Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?
भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.
तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..
सध्या फी १.५ लाखपासून पुढे
सध्या फी १.५ लाखपासून पुढे आहे चांगल्या कॉलेजची. म्हणजे १.५*४ वर्षे, बाहेरगावाहून आलेले असाल तर होस्टेल+मेस+इतर खर्च, स्टेशनरी चार्जेस, टीम प्रोजेक्ट्स आणि त्याचं कॉंट्रिब्युशन, गरजेनुसार फिरून प्रोजेक्ट्स चं मटेरिअल गोळा करणं म्हणजे पर्यायाने बस/ अन्य पब्लिक ट्रान्सपोर्ट, लॅबोरेटरी कितीही सुसज्ज असली तरी लॅपटॉप.... हे अनिवार्य.
यात मोबाईल रिचार्ज, स्वाभाविकपणे अधेमधे होणारा सिनेमा-पार्टी-वनडेआऊटिंग इत्यादी मनोरंजन खर्च (अतिपुस्तकीकीडा वगैरे अपवाद वगळता थोडाफार टीपी करतातच मुलं या वयात) धरलेला नाही. ऐन वेळी आलेलं कोणतंही आजारपण वेगळं. किरकोळ सर्दी-ताप वगैरे ठीक, मोठ्या आजारपणात होस्टेलची मुलं अर्थातच गावी जातात.
करा बेरीज.
२००१ साली फी मध्ये झालेले बदल
२००१ साली फी मध्ये झालेले बदल
४००० ची फ्री सीट १६००० ची झाली
१६००० ची पेमेंट सीट ४८००० ची झाली
@कुंतल,
@कुंतल,
३२००० पेमेंट सीट असे ती बहुतेक ४० की ४८ झाली होती.
@सिमंतिनी
>>
११ लाख फी + हॉस्टेल इ खर्च धरता जर ~ २० लाख शिक्षणाचा खर्च असेल तर - त्याऐवजी कुठेतरी चिमुकल्या शहरात एक प्रॉपर्टी विकत घेतली भाड्याने देण्यासाठी तर अपत्य फार काही तोशीस न करता आयुष्यभर उत्पन्न मिळवू शकेल, नाही?
(असं करावे ह्या मताची नाही. हा एक असाच र्हेटोरिकल प्रश्न आहे. र्हेटोरिकलला मराठीत काय म्हणतात माहिती नाही.)
>>
२०लाखाच्या प्रोपर्टीवर (फ्लॅट वगैरे) फार फार तर ५००० रुपये महिना भाडे मिळेल. म्हणजे वर्षाला ६००००. त्यात अपत्याच्या बिडीकाडीचा पण खर्च निघत नाही आता.
>> ~ २० लाख शिक्षणाचा खर्च
>> ~ २० लाख शिक्षणाचा खर्च असेल तर - त्याऐवजी कुठेतरी चिमुकल्या शहरात एक प्रॉपर्टी विकत घेतली भाड्याने देण्यासाठी तर अपत्य फार काही तोशीस न करता आयुष्यभर उत्पन्न मिळवू शकेल, नाही? >> उत्तर अपेक्षित नसलेल्या प्रश्नचं उत्तर लिहितोय.
ठिकठाक इंजिनिअरला आयटी मध्ये २० लाख वार्षिक पगार (कदाचित सरासरी ही) असावा आजकाल. सगळे इंजिनअर चांगले नसतात आणि आयटी मध्ये ही नसतात हे मान्यच. पण सगळी कडे फी पण २० लाख नसावी.
आणि २० लाखात चिमुकल्या गावात जरी काही प्रॉपर्टी मिळालीच तरी चिमुकल्या गावात भाडी ही चिमुकलीच असतील. मुंबई पुण्यातही भाडी फारच स्वस्त (किंमतीच्या मानाने) आहेत असं पूर्वी केलेल्या गणितावरुन आठवतंय. शेवटी प्रॉपर्टीत पैसे कमवायचे असतील तर लोकेशन लोकेशन लोकेशन समिकरणच चालते.
इंजिनिअर होऊन आरओई येत नसेल आणि आणखी कुठे येत असेल तर लोकं आपोआप बंद होतील ना जायची?
टवण्यांनी लिहिलेलं भाडं असेल
टवण्यांनी लिहिलेलं भाडं असेल तर फक्त ३% रिटर्न झाला की! तो ही प्रिटॅक्स!
