Who killed value of engineering in India?

Submitted by mrunali.samad on 3 November, 2020 - 11:49

Rise of unemployment in engineering graduates in India..
Who killed value of Engineering in India?

भारतात एकूण 4500 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.सीमीलर लोकसंख्या असलेल्या चीनमधे अराउन्ड 650 इंंजिनीयरींग कॉलेजेस आहेत.भारतात खरंच इतक्या इंजिनिअर्स ची गरज आहे का?Supply is much more than demand. टॉप लेवल चे 100 कॉलेजेस सोडून बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्राध्यापकांचे कौशल्य पैथेटिक आहे.
इतक्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसला सरकारी मान्यता का मिळते?त्या कॉलेजमधून खरंच स्किलफूल इंजिनीयर्स बाहेर पडतात का?मी पाहिलेले काही इंजिनीयर्स बँकेत, रियल इस्टेट, किराणा शॉप, गैस स्टोव्ह रिपेरींग अशी कामे पण करत आहेत.
Even today parent's mindset is filled with only two options either medical or engineering. Medical is too costly, so go for engineering.
From last 20 years the same trend follows now we are seeing the adverse effect of huge supply and less demand.

तुमचे काय निरिक्षण काय आहे या विषयावर जाणून घ्यायला आवडेल..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गरम फुंकुन पिणे हे उदाहरण अनेक पातळ्यांवर चुकलेले आहे. अर्थात ते तुम्हाला ही समजले आहे सो त्यावर आणखी लिहित नाही.

>>पण सगळ्या गोष्टीत तंत्रज्ञानावर 'अति ' अवलंबून रहाण्याने क्षमतांचा र्‍हास व पुढे कदाचित विनाश हे आपल्याला सर्वांनाच जाणवतेय, आणि मला तितकेच म्हणायचे होते. >>
>>पण फोन नंबर पाठ करुन लक्षात ठेवण्याची आपली क्षमता मोबाईळ आल्यावर आणि स्पेलिंग स्वतः लक्षात ठेवण्याची क्षमता ऑटो करेक्ट आल्यावर नक्कीच कमी झाली आहे. >>

रुळलेल्या वाटेला छेद देत मूलभूत जगण्याची कौशल्ये शिकण्याच्या प्रयत्न केलेली/ झटलेली काही मोजकी मंडळी वगळता आपल्याला जंगलात तिकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींत जगायला सोडले तर आपली किती दयनीय अवस्था होईल! आपल्या गुहेत राहणार्‍या पूर्वजांनी त्या अवस्थेत आपल्याकडे बहितलं तर ते काय नजरेने बघतील? कदाचित तुम्ही त्या आईकडे बघताय त्याच नजरेने असेल का?

अर्थात आपण ती कौशल्ये विसरलो कारण आज आपल्याला त्याची काही गरज पडत नाही आणि त्याच्या मोबदल्यात आज गरज लागणारी कैशल्ये जशी... आपल्या गरजा कशा भागवाव्या आणि त्यासाठी पैसे कसे कमवावे, कामाच्या ठिकाणाहुन बस, आगगाडी बदलत घरी कसे यावे, वार्षिक कर कसे भरावे इत्यादी इत्यादी आपण आत्मसात केली.
आपल्या पूर्वजांकडेही आपल्या इतकाचा तल्लख मेंदू होता आणि त्यांच्याकडची कुठली कुठेली कौशल्ये आपण आज गमावली आहेत याचे काही उत्खननातून मिळालेले पुरावे आणि बाकीचे मानववंशशास्त्रातील अनुमाने यावरुन थोडेफार तर्कच आपण आज करू शकतो.

१. प्राण्यांचा मागोवा घेणे, त्यांचा सुगावा लावणे आणि मग नंतर त्यांची शिकार करणे: यात तो प्राणी किती मोठा आहे, नर आहे का मादी आहे, तो सध्या कुठे आहे अशी बारिक बारीक निरिक्षणे करत, भेद बघत त्याची पुढची हालचाल काय असेल त्याचे अनुमान काढणे आणि त्यानुसार आपली हालचाल ठरवणे. असाच कीटकांचा किंवा इतर कुठल्या भक्ष्याचा माग काढणे हे जर लहानपणापासून त्या परिस्थिती राहिले नाही तर आपण संपूर्णपणे गमावलेलं कौशल्य आहे.

