Who killed value of engineering in India?

Submitted by mrunali.samad on 3 November, 2020 - 11:49

Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?

भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.

तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Indian moms.
विश्वास वाटत नसेल तर Whitehat Jr ची अ‍ॅड बघा.

इतकं मोघम नको. लेख लिहित आहात तर अजून विस्तृत हवे. गेल्या २५-३० वर्षांत ट्रेण्ड कसा बदलत गेला. तेव्हा असलेल्या किमान दर्जाची पातळी कशी खालावत गेली. पैसेवाल्या, राजकारणी, वगैरे लोकांनी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कशी कापून खाल्ली या आणि अशा अनेक घटकांना स्पर्श व्हायला हवा.

--- Er-Filmy Wink

या सगळ्याला राजकारणी जबाबदार आहेत.इंजिनिअरिंग कॉलेज उघडणे हा नोटा छापायचा धंदा आहे.जिथे एसटी जाण्याइतकेही रुंद रस्ते नाहीत तिथे इंजिनिअरिंग कॉलेज असते.दर वर्षी 60 मुलं एका ब्रँचमधून बाहेर निघतात.
आता हे चित्र बदलते आहे.इंजिनिअरिंग ची फी परवडत नाही आणि नोकरी मिळण्याची खात्री नाही म्हणून कॉलेजेस ओसाड पडली आहेत.कट डाऊन क्रायटेरिया कमी केला जातो आहे.
इंजिनिअरिंग आणि कोडिंग दोन्ही मध्ये आयटीच्या चांगल्या पगाराच्या नोकरी च्या आशेने घुसू नका,मुलांना घुसवू नका असं जमेल तेथे सुचवतो.अजून 10 वर्षांनी चित्र वेगळं असेल.
स्वतःच्या मूळ टेक्नॉलॉजीशी,काहीतरी धंदे शिक्षणाशी जुळलेले राहा.

आजकाल Animation चा बोलबाला आहे. ओळखीतले काही मुलं या क्लाससाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन रहात आहेत. दीडदोन तासांचा क्लास आणि बाकी वेळ रिकामे.

योग्य वेळेत मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक विद्यार्थी सरळ वाटेने, वाट दिसेल तसे इंजिनिअरिंग ला जातात.
शहरी भागात पुढील नियोजन केले जाते परंतु ग्रामीण भागात पुरेसे नियोजन केले जात नाही.
पण हो आता चित्र नक्कीच बदलत आहे.

ईंजिनिअरिंग कॉलेज पासून डान्सबार पर्यंत आणि पतपेढी पासून जुगाराच्या छुप्या अड्ड्यांपर्यंत सगळे ऊद्योग राजकारणी स्पॉन्सर्ड असतात.
आपल्या पाल्याने कुठे जायचे काय करायचे ते काही अंशी पाल्याच्या आणि बहुतांशी आपल्याच हातात असते.
Its moms who take unnecessary pride in deciding what their kids should study.
ऊगीच नाही त्या व्हाईट हॅट ज्युनिअर अ‍ॅड मध्ये आई बोलतांना दाखवली आहे बापूस नव्हे.
अगदी प्लेग्रूप ते शाळा सगळीकडे अ‍ॅड्स आई लोकांना टार्गेट केलेल्या असतात... बाबा लोक आधीच कामाच्या ठिकाणी न्यूनगंडाने पछाडलेले आणि घरी खर्चाच्या जबाबदारीने पिचलेले असतात ते खिसा ढिला करण्यापलिकडे फार काही करत नाहीत. कार्टा/कार्टी काहीही शिकले तरी फार काही दिवे लावणार नाहीत हे त्यांना आधीपासूनच माहिती असते. त्यामुळे ते 'बरं' म्हणण्यापलिकडे फार काही करत नाहीत.

तसं काही नाही हो हाब.तुम्ही अजून मुलांच्या शाळांबददल, क्रिकेट क्लास बद्दल, रोबोटिक्स बद्दल अखंड बोलणारे बाप पाहिले नसावेत.