ठिकठाक इंजिनिअरला आयटी मध्ये
ठिकठाक इंजिनिअरला आयटी मध्ये २० लाख वार्षिक पगार (कदाचित सरासरी ही) असावा आजकाल.
>>
हा आकडा पाहून
Who killed value of engineering in India?
हे शीर्षक तितके समर्पक वाटत नाही
ठिकठाक इंजिनिअरला आयटी मध्ये
ठिकठाक इंजिनिअरला आयटी मध्ये २० लाख वार्षिक पगार (कदाचित सरासरी ही) असावा आजकाल.
>>
कैच्याकै. इन्फोसिस टीसीएसच्या मॅनेजरचासुद्धा सरासरी पगार याच्यापेक्षा १-२ लाखानं कमीच आहे. हा पगार फक्त प्रिमीयम क्रीम (आय आय टी वैगरे) विद्यार्थी, त्यातही जे गुगल सारख्या प्रोडक्ट बनवणार्या कंपन्यांत किंवा प्रथितयश स्टार्टअप मध्ये आहेत त्यांना मिळतात. बाकी ठिकठाक इंजिनिअर वैगरे आयटीआयपेक्षाही खाली आहेत, गाळातल्यांची बातच सोडा.
आयटीत दुसर्यांची धुणी धुवायला ३-४ पुरेत. धोबी जरा अनुभवी झाला का दोन तीन वर्षांच्या टप्प्यात १-२ लाखानं वाढ होते. तेही काही स्तरापर्यंतच.
साधारण १० वर्ष खपून १२-१३ लाखांवर आला की वरच्या ब्रॅकेटमध्ये चढणं अतिशय कठीण आहे. मग तुमचं स्किल, टेक्नॉलॉजीची डिमांड, प्रोजेक्ट, मॅनेजमेंट या सगळ्या फ्रंटवर प्रचंड घासावी लागते. नाहीतर पगाराचा ग्राफ जवळजवळ आडवा झालाच म्हणून समजा.
वर जाण्यासाठी टेक्नॉलॉजी बदलणं, नवीन डिग्री (बहुतांश मॅनेजमेंटचीच), ऑनसाईट लॉटरीचे नवस बोलणं ते थेट पार्ट टाइम फ्रिलान्सिंग असे बरेच उपद्व्याप करणारे पाहिलेत, पण त्यात पुढं जाणारे फारच कमी.
इंजिनियरना सरासरी 20 लाख मिळत
इंजिनियरना सरासरी 20 लाख मिळत असते तर आज ही कॉलेजेस अशी ओस पडायला लागली नसती. तीनचार वर्षापूर्वी पेपरात इंजिनिअरिंग सीट्स किती आणि प्रवेश अर्ज किती ह्याची आकडेवारी वाचली होती. किमान 25 टक्के सीट्स तरी खाली होत्या. मला तेव्हा पहिल्यांदा कळले डिमांड कमी झाली ते.
रच्याकने, इंजिनियरिंची फी लिहीणार्या लोकांनी डॉक्टरकीची फीही एकदा पाहून घ्या. ती 50-60-70-80 लाखांच्या घरात आहे असे मी गेल्याच वर्षी ऐकले होते आणि डोके गरगरले होते.
आर्ट्सला जाणारे बहुतेक लोक स्पर्धा परीक्षा हा उद्देश ठेऊन जातात. आजही आर्टस्ला जाऊन भाषा, इतिहास, भूगोल व व शिकून पुढे नोकरी मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. प्रोफेसरकी करायची तर नेट सेट वेगळे करावे लागते जी पास होणे जिकिरीचे. बहुतेक लोक सायकॉलॉजि नाहीतर इकॉनॉमिकस घेऊन पुढे शिकतात. तरीही आर्टस् ला बरे दिवस येताहेत, प्रतिष्ठा मिळतेय हे चांगले आहे. आमच्या वेळी आर्टस् घेतले म्हणजे काहीही शिकण्याची अक्कल/कुवत नाहीये हे गृहीत धरले जाई

सीमंतिनी, तुमचा प्रश्न जरी
सीमंतिनी, तुमचा प्रश्न जरी -हेटोरिकल असला तरी त्या दृष्टीनेही विचार करायला हवा असे मला वाटते. मुलांना इंजिनियर किंवा बी कॉम पदवीधर करून नंतर नोकरीसाठी काही लाखांत पैसे लाच म्हणून देणारे पालक ग्रामीण भागात विशेषकरून पाहिलेत. नोकरी मिळावी म्हणून 5 ते 10 लाख खर्च करतात. नोकरी मिळते 5 ते 10 हजाराची. यातून मुलाचा व पुढे त्याच्या कुटुंबाचा खर्च निघून मूळ इन्व्हेस्टमेंटचे पैसे निघायला किती वर्षे लागणार? आणि आधी झालेला शिक्षण खर्च वेगळाच. त्या पेक्षा ते 5-10 लाख गुंतवून मुलाला दुकान काढून नाहीतर अजून काहीतरी धंदा काढून दिलेला बरा. मुलाने नंतर नोकरी सोडली तर ते पैसे गेलेच. ओळखीत असे घडलेले पाहिलेय.