२. काय खावे आणि स्वउपचार कसे करावे : खुल्या आसमंतात मिळणार्‍या वनस्पती, झाडपाल्यांतील काय खावे. दुखलं खुपलं तर कुठल्या आणि कशा वनस्पती वापराव्या इ. इ.

३. दिशाज्ञान (नेव्हिगेशन): आपले पूर्वज शेकडो मैल दूर जीपीएस, नकाशे नसताना दळणवळण करत, प्रदेश ढुंडाळत. होमो इरेक्टस पासून मैलोनमैल धावण्याची शक्ती होती. रानावनातून शेकडो मैल जाण्याच्या वाटा स्मृतीपटलावर कोरलेल्या असायच्या, त्यासाठी काही खुणा केलेल्या वस्तू इ. ची मदत घेण्यापासून आज आपला जीपीएस पर्यंतचा प्रवास आहे.

४. शून्यातून कपडे तयार करणे. डुक्कराच्या कातड्याचे बुटांचे तळवे आणि मऊ हरणाच्या कातड्याचे गुबगुबीत आवरण करणे इ. बरचं सांगता येईल.

५. दगडातील/लाकडातील/ ओतीव धातूचे कोरिवकाम (स्कल्पचर) आणि पेंटिंग, जे मायकलअँजेलोच्या काळात लाईफ स्किल टाईप होते, जे सामान्य माणसाला अवगत होते. मायकलअँजेलो उच्च कलाकार होता यात शंका नाही पण त्या काळातील स्क्ल्पचर करणारे आजच्या पेक्षा जास्त पारंगत होते. आज नवनवीन टूल्स, तंत्रज्ञान आलं आहेच पण ते स्किल टिकलं नाही.

६. प्रिंटिग प्रेस आल्याने मोठी मोठी ग्रंथांची बाडं काव्यमय रित्या मुखोग्दत करणे आणि तद्नुशंगित स्मृती गमावली.

झाडावर चढणे, शेतात काम करताना हवामानाचा अंदाज बांधणे अशी अनेक कौशल्ये तर गेल्या दोन पिढ्यांत मी स्वतः गमावली आहेत.
तर हो! आपण अनेक कौशल्ये गमावली आणि अनेकोनेक कमावली.

>>जीवशास्त्रीय सिस्टीम आहे ती. बँकेचे पासबुक नाही.>> अर्थातच!
आज संगणकशात्र शिकणार्‍या विद्यार्थ्याला लो लेव्हल मेमरी मॅनेजमेंट फारसं शिकवलं जात नाही (नसावं)... (आयरॉनिकली परत मेमरी मॅनेजमेंटच.. Happy ) कारण आजच्या प्रोग्रॅमिंग भाषांत ते लो लेव्हल स्किल आणि त्या अनुशंगाने होणारे न्युआन्सेस त्या संगणक भाषेने त्याच्या मूळ ढाच्यातच आत्मसात केलेले असतात. तुम्हाला इतकं खाली उतरुन गाळ उपसावा लागत नाही. त्याचं ज्ञान असेल तर कदाचित तुम्ही त्याचा उपयोग करुन आणखी चांगले कोडर बनाल, पण बहुदा नाहीच. कारण सर्वसामान्य कोडिंग मध्ये, तुमच्या रोजच्या जगण्यात त्याचा उपयोग करायची वेळ येण्याची शक्यता कदाचित फारच कमी असेल. ते स्किल गेलं म्हणून हळहळायचं का? तर मला वाटतं नाही. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल... समस्येची उकल करुन मात करण्याचे कौशल्य आत्मसात केले की अशी हरवलेली कौशल्ये गरज लागेल तेव्हा परत मिळवणे शक्य होते/ होईल.

