Who killed value of engineering in India?

Submitted by mrunali.samad on 3 November, 2020 - 11:49

Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?

भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.

तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>२-३ वर्षात टीम लीड, मग २-३ वर्षात मॅनेजर बनायची घाई. एकदा मॅनेजर झाले की कोडिंग विसरायचे आणि एक्सेल भरत बसायच्या, असे हे कामाचे स्वरूप.

मुद्दा बरोबर आहे!
आयटी मध्ये मिळतही असेल इतकी पटापट ग्रोथ पण इतर इंडस्ट्रीजमध्ये लीड रोलमध्ये जाण्यापूर्वी बऱ्यापैकी घासावी लागते.
माझा स्वताचा (embedded industry मधला) अनुभव असा आहे की चांगले आठ दहा वर्षे ट्रेनी, इंजिनीअर, सिनिअर इंजिनीअर, लीड इंजिनीअर वगैरे रोलमध्ये हात काळे केल्यावर मगच (लांबून सुखाची वाटणारी) टीम लीड, मॅनेजरकीची टायटल मिळतात.
आणि आजकाल यातही अनेक सर्टिफिकेशन्स आहेत.... PMP आहे, ScrumMaster आहे, MBA तर आहेच.... नुसत्या एक्सेल भरुन भागत नाही.... नवीनवी मॅनेजमेन्ट फ्रेमवर्क शिकावी लागतात..... कस्टमरगणीक टूल्स बदलतात.... पीपल मॅनेजमेन्टमध्ये तर प्रत्येक नवा अनुभव काहितरी शिकवून जातो..... त्यामुळे मॅनेजर झालात तरी शिक्षणाला अंत नसतोच!
You have to keep upgrading yourself to stay relevent Happy

लोकांनी आपली निरीक्षणे यथाशक्ती नोंदवलीत mrunali.samad. तुमच्या मांडलेल्या / मनातल्या पण मांडल्या न गेलेल्या शंकांना / प्रश्नांना अपेक्षित अशी आहे का या सर्व मतमतांतराची दिशा?

Engineeringच्या शिक्क्याचे भारतीय समाजातील ग्लॅमर हेही कारण असावे?
इंजिनिअरिंग कॉलेजेसच का आयआयट्या पण कैक झाल्या आता भारतभर. पूर्णवेळ / अर्धवेळ / सायंकालीन वर्ग घेणार्‍या मॅनेजमेंट संस्था झाल्या पैशाला पासरी. तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायचे उद्योग. बाहेर पडून अधांतरी लटकणार्‍या मुलांचा विचार त्यांनी का करावा? त्यात काही फायदा असतो का? आणि त्यांना दोष देताना,
मेंढरांसारखे धक्काबुक्की करत धावण्याआधी आपण पालक / विद्यार्थी म्हणून विचार करतो का? की आपण कुठे जातोय, का जातोय, पोचणार आहोत का आपल्या अपेक्षेनुसार / दाखवल्या गेलेल्या स्वप्नानुसार....

बरं अगदी आयआयटीतून शिकून पुढे तांत्रिक कामात मन रमत नाही म्हणून मग चिरलेल्या / निवडलेल्या भाज्यांचा व्यवसाय, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम / एनजीओ इत्यादि करणारे पण आहेत. तेव्हा आयआयटीची ब्रँड वॅल्यू कामी येते भांडवल उभे करायला. मेकॅनिकल, प्रोडक्शन, सिविल कुठलीही डिग्री असली तरी नोकरी आयटीतच हवी असते. शॉपफ्लोअर, मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन साईट येथे काम करताना होणारी दगदग नको असते. कितीतरी कंगोरे आहेत विचारात घेण्यासारखे...

टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सुद्धा वास्तवात पॅथेटिक असू शकतात. आत गेल्यावर कळते. काय करणार आहोत आपण? AICTE चे नॉर्म्स ठरवणार आहोत? तंत्रशिक्षणमंत्र्यांना जाब विचारणार आहोत? आपल्या एरिआतील एकेका कॉलेजचे मूल्यमापन करून बंद पाडणार आहोत? आपल्या मुलांचे कॉलेज नाही निघाले चांगले तर पुढचे शिक्षण थांबवणार आहोत? की त्यांच्याशी कायदेशीर लढा देऊन दर्जा सुधारायला भाग पाडणार आहोत?

