Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?
भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.
तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..
कारवी
कारवी
तुम्ही म्हणता तसं बेसिक मोटर स्किल्स चं होणार नाही. गरम एकदा भाजल्यावर फुंकर मारणे हे परत मेमरीत आणणे किंवा पाण्यात बुडून जीव घुसमटतो कळल्यावर हात पाय मारणे हे सहजासहजी जाणार नाही.
पण फोन नंबर पाठ करुन लक्षात ठेवण्याची आपली क्षमता मोबाईळ आल्यावर आणि स्पेलिंग स्वतः लक्षात ठेवण्याची क्षमता ऑटो करेक्ट आल्यावर नक्कीच कमी झाली आहे.
फॅशन परत येते तश्या गोष्टी परतून येत आहेतच. फिरकीचा तांब्या, तांब्याची भांडी वगैरे परत आली.बैलगाडी राईड रेझॉर्ट ला असतेच. तसं अगदी बेस गोष्टी वापरायच्या, जात्याने स्वतःचं दळण दळायचं, फॅशन म्हणून काचा मारलेली नऊवारी किंवा धोतर नेसायचं वगैरे पण फॅशन म्हणून परत येईल.
काँप्युटर सायन्स,
काँप्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी हे विषय सोडून बाकीच्या विषयातील इंजिनीअर्स कडून देखील ऐकायला आवडेल >>> हो
(हे इंजिनियरिंग संदर्भात आहे. बाकी मेडिकल फील्ड कायमच भारी असते)
आमच्या लहानपणी मेकॅनिकल इंजिनियर (तो ही सीओईपीचा) म्हणजे सर्वात भारी असे. असे लोक अनेकदा वागण्याबोलण्यातून्ही उठून दिसत. विशेषतः त्याच फील्ड मधे नोकरी/धंदा करत असलेले. एकदम "ऑफिसर लाइक क्वालिटी". मग ते जरा कमी झाले.
मग नंतर इलेक्ट्रॉनिक्सला आणि त्यानंतर कॉम्प सायन्सला भाव आला. टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") सारख्या कंपन्या सॉफ्टवेअर जॉब्ज करता कोणत्याही स्पेशलायझेशनचे इंजिनियर घेउन ट्रेन करत. पण सर्वांना कंपनीच्या कोअर बिझिनेसची माहिती भरपूर मिळेल हे ही बघत.
आता सध्या करीयर गायडन्स काय असतो सहसा? मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे तुम्हाला कोअर कौशल्ये देतात त्या क्षेत्रातली. नंतर कॉम्प सायन्स कडे जाता येते - जरी कॉम्प सायन्स डिग्रीवाल्या/वालीपेक्षा मागे पडलात तरी. पण फक्त कॉम्प सायन्स केले तर भविष्यात इतर क्षेत्रात जाणे तुलनेने अवघड असावे. मात्र त्या मार्गाने चांगल्या पगाराची नोकरी लौकर मिळते. ही शॉर्ट टर्म्/लाँग टर्म सेफटी वगैरे तुलना कोणी वापरतात का?
भाजल्यावर फुंकर मारणे हे
@ अनु
भाजल्यावर फुंकर मारणे हे उदाहरण सहज आठवले ते दिले. ते बदलता येईल.
पण सगळ्या गोष्टीत तंत्रज्ञानावर 'अति ' अवलंबून रहाण्याने क्षमतांचा र्हास व पुढे कदाचित विनाश हे आपल्याला सर्वांनाच जाणवतेय, आणि मला तितकेच म्हणायचे होते.
परत मेमरीत आणणे --- हे आधी केले असेल तर होईल;
आपण कमी केले, पुढच्या पिढीने करणे सोडून दिले, तर ४-५ व्या पिढीने जिने कधी केलेच वा केलेले बघितलेच नाही तर मेमरीत रेकॉर्डच नसेल, मग कुठून आणणार परत ?
