दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉन नाहीये... याच फ्रेम मध्ये पुढे एका सुंदरी चा हात येतो. हिरो हिरोईन दोघांचेही नातेवाईक सिनेमा मधले आहेत ..

नसावा. हा कुणीतरी रोमँटीक छाप अनिल कपूर टाईप्स असावा - (लेट ९०ज, मिडल असावा). पांढरा शर्ट तो पण झब्बा घालून रंगवतो म्हणजे पुढचा सीन रंग त्याच्यावर उडणे किंवा चित्र जिवंत होणे इ काहीतरी असणार...

(कैसी है ये रूत पाहून आले पण त्यात अक्षय खन्ना झब्ब्यात घरात नाही!!!!!!!)

मला क्लू च देता येत नाहीत Happy सी, इतकं मागे नको जाऊस
हिरो चां एका खेळावर सिनेमा येत आहे.. हिरोईन तिच्या एका टीव्ही शो मधल्या सामान्य ज्ञानावरून ट्रोल झाली होती ..

यस्स

भारी आहे हा धागा. पण माझा श्रमाते इतका अभ्यास नाही Proud शिवाय जुन्या गाण्यांत विकेट पडते. त्यामुळे मी वाचनमात्र असते इथे पुष्कळदा

'श्रद्धा ए_श्रद्धा कोडं आलं बग....' >>>> Lol

तिच्याइतका अभ्यास कुणाचाच नाही पण म्हणून आपण चिकाटी सोडायची नाही Wink मै अपने जिले का इंडियन आयडल हूं तसं ...
(संदर्भः https://www.youtube.com/watch?v=DpyKrONKdCs)
येत जा गं अधून मधून, मदत होते इतरेजनांना.

John चित्रकार आहे का<<<< हे गाण्यात सुद्धा विचारता आले असते तुला.. 'ये जॉन चित्रकार है? ये जॉन चित्रकार है??'

अबरहम कर के अगला पझल दे दो.

Pages