Who killed value of engineering in India?

Submitted by mrunali.samad on 3 November, 2020 - 11:49

Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?

भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.

तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला 238 रु वार्षिक फी होती. त्यात हॉस्टेल आणि पुस्तक फ्री होते. मेसला 180 रु लागायचे महिन्याला

>> अशी एखादी फ्री टेस्ट घेता मला येईल का नेटवरून? नेमकं काय ते बघायला?
https://www.w3schools.com/python/exercise.asp या लिंकवर पायथॉनचे खुप सोपे प्रश्न आहेत. याच धर्तीवर कठीण प्रश्नावली बनवता येईल.
JUnit/Selenium सारखी ऑटोमेटेड टेस्ट फ्रेमवर्क वापरुन, मुलांनी सबमीट केलेले प्रोग्राम योग्य आहेत की नाही हे सहज तपासता येईल. खर्‍या आयुष्यात जसे प्रोग्राम टेस्ट केले जातात तसेच परिक्षेतही केले जावेत.

धन्यवाद, व्यत्यय. प्रयत्न करून बघते.
अनुंनी थोडे उत्तर दिलेच आहे पण तुम्हीही वेळ मिळाल्यावर दोन शंकांवरही थोडे काही लिहीलेत तर आवडेल वाचायला.

@ अनु -- धन्यवाद. थोडा अंदाज आला.
डोमेन नॉलेज वाला माणूस फक्त रिकवायरमेन्ट जमा करण्यापुरता, तरीही त्याचे काम इंटरेस्टिंग + कळीचे वाटतेय. एकाची अपेक्षा, कल्पना, व्यक्त-अव्यक्त गरज नीट समजून ती दुसर्‍याला प्रोग्राम फ्लोमध्ये त्याच्या विचाराची दिशा योग्य जाईल अशा रीतीने समजून सांगणे. डोमेन नॉलेज + ह्यूमन माइंड नॉलेज वापरून. तो चुकला की बाकी दोघे भांडत रहाणार. प्रोजेक्ट कॉस्ट, वेळ, यश सगळ्यावर परिणाम.

किती पगारावर सही केली आणि शाळेने किती हातात दिला ही गणितं अजूनही जिल्हा परिषद शाळांमध्ये वेगळी असणार.
Submitted by mi_anu >>
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नसतं हो असं.

मेबी. सध्या कोणी ओळखीचं नाही.
मला जनरीक मराठी शाळा म्हणायचं असेल.
या गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत ग्रामीण भागात. आई मुख्याध्यापिका होती काही वर्षं.

दोक्तरांचे जॉब ही आउट सोर्स आहेत

एका पार्ट टाइम जॉब ला मधली कम्पनी सरकार कडून पर डॉकटर 60000 घेते आणि कँपौंड्रचे 18000

प्रत्यक्षात 40 आणि 13 देतात , पण दोन्ही व्यवहार ऑन पेपर आहेत , म्हणजे त्यांना मिळणारेही ऑन पेपर 60
आणि ते डॉकटरला ऑफार लेटर देतात , तेही कागदावर 40

कुणीतरी सरकार मधलाच मनुष्य कम्पनी ओनर असणार

अशी 15 क्लिनिक्स आहेत
अजून 35 निघणार आहेत

होमवर्क : कम्पणीचे मासिक उत्पन्न किती ?

आयटी कंपनीत जे डॉक्टर्स नेमलेले असतात त्यांच्या पगाराची पण हीच गत आहे... डॉक्टरला ४० हजार मिळतात शिवाय आयटी लाईफ जवळुन अनुभवता येते.. आधीचे छान चौकीतले दिसणारे लाईफ कसे बेगडी आहे हे हळुहळु जाणवू लागते.. तिथले स्ट्रेस कळतात.. शिवाय भरपूर फ्री टाईम पण मिळतो.. मग एम.डी. च्या पुर्वपरिक्षेचा आभ्यास करणारे एम.बी.बी.एस. अथवा बि.ए.एम.एस. डॉक्टर्स रिकाम्या वेळात आभ्यास करण्यासाठी हा जॉब आनंदाने स्विकारतात... काही रिटायर्ड सरकारी डॉक्टर्स पन या जॉबवर जॉईन होतात (जेणे करुन सरकारी पेंशन ६० हजार अन या जॉबचे ४० हजार..! ).