> ठिकठाक इंजिनिअरला आयटी
> ठिकठाक इंजिनिअरला आयटी मध्ये २० लाख वार्षिक पगार (कदाचित सरासरी ही) असावा आजकाल.
अजिबात नाही.
नुकत्याच जाळपोळ झालेल्या कोलार मधल्या कंपनीत ग्रॅज्युएट इंजिनीअर ला किती देत होते ?
या इतक्या फीज सर्वाना आहेत की
या इतक्या फीज सर्वाना आहेत की फक्त ओपनवाल्याना? वाचून डोळे पांढरे झाले.
20 लाख ठीक ठाक इंजिनियर ला
20 लाख ठीक ठाक इंजिनियर ला भारतात?
बहुतेक नसावा.खूप मोठ्या कंपनीज मध्ये असेल गुगल अमेझॉन वगैरे.
सध्या फ्रेशर चे भाव 3.5 लाख(क्रीम इन्स्टिट्यूट) आणि 2.5 लाख(बाकी सर्व इंजिनियरिंग कॉलेज) असा ऐकला होता.हे कागदी आकडे.यात इन्श्युरन्स,व्हेरिएबल पे कमी जास्त होणारे भाग वगैरे सर्व जाऊन हातात टिकल्या येतात.ऑफिस जवळ भाड्याने राहिले तर भाडे महाग.लांब राहिले तर पेट्रोल किंवा बस चा खर्च.फ्रेशर असाल तर कंपनी तन मन धन एक करून 10 तास देऊन नव्या गोष्टी शिकून काम करावे अशी अपेक्षा करणार.
अर्थात हे सर्व 3-4 वर्षं भक्तिभावाने केले,योग्य प्रोजेक्ट मध्ये काम मिळाले, 2-3 योग्य नोकऱ्या बदलून स्किलसेट वाढवले तर लग्नाच्या वयापर्यंत एखादे ऑनसाईट मिळून घर कर्ज त्यातल्या त्यात कमी घेता येईल इतके पैसे जमतात.
त्यात पण गावाकडून/छोट्या शहरातून आलेली मुलं, जिथे वडील शेती किंवा छोट्या बिझनेस मध्ये,उत्पन्न मोठ्या शहराच्या मानाने कमी पण त्यांच्या गावात सुखाने जगायला पुरेसं,आई होम मेकर अश्या घरात कुटुंबाला आधार बनून, बहिणीच्या लग्नात किंवा लहान भावंडांच्या शिक्षणात बरेच पैसे लागतात त्यांच्यासाठी सर्व अजूनच आव्हान बनते.
आणि तरीहि हे सगळं एका मेडिकल कॉलेज च्या फ्रेशर ला आर्थिक जम बसेपर्यंत करायला लागणाऱ्या उचापतींपेक्षा बरंच सोपं आहे.
आयटी सर्विसेस म्हणजे इन्फोसिस
आयटी सर्विसेस म्हणजे इन्फोसिस, विप्रो वगैरे कंपन्यांमध्ये २००१/२००३ साली कॉलेजातून नोकरीवर घेतलेल्याला वर्षाला २.५ लाखाच्या आसपास आणि कॉलेज बाहेरून घेतलेल्याला २ ते २.२ च्या आसपास पगार मिळत असे. तेव्हा ऑनसाइट जवळजवळ नक्की असे व त्यामुळे एकदम १०-२० लाख वर्षाला साठवता येत असत.
आज नवीन इंजिनीअरचा पगार साडे तीन ते चार लाखाच्या दरम्यान आहे (महिना ३०-३५ हजार). आता भाववाढ लक्षात घेता २० वर्षात २.५ लाखाचे ३.५ लाख म्हणजे पगार चांगल्यापैकी (५०% पेक्षा जास्त) कमी झाले आहेत हे लक्षात येईल.