शेतकऱ्यांसारखं होतं ते.एरिया मधल्या एकाने सूर्यफूल किंवा सोयाबीन लावून चांगले पैसे कमावले.आता बाकी सगळे सोयाबीन लावतात.सोयाबीन चा भाव पडतो आणि नफा कमी होतो.
एके काळी सॅप कोर्स ची फी 1 लाख होती.खात्रीशीर ऑनसाईट नोकरी मिळायची.पण 1 लाख खूप कमी पालक भरू शकायचे.
नंतर 50000 फी घेऊन सगळ्यांनी एम्बेडेड व्ही एल एस आय सेंटर काढली. त्यात नोकऱ्या काहींना मिळाल्या काहीजण आयटी मध्ये गेले.
काही वर्षांपूर्वी सेलेनियम, बिग डेटा, हडूप,सध्या अझुर ए डब्ल्यू एस गुगल क्लाउड डेटा सायन्स हे नोकरी मिळवणारे हुकुमाचे एकके.डेटा सायन्स चं दुकान काढून बसलेले क्लासेस 85000 फी घेतात.
अशी वेगवेगळ्या सोयाबीन ची पिकं, लाटा येत राहणार.आपल्या फायद्याचं पीक कोणतं ठरेल याचा आपापला अंदाज प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायचा.

बाहेर खूप बोलत असतील, पण घरी त्यांच्या बोलण्याला फार किंमत मिळत नसावी.
नाही तर आपल्याला ईंजिनिअरिंग ऐवजी who killed value of cricket in India असा धागा बघायला मिळाला असता Proud

मला भिती वाटतेय की आता ईथे देखील स्त्री पुरुष समानता वाद सुरू होणार…
मुलाच्या करीअरचा निर्णय घ्यायचा हक्क कोणाचा?
त्याचा अभ्यास घेणार्‍या आईचा की त्याच्या शाळेची फीज भरणार्‍या बाबांचा Happy

जोक्स द अपार्ट,

राजकारण्यांनी धडाधड कॉलेजेस उघडले आणि मग ते भरायला तशी मार्केटींग, खोटा डिमांड, खोटी पत उभारली, लोकं वाहावत गेली…. असे मलाही वाटते.
कित्येक पालकांना वाटत असेल की काही वेगळे करावी पण काय हे मार्गदर्शन योग्य वेळी मिळायला हवे ना.. ते देणार कोण? कारण कॉलेजेस तर आपण ईंजिनिअरींगची उघडून बसलोत.

मी तर ठरवलंय की कायपण करायचे पण पोरांना ईंजिनीअरींगला नाही टाकायचे. यासाठी मी सुद्धा एक एंजिनीअर आहे हे मी पोरांपासून लपवून ठेवतोय Happy

बाई दवे,
शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होणार असे ऐकले होते.
त्यामुळे काही सिच्युएशन बदलायचा स्कोप आहे का?

एंजिनिअर्स कामावर लागणारे कारखाने कोणते?
ओटो?
आता इथे सेमी नॉक डाऊन माल परदेशांतून आणून जोडत असतील तर त्यांत किती लागतील?

फक्त परदेशातून माल आणून असेंबल होत नाही.
किमतीमुळे आणि इम्पोर्ट कॉस्ट मुळे आता बरेच पार्ट भारतातल्या कारखान्यात बनून असेंबल होतात.टॅक्स ची धोरणं नीट ठेवली तर हे प्रमाण वाढत राहणार आहे.
आयटी मध्ये पगार वाढून एक स्टेज अशी येईल की भारतापेक्षा व्हिएतनाम, चायना, ईस्ट युरोप मधले रिसोर्स परवडायला लागतील.
कोअर इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग,इतर खरे उद्योग(ज्यात डोळ्याला दिसेल असे काही बनते) जितके वाढतील तितके उत्तम.
'स्वस्त रिसोर्स' म्हणून आयटी मधली कामं भारतात येणे हीसुद्धा लाट उतरेल.

>> Rise of unemployment in engineering graduates in India..
>> Who killed value of Engineering in India?

आपणच की (एक देश/समाज या अर्थाने). आपल्या प्रगतीला किंवा अध:पतनाला वरकरणी काही कारण असले तरी शेवटी आपणच, आपली विचारसरणी, आपल्या सवयी, आपली वृत्ती वगैरे वगैरे बऱ्याच बाबी जबाबदार असतात. अर्थात यातूनच उत्क्रांती होत असते. पुढच्या पिढीत करेक्शन येत असते. हे थोडक्यात उत्तर झाले. दीर्घ उत्तर खूपच दीर्घ होईल Happy

भारतात भरपुर इंंजिनीयरची गरज आहे. फक्त कॉलेजचा दर्जा सुधारला पाहिजे. TCS, Wipro, Infy सारख्या कंपन्या दर वर्षी हजारानी लोक घेत असतात.