पण भाषा, इतिहास, भूगोल शिकणार्‍या मुलांना कितीतरी संधी आता उपलब्ध आहेत>>>>

जेवढी मुले पास होऊन बाहेर पडतात त्या प्रमाणात ह्या संधी नाहीत. परत बहुसंख्य मुलांना नोकरीत रस असतो. स्वतःहून ब्लॉग लिहून किंवा इतर काही करून पैसे मिळायला खूप वेळ लागतो, तेवढे स्किल्स त्या मुलात हवे, डेव्हलप करायची इच्छा हवी. सगळ्यांना नियमित पैसे व साधारण काम अशी नोकरी हवी असते. परदेशी भाषा शिकून भाषांतराच्या संधीही खूप मोजक्या आहेत. त्यात पैसे मिळवणे तर कर्मकठीण. माझ्या मुलीने इतिहासात मेजर केले पण त्यात शिकवण्याखेरीज फारश्या संधी नसल्यामुळे आणि त्यातही खूप गर्दी असल्यामुळे, परदेशी भाषा शिकून आता ती इतरांना शिकवते. भाषांतर वगैरे क्षेत्रातले मार्केट तिला फार चांगल्या तर्हेने माहीत आहे. नव्या लोकांसाठी बाहेरून वाटते तितके ते चांगले नाहीय.

आणि शेवटी तुलना करताना आपण सर्वसामान्य मुले तुलनेत घ्यायला हवीत. आयआयटीत शिकून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये गुगलचे करोडभर पेकेज घेणारी मुले आहेत पण ती मोजकी, त्यावरून त्या मार्केटमध्ये सगळ्यांना करोडची पॅकेजेस मिळतात असा निष्कर्ष काढता येत नाही.

पगाराचे म्हटले तर माझ्या कंपनीत असेही लोक आहेत ज्यांना कंपनी सोडून जायची इच्छा आहे पण जाता येत नाही कारण इथे जेवढा पगार मिळतो तेवढा त्याच पोजिशनला बाहेर कोणीही देत नाहीत. इथे इतका कसा झाला याची कारणे वेगळी आहेत. Happy

या गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत ग्रामीण भागात. आई मुख्याध्यापिका होती काही वर्षं.>>>>

हो, मीही पाहिलेले आहे, मुलीच्या शाळेतली शिक्षिका बिचारी अशी अडकलेली. पण ही जुनी गोष्ट झाली. आताच्या जमान्यात काय आहे माहीत नाही. सरकारी शाळांत पगार वेळेवर मिळत नसेल कदाचित पण व्यवस्थित मिळत असावा. पण खाजगी शाळांमध्ये ग्रॅज्युएट असलेल्या पण नेट सेट किंवा त्या टाइप पात्रता नसलेल्या शिक्षकांना चांगला पगार नाही मिळत.

कारवी, 'कोडिंग इंटर्व्हू स्क्रीनिंग टूल्स' म्हणून सर्च द्या. हल्ली कंपन्या इंटर्व्हू मध्ये अशा टूल्सवर सर्रास प्रोग्रॅम करायला लावतात. मजा पण येते असं कोड करुन टेस्ट केसेस रन करायला. हॅकररँक वापरली आहे. https://www.hackerrank.com/ पण अशी अनेक आहेत.

काल मी २० आकडा कॉन्झर्वेटिव्ह म्हणून लिहिलेला, पण जन्ता मग मला अगदीच वेड्यात काढायला लागली बघुन जरा आश्चर्यचं वाटलेलं. म्हटलं असेल बाबा! आपल्याला काही भारतातलं कळत नाही अशा झक्की मोडात गेलेलो.
व्यत्यय, तुझी पोस्ट वाचुन आता जरा हायसं वाटतय Happy

अमितव
तुमचे आणि व्यत्यय चे विधान नक्की काही कंपनीज साठी सत्य असेल. मिड सिनीयर माणसाला २० लाख पॅकेज असेलही.
पण माझ्या जवळपास मी एक दुसरं जग बघते.

हो, ती कोडींग वाली टूल भारी असतात. सर्वात जास्त आवडलेलं होतं ते स्प्रिंगर नेचर कंपनीच्या ईंटरव्ह्यू मधलं.