कारवी अवांतर नाही पण तुमच्या
कारवी अवांतर नाही पण तुमच्या मुळे आम्हालाही नवीन माहिती मिळते. चर्चा होते .
सियोना, नवीन माहिती + चर्चा
सियोना, नवीन माहिती + चर्चा ही केव्हाही चांगलीच. मलाही आवडते.
आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार मायबोलीकरांमुळे ती उत्तम होतही असते.
पण मूळ धाग्याच्या विषयाशी फाटा फुटला ना माझ्यामुळे, यावर मृणालींना आक्षेप असू शकतो. म्हणून मी थांबले.
एक प्रश्न - सगळीच कामे
एक प्रश्न - सगळीच कामे प्रोग्रॅम लिहून करता येतील का?
जर तशी करता येत असतील तर सगळीकडे माणसे काढून मशीन बसवावी लागतील. बेडेकरांचे बेसनाचे लाडू पण मशिन बनवणार....
मग माणसे काय करणार? जर ती सगळी प्रोग्रॅम किंवा तत्सम काही ज्यामुळे कामे ऑटोमेट होणार असे लिहीत बसत असतील तर त्यांनी कामेच केलेली बरी. कारण असे सतत बसणे तब्येतीला हानिकारक, दर तासाला उठून चालायची आठवण करायला पण अँप लागेल, जिम लागेल. त्यापेक्षा अंगमेहनत केलेली बरी.
( मी पाणी प्यायची आठवण करायला अँप डालो केले होते त्याची आठवण झाली)
मग माणसे काय करणार? >>>> हे
मग माणसे काय करणार? >>>> हे हि वाचा
https://en.m.wikipedia.org/wiki/Universal_basic_income
मग माणसे काय करणार? ह्याचे
मग माणसे काय करणार? ह्याचे उत्तर तसे सोपे आहे
मशीन आहे म्हणून माणसाला काम करायचे की नाही हा पर्याय आहे. म्हणजे धुण आजही धुपाटण्याने बडवून धुवू शकतो पण मशीन वापरतो तसंच. आपल्या आवडीची कामे करायची, बाकी मशीनला द्यायची. बस्सं एक मायबोलीवर प्रतिसाद द्यायचं मशीन आलं पाहिजे 
परत मेमरीत आणणे --- हे आधी
परत मेमरीत आणणे --- हे आधी केले असेल तर होईल;
आपण कमी केले, पुढच्या पिढीने करणे सोडून दिले, तर ४-५ व्या पिढीने जिने कधी केलेच वा केलेले बघितलेच नाही तर मेमरीत रेकॉर्डच नसेल, मग कुठून आणणार परत ?>>>>
सहमत. उद्या सगळ्या मशिनी बंद पडल्या तर आजच्या पिढीला आधीची जुनी पिढी जशी काम करत होती तसे करावे लागेल पण कसे करायचे हे माहीत नसेल. मग ते रीइन्व्हेंटिंग द व्हील होईल.
(करोना आयुष्यात येण्याआधी 'उद्या सगळे जग बंद पडले तर...., सगळी वाहने बंद पडली तर.... ह्या टाइम पास कवी कल्पना वाटायच्या, आता पोस्ट करोना, अमुक एक होणारच नाही ह्यावर विश्वास बसत नाही)
इथे विषयाला धरून नाही पण मला
इथे विषयाला धरून नाही पण मला मिस्टर किम चं वाक्य आठवलं:

व्हेन रोबोट्स टेक ओव्हर, यु विल थॅंक मी....आफ्टर यु थँक द रोबोट.
तो सीन युट्युब वर शोधायचा प्रयत्न केला पण काय म्हणून शोधू कळलं नाही त्यामुळे सापडला नाही
माणूस आरामात झोपेल आणि त्याला
माणूस आरामात झोपेल आणि त्याला झोपेत उलट सुलट हलवून ताणून हाय इंटेन्सीटी वर्क आऊट करायचं मशीन येईल :मग आपल्याला 'हालचाल होत नाही मशिन्स मुळे' म्हणून काळजी करायला लागणार नाही.