हीच परिस्थिती एमबीए कॉलेजमधून आयटीत आलेल्यांची आहे. २०००साली इन्फोसिसमध्ये आयआयएम लखनौ, बेंगलोर मधूनही लोक नोकरीस येत असत. आज बालाजी इन्स्टिट्युट मधून घेतले जातात. पगार २००३मध्ये होता तेव्हडाच आज मिळतो.
याचे मुख्य कारण आयटी सर्विसेस मधल्या कंपन्यांचे काम कमोडिटाइज झाले आहे. पुर्वी ज्या कामासाठी टिअर१ कॉलेजातला इंजिनिअर लागत असे तिथे आज टिअर नसलेल्या कॉलेजातच बीसीए सुद्धा चालतो. जी परिस्थिती ८०-९०च्या दशकात कारखान्यात इंजिनीअर लोकांना ज्या पद्धतीने सामान्य पगार मिळू लागले ती परिस्थिती आज आयटी सर्विसेसमध्ये आली आहे.
गूगल , मायक्रोसॉफ्ट किंवा प्रोडक्ट कंपन्यात आजही उत्तम पगार मिळतो पण गुणवत्ताही उत्तम लागते.
जसे मॅनुफॅक्चरिंग नंतर आयटी हा नवा धंदा आला तसा आता पुढला एक इन्फ्लेक्शन पॉइंट येईपर्यंत सामान्यांनी हरि हरि करत बसावे. असामान्य व रिस्क घेणारे फोडून पुढे जातच राहतात.
सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर,
सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर, बंगलोर असा ग्लासडोर वर सर्च दिला तर सरासरी बेस १० लाख अधिक १ ते ६ लाख बोनस इ. दिसतंय.
ठीकठाक इंजिनिअर ला सरासरीच्या साधारण दुप्पट अगदी सहज मिळतात हा अनुभव आहे.
तर ते असो. मुद्दा २० लाख का १५ लाख नसून ज्याला त्या शिक्षणात रस आहे त्याच्या शिक्षणाचा खर्च काही वर्षात भरून निघतो हा होता. ज्याने सिरीयसली शिक्षण घेतले नाही त्याच्या मुखी लोणी हवंय का?
बंगलोरला पगार (आणि शाळांच्या
बंगलोरला पगार (आणि शाळांच्या फिया, घरांची भाडी वगैरे) जास्त असतात
आयटी चे पगार फार वाढले नाहीत
आयटी चे पगार फार वाढले नाहीत हे एका प्रकारे चांगलेच आहे.
मॅन्युफॅक्चरिंग वाल्यांचे वाढले पाहीजेत.सगळे समान लेव्हल ला यायला हवेत.
(आणि रियल इस्टेट ची भाव वाढ काहीतरी करून कमी वेगाने झाली पाहिजे)
बंगलोर ला ट्रॅफिक पाहता पेट्रोल चा खर्चही जास्त असेल.
अरे शाळांच्या फिया आणि
अरे शाळांच्या फिया आणि पेट्रोल चे खर्च कुठे काढले आता!

बे एरियात पण घर फार महाग आहेत आणि ट्रॅफिक पण फार आहे आणि स्टेट टॅक्सेस पण फार आहेत आणि घर महाग आहेत हे राहिलंच.
असो. मी आता मुद्दाच विसरलो.
साधना, धन्यवाद. नोकरीसाठी
साधना, धन्यवाद. नोकरीसाठी अधिक पैसे पडत असतील तर अवघडच आहे. शिक्षणासाठी झालेला खर्च भरून निघणे (स्टुडंट लोन फेडणे) ह्यात अनेकवेळा अमेरिकन मुलांची १० ते १८ वर्ष जातात. पर्यायाने घर, लग्न इ सगळेच लांबते. भारतात बरेच वेळा पालक शिक्षणासाठी पैसे भरतात. त्यामुळे ते पैसे परत मिळायला किती काळ गेला ह्याची मोजदाद होत नसावी. पण एकूणात ह्या बाबतीत भारत फार मागे नाही हे लक्षात आले.