प्रोग्रॅम कुठे वापरले जातात तर,
तुम्ही बसलेले आहात त्याच्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट स्मार्ट होते आहे. टूथ ब्रश्, कमोड, दाराची बेल, टीव्ही वर स्ट्रीम करायला वापरतो तो बॉक्स, वाईन आणि मद्य ठेवण्याच्या बाटल्यांची बुचं, बर्फ पडला की आपोआप वितळेल अशी घरांची छपरं, दाराची घंटी, स्पीकर्स, गूगल होम/ एको सारखे मदतनिस, असंख्य प्रकारचे कॅमेरे, स्मार्ट दिवे (यात तर अशक्य काय काय प्रकार येत आहेत), वाहने, रस्त्यावरील दिवे, घराची चोरांपासून सुरक्षा उपकरणे, एकुणच सुरक्षा देणारी उपकरणे, क्लायमॅट कंट्रोल, वेअरेबल्स, चष्मे, काँटॅक्ट लेंसेस, अनेकोनेक स्कॅनर्स, मोशन डिटेक्शन वर तर हजारो उपयोगी प्रकार आहेत .. आणि हे हिमनगाचे टोक आहे.
सगळ्या उपकरणांत निरंतर फीचर अ‍ॅड करायची स्पर्धा आहे. बरं ही वरची उदाहरणं फक्त आय-ओ-टी प्रकारची दिली आहेत. त्याच्या फ्रंट एंडला अ‍ॅप, बॅक एंडला वेब सर्विसेस, माहिती साठवायला डेटाबेस, माहितीचं वहन करायला विविध प्रोटोकॉल (ब्लूटूथ, झिगबी, वायफाय, एलटीई) इ. आहेच.
एंटरप्राईज च्या गरजा आणि लागणारी सॉफ्टवेअर वेगळी, बाकी स्विचेस, इन्फ्रास्टक्चर पासून इ-कॉमर्स इ. पर्यंत... नेव्हर एंडिंग लिस्ट आहे!

हालोईनला कँडी गोळा करण्याची स्मार्ट बॅग जी शार्प मेटलच्या वस्तू स्कॅन करुन अलर्ट करेल अशा अतरंगी गोष्टींना ही मार्केट आहे.
ही प्रत्येक गोष्ट कमोडटाईज्ड व्हायला काही वर्षे जातात. मध्यंतरी वाचलं त्याप्रमाणे २०२१ पर्यंत २० बिलियन आयओटी वस्तू दैनंदिन वापरात असतील आणि आलेख चढताच असेल. मला तरी जॉब इतक्यात कमी होतील असं काही वाटत नाही.

मी इंजिनिअरिंग ला असताना पर इयर रू. 44,000/- इतकी फि होती.जस्ट एक वर्षे आधी फ्रि सीट्स बंद झाल्या होत्या तेव्हा.
आजकाल किती फि आहे इंंजीनीयरींग ची??>>>>>>
ही माझ्या कॉलेजची फी होती
2016-17 :- 94000
2017-18 :- 86000
2018-19 :- 84000
2019-20:- 83000
राहण्या खाण्या चा खर्च वेगळा
इचलकरंजी मध्ये रूम भाडं 3000 आहे आम्ही तिघे जण एका रूम मध्ये प्रत्येकी 1000 भाडं
मेस 1800-2000 आहे.

जर तुमच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर फी च्या 40-50% इबीसी शासनाकडून डायरेक्ट कॉलेजला मिळते. आणि जर तुमचे पालक अल्प भू धारक असतील तर निर्वाह भत्ता पण मिळतो, मला 20000 मिळायचे दरवर्षी. हेच जर तुम्ही पुण्या-मुंबईत रहात असाल तर 30000 मिळतात

खूपशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगमधे इंटरेस्ट नसतो. फैमिली,सोसायटी इश्शुज म्हणून नाईलाजाने एडमिशन घेतली जाते.>>>>> खरंय हे!!
मला नव्हतं करायचं इंजिनिरीग, आता केलाय एवढा खर्च म्हणून जॉब पण करायला सुरवात केलीय. मला मानववंश शास्त्रात रस आहे, आता एक्सटर्नल एम ए करायचा विचार करतोय ignou मधून. Lol

नवीन Submitted by अमितव >>>>
धन्यवाद. सुचवलेली स्क्रीनिंग टूल्स पहाते.
सो, जेजे स्मार्ट, ऑटोमेटेड, डिजीटाईझ्ड, एआय बेस्ड इत्यादि त्या सार्‍यासाठी प्रोग्रामिंगचे चक्र अव्याहत सुरू रहाणार. आधी नवीन सोय मग त्याची उपयुक्तता वाढवणे यासाठी. माझ्या डोक्यात फक्त ऑफीस, उत्पादक कंपन्या, संशोधन क्षेत्र असेच ढोबळ मॅक्रो विषय होते. सामान्य ग्राहकाच्या प्रत्येक वापर, हालचाली, गरजेवर आधारित सॉफ्टवेअर बनणार असेल तर मग अनंत हाच शब्द. तुमच्या लिस्टमधील काही उत्पादने ऐकून माहिती आहेत, पण व्याप्ती लक्षात आली नव्हती. कारण अजून वापरात काही आलेले नाही.
सगळं निर्जीव ते स्मार्ट आणि मेंदूची क्षमता न वापरल्याने तो कुचकामी झालेला बावळट सजीव माणूस, असं होणार?