आणि माणूस फक्त झोपूनच
आणि माणूस फक्त झोपूनच राहिल्यावर त्याचे आयुष्य मशिन drivenच ठेवण्यासाठी जो पैसा लागेल त्याची व्यवस्था त्याच्या तिर्थरूपांनी करावी ही अपेक्षा असेल का
आणि झोपूनच राहायचे तर जगायचे कशाला व का? जगलोच तर लग्न कशाला हवे?पोरे कशाला हवी? ... हे सगळे डिप्रेसिंग प्रश्न मशीनच कौंसेलिंग करणार ..
टवणे सर, लिंक इंटरेस्टिंग आहे. जगात काय काय होऊन राहिलेय आणि इथे माझे आयुष्य युझर रिकवायरमेंट डिस्कस करण्यात खर्ची पडतेय...
https://www.opencolleges.edu
https://www.opencolleges.edu.au/informed/features/6-skills-wont-replaced...
नवीन माहिती + चर्चा ही
नवीन माहिती + चर्चा ही केव्हाही चांगलीच. मलाही आवडते.
आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार मायबोलीकरांमुळे ती उत्तम होतही असते.>>>>>>>
बरोबर आहे कारवी..विषयाला धरूनच थोडेफार अवांतर, माहितीपूर्ण प्रतिसाद चालतात कि
आणि माणूस फक्त झोपूनच
आणि माणूस फक्त झोपूनच राहिल्यावर त्याचे आयुष्य मशिन drivenच ठेवण्यासाठी जो पैसा लागेल त्याची व्यवस्था त्याच्या तिर्थरूपांनी करावी ही अपेक्षा असेल का
>>
युनिवर्सल बेसिक इन्कम असल्यामुळे प्राथमिक गरजांसाठी काम करायचे नाही.
समाजाने एकत्र मिळुन, जगण्यासाठी लागणारे साधन सामुग्री निर्माण करायची. हे काम रोबोटने करायचे. ती सामुग्री (अन्न, घर वगैरे) सगळ्यांनी वाटुन घ्यायची. गावाचे व्यवस्थापन, जसे की पाणी, स्वच्छता, शिस्त ई. रोबोट करतील हे रोबो वयक्तीक खर्च करुन नाही तर समाजाची सामायीक मालमत्त असेल. वयक्तीक रोबो वेगळे. ते स्वतःची चार्जींग/दुरुस्ती स्वतःच करतील.
यापेक्षा जास्त काही हवे असल्यास गुण पद्धती असेल. त्याप्रमाणे तुम्ही काम करु शकता किंवा तुमचा रोबोटला काम करायला लावु शकता. त्यात बार्टर सिस्टीम येऊ शकते.
झोपुन रहायचे. मनाने रोबोट नियंत्रीत करुन त्याच्यामार्फत जगायचे. झोपुन कंटाळा आला की बाहेर फिरायला जाऊ शकता! बगीचे, सिनेमागृह, नाट्यगृह इथे आपल्या क्रेडीट/गुण पद्धतीनुसार प्रवेश दिला जाऊ शकतो. पैसे द्यायचे नाहीत.
<< इतक्या खाजगी इंजिनिअरिंग
<< इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते? >>
का मिळू नये? मी तर म्हणतो की शिकायचे जितके पर्याय उपलब्ध होतील तितके चांगलेच आहे. मग कुणी आय.आय.टी. मध्ये शिकेल किंवा महागड्या खाजगी कॉलेजमध्ये शिकेल किंवा मुक्त विद्यापीठात शिकेल किंवा Udemy, Coursera, EdX वा यूट्यूब बघून शिकेल.
