Who killed value of engineering in India?

Submitted by mrunali.samad on 3 November, 2020 - 11:49

Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?

भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.

तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आता कोणीतरी विषयाला योग्य जागी आणणारा प्रतिसाद द्या > Who killed value of engineering in India? Happy

खालील प्रतिसाद पूर्णपणे माझ्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे.
(२००५ मध्ये पुणे विद्यापीठाशी संलग्न खाजगी कॉलेजमधून मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर झाले आहे)

मागे वळून बघताना इंजिनिअरिंगच्या दिवसांमधल्या खटकणाऱ्या, ' हे याहून चांगलं होऊ शकलं असतं, असायला हवं होतं' असं वाटायला लावणाऱ्या काही गोष्टी आहेत.

1. चांगले शिक्षक कमी असणे (प्रोफेसर, लेक्चरर, व्हिजिटिंग प्रोफेसर या सगळ्यांना मिळून शिक्षक हा शब्द वापरला आहे)
चांगल्या शिक्षकाकडून खालीलपैकी काही किमान अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं.

१. प्रामाणिकपणे वेळेवर वर्गात येणे (हे खूप गृहीत धरतो आपण, पण ही अपेक्षाही सगळ्यांकडून पूर्ण होत नाही. मी नंतर सीओईपीत पोस्ट-ग्रॅज्युएशन केलं तेव्हा एक मॅडम रोज हमखास कमीतकमी ५-१० मिनिटं उशिरा यायच्या आणि ५ -१० मिनिटं लवकर सोडायच्या )

२. विषय, त्यातल्या मूलभूत संकल्पना समजावून सांगणे. (नंतर GATE देताना हे लक्षात आलं होतं की आपल्या बऱ्याच बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नाहीत Sad )
मूलभूत संकल्पना समजल्या की विषयात 'मजा' येऊ लागते. हा अनुभव आहे.

३. Approachable असणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करणे

४. अगदी सगळा जमला नाही, तरी बराचसा syllabus वर्गात शिकवून पूर्ण करणे.

इंजिनिअरिंगला आल्यानंतरसुद्धा शिक्षकांवर एवढं अवलंबून राहावं का, असं कुणाला वाटत असेल. पण स्व-अभ्यास करण्याला मर्यादा असतात. कठीण संकल्पना कुणी समजावून दिल्या तर जास्त चांगल्या आणि लवकर कळतात असं मला वाटतं.
फर्स्ट इयरचे आमचे बहुतेक सगळे शिक्षक चांगले होते. पुढच्या तीन वर्षांमध्ये मात्र, म्हणजे जेव्हा त्या त्या branch चे मुख्य विषय शिकवले जातात तेव्हा मात्र अक्षरशः हाताच्या बोटांंवर मोजावे एवढे कमी शिक्षक चांगले होते. जे चांगले होते, त्यांच्याबद्दल

१. एक सर, जे वयाने आणि अनुभवाने खूप ज्येष्ठ होते, त्यांचा भर हा मूलभूत संकल्पना समजावून देण्यावर जास्त होता. विषयाचं मर्म, practical मध्ये नेमकं काय शिकायचं, हे ते खूप छान शिकवायचे. त्यांनी सेकंड इयरला एक आणि लास्ट इयरला एक, असे दोन विषय शिकवले.
२. एक मॅडम होत्या, त्यांचा विषय तसा सोपा आणि स्कोअरिंग होता. (Computational techniques) त्यांनी त्या विषयाला साजेशी पद्धत वापरली, ती म्हणजे दर पंधरावीस दिवसांनी त्या टेस्ट घ्यायच्या, पेपर्स तपासून द्यायच्या. त्यामुळे आमची त्या विषयाची तयारी चांगली झाली.
३. एक व्हिजिटिंग प्रोफेसर होते, त्यांचापण भर मूलभूत संकल्पनांंवर होता आणि ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून आम्हाला विचार करायला लावायचे.