(वैयक्तिक मत) असं होणार नाही कारण हे चक्र सेल्फ फिडिंग आहे. जे आपण शिकलो ते पुढची पिढी टेकन फॉर ग्रँटेड धरुन पुढचं शिकेल/ शोध लावेल.
पण हे असं होणार हा विचार पॉप्युलर कल्चर मध्ये लय फेमस असल्याने यावर खच्चुन पुस्तकं चित्रपट मात्र निघतात/ निघतील. ती वाचायला/बघायला बुक रीडर आणि अ‍ॅनिमेशन इ. मध्ये जॉब ही निघतीलच Wink Proud
अर्थात बाय चॉईस मेंदूचा वापर करायचा नाही असा अट्टाहास वाढत गेला तर ग्लोबर वॉर्मिंग रुपी विवेकानंद आहेतच उत्तिष्ठत -जाग्रतचे तडाखे द्यायला!

तुम्ही बसलेले आहात त्याच्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट स्मार्ट होते आहे. >>> अमित यापुढे "पण जगातील एकूण स्मार्टनेस तेवढाच (कॉन्स्टण्ट) आहे. म्हणजे काय ते समजून घ्या" असे लिहीता लिहीता थांबलास का? Happy

कारवी - अमितने चांगली माहिती दिलेलीच आहे. त्यात थोडी भरः
ज्याला आपल्याकडे ढोबळपणे आयटी म्हणतात त्यात बरेच प्रकार आहेतः
१. प्रॉडक्ट कंपन्या - यांचे प्रमुख उत्पादन हे त्या प्रोग्रॅमिंगशी थेट संबंधित असते. उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्टची विंडोज (ऑपरेटिंग) सिस्टीम. कॉम्प्युटरची मेमरी व डिस्क या दोन्हीचा वापर कसा करायचा यात जर एखाद्याने मोलाची भर घातली तर त्यांना थेट फायदा असतो. अशा प्रोग्रॅमर्सना अशा कंपन्यांत सहसा प्रमुख स्थान असते. नेटफ्लिक्स चे तुम्हाला चित्रपट सुचवण्याचे अल्गॉरिदम (प्रत्यक्षात किती उपयोगी आहे ते एक मिनीट बाजूला ठेवू - मला बेनझीर भुट्टोंवरची फिल्म पाहिल्यावर हिम्मतवाला चे रेकमेण्डेशन आले होते, तर अ‍ॅमेझॉन प्राइम वर पद्मावत शोधताना सापडला नाही पण बाजीराव मस्तानी सर्च केल्यावर पद्मावत दिसला), यू ट्यूब, गूगल किंवा फेसबुक मधे तुमच्या आवडीनुसार कोणत्या जाहिराती तुमच्या मोबाईलवर आणायच्या ते ठरवणारे लॉजिक, स्मार्ट फोन्स मधे अ‍ॅपल किंवा सॅमसंग ने आणलेले नवीन "हार्ड" फीचर (दोन कॅमेरे, क्यू आर कोड स्कॅनर ई.) वापरून त्याचा फायदा घेणारे एखादे नवीन अ‍ॅप तयार करणारे - हे सगळे यात येतात. यातही लागणारे कौशल्ये खूप विविध आहेत. पण साधारण कॅटगरी प्रोग्रॅमर्सचीच. याला जनरली कॉम्प सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, रोबॉटिक्स स्किल्स वाले लोक लागतात. गणित, स्टॅटिस्टिक्स व अनेक कामांत इव्हन फिजिक्स ची माहिती असणे आवश्यक आहे.

२. "आयटी" डिव्हिजन्स - इथे कॉम्प्युटरचे काम हे त्या कंपनीच्या मुख्य उत्पादनाला पूरक असते किंवा त्याचा खप वाढवण्याकरता, किंवा खर्च कमी करण्याकरता वापरात येते. यातही दोन प्रकार आहेत -
काही कंपन्या आता वेब साइटवरून विक्री करतात - तेथे "ऑनलाइन रिटेल" शी संबंधित कामे ही प्राथमिक होतील (उदा: रीबॉक चे शूज ऑनलाइन घेण्याकरता असलेल्या साइट संबंधी प्रोग्रॅमिंग). तेथे पुन्हा वरच्या सारखी "कोअर प्रोग्रॅमिंग" स्किल्स लागतात. दुसरा प्रकार जास्त कॉमन होता, अजूनही आहे - ज्यात कंपनीचा मूळ बिझिनेस हा कॉम्प्युटर किंवा वेब साइटशी संबंधित नसतो पण त्यांच्या फायनान्स, सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग कामाला पूरक म्हणून त्यांची आयटी डिविजन काम करते.