त्या पेक्षा ते 5-10 लाख
त्या पेक्षा ते 5-10 लाख गुंतवून मुलाला दुकान काढून नाहीतर अजून काहीतरी धंदा काढून दिलेला बरा. मुलाने नंतर नोकरी सोडली तर ते पैसे गेलेच. ओळखीत असे घडलेले पाहिलेय. >>> अगदी हेच बऱ्याचदा डोक्यात येऊन गेलंय. सगळ्यात उत्तम आणि मंदीचा परिणाम न होणारा धंदा/ व्यवसाय म्हणजे न्हाव्याचे दुकान ,नंतर जम बसला की पॉश सलोन करता येईल किंवा पानपट्टी . पण या धंद्यांना पॉश होईपर्यंत ग्लॅमर नसते.
मलाही वाटतंय कि भारतात अंदाजे
मलाही वाटतंय कि भारतात अंदाजे दहा वर्षे जरी नोकरी केली तरी 20 लाख वार्षिक उत्पन्न नसावे काही अपवाद वगळता.
आय टी जॉब्स इंजिनिअर्स ची डिमांड वाढत नसून स्प्लाय वाढत चालला आहे सो डेफिनेटली अवरेज पगार कमीच असणार.
तसेच माझ्या वेळी(13 वर्षे पूर्वी) इलेक्ट्रॉनिक्स इं.सुरुवातीला तीन लाख वार्षिक पैकेज वर रिक्रुट केले जायचे... अजूनही सरासरी काही वाढलेली नाहीये..
ओळखीतले काही मुलं साध्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलेले अनुभव मिळावा म्हणून 10,000/- महिना पण जॉब करताएत.
नोकरी मिळायला लाच च्या साधना
नोकरी मिळायला लाच च्या साधना च्या पोस्ट वरुन आठवलं:
एकेकाळी ग्रामीण भागात मुलींना डी एड ला टाकायला लोक टेबल खालून लाख दीड लाख डोनेशन द्यायचे. डी एड होऊन सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षीका आणि लग्न लवकर जमतं, कुठेही नोकरी मिळायला सोपं वगैरे
डी फार्म (बंद झाला ना आता) आणि डी एम एल टी साठी पण (लॅब टेक्निशियन) डोनेशन्स द्यायचे लोक.
त्या मानाने या पोस्ट्स ला पगार फार नसायचा. मला एक माणूस माहित आहे जो चेअरमन चा भाचा प्युन होता आणि पगारावर सही करुन पूर्ण पगार दुसर्या दिवशी चेअरमन च्या हातात द्यायचा. असं त्याला किती महिने करावं लागलं आठवत नाही.
किती पगारावर सही केली आणि शाळेने किती हातात दिला ही गणितं अजूनही जिल्हा परिषद शाळांमध्ये वेगळी असणार.
मुलाने नंतर नोकरी सोडली तर ते
मुलाने नंतर नोकरी सोडली तर ते पैसे गेलेच. ओळखीत असे घडलेले पाहिलेय. >>>
ह्याला दुसरी बाजु पन आहे, पानटपरी, चहाचं दुकान (कोणताही सुर्वातिला जम न बसलेला धंदा) चालवणार्याला नवरी मिळायला फार अडचण येते, पळ वाट ही की पैसे भरुन फक्त नोकरी आहे हे दाखवायचं, एकदा लग्न झालं की मग पुन्हा तेच चालु नाहितर दुसरं काहीतरी. काही लोक्स तर ह्या एका कारणासाठी शहरात येतात. (गावाकडे राहणारा असला तरी लग्नाचे चान्सेस कमीच होतात).
विप्रो ने ह्या वर्षी सरासरी
विप्रो ने ह्या वर्षी सरासरी ६.५ लाख CTC मध्ये २७८ मुले घेतली. ( https://vit.ac.in/placements/overview मध्ये २०-२५ ओळी सोडुन ही माहिती आहे) . ह्याच कॉलेज मध्ये मायक्रोसॉफ्ट ने ४४ लाखाचा CTC दिला आहे. बॅचलर पेक्षा मास्टर्स ला ऑफर चांगल्या आहेत. ह्या कॉलेज ची फी २.५लाख आहे. १०-२०% मुलाना खुपच चांगले पॅकेज मिळते, ५०% मुलाना वार्षिक ३-१० लाखाचे तर शेवट्च्या २०-३०% मुले महिना १०००० रुपयात जॉब करावा लागतो.