४. याशिवाय काही नवीन लागलेले शिक्षक होते, जे त्यांच्या परीने मेहनत घ्यायचे, विचारलेल्या शंकांची उत्तरं तेव्हा देता आली नाहीत, तरी नंतर द्यायचे.

2. 'पीएलमधे बघू' ही विद्यार्थ्यांची चुकीची सवय-
प्रत्येक सेमिस्टरच्या पीएलमधे हे जाणवतं की आधीपासूनच अभ्यास केला असता तर जरा बरं झालं असतं. पण ही चूक शेवटपर्यंत सुधारली जात नाही. यात थोडा गतानुगतिक असण्याचाही भाग असतो. विशेषतः होस्टेलवर राहणारा एखादा मुलगा किंवा मुलगी जर सुरुवातीपासून अभ्यास करत असेल तर 'घासू', 'सिन्सिअर' अशा आणि यापेक्षा शेलक्या टोमण्यांचा सामना करावा लागतो.

3. सबमिशन नावाचा अनुत्पादक प्रकार-
Practical समजून घेऊन, प्रामाणिकपणे करणं, त्याच्यामागची थिअरी समजून घेणं, observations, results, conclusion नंतर नीट लिहून काढणं एवढं पुरेसं असलं पाहिजे. पुढच्या Practical च्या वेळी ते तपासून घेतलं की झालं. सेमिस्टर संपता संपता जिवावर आल्यासारखं पानंच्या पानं निरर्थक मजकूर लिहून काढणं, रांगा लावून ते तपासून घेणं यात काय अर्थ आहे?
त्यातून काहीही साध्य होत नाही. वेळ तेवढा वाया जातो. यातून त्या टॉपिकबद्दल काहीही आस्था निर्माण होत नाही.

4. संबंधित विषयाचा एक 'दृष्टिकोन' दिला जात नाही.
उदाहरणार्थ, आम्हाला सेकंड इयरला इंजिनिअरिंग मॅथ्स होतं, ज्यात फुरियर ट्रान्सफॉर्म, लाप्लास ट्रान्सफॉर्म, झेड ट्रान्सफॉर्म असे टॉपिक्स होते. पण तो सगळा विषय 'गणित' म्हणूनच शिकवला गेला. या सगळ्या गणिती प्रक्रियांंचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेत नेमका काय उपयोग होतो, आपण हे कशासाठी शिकतोय हे कुणी शिकवलंच नाही.
असं अनेक विषयांच्या किंवा टॉपिक्सच्या बाबतीत झालेलं असू शकतं.

चार वर्षं कॉलेजमध्ये काढून, पदवी मिळवूनही जर मुलगा/मुलगी चांगला/ली इंजिनिअर बनत नसेल, तर याला कारणीभूत वरीलपैकी अनेक गोष्टी आहेत असं मला वाटतं.

या संदर्भात हा खालील लेख वाचनात आला. विचार करण्यासारखे आहे हे. त्यातील काही वाक्ये जशीच्या तशी उर्धृत करत आहे....

'लातूर पॅटर्न’ची शोचनीय बाजू
दिवंगत वैज्ञानिक डॉ. वसंत गोवारीकर यांनी लातूरात आल्यावर या मॉडेलचे व मेरीटमध्ये येण्याचे जाहीर वाभाडे काढले होते. त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्दयाकडे लक्ष वेधलं होतं. ते म्हणाले होते, ‘हे जे विद्यार्थी भरपूर गुण घेऊन पहिले-दुसरे येतात, ते पुढे इंजिनिअरिंग-मेडिकलला गेल्यावर नापास का होतात? त्यांना साधं इंग्रजी बोलता येत नाही.’ आज या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येतं, यामुळे आमच्या पिढीचं किती नुकसान झालं ते.

पूर्ण लेखाची लिंक: https://www.aksharnama.com/client/article_detail/2238

अतुल सर तुम्ही दिलेली लिंक छान आहे. माझे मिस्टर पण लातूर पॅटर्नचे 1995चे विद्यार्थी आणि फर्स्ट इयर इंजिनीयरिंग ला ATKT लागली होती.पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्या लेखात दिले आहे ते सगळे खरे आहे.