या कामाकरता कोअर प्रोग्रॅमिंग थोडे लागतेच पण त्याबरोबर इतरही कौशल्ये लागतात. पहिल्या कॅटेगरीच्या मानाने अगदी कॉम्प सायन्स वालेच लागतात असे नाही. जावा, पायथॉन व "बिझिनेस" वाली सॉफ्टवेअर्स - ईआरपी, डेटाबेस, डेटा वेअरहाउसिंग, अ‍ॅनेलेटिक टूल्स वगैरे मधे अनुभव असलेले लोकही खूप लागतात. मूळ कॉम्प सायन्स स्किल नसेल तरी किंवा मुळात अ‍ॅकेडमिक डिग्रीचा कॉम्प्युटरशी काहीही संबंध नसेल तरी यात प्रावीण्य मिळवता येते - आवड, मेहनत आणि योग्य संधी - यातून. मागच्या दोन दशकांत अत्यंत विविध क्षेत्रातून यात वर आलेले अनेक लोक मी पाहिलेले आहेत.

३. सर्विसेस कंपन्या - या कंपन्या वरच्या दोन्ही पद्धतीच्या सर्विसेस पुरवतात. म्हणजे वरच्या दोन कॅटेगरीतील कंपन्यांना त्या त्या कामाकरता लागणारे लोक पुरवण्यापासून ते त्यांची ती कामे कंत्राटी पद्धतीवर करून देण्यापर्यंत ते अगदी त्यांची आयटी डिविजन/ वेब ऑपरेशन्स पूर्ण मॅनेज करण्यापर्यंत अनेक कामे या कंपन्या करतात. इन्फोसिस, विप्रो व भारतातील अनेक मोठी नावे प्रामुख्याने हे करतात. याला लागणारी कौशल्ये वरच्या कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे त्याप्रमाणे ती ती लागतात. इथे तुमचा एम्प्लॉयर म्हणजे ही कंपनी असते (उदा: विप्रो) पण प्रत्यक्ष काम कस्टमर कंपनीत चालते. क्लायंट, ऑनसाइट, ऑफसाइट वगैरे शब्द प्रचलित झाले आहेत ते या कंपन्यांमधल्या वापरांमुळे.

इथे मी वरून खाली ज्या क्रमाने लिहीले आहे बहुधा त्याच क्रमाने "कोअर" कौशल्याचे (प्रोग्रॅमिंग) महत्त्व कमी होत जाउन "सॉफ्ट स्किल्स" चे महत्त्व वाढत जाते - कस्टमर्स व एकूणच प्रोफेशनल सेट अप मधे वावरता येण्याचे व संवाद साधता येण्याचे कौशल्य. अर्थात हे फक्त स्किलसेट वेगळा या अर्थाने. कंपनी कल्चर प्रमाणे यातील कोणतीही कामे खूप इन्टरेस्टिंग व वर्क सॅटिस्फॅक्शन (आणि पैसे) देणारी असू शकतात, किंवा "कोणीच काही करत नसून बेन्सन जॉन्सन कंपनी कशी काय चालते?" असेही होउ शकते. ते सगळे कंपनी कल्चरवर अवलंबून आहे.

यातले कोणतेही काम कमी किंवा जास्त महत्त्वाचे आहे का हे ते काम वरच्या कोणत्या पद्धतीचे आहे यावर अवलंबून नाही, तर तुमच्या कामाचा तुमच्या कंपनी/कस्टमर वर एकूण इम्पॅक्ट किती आहे त्यावर आहे.

तर हे ढोबळ तीन प्रकार आहेत. खोलात शिरलो तर अजून खूप उप-प्रकार आहेत.

>>पण जगातील एकूण स्मार्टनेस तेवढाच (कॉन्स्टण्ट) आहे.>> Biggrin या लॉ वर कॉपीराईट घे ताबडतोब!
पार्किंसन्स लॉ, कनिंगहॅम लॉ किंवा इंटरनेट वरील कुठलीही चर्चा पुरेसा वेळ चालली की हिटलर/ नात्झी च्या तुलने पर्यंत जाते इ. लॉ सारखी.