कॉलेजमध्ये ज्ञान (knowledge) आणि कौशल्य (skill) दोन्ही मिळते. जर हे ज्ञान इतर कुठे सहज मिळत असेल, तर चांगले आहे की. कौशल्य हे बहुतेक वेळा प्रत्यक्ष काम करूनच मिळते आणि त्याच्यासाठी नवीन माणसाला प्रत्यक्ष कंपनीत शिकावे लागतेच.
<< टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") सारख्या कंपन्या सॉफ्टवेअर जॉब्ज करता कोणत्याही स्पेशलायझेशनचे इंजिनियर घेउन ट्रेन करत. >>
हे दिवसेंदिवस वाढतच जाणार. अनेक कंपन्या आता स्वतः:चे सर्टिफिकेशन्स काढणार आणि लोकांकडून काम करून घेणार. सॉफ्टवेअर लिहायला इंजिनिअरच पाहिजे, याबद्दल मला स्वतः:ला शंका आहे. खूप इंजिनिअर बघितले आहेत ज्यांना २-३ वर्षात सिनियर प्रोग्रॅमर, मग टीम लीड, मग मॅनेजर बनायची घाई असते. आणि तसेही आता ते काम रिमोटली करता येते हे आता सिद्ध झाले आहे, त्यामुळे काम होण्याशी मतलब, ते कोणी (इंजिनीअरने केले काय नी BCA/MCA ने केले काय नी B.Sc. किंवा PhD ने केले काय याने फार फरक पडत नाही आणि कुठून केले याचेपण कमी महत्व होणार. त्यामुळे इंजिनीअरची आय.टी. क्षेत्रातील मक्तेदारी दिवसेंदिवस कमीच होणार.
Universal basic income
Universal basic income कन्सेप्ट पूर्ण वाचली नाही. वाचते.
परदेशात 10 वर्षे पोस्टात काम
परदेशात 10 वर्षे पोस्टात काम केलेला माणूस अचानक प्रोग्रामिंग आवडते म्हणून सॉफ्टवेअर मध्ये जाऊन हुशारीने मोठ्या पदावर जाऊ शकतो.
आपल्या इथे पटकन असे पूर्ण 180 डिग्री स्विच करता येत नाहीत(किमान नोकरीत)
पण असे दिवस लवकरच यावे.
मुळात इतर मेहनतीच्या कामांना प्रतिष्ठा मिळावी.पगार भरपूर आहे म्हणून एखादा ट्रक ड्रायव्हर बनला वगैरे.
मुळात इतर मेहनतीच्या कामांना
मुळात इतर मेहनतीच्या कामांना प्रतिष्ठा मिळावी.पगार भरपूर आहे म्हणून एखादा ट्रक ड्रायव्हर बनला वगैरे.
>>
येईल पण वेगळ्या कारणासाठी. जसे आधीच्या प्रतिसादात नऊवारी, दळण दळणे, पाटा वरवंटा याचे उदाहरण आले आहे फॅशन परत येईल या अर्थाने, तसे सगळे जण ऑटोमेटीक विनाचालक कार / ट्रक वापरत असताना आम्ही कसे मॅन्युअल वापरुन "खरी ड्रायवींग" करतो, एवढा अवजड ट्रक घाटात कसा नेतो वगैरे हे दाखवण्याची फॅशन येईल!
<< २००१ साली फी मध्ये झालेले
<< २००१ साली फी मध्ये झालेले बदल
४००० ची फ्री सीट १६००० ची झाली
१६००० ची पेमेंट सीट ४८००० ची झाली >>
Price is what you pay. Value is what you get. If you think education is expensive, try ignorance. /s
युनिवर्सल बेसिक इन्कम
युनिवर्सल बेसिक इन्कम असल्यामुळे प्राथमिक गरजांसाठी काम करायचे नाही.
