Who killed value of engineering in India?

Submitted by mrunali.samad on 3 November, 2020 - 11:49

Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?

भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.

तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ Submitted by स्वरुप ---
माझं कोणी शिकत नाहीये सद्ध्या पण, हेही जुनेच आहे. आणि फक्त इंजिनिअरिंगमध्ये नाहीये.
शिक्षक कंटाळवाणे म्हणून मुलाना रस वाटत नाही; मोजकी मुले सोडता बाकीचे उपस्थिती + ओरलला नडायला नको म्हणून बसतात. हल्ली मोबाईल असतो वेळ घालवायला. आधी फुलीगोळा खेळायचे, स्केचेस करायचे.
आणि मुले जुलूमाचा रामराम करतात, ट्यूशन, तयार नोट्स आहेत म्हणून शिक्षक पाट्या टाकतात. काहीच अपवाद असणार.

शिक्षणसंस्था ........ द्वंद्वात अडकलेल्या आहेत....?
कोण जाणे !? कोणी प्राचार्य, व्यवस्थापक ओळखीत नाहीत. काही असतीलही शिक्षणासाठी संस्था म्हणून शिक्षणाचा दर्जा ही प्राथमिकता असणारे.
पण आम्हा सर्वसामान्य लोकांचा समज असा की संस्थांना फी घेणे, स्वतःच्या नफा मार्जिनची काळजी घेणे, रिझल्ट कागदोपत्री चांगला दिसेल + कॅम्पस प्लेसमेंट डेटा आकर्षक दिसेल जेणेकरून त्याची जाहिरात करून पुढच्या वर्षी अधिक फी, अधिक गर्दी खेचता येईल. यातच जास्त रस असतो.

मग अधिक गाळात नेणारे दुष्टचक्र सुरू होते, सुरू रहाते. दर्जाचे तीनेतेरा होतात.
ना मुले, ना पालक, ना शिक्षक, ना नोकरी देणारा समाधानी.

तुमच्या दुसर्‍या प्रतिसादातला उपाय चांगला वाटतोय. तो तितक्याच आस्थेने + शिस्तीने राबवणारा हवा. याला उत्सुक मुले नक्की मिळतील. सद्ध्या तीही दिशाहीन, मजबूर झालीत. शेवटी पोट भरल्यावर बाकीचा तत्वनिष्ठपणा परवडतो. उपाशी + तत्वनिष्ठ रहात नाही हल्ली कोणी.

@ सर्व नवीन Submitted प्रतिसाद
on 19 December, 2020 - from 00:00 to 18: 30, @कारवी >>>>>>>>>>>>>

हो, बरोबर आहे तुमचे.

>>मग कुणासाठी इतका जीव आटवायचा?<<
तीसेक वर्षांपुर्वि आय्टि सर्विसेस इंडस्ट्रीचं ऑपरेटिंग मॉडेल फ्लॅट होतं. सगळे कंसल्टंट डिमांड असेल तशा प्रोजेक्टस्वर काम करायचे. इंडस्ट्री वर्टिकल्स, टेक्नालजी काहिहि अलाइनमेंट नसायचं. ते एकप्रकारे इंडस्ट्री/टेक्नालजी एग्नास्टिक मॉडेल होतं. त्यानंतर गेल्या १५-२० वर्षांत मॉडेल थोडं बदललं. टेक्नालजी स्ट्राँग, परिपुर्ण झाल्याने त्यानुसार प्रॅक्टिस लाइन्स निर्माण झाल्या - एसएपी, ओरकल, जेडि एडवर्ड्स, पिपलसॉफ्ट इ. या प्रॅक्टिस लाइन्स सगळ्या वर्टिकल्सना सेवा पुरवायच्या. सॉर्ट ऑफ इंडस्ट्री एग्नॉस्टिक; हॉरिझाँटल प्रॅक्टिस लाइन्स सर्विंग इंडस्ट्री वर्टिकल्स. आता गेल्या ८-१० वर्षातलं मॉडेल अजुन ट्विक झालं आहे. स्पर्धेत टिकुन रहाण्याकरता प्रत्येक वर्टिकल करता डेडिकेटेड, फोक्स्ड टेक्नालजी अलाइन्ड प्रॅक्टिस लाइन्स निर्माण झाल्या. एग्नॉस्टिक हा शब्द जो एकेकाळी प्रौढिने मिरवला जायचा तो आता नामशेष होत चालला आहे.