टेक्नालजी कंपन्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी काम करणारी प्रोग्रॅमर हि जमात हळुहळु एक्स्टिंक्ट होणार. भविष्यातलं सॉफ्टवेर, इथे मी प्लॅट्फॉर्म (सास, पास, आयाज) म्हणेन प्रॉडक्ट नाहि, डेटा ड्रिवन असणार आहे. कोड ड्रिवन नाहि. एसएमइज वुड मेंटेन, ड्राइव चेंजेस बाय मनिप्युलेटीग डेटा... Happy

हो. खरं आहे.प्रोग्रामिंग पेक्षा काहीतरी कॉन्फिगरेशन करुन ऑटो जनरेटेड कोड.
-(एक काही वर्षांनी एक्स्टिंक्ट होणारा प्रोग्रामरडायनॉसॉर)

कॉपीराईट घे >> Happy मर्फीज लॉ मधे हे वाचले आहे ऑलरेडी - "Total intelligence in the world remains the same. The population is increasing" - असे काहीतरी Happy

क्लाउड कॉम्प्युटिंग मुळे "सिस्टीम अ‍ॅड्मिन" रोल वाले जॉब्ज कमी झालेत. एका कंपनीत डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स जर ५ लागत असतील, तर त्यांनी क्लाउड डेटाबेस सर्विसेस वापरल्यावर त्यांना किमान सगळे च्या सगळे लागत नाहीत. एखादा पुरेल. तर क्लाउड कंपनी अशा अनेक कस्टमर्स करता अ‍ॅडमिनिस्ट्रेशन करत असल्याने, व त्यातही त्यांनी ऑटोमेशन केल्याने त्यांनाही शंभर कस्टमर गुणिले ५ प्रत्येकी - इतके अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स लागत नाहीत. म्हणून एकूण नोकर्‍यांची गरज कमी झाली. हे सध्या ऑलरेडी होत आहे.

मात्र असे सध्या होत असलेले जॉब रिडक्शन इतर कोठे आहे कल्पना नाही. प्रोग्रॅमिंग करणारे बहुतांश रोल्स अजूनही आहेत असे दिसत आहे. सॉफ्टवेअर्स बदलली, टूल्स बदलली पण कामाचे स्वरूप साधारण तसेच आहे. गेल्या १०-१५ वर्षांतील ट्रेण्ड वरून.

२० वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर मधे हे काम जोरात होते (Y2K सोडून) पण आता नाही - असे किती आहेत ते शोधले तर त्यावरून कळेल की हा ट्रेण्ड किती जोरात आहे, व आत्ताचे रोल्स अजून साधारण किती वर्षे राहतील.

ऑटोमेशन मुळे क्यू ए चे जॉब कमी झाले असावेत. एकदा फीचर/ रिग्रेशन केसेस ऑटोमेट केल्या की पुढच्या रिलीज ला/ स्क्यू ला / प्रोडक्ट ला त्या केसेस स्केड्युल केल्या की झालं. त्यात फेल झालेल्या केसेस आपोआप जिरा लिहून टाकतात. ते ट्रीआज करायला, नव्या केसेस लिहायला फ्रॅ क्श न ऑफ लोक पुरे.

चांगली चर्चा चालू आहे.
काँप्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी हे विषय सोडून बाकीच्या विषयातील इंजिनीअर्स कडून देखील ऐकायला आवडेल विशेषतः oil and gas, renewable energy, biomedical engineering, aerospace इत्यादी क्षेत्रात काय परिस्थिती आहे? आयटी एवढ्या घाऊक नोकऱ्या नसतील यात पण काहीतरी मागणी असेलच ना? की इथेही डोमेन नॉलेज अधिक programming असा skill set लागूं लागलाय?

ऑईल, गॅस, एरोस्पेस मध्ये डोमेन नॉलेज चे थोडे लोक आणि बाकी कोडर्सच असावेत. काही मायनिंग प्रोडक्ट्स वर काम केलं आहे.
बायोमेडिकल devices मध्येही एकदा का गरज आणि इन्टर्फेस नीट ठरले (जे ट्रिव्हियल कदाचित नाही) की मग प्रोसेस आणि टास्क आणि रिसोर्स.. हाकानाका.
बायो न्युरोंस, जीन्स, ड्रग डिलिव्हरी इ. मध्ये सायन्स कुठे संपतं आणि इंजिनिअरिंग काय करतं याची फार कल्पना नाही. पण interdisciplinary ovharlap बराच जास्त असावा वाटतं.

आवडले म्हणून इथे देतेय

>>>>>>

पालकहो !

अगोदर मुलांना शिकवा सोजी, आटा, रवा आणि मैदा यातला फरक.

ती मुलं ओळखू देत मूग, मसूर, हरभरा, उडीद, मटकी आणि तूर कशी असते.

त्यांना समजून घेऊ द्या ताक, दही, लोणी, तूप, खवा, चीज, पनीर यातला भेद.