समाजाने एकत्र मिळुन, जगण्यासाठी लागणारे साधन सामुग्री निर्माण करायची. हे काम रोबोटने करायचे. ती सामुग्री (अन्न, घर वगैरे) सगळ्यांनी वाटुन घ्यायची. गावाचे व्यवस्थापन, जसे की पाणी, स्वच्छता, शिस्त ई. रोबोट करतील हे रोबो वयक्तीक खर्च करुन नाही तर समाजाची सामायीक मालमत्त असेल. वयक्तीक रोबो वेगळे. ते स्वतःची चार्जींग/दुरुस्ती स्वतःच करतील
कम्यून्स मध्ये असेच असते. फक्त कम्यून्सच्या पुढच्या पुढच्या आवृत्त्यांत माणसेच रोबोट बनतात.
काँप्युटर सायन्स,
काँप्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी हे विषय सोडून बाकीच्या विषयातील इंजिनीअर्स कडून देखील ऐकायला आवडेल >>
मी पेट्रोलियम इंजिनीयर, आणी Oil & Gas company मधे कामाला. Oil & Gas company मधे IT Engineers ची गरज नेहमीच होती, कारण Reservoir & Production मधे अनेक प्रकारची software, simulators वापरली जातात, आणी data handling etc मुळेही IT jobs मुबलक असतात.
लागोपाठच्या ३ downturns मुळे, आणी त्यात आत्ताचा downturn कोव्हीड बरोबरीने आल्यामुळे major oil companies are currently in the early stages of one of the biggest transformations. तशातच वर्षभर technology sector मधील बहुतेक लोक घरुन काम करीत आहेत, त्यामुळे technology चा वापर वाढत चालला आहे. Remote working चे फायदे लक्षात आल्यामुळे बर्याच कंपन्या पुढेही हे चालू ठेवतील. हे लक्षात घेउन टेक कंपन्या त्यांची solutions अधिकाधीक remote-access friendly करण्याकडे भर देतील. Oil companies च्या data policies फार क्लीष्ट असल्यामुळे हे काम सोपे नाही, आणी त्यासाठी वेळही भरपूर लागेल. त्यामुळे येत्या काळात oil & gas sector मधे IT साठी बर्याच संधी उपलब्ध होतील असा माझा अंदाज आहे.
सध्या सीओईपीची फी किती आहे?
सध्या सीओईपीची फी किती आहे?
2004 मधे सीओइपी ची फि 9000 /-
2004 मधे सीओइपी ची फि 9000 /- पर इयर होती असं आठवतंय.
सध्याची माहित नाहीये.
सध्या सीओईपीची फी किती आहे?
सध्या सीओईपीची फी किती आहे?
Submitted by हरचंद पालव >>>>>
त्यांच्या साईटवर ९०k+ दिलीय + हॉस्टेलचे २७k. प्रत्यक्ष माहिती नाही.
खूपच वाढली म्हणजे. माझ्या
खूपच वाढली म्हणजे. माझ्या वेळी 6 महिन्याची फी 180 रुपये होती. हॉस्टेल फी महिना 10 रुपये + डिपॉझिट 10 रुपये होते.
खूपच वाढली म्हणजे. माझ्या
खूपच वाढली म्हणजे. माझ्या वेळी 6 महिन्याची फी 180 रुपये होती. हॉस्टेल फी महिना 10 रुपये + डिपॉझिट 10 रुपये होते.
नवीन Submitted by लाकूडतोड्या on 18 December, 2020 >>>>> >
1950 का????
(क्रुपया हलके घ्या)
कि ब्रिटिशांच्या काळात
खूपच वाढली म्हणजे. माझ्या
.
खूपच वाढली म्हणजे. माझ्या
खूपच वाढली म्हणजे. माझ्या वेळी 6 महिन्याची फी 180 रुपये होती. हॉस्टेल फी महिना 10 रुपये + डिपॉझिट 10 रुपये होते
मलाही. सेम फी होती. EBC फी सवलत होती
मला सवलत न्हवती. ही पूर्ण फी
मला सवलत न्हवती. ही पूर्ण फी होती, पण महिना 300 रुपये नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होती, त्यामुळे मेसचा खर्च पण निघत असे.
Pages