इंजिनिअर्स चा डिमांड भरपुर आहे पण मुलामध्ये हवे तसे स्किलसेट मिळत नाही. आमची कंपनी चांगल्या स्कील असलेल्या मुलाना चांगला पगार तयार आहे पण तेवढे स्किलसेट खुप कमी जणात असते. स्कील सेट आत्मसात करण्याची कुवत नसेल तर engineering ला जाउ नये. आजकाल कॉलेज भरपुर झाल्याने प्रवेष परिक्षेत ५ ते १०% मार्क पडले तरी सहज प्रवेष मिळतो आणि अशी मुले बर्याच वेळा स्किल आत्मसात करु शकत नाहीत.
अमेरिकेत चांगल्या engineering college मध्ये पहिल्या वर्षी ३०% ड्रॉपआउट असतात जे non-engineering मध्ये प्रवेष घेतात. भारतात engineering मध्ये non-engineering ऑपशन नसल्याने कॉलेजला जवळपास सगळ्याना पास करावे लागते . (नाहीतर फी मिळत नाही तसेच कॉलेजचे नाव पण खराब होते) भारतात पहिल्या वर्षी ड्रॉपआउट व्ह्यायला पाहिजेत अशी ३०% मुले महिन्या १०००० रुपयात काम करतात. यात काही जण नोकरी करता करता स्किल डॅव्हलप करुन २-३ वर्षाने चांगल्या पगाराची नौकरी धरतात तर काही मार्ग बदलतात.
आर्ट्सला जाणारे बहुतेक लोक
आर्ट्सला जाणारे बहुतेक लोक स्पर्धा परीक्षा हा उद्देश ठेऊन जातात. आजही आर्टस्ला जाऊन भाषा, इतिहास, भूगोल व व शिकून पुढे नोकरी मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. >> माझ्याकडे नक्की डेटा उपलब्ध नाही. पण भाषा, इतिहास, भूगोल शिकणार्या मुलांना कितीतरी संधी आता उपलब्ध आहेत. परकीय भाषा शिकून भाषांतराची कामे, स्थानिक भाषा शिकल्यास ब्लॉग्स लिहिणे, सोशल मिडीया मार्केटिंग, जाहिरात कंपन्यामधे काम, वेगवेगळ्या द्रुकश्राव्य माध्यामांसाठी scripts लिहिणे अश्या अनेक संधी आहेत.
लोकांचा हल्ली इतिहास/ heritage यामधे भरपूर रस वाढला आहे. त्यामुळे heritage walks/ tours घडवणे, youtube वरून इतिहास विषयावर माहितीपर videos प्रसारित करणे, ब्लॉग्स लिहिणे या सगळ्यातून पैसा मिळू शकतो.
भूगोलाच्या विद्यार्थ्यांना NGOs मधे काम करणे, Multi-national कंपन्यांसाठी स्थानिक अर्थशास्त्रीय डेटा गोळा करून देणे/ डेटाचा analysis करणे, Geo-informatics मधील संधी अश्या कितीतरी संधी उपलब्ध आहेत.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य इंजिनिअरला मिळणारा पगार आणि ह्या सर्व कामात मिळणारे उत्पन्न हे आता जवळ जवळ सारखेच झाले आहे. पालकांनी हे सगळे लक्षात घेऊन :
१) सरसकट सगळ्या मुलांना उगीच इंजिनिअरिंगच्या साच्यात न बसवता, त्यांना खरच ज्या विषयाची आवड आहे तो विषय शिकू द्यावा.
२) हातात डिग्री पडताच क्षणी मोठ्या पॅकेजची नोकरी मुलाला मिळेल ही अपेक्षा सोडून द्यावी.
३) आवडीच्या विषयातील डिग्री असेल आणि काही वर्ष उमेदवारी करायची तयारी असेल तर भविष्यात पगाराचे मोठे पॅकेज तो मुलगा/ मुलगी नक्की मिळवेल याची खात्री बाळगावी.
च्यायला मी बहुतेक कुठल्यातरी
च्यायला मी बहुतेक कुठल्यातरी पॅरॅलल युनिव्हर्स मधल्या आयटी इंडस्ट्रीमधे काम करतो बहुतेक. आमच्याइथे चांगले पगार आहेत.