तुम्ही पाहिलेले इंजिनीअर्स प्रामाणिक म्हणेन मी. नैराश्याच्या चक्रात जाण्याऐवजी आपण फसलो, चुकीच्या रस्त्याने गेलो हे वेळीच समजून निदान स्वावलंबी तरी झाले. गुणवत्ता असेल तर योग्य संधी मिळताच येतील पुन्हा मूळ शिक्षणाशी निगडीत व्यवसायात... आणि ही गुणवत्ता व्यक्तीत उपजत असते. पुस्तकी शिक्षणात किंवा शिक्षणसंस्थेच्या बाजारमूल्यावर नसते इतकेच नोंदवेन.

फक्त engineer degree बद्दल ही वानवा नाहीये. पूर्वी 10वी झालेले खुप असायचे, मग graduation वाले, आता post graduation वालेही बरेच असतातं. पण त्या त्या विषयातील skills येत नसतात, रट्टा मारणे झालंय. फक्त नावाला degree..
मी ही developer post साठी interview घ्यायचे, नुकतेच distinction मिळवून आलेले they can't explain basic things, मग खरंच कीव येते.
करावी, अमर यांच्या प्रतिसादाशी सहमत

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माझ्या पाहण्यात असेही आहे, खूपशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगमधे इंटरेस्ट नसतो. फैमिली,सोसायटी इश्शुज म्हणून नाईलाजाने एडमिशन घेतली जाते.
एक रिसेंट उदाहरण आहे,
ओळखीतल्या फैमिलीत एक आहेत ज्यांनी मला फोन करून तुम्ही मुलीला समजावा कि इंजिनिअरींगलाच एडमिशन घे असा आग्रह केला. कारण त्यांनी बारावी पर्यंत मुलीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले आहेत म्हणून त्यांना वाटतय इंजिनिअरिंग जावं मुलीने पण मुलीला कॉमर्सला जायची इच्छा आहे.

इंग्रजीची बोंब आहे सार्वत्रिक.

>>>>>

मुळात आपण ईंग्रजीला अवाजवी महत्व देऊन ठेवलेय. ती फक्त एक ज्ञान आणि माहितीचा साठा मिळवायची भाषा आहे. पण आपण ईंग्रजीवरूनच लोकांची अक्कल आणि दर्जा जोखू लागलोय. याला भाषेची गुलामगिरीही म्हणू शकतो. एकीकडे ईंग्रजी छान बोलता येत नाही त्यांना याचा न्यूनगंड कसा येईल हे आपण बघतो. तर दुसरीकडे आपली मातृभाषा बोललो तर आपले ईम्प्रेशन डाऊन तर नाही ना होणार हा न्यूनगंड घेऊन आपण जगतो. काय गरज आहे एखादा चांगला ईंजिनीअर बनायला फाडफाड ईंग्लिश फाडायची.. तर काही नाही !

इंजिनियरिंग कोणत्या भाषेतून शिकतो आपण, मुळात ती भाषा नसेल येत तर ज्ञान कसे आत्मसात करणार, फाडफाड बोलता नाही आली तरी संज्ञा कळण्या करता इंग्रजी यायलाच हवी

Who killed value of engineering in India? >> या शीर्शकाचा अर्थ वेगळा होतो. Who killed value of engineering डिग्री in India? असे पाहिजे, नाही का. ? सगळ्या मंडळींनी हाच अर्थ घेतलाय ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे.:) मला टायटल वाचून वाटल होत आता इंजिनियरींग शाखा संपली की काय.

इंजिनियरिंग शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. पण ते फक्त इंजिनियरींगच्या बाबतीत लागू आहे असे नाही. सर्व क्षेत्रातच तीच बोंब आहे. शाळा , कॉलेजे, शिक्षण ह्या गोष्टी लुटण्यासाठीच निर्माण केल्या जातात की काय अशी सर्वसामान्य परिस्थिती दिसते आहे. अपवाद आहेत नाहीत अस नाही. पण सध्याच्या व्यवस्थेत ते अपवादच रहाणार.

स्कील इंडिया हा एक चांगला उपक्रम आहे.

इथे सगळे गम्भीर इंजिनिअर पाहून थोडे दडपणच आले. मला तर एमस करून आलो तरी काय शिकलो नेमकं ते अजून कळलं नाय. काठावर पास मंडळी नाहीत का कुणीच ? Sad
ते दाताचे डाक्तर आणि आर्कीतेक्तबी लै झालेत सगळीकडे. त्यांचाबी धागा येउद्या

मी आहे ना.
इंजिनिअरिंग चे विषय आता पाहिले तरी कशी शिकले असं वाटतं.
बहुतेक हॉस्टेल, त्याबरोबरच्या गंमतीजमती याबरोबर कंपल्सरी पचवायचं कडू औषध म्हणून इंजिनिअरिंग केलं असावं.
मला केमिस्ट्री शिकायला आवडते.

