..वीरुंनी लिहीलं तेव्हा कुठे उलगडा झाला.

छान

मी दुःखात असलो की मला त्या हडळीची खूप आठवण येते > ५ मार्कांसाठी संदर्भासहित स्पष्टीकरण द्याच आता

Submitted by प्रणवंत on 24 September, 2020 - 16:18>>>
खूप दिवसांनी लिहितोय त्याबद्दल क्षमस्व. तर मी त्यावेळी सिंगल होतो. ती हडळ पण बहुतेक सिंगल होती. ती चिंचेच्या झाडावर राहायची. मी एक दोनदा मध्यरात्री तिला बघितली होती. तिचा चेहरा काही दिसला नाही पण तिला पाहताच मी जागेवर थबकलो, पाठीमागे कोणीतरी व्हायोलिन वाजवतंय, हवाये चलनी लगी है, सासे थम गई है, एक मेहका मेहकासा पैगाम लाती है असं काहीतरी झालं. तिला पण मी आवडलो होतो. मी दुपारी चिंचेच्या झाडाखाली गेलो की मला दगड मारायची गरज पडायची नाही ती माझ्यासाठी वरून चिंचा तोडून खाली टाकायची. एकदा ती चक्क माझ्या स्वप्नात आली. पंजाबी ड्रेस घातला होता. मी शाळेच्या बाकावर बसून युट्युबवर व्हिडीओ बघत होतो इतक्यात ती समोरून आली. मी पाहताच क्षणी तिला ओळखलं. कसलीच छान दिसत होती ती. गालावर रुळणाऱ्या काळ्याभोर बटा, चंद्रकोरी पापण्या, चाफेकळी नाक, गालावर पडणारी खळी मी पाहतच राहिलो. तिने बोलायला सुरू केल्यावर मी कुठे तंद्रीतून बाहेर पडलो. बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. नन्तर आम्ही कितीतरी सेल्फी काढल्या. बायकांचं नळावर भांडण सुरू झालं होतं त्या आवाजाने मला जाग आली. मी वैतागून बाहेर आलो तर बायका जोरात फॉर्ममध्ये होत्या त्यामुळे मी राग कंट्रोल केला. पण तो दिवस खूपच छान गेला, स्वप्न आठवलं की मी एकटाच गालातल्या गालात हसायचो. नन्तर ती स्वप्नात वारंवार भेटू लागली. आम्ही गप्पा मारायचो, फिरायचो. असं कितीतरी दिवस सुरू होतं. नंतर काय झालं माहीत नाही ती स्वप्नात यायची बंद झाली. चिंचेच्या झाडाखाली गेलो तरी आता मला काठी मारून चिंचा पडायला लागत होत्या. तेव्हापासून कधीतरी ती पुन्हा स्वप्नात येईल अशी मनाची समजूत काढून मी झोपी जातो.

मी त्यावेळी सिंगल होतो. ती हडळ पण बहुतेक सिंगल होती.>>>
ती सिंगल होती हा तुम्ही करुन घेतलेला सर्वात मोठा गैरसमज होता महाशय! तुम्ही तेव्हा सिंगल असल्याने मनोकायिक की कुठला तो परिणाम होऊन ती स्वप्नात येऊ लागली असेल.
ते व्हायोलिनचे सूर मी काढत होतो हे तुम्हाला दिसलंच नव्हतं का..आम्ही दोघांनी तुमची गंमत करावी म्हणून सहज एकदोन चिंचेची बोटकं वरून काय खाली टाकलीत तुम्ही हवेतच तरंगायला लागलात राव..
जाऊदे! होतं असं..सिंगल असलं की...
आता तुम्ही सिंगल नाही आहात. हाडळीची वाट आजिबात बघू नका. त्याऐवजी मेडीटेशन करा पाहू. Biggrin Light 1 घ्या.

हा.आ. मग हाडळीने आणि तुम्ही टाळ्या वाजवून गाणं पण गायलं असेल ना.. 'बुध्दु बनाया..बडा मजा आया !' घ्या माझ्याकडून पण Light 1
Lol

चिंचेच्या झाडाखाली गेलो तरी आता मला काठी मारून चिंचा पडायला लागत होत्या. >>>>>>>
खरं हे वाचून वाईट वाटलं, थोडी माणुसकी नाही भुतासकी दाखवायला पाहिजे होती खरं हा. आणि हा.आ. यांनी.. चिंचा टाकायच्या ना खाली थोड्या..

थोडक्यात हा.आ. म्हणत आहेत:

बचना ए बोकलत
लो मैं आ गया
हाडळी का आशिक इंसा का दुष्मन
अपनी अदा है भूतोंं से जुदा, हे हो!

आणि बोकलत म्हणत आहेत मैं एक दिन लौट के आऊंगा, ये मत भूल जाना तुम...

सामना रंगणार आहे.

नमस्कार मी माबो वरील जुना वाचक आहे पण या धाग्यावर लिहिण्यासारखे असे माझे स्वतःचे असे काहीच अनुभव नाहीत ( देवगण असल्याने ) पण असो ... काही ऐकिवात असलेले किस्से इथे मांडतोय ते खरे की खोटे हे मलाही माहीत नाही पण ऐकायला खुप माजा येते...