हे सगळं पुराण सांगण्याचा हेतु काय, तर हाच अ‍ॅप्रोच शिक्षणात, मुख्यत्वे कोर एंजिनियरींगच्या अभ्यासक्रमात यायला हवा; टेक्नालजीकल ट्रेंड्स अभ्यासक्रमात बेक करुन. कोर इंडस्ट्र्रीज मधे ऑटमेशन वाढतच जाणार आहे, त्याचा प्रभाव आणि दबाव कोर एंजिनियरींग्च्या शिक्षणसंस्थांवर पडायला हवा. असं झालं तरंच उठ्सुठ सगळे एंजिनियर्स आय्टित पळणार नाहित...

अमितव, फा, मंदार, धन्यवाद!
अमितव, प्रतिसाद पटला फक्त शाळेत प्रत्येकाने कोडींग शिकलं पाहिजे हे तितकेसे नाही पटले. जरी प्रत्येक माणसाला तीन वेळा खायला लागते तरी आपण शाळेत स्वयंपाक करायला शिकवत नाही. मग कोडींगचा आग्रह कशासाठी? जर त्या मुलाला किंवा मुलीला आवड असेल तर जरूर शिकू देत पण सरसकट सगळ्यांना शिकवण्याची काय गरज?
बाकी सर्व प्रतिसाद चांगले आहेत. Somehow we are not really thinking of how unpredictable future is going to be. There will be major disruptions in every field - climate change, energy crisis, natural disasters, jobless growth with automation/AI etc will keep changing the "normal". We all have experienced this first hand in the past few months. I think agility of intelligence and the ability to live without technology will be very important skills in the future.

>> climate change, energy crisis, natural disasters, jobless growth with automation/AI
Doomsday Prepers नावाची एक सिरीज होती नॅटजिओवर काही वर्षांपुर्वी, तुम्हाला आवडेल जिज्ञासा.

>> ability to live without technology
हे असं काही असु शकतं यावर माझा विश्वास नाही. तुम्हाला डिजीटल टेक्नॉलॉजी म्हणायचं आहे का सरसकट सगळीच टेक्नॉलॉजी?

>> वीजदेखील वापरत नाहीत

घरात रहातात, कपडे घालतात, भांडी वापरतात, अन्न शिजवायला सिलेंडर आणि आग वापरतात, पुस्तकं वाचतात.... हे सगळं टेक्नॉलॉजी शिवाय शक्य नाही.

अमित बहुधा कोडिंगचा "कन्सेप्ट" माहीत करून देण्याबद्दल म्हणत असावा. एखादा प्रॉब्लेम कोडिंगने कसा सोडवायचा याची ओळख जितक्या लौकर होईल तितके चांगले. त्यात फार वेळ घालवायचा की नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर असेल.

छान चर्चा सुरु आहे. वाचतेय.
>>प्रत्येक माणसाला तीन वेळा खायला लागते तरी आपण शाळेत स्वयंपाक करायला शिकवत नाही. मग कोडींगचा आग्रह कशासाठी? >>
देशात स्वयंपाक शिकवत नाहित हेच माझ्या मते चुकीचे. आमच्या इथे शिकवतात. होम इकॉनॉमिक्स मधे साधे शिवणकाम, बेसिक स्वयंपाक (स्टार्टर, मेन, डेझर्ट, ब्रेकफास्टचे पदार्थ, लेमोनेड - कॉफी- हॉट चॉकलेट) ,थोडे कंझुमर सायन्स असे असते. शिवाय भांडी घालणे, लॉण्ड्री आणि किचन सफाई.