आले-सुंठ, हळकुंड-हळद, द्राक्षे-बेदाणे, खजूर-खारीक, नारळ-खोबरे, कांदा-लसूण धान्ये-डाळी-पीठ म्हणजे काय हेही कळू दे.

मुलांना कैरी-आंबा-आमरस, जिरा-बडीशेप-शहाजिरे, रातंबा-आमसूल-कोकम, तीळ-कारळे-कोरडा, हे ओळखायला शिकवा.

दाखवा त्यांना ज्वारी, बाजरी, भात, गहू, मका, ऊस, सोयाबीन, गवत यांची रोपटी आणि भेंडी, गवार, वांगे, टोमॅटो, मिरचीसह मेथी, पोकळा, पालक, शेपू, करडा, चुका, कोबी, फ्लाॅवर, चाकवत, मोहरी, कडीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा कसे ? कुठे ? केव्हा ?उगवतात-वाढतात-फुलतात-फळतात.

वरणा, पडवळ, दोडका, भोपळा, कारले, तोंडली यांच्या वेली आणि जंगलात वाढणारी पिंपळ, पळस, हुंबर, ऐन, सिसवाची झाडे बांधावरच्या बोरी-बाभळी, आंबा, रस्त्याकडेचा कडुनिंब, चिंच, वड, ओढ्याकाठची करंजी, जांबूळ पाहू दे ना!
फळा-फुलांनी लगडलेल्या झाडांच्या बागा, मंद वाऱ्यासोबत दरवळणारा त्यांचा सुगंध हुंगू देत मुक्तपणे.

कळू दे त्यांना गाय-बैल-म्हैस, घोडा-गाढव-खेचर, शेळी-मेंढी यातला फरक.

दाखवा त्यांना धार कशी काढतात, शेताला पाणी कसे पाजतात, गूळ कसा रांधतात आणि पिकांची मळणी कशी करतात.

पडून-लोळून माती-चिखलात, पावसात भिजून, उकाड्याने शिजून शेतात राबताना घाम कसा निथळतो तेही अनुभवू दे.

शिकवा वडीलधाऱ्यांच्या सहवासात सौजन्याचा पाठ, मावशी-काका-काकी, मामा-मामी, आजी-आजोबांच्या कुशीत गुजगोष्टी, आई-बाप, बहीण-भावाबरोबर घरातील कामास लावू दे हातभार मित्रांच्यासोबत पाहू देत पाने-फुले, पशु-पक्ष्यांची चित्रे, वाचू देत चिऊ-काऊच्या गोष्टी, निदान करू दे खेळासह मस्ती.

हे सारं विसरून बछड्यांना कोडींग शिकवू पाहात आहात; मग ती समस्यांचा डोंगर बनणार नाहीत तर दुसरं काय ?

काळ्या, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या हॅटची घाई कशाला !

कोडींगही शिकू देत, पण अगोदर डिकोडींग समजू दे आपल्या परिसरातले...
मनसोक्त हुंदडायला राखून ठेवा,
नका कोमेजू अथवा मारू त्यांचं बालपण...
*रमेश*

(डॉ अतुल अग्रवाल, बाल/शिशु रोग विशेषज्ञ यांच्या हिंदी कवितेचा मुक्तानुवाद)

Submitted by अमितव, फारएण्ड, राज, अनु .... वाचतेय. झाले क्लिअर बरेचसे.
आता केसेस स्केड्युल / जिरा / ट्रीआज हा न कळणारा भाग सुरू झालाय, मी आयटीवाली नाही, त्यामुळे ओके.
तंत्रज्ञानाच्या पुढच्या टप्प्यात मानवी बुद्धीमत्तेलाही पर्याय असणार आहे; तिची गरज, अनिवार्यता कमीच होणार, इतके कळले.

हे चक्र सेल्फ फिडिंग आहे. जे आपण शिकलो ते पुढची पिढी टेकन फॉर ग्रँटेड धरुन पुढचं शिकेल/ शोध लावेल >>>

असे खरेच होईल का माहीत नाही.

एक पाहिलेला प्रसंग -- परदेशातून आलेले सून, मुलगा, नातवंडे. सासूने मी योगा करते मुलांना दूध दे सांगितले. नातवाने ओठाला लावताच असह्य गरम म्हणून सांडून घातले.
सुनेचे स्पष्टीकरण : फ्रीझरमध्ये ठेवलेला कुठला टेट्रापॅक ( बहुतेक milk quantity, brand specific container thickness etc) मायक्रोवेवला काय पॉवरवर किती वेळ ठेवला की दूध पिणेबल होते आणि स्ट्रॉ खुपसून मुलांना देता येतो. हे तिला माहीत. पातेल्यातील दूध मगातून प्यायला देताना काय करायचे हे नाही.
२५-२७ वर्षे इथे राहिलेली मुलगी ३-४ वर्षात सराव गेल्याने विसरली.
मुलांना हातात आले की प्यायचे माहीत. हाताने मगाच्या गरमपणाचा अंदाज घेणे, वाफ दिसल्यावर थोडा वेळ थांबून / फुंकून पिणे हे केलेच नसल्याने येत नाही.