जुना पॅटर्न काय होता आता नव्यात काय फरक आहे काही नीट समजलं नाही. मार्क मिळतात बाकी काही मिळत नाही शिवाय काही समजलं नाही.

आज पहिल्यांदा हा धागा पाहिला.
माझ्या आठवणीत इंजिनिअरिंग म्हणजे मुख्य शाखा या मेकॅनिकल / इलेक्ट्रीकल / सिव्हिल या असत. त्यानंतर कंप्युटर इंजिनिअरिंग सुरू झाले. त्या आधी अ‍ॅपल नीट इ. मधून सॉफ्टवेअर शिकून गेलेले अनेक जण यशस्वी झालेले आहेत. अ‍ॅपल प्रमाणे गल्लोगल्ली सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टीट्यूट झाल्या. त्यांच्याकडून फेक प्रमाणपत्र घेऊन काही जण परदेशात गेले आणि नोकरीला लागले. त्यांच्या मुळेच तक्रारी झाल्या आणि शासनाला धोरण आखावे लागले.
इथे दोन गोष्टी झाल्या. फक्त सॉफ्टवेअर शिकणा-याला इंजिनीअर म्हणू लागले. त्यासाठी त्याच्या माथी अनेक विषय मारण्यात आले.
खासगी म्हणजेच सर्वोत्तम या समजाला धक्का लागला. तरीही काही कॉलेजेस फक्त कंप्युटर इंजिनीअरिंगसाठीच उघडली गेली. कारण त्यांना व्यवसाय दिसत होता.
अ‍ॅपल आणि नीट मधे स्पर्धा होती तेव्हां त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात जसे बदल होतील तसे फ्लेक्झिबल अभ्यासक्रम आखले होते. शासनाच्या पातळीवर अभ्यासक्रमात बदल करण्यास बरेच दिवस लागतात.
हे झाले कंप्युटर इंजिनिअरिंग बद्दल.
मूळच्या इंजिनिअरिंगबद्दल पुढच्या प्रतिसादात.

भारतात जेव्हां इंडस्ट्री सुरू झाल्या तेव्हां त्यांना अभियंत्यांची निकड भासू लागली. त्या वेळी त्यांना इंडस्ट्रीच्या आवारात अ‍ॅप्रेंटीसशिपची परवानगी दिली गेली. इंडस्ट्रीज दहावी पास (त्याच्या आधी सातवी पास) मुलांना घेऊन त्यांना कारखान्यात हवे ते शिक्षण देत. त्याला पुढे आयटीआय म्हणू लागले. आजही कारखान्यात इंजिनीअर पेक्षा आयटीआयची गरज जास्त असते.

त्यांच्यावर पर्यवेक्षक म्हणून अभियंते हवे होते. त्यासाठी इंडस्ट्रीजच्या सहकार्याने अभ्यासक्रम बनवले गेले. मात्र यातून बाहेर पडणारे अभियंते संख्येने कमी होते. त्यामुळे डिप्लोमाला परवानगी मिळाली. त्यात डिग्रीचा अभ्यास सौम्य केला होता. त्यातून कारखान्यांची गरज भागली. कमी पगारावर पर्यवेक्षक उपलब्ध झाले. मग बीई मेकॅनिकल इंजिनीयरचे काम काय ?
त्यामुळे बीई होऊन भागेना. बीई + व्यवस्थापन केलेल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापक म्हणून नोक-या मिळू लागल्या. व्यवस्थापन आणि अभियंता हे दोन पूर्णपणे स्वतंत्र व्यवसाय आहेत. प्रोडक्शन मॅनेजर साठी बीई असणे समजू शकते.
सुरूवातीपासूनच इंजिनीअरिंगचे ध्येय काय याबाबत गोंधळ राहिला आहे. शासन हट्टाने अनेक विषय शिकवत राहते. त्यात वर्षानुवर्षे बदल होत नाही. दुसरीकडे तंत्रज्ञान बदलत राहते. त्याप्रमाणे इंजिनीअरिंग कॉलेजेसला मॉडर्न मशीन्स विकत घेता येत नाहीत. मेकॅनिकल इंजिनीअरिंग हा विषय मशीन्स हाताळण्याचा आहे. पण कॉलेजेस मधे बाबा आदमच्या जमान्यातली लेथ मशीन असते. तर कारखान्यात एनसी / सीएनसी लेथ असतात. स्पेशल मशीन्स असतात. होनिंग साठी प्रोग्रॅम्ड मशीन्स असतात. सरफेस फिनिश मोजण्यासाठी हाय प्रिसिजन इंस्ट्रुमेंटस असतात. याच्याशी मेकॅनिकल इंजिनीयरची तोंडओळख सुद्धा नसते. त्यातच इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग ही वेगळी ब्रँच सुरू झाल्याने मेकॅनिकल इंजिनीअरला आवश्यक अशा अनेक गोष्टी तिकडे वर्ग झाल्या.