माझी कॉलेजमधली मैत्रीण टाटा इन्फोटेक मधे जॉईन झाली ती आज्तागायत तिथेच आहे. २२ वर्षांनी TCS मधे ३६ लाख पगार घेतेय. एकदाही कंपनी न बदलता. कालच विप्रोमधल्या मित्राचा फोन आलेला. १५ वर्षांनी विप्रो सोडतोय. कॅपजेमिनीने ४४ लाखांच पॅकेज आणि २ लाख जॉईनींग बोनस देउ केलाय. एक चुलत मेहुणी इन्फोसिस मधे ३३ लाख पगार घेतेय १७ वर्षांच्या अनुभवाला. माझ्या कंपनीत अजुन जास्त पगाराची नोकरी मिळेल का म्हणुन चौकशी करत होती तेव्हा तिचा पगार सांगितला मला. आणि हे सगळे एकाच कंपनीत १५+ वर्ष काढलेले आहेत.
चार ते आठ वर्षांच्या अनुभवाला आम्ही सर्रास बारा ते वीस लाख पगार देतो. माझ्या टीममध्येच सरासरी अनुभवाच्या २ ते २.५ पट पगार आहे. म्हणाजे ६ वर्ष अनुभवाला १२ ते १५ लाख पगार. अनुभव वाढत जातो तसं हे गुणोत्तर हळुहळु घटत जातं. आणि हे खुप कॉमन आहे असाच माझा समज होता कारण अनुभवाच्या तिप्पटीपेक्षा जास्त पगार द्यायला HR वाले तयार असतात पण मीच नाही म्हणतो कारण इतर टीम नंतर माझ्याच मागे भुणभुण लावणार.
व्यत्यय, या लोकांबद्दल खूप
व्यत्यय, या लोकांबद्दल खूप चांगलं वाटतं. त्यांनी एका कंपनीत राहून चांगलं काम केलं, स्किल्स मिळवले आणि त्याचा मोबदला मिळवला.
माझ्या आजूबाजूलाही असे लोक आहेत. पण फार कमी.
बरेच जण कमी पगारावर, त्याच त्या स्किल्स वर वर्षानुवर्षं काम करायला लागलेले, आणि त्यामुळे बाहेर ऑफर्स मिळायला अडचणी येणारे आहेत. त्यांनी आयुष्यात किमान २-३ स्विच मारायलाच हवे होते असे ते आता म्हणतात.
(हे वाचून मला गुगल करु नये
नौकरी वर सध्या ३-८ वर्षे अनुभवाचा+लोकेशन चा फिल्टर मारला तर ८-१४ लाख मध्ये १५० कंपनी आणि >१५ लाख मध्ये ३ कंपनी वगैरे येतात.>२० मध्ये एखादी येत असेल.
>> ३-८ वर्षे अनुभवाचा+लोकेशन
>> ३-८ वर्षे अनुभवाचा+लोकेशन चा फिल्टर मारला तर ८-१४ लाख मध्ये १५० कंपनी
म्हणजे वाईट नक्कीच नाही ना. आणि या वयात लोकेशनचा फिल्टर लावु नये. बंगळुरु, हैदराबाद इथे खुप जास्त संधी उपलब्ध आहेत. Barclays, HSBC, Credit Suisse, JPM, EY वगैरे कंपन्यात विप्रो/इन्फी पेक्षा पगार जास्त पण गुगल, मायक्रोसॉफ्ट पेक्षा जॉईन करायला सोपं आहे त्यांचाही विचार व्हावा.
>> बरेच जण कमी पगारावर, त्याच त्या स्किल्स वर वर्षानुवर्षं काम करायला लागलेले, आणि त्यामुळे बाहेर ऑफर्स मिळायला अडचणी येणारे आहेत.
अर्थात काळानुरुप स्किल्स अपडेटेड ठेवायला लागणारच. अधुन मधुन गरज नसतानाही जॉब मार्केटचा अभ्यास करुन, इंटरव्ह्यु देउन आपण कुठे कमी पडतोय हे बघायला हवं. वाचत रहायला हवं, युट्युब व्हिडिओ बघावेत, जमल्यास सर्टिफिकेशन्स करायला हवीत. तुम्हाला तुमच्या कामाचं क्षेत्र आवडंत असेल तर हे सगळं कंटाळवाणं/त्रासदायक न वाटता उलट मजा वाटते. प्रसंगी शहर बदलायची तयारी हवी. पण जर हे काहीच करायचं नसेल तर मात्र ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!