इंजिनियरिंग कोणत्या भाषेतून शिकतो आपण, मुळात ती भाषा नसेल येत तर ज्ञान कसे आत्मसात करणार, फाडफाड बोलता नाही आली तरी संज्ञा कळण्या करता इंग्रजी यायलाच हवी
>>>>>>

एक्झॅक्टली! तेवढी येणे पुरेसे आहे. म्हणून तर मी अवाजवी शब्द वापरलाय.
जर एखादा फाडफाड ईंग्लिश न येणाराही ईंग्लिशमध्ये ईंजिनीअरींग शिकून आणि ईंग्लिशमध्ये पेपर लिहून चांगले मार्क्स काढत असेल तर तुम्हाला अपेक्षित आहे तेवढी ईंग्रजी त्याला येत असणारच ना…

आणि मग जर ईंजिनीअरींग वा मेडीकल वा एकूणच कुठलेही कॉलेज जर ईंग्लिशमध्येच शिकवायचे असेल, आणि पुढे जाऊन तिलाच जास्तीचे महत्व द्यायचे होते, तर मुळात मुलांना शाळेत मराठीत का शिकवत होते? त्यामुळे हल्ली मराठी शाळांचा टक्का कमी होत ईंग्लिश शाळांचा वाढतोय हे खूप चांगले होतेय. निदान शाळेत आपण वेगळे शिकतोय आणि बाहेरच्या जगात वापरावे लागणारे ज्ञान वेगळे आहे हे समजल्यावर मुलांची तारांबळ तरी उडत नसेल.

पण शाळेत काय माहिती आपण पुढे इंजिनिअरिंगलाच जाणार आहोत ते? कुणाला इतिहास संशोधक किंवा भाषातज्ञ व्हायचे असेल तर?

व्हाईटहॅट वर खूप चर्चा सगळीकडे चाललेली असते.
आपलं मूल वुल्फ गुप्ता बनून त्याला कोट्यावधी चं पॅकेज मिळण्याचे प्रयत्न करायला अजून बराच वेळ आहे इतकं कळलं तरी झालं.
'कोडिंग शिकणे' आणि प्रोग्रामर बनणे या नोकऱ्या पुढच्या 10 15 वर्षात नसतील.एखाद्या ऍप ला आपल्या सर्व मागण्या सांगायच्या आणि सर्व कोड लिहून मिळेल असं काही येईल.ही ऍप सांभाळणे, या ऍप मध्ये जास्त जास्त अक्कल टाकणे असे जॉब बनतील पण त्याला खूप चांगल्या लेव्हल चं प्रोग्रामिंग लागेल.
अमक्या झऱ्याचं जादुई पाणी, तमका मॅग्नेटिक बेड, ढमकी व्यायाम न करता वजन कमी करणारी ग्रीन कॉफी यांच्या सारखंच व्हाईट हॅट एक.ज्यांना परवडेल ते शिकवतील.बाकीचे पालक शांतपणे लांब राहतील.
अगदी ज्यांना मोठ्या गाड्या किंवा अनेक दिवसांच्या फॉरिन सुट्ट्या परवडतात असे लोकही व्हाईट हॅट च्या जाहिरातींना भुलत नाहीयेत.
कायदेशीर रित्या त्यांचे अचाट नोकरी चे दावे त्यांनी काढले तर त्यांना एक महाग सॉफ्टवेअर क्लास बनायचा पूर्ण हक्क आहे(ते शिकवत असलेलया सर्व गोष्टी उत्तम प्रकारे फुकट युट्युब आणि उडेमी वर उपलब्ध असल्या तरी)

इंजिनिअरिंग कॉलेज उघडणे हा नोटा छापायचा धंदा आहे>>> शिक्षणसम्राटानी यावर कोट्यवधी कमावले आहेत व अजुन कमवत आहेत तरी याना आणि यान्च्या जातबान्धवाना आरक्षण पाहिजे. चाणक्य याला हातभार लावुन आपल्या मित्रान्चे भले करायच्या मागे आहेत.