आमच्या कंपनीत पण दर वर्षी शेकडो इंंजिनीयर लागतात. जर क्वालिटी सुधारली तर ही संख्या दुप्पट होउ शकते. अपेक्षा पण जास्त नाही जरी १२ वी चे फ़िज़िक्स आणि मॅथ चे कॉन्सेप्ट क्लियर असतिल तरी भरपुर आहे. कॉनसेप्ट चांगले असतिल तर बेकार राहाण्याची शक्यता खुप कमी आहे.

पोलंड, व्हिएतनाम आणि चायना मध्ये IT मध्ये भारतापेक्षा कमी पगार आहेत. पण एखाद्या कंपनीला एका वेळी खुप ईग्लिश बोलणार्या इंंजिनीयरची गरज असल्यास त्या देशात मिळणे अशक्य आहे. बल्क मध्ये इंंजिनीयर फक्त भारतात आणि अमेरिकेच मिळतात.

आत्ताच माझ्या बघण्यातले बरेचसे इंजिनीअर हे मोनोटोनस कामाला कंटाळून (अर्थात हे त्यांच्या म्हणण्यानुसार) पार्ट टाईम का होईना stand up comedy, professional phototogrphy, soft skill trainers, family business, yoga trainers, digital marketing वगैरे कामे करताना दिसतायत.

यातले बरेचसे चाळीशीच्या आसपासचे मिड लेव्हल मॅनेजमेन्टला पोहचून पुढची ग्रोथ खुंटलेले सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत.

मी जेव्हा बारावीला होतो तेव्हा खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये नुकतीच सुरू झालेली होती आणि संख्येनेही खूप कमी होती. पण ज्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळत नसे ते खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात जाणे सुरू झाले होते, तिकडेही ऍडमिशन्स फुल होऊ लागल्या, डिमांड वाढत होती आणि एक एक नवीन कॉलेज उघडत होते.

पुढे १९९८ च्या आसपास आमच्या कंपनीत नविन इंजिनिअर्स घ्यायचे असले की त्यांचा टेक्निकल इंटरव्ह्यू घ्यायचे काम माझ्याकडे आले. टॉप कॉलेजेस मधील इंजिनिअर्स आमच्याकडे येत नसत (लहान आणि नवी कंपनी, फिल्ड सुद्धा लोकांना नविन वाटे ) पण साधारण 10 इंटरव्ह्यू घेतले की त्यातील पाच जण टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये पास होत असत आणि मग पुढे मी आय क्यु टेस्ट / अधिक खोल टेक्निकल प्रश्न विचारून स्क्रिनिंग करायचो आणि पुढे आमचे डायरेक्टर इंटरव्ह्यू घेऊन कँडीडेट फायनल करत.

पुढल्या काही वर्षांत मात्र एका जागे साठी तीन कँडिडेट टेक्निकली ओके मिळण्यास मला वीसेक लोकांचे इंटरव्ह्यू घ्यावे लागत. अनेक कँडीडेट्सना बेसिकही नीट येत नसे.

हे प्रमाण पुढे खूप वाढत गेले आणि मी सुरवात एवढ्या बेसिक
प्रश्ना पासून करायचो की पूर्वी इंजिनिअर्सना असा प्रश्न विचारल्यास अपमान वाटला असता. प्रथम श्रेणी, डिस्टिंंक्शन मिळवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीकल इंजिनिअर्सना ओहम्स लॉ आठवतच नसे (I remember the name of law sir, but forgot it) किंवा काहीच्या काही चुकीचा सांगत. या एका प्रश्नात कँडीडेट नापास करावे लागत आणि त्यांची संख्याही बरीच होती. शिक्षणाचा स्तर एवढा खालावलाय यावर विश्वास बसत नव्हता.

याला जबाबदार कोण सांगणे कठीण, अतुल म्हणतात तसे आपणच म्हणायला हवे आपणच कॉलेजेससाठी एवढी डिमांड निर्माण केली, शिक्षणाचा बाजार करणारे राजकारणी लोक म्हणावेत तर आपणच त्यांना निवडून दिले.

शिक्षणाचा स्तर सुधारला नाही तर कठीण आहे आपलं.