मुलांना कोडिंग शिकवावे . जसे इतर अनेक गोष्टी आपण मुलांना अजमावून बघायला देतो तसेच कोडिंग. मुलांच्या विचाराला चालना मिळते, पायरी पायरीने प्रॉब्लेम सॉल्विंग कसे करायचे ते कळते. त्यांची या वयातील नैसर्गिक उत्सुकता आणि कल्पकता याचा वापर करुन जेव्हा ते काही तरी छोटेसे का होईना प्रत्यक्षात आणतात तेव्हा त्यांची शिकायची इच्छा अजूनच वाढते. बर्‍याच लहान मुलांना मॅथ शिकताना प्रश्न पडतो की हे कशाला शिकायचे. मॅथ, लॉजिक आणि कोडिंगची सांगड घालतो तेव्हा मुलांना शिकायला मजा येतेच आणि जोडीला मॅथ आणि लॉजिक कसे रोजच्या आयुष्यात महत्वाचे आहे ते ही उलगडते. आपण जो गेम खेळतो तो कुणीतरी कोडिंग केलेला आहे, आपल्या लंचमनीचा बॅलन्स दाखवणारे स्टेटमेंट असो की आपल्या ग्रेड्स दाखवणारे रिपोर्ट कार्ड त्यामागे कुणाचे तरी कोडिंग आहे हे कळायला लागते. घोकंपट्टी, मार्क वगैरे भानगडीत मुलांना न अडकवता शिकवावे. बागेत मटार, गाजर, टोमॅटो लावायला आणि नंतर स्वत: वाढवलेले तोडून खायला जशी मुलांना मजा येते तशीच मजा कोडिंगचीही.

व्यत्यय, doomsday preppers बघते. But I am not referring to a doomsday situation here. असा काही तरी दिवस येईल म्हणून तयारी करण्यापेक्षा असा दिवस येऊ नये म्हणून छोटे छोटे बदल करणे मला अपेक्षित आहे. Living without technology पेक्षा living without the use of low entropy energy whenever possible असे म्हणणे योग्य ठरेल. उदाहरणार्थ, लिफ्ट ऐवजी जिने, लहान अंतर चालत/सायकलने जाणे, replacing screen time with activities like gardening, knitting etc. साधं tinned Garbanzo beans (छोले) वापरण्याऐवजी रात्री छोले भिजत घातले तरी तुम्ही काही प्रमाणात कार्बन, वॉटर आणि एनर्जी फूटप्रिंट वाचवता. आता तुम्ही महिन्यात चार वेळा छोले करत असाल तर त्यातील दोन वेळा जरी कॅन न वापरता छोले केलेत तरी it becomes a step in the right direction.
माणसाने तंत्रज्ञानाच्या आधीन होऊ नये. प्रत्येक पिढी ही अधिक प्रगत तंत्रज्ञानासोबत वाढते आणि ते चूक नाही पण आत्ता आपण अशा वळणावर उभे आहोत की पुढची पिढी माणसाच्या अस्तित्वाची लढाई लढेल. I am in support of appropriate technology and appropriate use of it. We will need clever technological solutions to fight climate change and allied problems. But we need to develop a correct outlook for it. Imo, cutting down on unnecessary energy expenses will steer us towards this outlook.

स्वाती ताई, हे मला माहीत नव्हते! असं भारतातल्या शाळांमध्ये पण सुरू झालं पाहिजे!

अमित बहुधा कोडिंगचा "कन्सेप्ट" माहीत करून देण्याबद्दल म्हणत असावा. एखादा प्रॉब्लेम कोडिंगने कसा सोडवायचा याची ओळख जितक्या लौकर होईल तितके चांगले. त्यात फार वेळ घालवायचा की नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर असेल. >> हे पटण्यासारखे आहे.