यावर उपाय म्हणून ट्रेनी इंजिनीयर असे पद निर्माण झाले. दोन वर्षे ट्रिनींग घेतल्यावर मशीन्सची माहिती झाली कि त्या इंजिनीयरला आत्मविश्वास येत असे. पण ज्यांना ट्रेनिंग संपल्यावर त्याच कारखान्यात नोकरी मिळत नव्हती त्यांचे हाल कुत्राही खात नसे. कारण एका कारखान्यातले ट्रेनिंग दुसरीकडे निरूपयोगी असे. बीई होऊन स्वतःचा कारखाना टाकावा असा विश्वास नव्हता.

नंतर सँडविच अभ्यासक्रम आले. पण त्याच वेळी इंडस्ट्रीतून काम कमी होत गेले. फॅब्रिकेशन साठी ट्रेडसमनची गरज पडते. बरेच फॅब्रिकेटर्स जागतिकीकरणाचा फायदा उचलून फिलिपिन्स, इंडोनेशिया या देशातून स्वस्तात फॅब्रिकेशन करून घेऊ लागले. चीन मधे तर एसईझेड बनली. तिकडे बरेच कारखाने गेले. यामुळे मेकॅनिकला इंजिनीयरला काम उरले नाही. ते विप्रो, इन्फोसिस मधे येऊन लाईन बदलून सॉफ्टवेअर इंजिनीअरचे काम शिकू लागले. हे लोक सोडून जात नसल्याने त्यांना संधी मिळते.

सुरूवातीपासून बाहेरच्या जगाला अनुकूल असा अभ्यासक्रम फक्त सिव्हिल इंजिनीयरचा राहिला आहे. पण तिथे पगार कमी होते. सिव्हिल इंजिनीयरला आपला व्यवसाय सुरू करायला पैसा सोडला तर इतर अडचणी नव्हत्या. पण सिव्हिल इंजिनीयरला लागणा-या ज्ञानापैकी फक्त एका ट्र्क मधे किती वाळू, विटा बसतात आणि एका स्क्वेअर फूटाला किती खर्च येतो एव्हढे ज्ञान गरजेचे ठरले. ते मिस्त्रीकडेही असते. त्यामुळे अनेकांनी असा हिशेब येणा-या बीकॉम ग्रॅज्युएट्सना सुपरवायझर म्हणून नेमले. सह्यासाठी एखादा बेकार सिव्हिल इंजीनीयर मिळायचा. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात क्वालिफाईड पण जास्त पगार घेणारा अभियंता नकोसा झाला. सिव्हिल इंजिनीयर जर स्ट्रक्चरल इंजिनीयर असेल तरच त्याला काम मिळते. (अपवाद आहेतच).

थोडक्यात शासन दरबारी आणि बाहेरही ट्रेडसमन आणि अभियंता यातला घोळ संपलेला नाही. अभियंत्याकडे असलेल्या गणित आणि विज्ञानाच्या ज्ञानाची गरज संपलेली आहे.