आज काल आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर च्या इंटरव्हिव ची सुरुवात फॉर लूप च्या प्रॉब्लेम ने करतो. ऍव्हरेज काढणे वगैरे प्रश्न असतात. ९९% लोक यातच बाद होतात. सेकंदाचे मिलिसेकंद करणे वगैरे उच्च ज्ञान येणारे १००० मध्ये २-३ मिळतात.

शिक्षणाचा स्तर

एका कॉलेजात म्हणे वर्कशॉप नव्हता. सेमेस्टरमध्ये पैसे घेऊन बसभरून विद्यार्थी दुसऱ्या एका ( ट्रस्टीच्याच) कॉलेजात चार दिवस नेऊन आणून प्रक्टिकल्स उरकत.

Rise of unemployment in engineering graduates in India..>>>>

मागणीपेक्षा पुरवठा वाढला की असेच होणार.

पुरवठा वाढला याचे कारण राजकारणी नाहीत तर साधे गणितही न जमणार्या आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावे ही अपेक्षा असलेले आईबाप वाढले. हे वाढले कारण यात सुरवातीला इंजिनिअर कमी होते तेव्हा त्यांना पगार जास्त मिळत होता, लोकांनी ते बघून आपली मुलेही जास्त पगार घेणारी बनवायचा उद्योग हाती घेतला. कॉलेजेस कमी पडू लागली तसे हाती पैसा असलेले व नियम वाकवू शकणारे लोक म्हणजे राजकारणी यात उतरले.

मुळात सिव्हिल व इतर इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित क्षेत्रामध्ये इंजिनिअरची मागणी त्या क्षेत्रात किती काम आहे यावर अवलंबून असते. देशाची अर्थव्यवस्था कितपत मजबूत आहे, वर जातेय की खाली येतेय यावरही हे क्षेत्र अवलंबून आहे. अशा वेळी घाऊकरित्या सिव्हिल इंजिनिअरिंग करणारी मुले नोकरी मिळवू शकणार नाहीत. मुलांना दहावीनंतर योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे खूप मोठे कारण आहे. गावी तर मार्गदर्शन करणारे आदल्या वर्षी इंजिनिअरिंग केलेले असतात. ते आपल्याच वाटेने मुलांना पाठवतात.

आणि वर जे आईबद्दल लिहिलेय ते खरेच आहे. मीही खूप जवळून हे घडताना पाहिले आहे.

Who killed value of Engineering in India?>>>>>

Nobody kills anybody, everybody dies its own death through karma....

व्हाईट हॅट ज्युनिअर अ‍ॅड मध्ये आई बोलतांना दाखवली आहे बापूस नव्हे.
>> on our tv, they show adv with Dads too.:)
Some famous cricketers and such folks. Some adv - both parents.
Pakavalay tya adv ni.

बाकी आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा व्यवसाय करण्याची मानसिकता आहे.... शिक्षणक्षेत्र त्याला अपवाद कसे असेल?

आपल्या पॉलिसीज शिक्षणतज्ज्ञ ठरवण्याऐवजी राजकारणी आणि स्वयंघोषित शिक्षणसम्राट ठरवतात आणि मग quality बाजूला राहून quantity ला मह्त्व येते.