हो. गणित आणि प्रोग्रॅमिंगच्या कन्सेप्ट साठीच म्हणत होतो म्हणून पायथॉन इ. नवख्याला सोप्या भाष्यांपेक्षाही स्क्रॅच सुचवली.
स्क्रॅच मध्ये सिन्टॅक्स विरहीत गणितातील आणि संगणकशास्त्रातील संकल्पना प्रत्यक्ष हाताळून बघत ओपन एंडेड वे मध्ये समजत जातात. जसं अंकगणितात व्हेरिएबल शिकवताना त्याच्याशी काहीच कनेक्शन जाणवत नाही (मला तरी जाणवलं न्हवतं), पण तेच स्कॅच मध्ये समोर दिसत असल्याने इटरेशन, कंडिशन, रॅंडम नंबर हे तयार केलेल्या खेळातील वाहनाचा वेग ठरवायला किंवा खेळाचा स्कोर लिहायला वापरले जातात तेव्हा मुलं इंटरॅक्टिव्ह गेम्स तयार करत असतात आणि डिझाईन प्रोसेस, डीबग, फीडबॅक या अगदी सर्वशाखांत वापरल्या जाणार्‍या समावेशक संकल्पना नकळत समजुन घेत असतात.
शरीरविज्ञान, स्वयंपाक हे जसं प्रत्येकाला आलंच पाहिजे तसंच आपल्या आजुबाजूच्या टेक्नॉलॉजीकल वस्तू वापरताना त्यात अशा बनवताना साधारण काय केलं असेल याचं खोलात नसेल तरी जुजबी ज्ञान तरी असावंच. घरात अन्न येतं त्यात शेतकर्‍याने नक्की काय प्रोसेस केलेली असते आणि त्यामागे किती मेहेनत असते हे जसं आपल्या आईवडिलांनी आपल्या मनावर बिंबवलं तसंच डोरबेल वाजली की फोन वर बाहेरच्या माणसाचा व्हिडिओ दिसतो, आपण भारतात असताना अमेरिकेतील गराज डोअर उघडं आहे का बंद हे आपण बघू शकतो. झोपायच्या खोलीत झोपायला आल्यावर घर फार थंड वाटतंय असं वाटलं तर खालच्या मजल्यावर असलेल्या थर्मोस्टॅटमध्ये हातातील फोन वरुन सहज फेरफार करू शकतो. ते कसं होत असेल? ते ढोबळ समजलं तरी सजगता येते आणि पुरेसं ही आहे. तो कोड काय आहे, तो करता यावा अशी अपेक्षा अजिबात नाही. पण काय चालू असू शकतं? ते जर तर्क नाही करता आलं तर काय सर्च केला तर आपल्याला समजेल? आणि ते मुलं अप्रिशिएटही करतील.
(वरची उदाहरणं मी माझ्या आजुबाजूची दिली आहेत. ती तुम्ही वापरत नसाल तर तुमच्या जवळची उदाहणे घ्या)

स्वयंपाक शाळेत शिकवावा का कुठे ते माहित नाही. पण ते बेसिक लाईफ स्किल नक्की आहे. जसं कर भरणे, पैशाचे व्यवहार करणे, समाजाचा भाग होऊन रहाणे इ. आहेत.

@जिज्ञासा: तुमचा मुद्दा (the ability to live without technology will be very important skills in the future.) या धाग्याच्या संदर्भात (Rise of unemployment in engineering graduates in India..) अजुनही पटला नाही. तुमच्या स्पष्टीकरणाचा प्रतिवाद इथे
खुपच अवांतर होईल म्हणुन आवरतं घेतो.

धन्यवाद व्यत्यय !! मुख्य विषयाची आठवण करून दिल्याबद्दल.
धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद वाचायला आवडतील.

व्यत्यय, मुद्दा धाग्याच्या संदर्भात नाहीये. मुद्दा अवांतरच आहे. त्यामुळे धाग्याच्या संदर्भात पटला नाही तरी चालेल पण पटलाच नाही असे असेल तर मग नक्कीच चर्चा करायला आवडेल. या खाली दिलेल्या माझ्या धाग्यावर उर्जेच्या अनुषंगाने थोडी फार माहिती आहे. खरंतर मला तिथेही दोन तीन गोष्टी लिहायच्या आहेत. तुम्हाला वाटल्यास पुढची चर्चा तिकडे करता येईल.
https://www.maayboli.com/node/75251

लहान मुलांना कोडींग शिकवणे म्हणजे आतापासूनच त्याला इंजिनीअरच बनवायचं आहे ठरवून टाकणे.लॉजिकल रिझनींग वाढवण्याचे बरेच बाकिचे पर्याय उपलब्ध आहेत.
कोडींग साठी मोठी इकोसिस्टीम मार्केटमधे पालकांना ट्रैप करायला तयार आहे आणि पालक त्या जाळ्यात इझीली अडकताएत.