भारतात काही परदेशी कंपन्या आहेत. तिथे एका ऑपरेशन साठी एक विशेष इंजिनीयर असतो. स्प्रिंग बनवणारी कंपनी असेल तर तिच्या मायदेशात दहावीनंतर मुलं घेतात. त्यांना स्प्रिंगसाठी लागणारे इंजिनीयरिंग इत्थंभूत शिकवले जाते. त्याला फोर स्ट्रोक इंजिनचे काम माहीत नसते. पण तो जगातला सर्वात उत्तम स्प्रिंग मॅन्युफॅक्चरर असतो. डिझाईनचा कोर्स वेगळा असतो. एकाच माणसाला सगळे शिकवत नसत नाहीत. यात एकच तोटा आहे. जर त्याला कामावरून काढले तर तो स्प्रिंगच्याच उद्योगात जाऊ शकतो. कदाचित हा विचार भारतात केला गेला असावा.

तळटीप : विविध इंजिनियरिंग कॉलेजेसमधले कँटीन , कारखान्यातले कँटीन्स, बांधकामाच्या साईटवरच्या माझ्या वडापावच्या गाड्या या व्यवसायात असताना अभियंते लोक खाता खाता ज्या गप्पा मारत त्यावर आधारीत प्रतिसाद आहे. कृपया अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नयेत.

शा मा, हा इंजिनियर वाला प्रतिसाद जबरदस्त आहे.
'भारतातला सॉफ्टवेअर इंटर्न आणि परदेशी ब्रँच मधला इंटर्न' यावर अश्याच स्वरूपाच्या चर्चा ऐकल्या आहेत.

माझ्या बॅच मधील दोन मुली माझ्या सुप्पर शाळ करी मैत्रीणी दहावीत बोर्डात येउन पुढे सीओ इ पी मधून डिग्री घेउन एकीने वडिलांचा हायली टे क्निकल मोठा बिझनेस सांभाळला आहे. व दुसरीने अमेरिकेत पुढील शिक्षण घेउन करीअर केलेली आहे. आपण डिग्री का घेतो व त्याचा पुढे आप्ल्या लाइफ गोल्स शी काही संबंध आहे का ते बघून इंजि डिग्री घेतली तर चांगले इंजी मिळतील. व पुढे येतील. माझी बहीणही इंजिनेअर आहे.
आय रिस्पेक्ट दीज लेडीज.

ज्यांना एक्स्पोजर नाही त्यांचे काय ? इंजिनीअरींगची डिग्री (व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणतात) घेऊनही परदेशात जाऊन पुढचे शिक्षण घ्यावे लागणे हे ध्येय शासनापुढे नक्कीच नसणार. आपण मूळ हेतूबद्दल बोलूयात. हे एका पुस्तकात सुद्धा आहे.

अ‍ॅप्टेकच्या आधीपासून अ‍ॅपल या नावाने ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती. तीच पुढे अ‍ॅप्टेक झाली किंवा कसे माहीत नाही.
नीट च्या ऐवजी एन आय आय टी असे लिहायला हवे होते का ? हे सोपे वाटले. रच्याकने, शॉर्टफॉर्म्स लगेच समजणा-यांना अडचण नाही.

ॲपल माहिती नाही पण दहावीच्या सुट्टीत काहितरी करायचे म्हणून Aptech चा प्रॉडिजी कोर्स केला होता त्यात सगळे Microsoft Office वगैरे शिकवले होते!!
पण Aptech फॉर्मात होते तेंव्हा नंतर NIIT चे जास्त नाव झाले!!

अ‍ॅपलचे कोर्सेस बसस्टॉपवर लिहीलेले असायचे.
वर्डस्टार, डीबेस, फॉक्सप्रो, बेसिक शिका वगैरे.

महागड्या कोर्सेस मधे
फोर्ट्रान, कोबोल, पायथन, बेसिक यांचे कोर्सेस त्या वेळी होते. (याचा उपयोग कुणाला झाला हा संशोधनाचा विषय आहे).
त्यानंतर सी, सी ++ आणि व्हिज्युअल सी आले. या दरम्यान अ‍ॅप्टेकचे नाव दिसायला लागले.