गेल्या काही वर्षात जेंव्हा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटच्या मार्केट रेडीनेसबद्दल बऱ्यापैकी टीका झाली तेंव्हा निदान पुणे विद्यापीठाने तरी adjunct faculty नावाचा एक उपक्रम सुरु केला ज्यात ॲकेडॅमिक बरोबर ठराविक प्रमाणात industry experts ना appoint करायचे होते आणि त्या इंडस्ट्री एक्सपर्टनी त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या अनुभवानुसार इंडस्ट्रीत सध्या कुठला ट्रेंड आहे, काय टूल्स वापरतात वगैरे गोष्टी, project guidence वगैरे इंजिनिअरिंग स्टूडंट्सना द्यायचा. उपक्रम अर्थातच चांगला होता पण अमलबजावणीच्या नावाने सगळी बोंब होती. अगदी पुण्यातील नामवंत वगैरे गणल्या जाणाऱ्या कॉलेजेसबरोबर मी यानिमित्ताने जोडलो गेलो पण त्यांना फक्त टीकमार्क्स हवे असतात असा अनुभव आहे.
तुम्ही इंडस्ट्रीतले आहात तर तुम्ही प्रोजेक्ट आणताय का? तुम्ही प्लेसमेंट आणताय का? या यांच्या अपेक्षा (अर्थात काही चांगली माणसे नक्कीच भेटली पण ती अपवाद म्हणावे अशीच)
यांचा सगळा खेळ प्लेसमेंट ड्रिव्हन असतो..... तो T&P वाला म्हणून जो एक माणूस असतो त्याला बहुदा सेल्स वाल्यांसारखी टारगेट मिळत असावीत.
बरे यांचे प्लेसमेंटचे डीटेल्स बघितले तर ८०-९०% टक्के प्लेसमेंट ही फक्त आयटीमधली असते.... कोअर इंडस्ट्रीमधल्या प्लेसमेंट ड्राइव्हजमध्ये ना कॉलेजेसना इंटरेस्ट असतो ना स्टूडंट्सना!
आणि सगळ्यात वाईट याचे वाटते ज्याप्रकारे मॅनेजमेन्ट ॲकेडमिक स्टाफला वागवते.... हे बऱ्यापैकी जवळून बघितले आहे आणि कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्याला तर हे फारच धक्कादायक असते.
मी गेल्या काही वर्षात BE आणि ME/MTech प्रोजेक्टसाठी external examinar म्हणून जातोय.... प्रोजेक्ट गाईडसनी अक्षरशः पाट्या टाकलेल्या असतात.
सध्या IoT प्रचंड फॉर्ममध्ये आहे.... झाडून सगळे रासबेरी पाय वगैरेचे बोर्ड विकत घेतात आणि वाटून घेतल्यासारखे त्याला वेगवेगळे सेंसर लावतात आणि cloud वर data पाठवतात आणि स्क्रीनवर वेगवेगळे analytics दाखवतात.... एकाने temp, humidity sensor लावून climate control system म्हणायचे, पुढच्याने proximity switch आणि motion sensor लावून त्यालाच सिक्युरिटी सिस्टीम म्हणायचे, त्याच्या पुढच्याने त्याला PTC/NTC आणि पल्समिटर लावून Health monitoring system म्हणायचे आणि मग एकाने लेव्हल सेंसर किंवा optical sensor लावून त्याला water management system म्हणायचे.
एका प्रोजेक्ट हॉलमध्ये १२ पैकी १० प्रोजेक्ट मी असे बघितले की ज्यात बाकी सगळे सेम होते फक्त sensor बदलले होते आणि अनुषंगाने प्रोजेक्टचे नाव बदलले होते.
ही अवस्था PG student ची होती.... BE बद्दल काही बोलायलाच नको.
अजुन एका कॉलेजला इमेज प्रोसेसिंग हे स्पेशलायझेशन होते तिथे ही प्रोजेक्टमध्ये हीच थीम आढळली.... एकच evaluation kit आणि वेगवेगळी applications!
कुणी बेसिकमध्ये जायलाच तयार नाही!

असो! अजुनही काही तळमळीने शिकवणारे शिक्षक दिसतात..... एखादा का होईना व्हिजन असणारा HoD दिसतो..... marks चा फारसा विचार न करता design लेव्हलचा प्रोजेक्ट करणारे बॅचमध्ये दोन चार विद्यार्थी दिसतात तेंव्हा बरे वाटते!

सन्माननीय अपवाद आ हे त याची जाणीव ठेवून,
मी कधी घेतल्या नाहीत मुलाखती पण हे ऐकून माहिती आहे.
इंजिनीअर ट्रेनीला viscosity माहीत नाही. वाचून सांग लंचनंतर म्हटले तर तेही करायची गरज वाटत नाही.
किती precision / accuracy साठी रीडींगच्या स्टेप्स कशा असाव्यात माहीत नाही. एक्स्प्लेन करावे तर सांगणार्‍याच्या डोक्यावरून दुसर्‍या ट्रेनीशी मूक गप्पा.
नोकर्‍या नाहीत म्हणताना मिळाल्यावर तरी जीव ओतून करायची ना.
ते पाचपाटील लिहीतात ना ओरल्स, ड्रॉईंगशीट कॉपी बद्दल.... लोक एन्जॉय करत होते म्हणून वेगळा सूर लावला नाही.... पण तेव्हा हेच वाटले होते एक क्षण की का बाबांनो करताय मग इंजिनीअरिंग? शिक्का म्हणून, आईबापांवर उपकार म्हणून, चांगल्या हुंड्याची सोय की नाईलाज? १०-२०% अभ्यास तरी गंभीरपणे करावा....