कोडींग साठी मोठी इकोसिस्टीम मार्केटमधे पालकांना ट्रैप करायला तयार आहे आणि पालक त्या जाळ्यात इझीली अडकतात. >> हे जरी खरं असलं तरी कोडींग शिकवणे म्हणजे मुलाला किंवा मुलीला इंजिनीअरच व्हायचे आहे हे ठरवणं नाही. बेसिक स्वयंपाक, पैशांचे नियोजन, first aid या सारखेच आधुनिक यंत्र कशी चालतात याचे बेसिक ज्ञान असणे ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र याचा बाजार होऊ नये याच्याशी सहमत आहे.

Coding is required for engineers only in future.
It's not required for everyone.even they required they can learn comfortably once they will grow..It's not required for kids.
जेव्हा आधुनिक यंत्रे कशी चालतात हि रिक्वायरमेंट येते तीथे इंजिनिअर व्हायचे च असेच ठरवले जाते...
पायलट,मेडिकल, डॉक्टर, सीए यांना काय गरज आहे कोडींग ची??
स्वयंपाक आणि कोडींग ची तुलना करता येणार नाही.तीन वेळा माणसाला खायला लागतं मग त्याला बेसिक स्वयंपाक आला पाहिजे..कोडींग चे तसं नाहीये ना?
आर्थिक मैनेजमेंट, फर्स्ट एड हे गरजेचं आहे तितके कोडींग आहे का?

काही काही गोष्टी आपण फक्त आजूबाजूचे सगळे करतायत म्हणून (पीअर प्रेशर म्हणा किंवा प्रवाहाबरोबर जाणे म्हणा) करतो.

दोन प्रतिसाद आधी "धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद वाचायला आवडतील." असे मत नोंदवून धागालेखक पुढचा प्रतिसाद कोडिंग बद्दल लिहतो/लिहते हे याचे क्लासिक आणि ताजे ताजे उदाहरण आहे Wink

हलके घ्या Light 1

अमितच्या शेवटच्या पोस्टमध्ये त्याने जो मुद्दा मांडला आहे त्यातून प्रत्यक्ष कोडींग शिकवण्यापेक्षा ही अधिक भर हा कोडींग म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण कसा आणि कुठे करतो हे समजून घेणे आणि मग थोडेफार स्वतः कोड लिहीण्याचा प्रयत्न करणे हे घडणे महत्वाचे आहे असे मला वाटते. The focus should be on the process and its significance than the actual coding skills. If a kid is interested then she/he would pursue it further. एखाद्याला ते बोअरींग वाटेल आणि त्यापेक्षा बासरी शिकणं किंवा मायक्रोस्कोपखाली कांद्याची साल पाहणं अधिक आवडेल. पण किमान त्या सर्वांना कोडिंग नावाचे काही तरी असते ज्याच्यातून अनेक आपल्या उपयोगाच्या गोष्टी चालतात याची माहिती मिळेल. Exposure मिळणं महत्त्वाचं.

एक शेवटची पोस्ट, वर मला वाटतं कोडींग न लिहिता मी प्रोग्रामिंग लिहिलेलं, पण अनवधानाने कोडींग आलं असेल तर कोडींग हा शब्द बदलून tinkering करुया. ज्याने कोडींग चा स्टिंगमा असेल तर तो जाईल.
बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.

कोडिंग म्हणण्यापेक्षा बेसिक लॉजिक कसे काम करते हे हे शिकवावे. IF, THEN, ELSE, WHILE, GOTO, EXIT अशा बेसिक कन्सेप्ट्स फ्लो चार्ट अथवा अजून कसल्या साजेशा सोप्या रुपात शिकवता येतील. एवढे पुरेसे असावे ना?