खरं खोटं माहीत नाही पण असे बोलतात की माथेरान ला असे अमानवीय अनुभव येतात ..
1.माझा मित्र जो माझा कालीग पण आहे आणि शेजारी सुद्धा तो एकदा त्याच्या girlfriend बरोबर गेला होता तेव्हा संध्याकाळ च्या दरम्यान हे वाट चुकले आणि फिरत फिरत पुन्हा पुन्हा एक पडीक घराजवळ येत होते, शेवट बऱ्याच वेळाने एक घोडेवाला येताना दिसला तेव्हा त्याने यांनी वाट सांगितली
2. दोन वर्षांनंतर जेंव्हा आम्ही ऑफिस मधली ८ -९ मुलं मुलं गेलो होतो तेंव्हा याला ती जागा दाखवायला सांगितले तर आम्ही जेव्हा तिथे जात होतो तेंव्हा तेथील घोडेस्वाराने आम्हाला त्या वाटेने नका जाउ म्हणून सांगितले कारण विचारले असता तिथे कुत्रे असतात तुम्हाला जायचे असेल तर जा तुमची इच्छा असे रागातच बोलला शेवटी उशीर होत असल्याने आम्ही माघारी फिरलो
3. आमच्या ऑफिस मधला नविन जॉईन झालेला एक सांगत होता जेव्हा तो आपल्या कॉलेज ग्रूप बरोबर माथेरान ला गेला होता तेव्हा दिवसभर फिरून फिरून हे भाळतीलडेच गेले होते परत हॉटेल ला यायला रात्र झाली पण त्यांच्या ग्रूप मध्ये एक मुलगी होती तिने काळ्या कलर ची जीन्स व टॉप घातला होता तिला मधेच चक्कर आली होती , हे सर्व जण जेव्हा घरी आले तेव्हा तेव्हा पासून ती मुलगी सतत आजारी पडायची खूप डॉक्टर झाले पण काहीच फरक पडत नव्हता अखेर अस दीड दोन वर्षे चाललं अन अखेर तिचा मृत्यू झाला...
कदाचित हे सर्व निव्वळ योगायोग व भास असतील उगीचच अश्या सुंदर ठिकाणाला बदनाम करायचा कोणताही हेतू नाही , मला आजही माथेरान ला भटकायला खूप आवडते ...

असं फिरून फिरून त्याच जागी पुन्हा पुन्हा येणं होऊ शकतं. मी स्वत: याचा भरपूर अनुभव घेतलेला आहे.
आमच्या गावाच्या शिवेवर असंच एक ठिकाण आहे. शे-दोनशे वर्षांआधी कोणा श्रीमंत सावकाराचा वाडा होता तो. आता फक्त पडके अवशेष तेवढे उरलेले आहेत. बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात त्याच्याबद्दल. तो परिसर आजही डरावना आणि निर्मनुष्य असतो. लोकं घाबरतात तिकडे जायला.
साताठ वर्षांआधी मी न् माझी गर्लफ्रेंड कित्येक महीने फिरून फिरून त्या एकाच जागी वारंवार जायचो. तेथे पोहोचल्यानंतर काळाची गती धिमी वगैरे व्हायची. स्वत:चं भान उरायचं नाही. असं अनेक महीने चाललं होतं. कसं ते माहीती नाही पण आमच्या घरच्यांना कुठूनतरी याची भणक लागली. त्यांनी आपल्यापरीने अनेक उपाय योजून पाहीले पण फेल न् मग काय शेवटी वैतागून ब्राह्मणच्या हातून भलीमोठी पूजा घातली न् आमचं दोघांचं पुन्हा पुन्हा त्याच जागी जाणं कायमचं बंदच झालं.

आम्ही दोघांनी तुमची गंमत करावी म्हणून सहज एकदोन चिंचेची बोटकं वरून काय खाली टाकलीत तुम्ही हवेतच तरंगायला लागलात राव..>> Rofl
काय हे हाआ! इतकंपण स्पष्ट बोलु नये कधी.

मी त्यावेळी सिंगल होतो. ती हडळ पण बहुतेक सिंगल होती.>>>
ती सिंगल होती हा तुम्ही करुन घेतलेला सर्वात मोठा गैरसमज होता महाशय! - Lol

अमानवीय लऊ ट्रँगल है ये तो

अमानवीय लऊ ट्रँगल है ये तो>> Lol
हाआ सर आणि हाडळमॅडम चिंचेच्या झाडावर बसुन मस्त चिंचा खाताहेत आणि बोकलतसाहेब चिंचेच्या झाडाकडे बघुन गाणं म्हणत आहेत असे चित्र डोळ्यासमोर आले. Light 1

तीन वाजल्यापासून बाहेर फिरतोय. आमच्या एरियात सगळ्या दारावर रात्री तीन वाजता टकटक होते. दरवाजबाहेरून कोणत्यातरी ओळखीच्या माणसाचा आवाज येतो. दरवाजा उघडल्यावर बाहेर कोणीही नसतं. अजूनतरी कोणी दिसलं नाही. पुन्हा घरी जायचा विचार करतोय.

मग आमच्या इकडे कुणी केलं टकटक रात्री तीन वाजता ??मला आजुबाजच्यांनी फोन करून विचारले तुमच्या हि दारावर टकटक होतेय का??

बहुतेक हडळ चिंचा खाऊन मॅटर्निटी लिव्ह वर गेली असेल..>>>>मुलगी झाली तर हडळुली आणी मुलगा झाला तर हडळेश नाव ठेवावे.

Pages