नावाजलेल्या दिव्याखालीही अंधारच असतो हल्ली बहुतांश.... एका संस्थेचे थिसीस डिपार्ट्मेंट digitisation सुरू होते. डिपार्टमेंट प्रमाणे वर्षाप्रमाणे काम सुरू होते. अचानक आपण तेच पुन्हा वाचतोय असे वाटले. म्हटले प्यूनने पुन्हा तोच झालेला सेट काढला का रॅकवरून? बीटेक dissertation, तीच समरी, तेच लिटरेचर सर्व्हे. बाकी जुजबी फरक. मॅडमना सांगितले सहज तर म्हणाल्या अमुक गाईड आहेत का? त्यांचे तसेच असते.

एका कन्सेप्टशी ६ parameters संबंधित असतील तर एका विद्यार्थ्याने parameter १ व २ बदलून काम करायचे. ३ ते ६ स्टेडी. पुढच्या वर्षी दुसर्‍याने parameter ३ व ४ वर काम करायचे १,२,५,६ स्टेडी. अशी ३ वर्षे निघतात गाईडना फार त्रास न होता. चौथ्या वर्षी १ ते ६ चा comparative study. बरं हे प्रयोग फार खर्चिक, उच्च काठिण्यपातळीचे वगैरे नव्हेत की तसे करणे समजून घ्यावे. फक्त गाईडची सोय, मुलांना मेहनत नको. TIER रेसवाली संस्था बीटेक डिग्री अशी असेल तर मग बाकीच्यांनी काय घोडे मारलेय....

ढुंगणाला धस न लावता शेखी मिरवायची आपली भारतीय मनोवृती kills value of ....x..x..x.... गा जा भ कशानेही.

स्वरुप यांचे मत पटले. कारवी यांचे म्हणणेबरोबर आहे. नोकरी करताना काही लोक पाट्या टाकयचे काम करतात. नवीन काही शिकण्याची वृत्ती दिसत नाही.

काही कंपनीज ने हे चालू केले आहे.
स्वतः मोठ्या कॉलेजेस शी संपर्क ठेवून प्रोजेक्ट्स ना मदत करुन आपल्याला हवे ते स्किल्स मुलांना शिकवायला कॉलेज ला मदत करायची. म्हणजे मुलं ईंटर्न म्हणून घेता येतील आणि पुढच्या ६ महिन्यात इंडस्ट्री रेडी होतील.
दुर्दैवाने हे उद्योग कंपनी मधले लोक त्यांना मिळणार्‍या वेळामध्ये, नीट इंटरनेट कनेक्टिव्हीटी, व्हीकॉन्फ असलेल्या कॉलेजेस मध्ये किंवा प्रत्यक्ष जावे लागले तर वीकेंड ला स्वतःचा वेळ खर्च करुन करत असल्याने रिमोट एरिया ची कॉलेजेस मागे राहतात. पुणे मुंबई बंगलोर आणि याच्या आजूबाजूला असलेल्या कॉलेजेस ना प्राधान्य मिळते. बुलढाणा, अकोला, अमरावती, फैजपूर, चोपडा, चंद्रपूर (आता इतकेच एरिया आठवतायत) इथली १०% मुलं सोडून इतरांचं काय होतं? एक म्हणजे बापाकडे मोठा पैसा हवा म्हणजे काही करुन पुढच्या शिक्षणाला परदेशी.किंवा प्रचंड स्ट्रगल करत करत स्वतः नोकर्‍या शोधून, मुंबई पुण्यात नातेवाईकाकडे (किंवा इल्लीगली सीओईपी इंजिनीअरिंग च्या हॉस्टेल वर मित्रांच्या रुम मध्ये लपून) राहून नोकर्‍या शोधत राहणे. किंवा त्याच एरियात कॉलेज मध्ये टेंप लेक्चरर किंवा लॅब टिचर म्हणून लागणे.
अश्या एरिया मध्ये कॉलेजेस निघताना 'इंजिनीअरिंग झाल्यावर पुढे काय' हे प्रश्न अ‍ॅडमिशन घेणार्‍या मुलांनी आणि कॉलेज चालवणार्‍या मॅनेजमेंट ने नक्कीच विचारात घ्यायला हवेत.
इंडस्ट्री सर्व मोठ्या शहरात असायला हव्यात. जिथे नेटफ्लिक्स किंवा प्राईम वर मिर्झापूर बघण्याइतके किंवा फेसबुक वापरण्या इतके चांगले इंतरनेट आहे त्यांना आयटी मधले रिमोट जॉबही मिळायला हवेत.