कोडिंग ज्याला आवडतं त्याने शिकावं.
मुलांना शाळेत थोडी ओळख 7 वी नंतर केली जाते(मला 12 वी नंतर झाली)या ओळखीत जर गोडी जाणवली तर मुलं स्वतः इच्छा व्यक्त करतीलच, की मला यात पुढे शिकायचंय, सर्च करायचाय.
एकंदर मुलांना थोडं कळायला लागलं की वेगवेगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ओळखीच्या करून देऊन त्यांचा कल तपासणे.
अगदी 3 वर्षांपासून अबॅकस, 4 वर्षांपासून मार्स प्रि स्कुल हे मात्र पालकांच्या कौतुकाचं मोल आणि त्याचा वापर करून दुसऱ्यानी कमावलेले पैसे असं होतं(मार्स ला आम्ही 4 वयापासून बसवलं आहे, त्यात नंबर मिळून अजून पुढे अजून पुढे लेव्हल असं करत फी काही हजारात आणि परीक्षेची पातळी तितकीच राहायला लागली.(म्हणजे नॅशनल लेव्हल ला पण चित्रात रंग भरले आणि स्कुल लेव्हल ला पण))
एकदा 'तुमच्या 3 वर्षाच्या चिंटूला रोबोटिक्स/क्यू मॅथ/कोडिंग/सायन्स एक्सपेरिमेन्ट शिकवा' क्लास आला की काही पालक त्याला घालणार.मग त्यांच्या मुलांचे फेसबुकवर अमुक गीष्ट करताना फोटो/युट्युब चॅनल निघणार.त्याला 100 कमेंट येणार.मग ते बघून शाळेत शिक्षक कौतुक करणार.ते ऐकून बाकी मुलांच्या डोक्याला भुंगा लागणार.बाकी मुलं घरी येऊन पालकांना प्रचंड भावनिक ब्लॅकमेल करून तो क्लास लावायला लावणार.मग आजूबाजूला सगळेच लावतात, माझं मूल मागे नको पडायला म्हणून बाकी सगळे लावणार.असं होऊन शेवटी तो क्लास हा मिनिमम निकष बनणार(विश्वास ठेवा यात जळकुटेपणाचा एलेमेंट नाही.)
नवे क्लास काढुच नका असं म्हणत नाही.'काय वयापासून' यावर लीगल नियम हवेत.चाईल्ड प्रोडिजी असतील त्यांनी त्यांच्या ओळखी वापरून या गोष्टी शिकाव्या.
(ऑलिम्पियाड परीक्षा हे वरच्या परिच्छेदाला अपवाद आहे.माफक फी, चांगली पुस्तकं आणि चांगलं गुणांकन.)
सगळे कंस बंद केलेत(अभिमानाचा इमोजी)

सगळे कंस बंद केलेत>> Lol कंस उघडला की त्यात लिहिण्यापूर्वी बंद करून मग त्यात लिहिलंस की नाही ते सांग!
मग चितळे मास्तरांची ( ए के ए एकलिप्स इ. .. तत्सम आयडी ई शरण) विद्यार्थिनी का ते कळेल. Happy

ते नाही केलं बरं
मी एडिटप्लस किंवा एक्लिप्स एडिटर नाही Happy
एक्लिप्स स्वतः कंस बंद करतो त्यामुळे तिथे गरज नाही.

कोडींग चा स्टिंगमा वगैरे नाही अमित फक्त त्या नादात धागा विषय सोडून फारच भरकटतोय इतकेच बोलून (सध्यातरी) खाली बसतो.

ओके, आता कोणीतरी विषयाला योग्य जागी आणणारा प्रतिसाद द्या. म्हणजे परत गाडी रुळावर आली की आम्हाला नुसते अक्सिलरेटर दाबत खुर्चीवर बसता येईल. गाडी वळवायचे श्रम नकोत स्वतःला Happy

Pages