यानंतर ओरॅकल वगैरे.
नंतर या इन्स्टिट्यूट्सना चाप लागला.

@सियोना: Happy Happy मी हि लिंक माझ्या सुद्धा शाळेच्या ग्रुपवर पाठवली आहे. तेंव्हा आमच्या इकडे लातूर मोडेल चे नाव ऐकून माहित होते पण त्याबाबत खोलात कधी गेलो नाही

@ अमितव: माझे याबाबत जितके आकलन आहे त्यानुसार लातूर पॅटर्न म्हणजे ज्ञानार्जन साठी अभ्यास न करता केवळ गुण मिळवण्यासाठी अभ्यस करणे. येनकेनप्रकारेण मार्क मिळवायचे. त्यासाठी बोर्डाचे आधीचे वर्षांचे पेपर पाहून पुढील पेपर काय असेल. ऑब्जेकटीव प्रश्न कशावर येतात तपशिलात कशावर विचारतात इत्यादी इत्यादी बघून नेमके तेवढेच करायचे. पुस्तकातल्या अभ्यासापेक्षा बोर्डाचे पेपर सोडवण्यावरच जास्त भर असायचा. इत्यादी. अशी माझी समजूत आहे (यात काही चुकीचे असेल तर कृपया दुरुस्ती करावी ज्यांना माहिती आहे त्यांनी)

या लातूर पॅटर्न मुळेच चाटे क्लासेस उदयास आले व लोकप्रिय झाले (बरोबर ना?) याबाबत परवा एका वृत्तपत्राच्या फेसबुक फीड ला बातमी आली होती व त्यावर एकेकाने फार स्फोटक कॉमेंट्स लिहिया होता (त्यांची तेंव्हाची मोडस ओप्रेंडी चा पोलखोल करणाऱ्या). जर कुठे सापडली ती बातमी आता तर स्क्रीनशोट देतो.

>> अ‍ॅप्टेकच्या आधीपासून अ‍ॅपल या नावाने ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती. तीच पुढे अ‍ॅप्टेक झाली किंवा कसे माहीत नाही. नीट च्या ऐवजी एन आय आय टी असे लिहायला हवे होते का ?

अगदी अगदी Lol माझी पण अशीच आठवण आहे. स्टीव्ह जॉब्स ची 'अ‍ॅपल' नंतर माहित झाली आधी हीच 'अ‍ॅपल' माहित होती. मला वाटले माझीच गफलत होतेय कि काय. पण शांमा यांच्यामुळे दुजोरा मिळाला. अ‍ॅप्टेक कधीकाळी अ‍ॅपल होती याचा कुठे पुरावा मात्र मिळत नाहीये.

एन आय आय टी विरुद्ध नीट हे सुद्धा आठवतेय. मी त्यांच्या एका शाखेत जाऊन (तेंव्हा टेचात होते तिथे सगळे ट्रेनर्स टाय वगैरे घालून यायचे Lol ) त्यांना 'मला नीट विषयी माहिती हवी आहे' म्हणालो तर तो म्हणाला 'सर्वात पहिली माहिती हि आहे कि याचे नाव नीट नसून एन आय आय टी आहे' Lol मी मनातल्या मनात म्हणालो 'म्हणजे नीट बोलायचं नाही का?' Biggrin

@शांत माणूस तुमचे मोठे प्रतिसाद रोचक आहेत असे दिसतेय जरा सवडीने वाचतो Happy

>> फोर्ट्रान, कोबोल, पायथन, बेसिक यांचे कोर्सेस त्या वेळी होते. (याचा उपयोग कुणाला झाला हा संशोधनाचा विषय आहे).

Lol जुन्या आठवणी जागृत झाल्या. मला वाटते या धाग्यावर चर्चा न करता 'संगणक आणि जुन्या आठवणी (पहिली ओळख प्रशिक्षण कोर्सेस इत्यादी)' असा काहीसा धागा करावा. अनेकजण लिहितील. माझ्याकडे पण आहे लिहिण्यासारखे.

Pages