<< नवीन काही शिकण्याची वृत्ती दिसत नाही. >>
आयटी. क्षेत्रात असलेल्या लोकांकडे तरी अशी वृत्ती कुठे दिसते? २-३ वर्षात टीम लीड, मग २-३ वर्षात मॅनेजर बनायची घाई. एकदा मॅनेजर झाले की कोडिंग विसरायचे आणि एक्सेल भरत बसायच्या, असे हे कामाचे स्वरूप. मग नवीन काही शिकणार कोण आणि का शिकायचे? हँडस-ऑन कोडिंग करू शकणारे किती आय.टी. मॅनेजर आजूबाजूला दिसतात?

मानव, स्वरूप आणि कारवी उत्तम पोस्टस.

अमा, इंग्रजीची बोंब हा रोग नाही हे लक्षण आहे.

रोग आहे मुळातूनच चांगले विषय शिकवणार्‍या शिक्षकांची वानवा
रोगाचे मूळ आहे आपल्यातल्या पैशाला अवास्तव महत्व देणारी प्रवृत्ती
खोड आहे धनदांडग्यांनी शिक्षकांना मान न देणे,
फांद्या अनेक आहेत उदा. शिक्षकांना जनगणना / निवडणूक ई. शिक्षणबाह्य कामांना जुंपणे ई. गोष्टी
आणि फलस्वरूप हाती येतात ते कुठलेच विषय चांगले न शिकता पदवीच्या मांडवाखालून बाहेर पडणारे विद्यार्थी

शिक्षकांना पैसे आधीही खूप जास्त मिळत नव्हतेच
मानही मिळेनासा झाल्यावर ज्या घरांत पिढ्यान पिढ्या शिक्षक असत त्याही घरातील पोराबाळांत कोणीच शिक्षक बनेनात. फर्स्ट जनरेशन शिक्षकांनीही आपल्या पोराबाळांना शिक्षक न बनवता दुसरे काहीही करा असे सांगीतल्याची उदाहरणे कित्येक आहेत.

अर्थात हे ही विसरून चालणार नाही की सद्यकाळातील विद्यार्थ्यांच्या समोर 'न भुतो' प्रकारची अनेक प्रलोभने आहेत ज्यायोगे शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल अशी. त्यामुळेही फरक पडत असावा. (?)

चांगल्या इंजिनीअर्सना व्हॅल्यू होती आणि असणार आहे ....

याआधीच्या कॉमेन्टमध्ये कॉलेजेस आणि शिक्षक यांच्याबद्दलच्या कॉमेंट वाचल्या... मी स्वतः अनेक कॅम्पस इंटरव्यू घेतले आहे / घेतो आहे. तसेच इंजिनीरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कामही केलंय ...

सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विध्यर्थ्यांची कष्ट करायची तयारी ... २१ अपेक्षित चा अभ्यास करून तुम्ही कदाचित पास होऊ शकाल .. पण इंजिनीअर बनू शकणार नाही ...

मग काय होत ... मेकॅनिकल मध्ये अल्युमिनियम चे जॉब्स हिटट्रीटमेन्टला पाठवतात आणि IT मध्ये जावा चे सिंटॅक्स पाठ करण्याच्या नादात लॉजिक डेव्हलप करायचे राहून जाते ... (मी हे दोन्ही किस्से स्वतः बघितले आहेत... पहिल्याला प्रोबेशन नंतर घरी पाठवले तर दुसऱ्याला इंटरव्यू मध्येच रिजेक्ट केले आहे )

Er होऊन नोकरीच का करावी? आत्मनिर्भर बनावे आणि छोटे मोठे व्यवसाय सुरु करावेत म्हणजे जशी ह्या क्षेत्रातील गलोगल्ली कॉलेजची लाट आली तशी सध्या कृषि क्षेत्रातील विविध सबसिडी सारखी इकडे सुद्धा एक लाट ...लाटच काय तर त्सुनामी येऊन जाऊ दे सबसिडीची.

Pages