आईने जे केले नाही ते पुसले गेले, मुलांना मेंदूत नोंदच नसल्याने करता आले नाही. असे जर बर्‍याच बाबतीत प्रदीर्घकाळ झाले तर क्षमतेचा र्‍हास होईलच ना. आणि नवीन पिढीत ते मुळात उतरणारच नाही. असं कसं टेकन फॉर ग्रँटेड धरुन पिढी दरपिढी कॅरी फॉर्वर्ड होईल? जीवशास्त्रीय सिस्टीम आहे ती. बँकेचे पासबुक नाही.

फार तर,
आजी आजोबांचे मेंदू वेगवेगळ्या स्किल्ससाठी उत्तेजित असताना स्कॅन करून, नैसर्गिक स्किल्सचा डेटाबेस बनवायचा, मग प्रत्येक स्किलचा प्रोग्राम बनवायचा, आणि लागणार्‍या बायोकेमिकल्सची नोंद;
प्रत्येक प्रोग्रामला तो कुठे कुठे लागू शकेल त्या अ‍ॅप्लिकेशन परिस्थितींचा डेटाबेस लिंक करायचा.
( उदा फुंकर मारणे -- गरम दूध, पिझ्झा वरणभात समोर आल्यावर; डेटॉल लावताना; चटका लागल्यावर; शेवरीची म्हातारी दिसली की..... इत्यादि )

ग्राहक पिझ्झा खायला बसला की सेन्सरने नोट करायचे आणि रिमाइंडर द्यायचा,
१. तुम्हाला फुंकर अ‍ॅप्लिकेशन हवे का? Y/N
२. सेल्फ फुंकर की फुंकर मारायची सर्विस हवी ? २-१ / २-२
३. तुम्हाला ओठांचा चंबू करून हवा बाहेर टाकायला तोंड आणि पिझ्झ्याच्या मध्ये प्रेशर ग्रेडियंट हवा का? Y/N ( if Y, Go To -->)
४. ओठांचा चंबू करण्यासाठी गालाचे स्नायू ताणायला मदत हवी का? Y/N (if Y, Go To -->)
५. फुंकरींची किती वेळात किती आवर्तने करणार ? १ पर १ /२ / ३ सेकंद

पुढच्या पिढीने लागेल तशी स्किल्स + सेवा हायर करायची
मग कॉम्प्युटर तो तो प्रोग्राम वापरून ग्राहकाच्या मेंदूला (त्यातील योग्य कृती केंद्राला) जरूरी इंपल्स ( याचा रेट फुंकरीची किती वेळात किती आवर्तने या डेटावरून अजून एक प्रोग्रम ठरवणार) पाठवणार +
बायोकेमिकल्स इंजेक्ट व्हायची सोय करणार.
(इथे कधीतरी प्रोसेस फेल्ड ; बायोकेमिकल्स आऊट ऑफ स्टॉक; प्लीज रिफील ऑर रिप्लेस ब्रेन-बायो-पॅच असा मेसेज; मग गो टू स्टेप २-२ म्हणजेच फुंकर मारायची सर्विस हवी का असा पुनःप्रश्न)
मग पुढची पिढी ती कृती करणार. अ‍ॅज अँड व्हेन नीडेड बेसिसवर. हवी कशाला गर्दी मेंदूत नको ती.
हे होऊ शकेल....!!

कारवी सुनेचे उदाहरण नाही पटले. काही गोष्टी माणूस विसरला तरी चूक झाल्यावर परत सुधारू शकतो. कदाचित माणूस आणि यंत्राच्या बुद्धीत हाच फरक असावा.

हॉलिवुड मध्ये यावर ढिगाने चित्रपट आहेत. Wall-E नावाचा लहान मुलांसाठी सुंदर चित्रपट आहे.

सुनेचे 'उदाहरण' नाही स्वतः पाहिलेली वस्तुस्थिती आहे.
कदाचित माणूस आणि यंत्राच्या बुद्धीत हाच फरक असावा. >>>> याच मुद्द्यासाठी ते लिहीलेय ना?
बाकी जास्त लिहीत नाही, माझ्यामुळे खूप अवांतर आधीच झालेय.

Pages