व्हाईटहॅट वर खूप चर्चा सगळीकडे चाललेली असते. >>>
यापैकी बऱ्याच कंपन्या एड्युटेक नसून एड्युमार्केटिंग आहेत.

'एज्युकेशन' ही आता एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे. म्हणजे
'अमुक पैसे == अमुक स्किल'
'अमुक पैसे == मुलाला परदेशात मॅच आणि १ महिना ट्रेनिंग'
'अमुक पैसे == 'थेट केंब्रिज युनिव्हर्सिटी चा पोर्शन भारतात'
'अमुक पैसे == वर्गात १० मुले आणि प्रत्येकाकडे लक्ष'

ज्यांच्याकडे पैसे आहे ते खर्च करत असतील. हे पैसे खर्च न करता पुढे येणारेही असतील.
व्हाईटहॅट मला स्वतःला अजिबात पटत नाही. त्याचे ट्रायल सेशन घ्यायलाही घरात कडाडून विरोध केला. नंतर ते हजार फोन करणार मार्केटिंग चे.
व्हाईट हॅट चे जाहीरातीतले दावे चुकीचे आहेत, त्याबाबत कंझ्युमर फोरम कडून कारवाई नक्की व्हावी. पण त्यांना ते दावे न करता नुसताच महागाचा क्लास बनायचे असेल तर कोणी अडवू शकत नाही. तसेही इतर महागाचे क्लास अस्तित्वात आहेतच.

अनु तुमचे मत पटले. आधिच पालकांचे इंजीनियरिंग आणि मेडिकल चे भूत उतरले नाही . तोपर्यंत हे कोडिंग चे नवे खूळ.

मी इंजिनिअरिंग ला असताना पर इयर रू. 44,000/- इतकी फि होती.जस्ट एक वर्षे आधी फ्रि सीट्स बंद झाल्या होत्या तेव्हा.
आजकाल किती फि आहे इंंजीनीयरींग ची??

यंदा पुण्यात फर्गीच्या आर्ट्सचा कट ऑफ सगळ्यात जास्त होता सायन्स आणि कॉमर्स पेक्षा. हे इंजिनिअरिंगचे खूळ पण जाईल थोडया वर्षात अजून बेरोजगारी वाढली की. 44000?? पूर्ण शिक्षणाचा खर्च पण नाही झाला एवढा. लॉ कॉलेजची 2002 ची पहिल्या वर्षाची फी 1800 की 1900 होती. आणि तेंव्हा लॉ कॉलेज चे रँकिंग 1ले किंवा फारतर 2रे असेल पूर्ण भारतात.

44,000 ची ४% महागाईदराने २० वर्षांनी साधारण १ लाख होते. ६% महागाई दर धरल्यास १.५ लाख होते.
सो इंजिनिअरिंगची फी फार वाढलेली नाही म्हणावं का? Wink Happy
आमच्या काळी ४,००० होती. शेवटची दोन वर्षे १०,००० झालेली मला वाटतं.

२००१/२ ला फ्री सीटची फी ४ ची १०हजार झाली होती.
पुढे बहुतेक फ्री सीटच कॅन्सल झाल्या आणि प्रत्येक कॉलेज आपली फी ठरवू लागले. ९०च्या आधी बहुतेक तसेच होते.

११ लाख फी + हॉस्टेल इ खर्च धरता जर ~ २० लाख शिक्षणाचा खर्च असेल तर - त्याऐवजी कुठेतरी चिमुकल्या शहरात एक प्रॉपर्टी विकत घेतली भाड्याने देण्यासाठी तर अपत्य फार काही तोशीस न करता आयुष्यभर उत्पन्न मिळवू शकेल, नाही?
(असं करावे ह्या मताची नाही. हा एक असाच र्हेटोरिकल प्रश्न आहे. र्हेटोरिकलला मराठीत काय म्हणतात माहिती नाही.)

आमच्या काळी ४,००० होती. शेवटची दोन वर्षे १०,००० झालेली मला वाटतं. >>>> हो. पहिली दोन वर्ष फ्रि सिट ४००० आणि पेमेंटची ३२०००.
नंतर फ्रि चे १०,००० झाले. पेमेंटचे तेव्हडेच होते.
त्यावेळची ती सेंट्रलाईज्ड प्रोसेस चांगली होती खरतर. ३०% संपूर्ण महाराष्ट्रातले आणि ७०% लोकल.
नंतर सगळेच ऑटोनॉमस व्हायला लागले.

Pages