आता धाग्याच्या मुळ विषयाकडे वळतो. आपल्याकडे इंजिनीअरींगचा अभ्यासक्रम कितपत अद्ययावत आहे याबद्दल मला शंका आहे. आयटीच्या संदर्भात आपण मुलांना ८०८६ चा पिन डायग्राम घोकायला लावतो, त्याचे ऑपकोड वगैरे बेसिक्स शिकवतो (जे आयष्यात कधीच वापरणार नाही) पण Virtual Machines, Containerization, DevOps, Security or even basic version control and branching वगैरे कितपत शिकवत असु का याबद्दल मला शंका आहे. पण मला सध्याच्या अभ्यासक्रमाबद्दल फारशी कल्पना नाही त्यामुळे माझं विवेचन चुकीचं असेल तर मला हायसं वाटेल.
शिवाय लेखी परीक्षांबद्दल मला तिटकारा आहे. प्रोग्रामिंगचं ज्ञान हे Machine Graded Programming Test (MGPT) ने तपासलं जावं (fondly remembering MGPT from NCST-Juhu back in 1998). उर्वरीत परीक्षा मल्टीपल चॉईस ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांची असावी. त्याबदल्यात उत्तीर्ण व्हायला ४० ऐवजी ७०-८०% गरजेचे केले जावेत.
सिलॅबस अपडेट नाहीच आहे.
सिलॅबस अपडेट नाहीच आहे.
भारतातल्या मोठ्या युनिव्हर्सिटी आधीपासूनच हे कसं बदलता येईल यावर विचार करत आहेत.
आता काही कंपनीज फायनल इयर पासून लोकांना प्रोजेक्ट करुन स्वतःच्या कंपनीत लागणारे स्किल शिकवतात, त्यांच्याकडून त्यातल्या त्यात सोपी कामं करुन घेतात आणि मग इंटर्न म्हणून घेतात. याबदल्यात प्रोजेक्ट साठी लागणारी स्किल शिकवतात. कॉलेज गरीब असेल तर फंडींग देतात.
थोडेसे अवांतर, ( सॉरी
थोडेसे अवांतर, ( सॉरी mrunali )
Machine Graded Programming Test (MGPT) ने तपासलं जावं
Submitted by व्यत्यय >>>>
मी आयटीमध्ये नाही. अशी एखादी फ्री टेस्ट घेता मला येईल का नेटवरून? नेमकं काय ते बघायला?
आणि दोन शंका,
१. इतके सारे इंजिनीअर्स इतक्या कंपन्यांमधून इतक्या संख्येने प्रोग्राम लिहीतात, ते नेमके कुठे वापरले जातात?
म्हणजे बँकेचे सॉफ्टवेअर, बनवले, वापरले, त्रुटी सुधारून घेतल्या. ओके झाले की सगळ्या ब्रांचमध्ये तेच. बँकेची काही सर्विस अॅड झाली, ग्राहक खूप वाढले तर अपग्रेड किंवा नवीन गरज. अन्यथा एक कस्टमर आटोपला, ही माझी समजूत. तर इतकी गरज सातत्याने निर्माण कुठून होते?
२. आयटी सर्विस कंपन्यांचेही मर्यादित स्किल एरिआज असतात का कोणीही काहीही प्रोग्राम लिहू शकतो? म्हणजे कोणी बँकवाले, रोबोवाले, फक्त CNC ऑटोमेशनवाले, फक्त अवकाश यानासाठी प्रोग्रम लिहीणारे अशी discrete specialisation वर्गवारी असते का?
आणि त्या त्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने माहीतगार इंजिनीअर हायर केले जातात का? उदा अवकाश यानासाठी, लिहीणार प्रोग्रामच पण मूळ डिग्री एरोस्पेसची असेल असे काही....
माहितगार: असले तर बरं पडतं.
माहितगार: असले तर बरं पडतं.
पण भारतीय सर्व्हिस कंपनीज मध्ये प्रोजेक्ट विमान, तेल, बूट, फोन, डायपर यापासून काहीही प्रॉडक्ट कंपनी शी संबंधित असू शकतात.त्यामुळे डोमेन नॉलेज वाला माणूस फक्त रिकवायरमेन्ट जमा करण्या पुरता, आणि ते झाल्यावर बाजूला/दुसऱ्या कामावर आणि मग पुढच्या भविष्यात बाकीचे प्रोग्रामिंग ज्ञान, किंवा किमान लॉजिक चांगलं असलेले लोक.
आपल्याला काय करायचं हे स्पेसिफिकेशन वाचून नीट कळलं तर प्रोग्रामिंग लँग्वेज अगदी येत नसेल तरी शिकता येते.
Pages