माझ्या कॉलेजला वार्षिक फी वार्षिक फी 1600 होती. हॉस्टेल फी वर्षाला 700 च्या आसपास.
विना सवलत. विद्यार्थ्यांनी चालवलेली मेस त्याचे महिन्याला 180 ते 200 व्हायचे. (दर महिन्याला झालेला खर्च विध्यार्थ्यांच्या संख्येने विभागल्या जाऊन, दर महिन्याचे बेसिक बिल निघायचे + कुणी काय extra घेतले (स्वीट, नॉनव्हेज, गेस्ट))

यासाठीही स्टेट बँकेकडुन शैक्षणिक कर्ज घेतले होते. व्याजदर खूप कमी होता सगळेच घ्यायचे तेव्हा.

Submitted by अमितव on 18 December, 2020 - 22:00
आपल्याला जंगलात तिकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींत जगायला सोडले तर >> अगदी हेच डोक्यात आले होते सकाळी पण लिहायच्या कंटाळ्याने थांबलो, तुम्ही पुढे छान शब्दात मांडले आहे तेवढे मला जमलेही नसते.

नवीन Submitted by अमितव on 18 December, 2020 - 22:00 >>>

मी गरम फुंकून पिणे याबद्दल बोललेले नाही + त्या आईकडेही 'कुठल्या' नजरेने बघितलेले नाही.
फक्त -----
गरम फुंकून पिण्याचे स्किल ज्या मुलाला अवगत करून दिलेले नाही / निसर्गतः विकसित झालेले नाही अशा मुलाला,
जुन्या सेटपमध्ये दूध देताना,
जुना आणि नवीन असे दोन्ही 'दूध गरम करून देणे' सेटप्स मुळात अवगत असलेली व्यक्ती,
नवीन सेटपच्या सोयीस्करपणामुळे + त्यातील तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून राहून + स्वतःच्या तारतम्याने कृती करण्याच्या गरजेतून मुक्त होण्याच्या सुविधेमुळे, त्याचाच सातत्याने वापर करते व,
जुन्या सेटपमध्ये निश्चित लागणारे तारतम्य, सामान्य ज्ञान / नैसर्गिक कल, स्किल अजिबात वापरेनाशी होते,
परिणामी त्या स्किलचा र्‍हास झाला. फक्त मोजक्या ३-४ वर्षात.

इतकी साधी गोष्ट, इतक्या साध्या पण नियमीत नव्या कृतीने, इतक्या वेगात स्मृतीपटलावरून धूसर होते,
तर जेव्हा तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप प्रमाणाबाहेर होईल तेव्हा अजून कसे, किती विपरीत परिणाम होतील?
----- हा मुद्दा होता.

त्याच्याशी तुम्ही असहमत असू शकता. पण तो चुकीचा नाहीये.

सोय, सुविधा, बदल, कालबाह्यता, प्रगती, उत्क्रांती या स्वाभाविक घटना आहेत. जोपर्यंत याचा वेग आणि सजीवांच्या आयुष्यावरील परिणाम प्रमाणात आहे/होते तोवर ठीक.
कुठलीही गोष्ट जेव्हा अती, अति होते तेव्हा ती हिताची रहात नाही. त्याचा भस्मासुर होतो.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने पुढे जायचे तर त्यातही समतोल असावा.
सर्व क्षेत्रे सोबत सोबत वाढावीत. कोर स्किल + ऑटोमेशन यांच्या योग्य समन्वयाने.

फक्त ऑटोमेशन, कॉम्प्युटर, आभासी इ इ तंत्रज्ञानाने सगळीच्या सगळी क्षेत्रे काबीज करून टेक्निकल कोर स्किल, ह्युमन आस्पेक्ट, नैसर्गिक बुद्धी, तारतम्य, विकसित झालेल्या मेंदूच्या आदिम क्षमता या सार्‍याला अडगळ ठरवावे -- आणि हेच मानवाच्याच भल्याचेच आहेच हे ठसवत रहावे ------- हे मला चूक वाटते.

सोय, सुविधा, सुखासीनता कोणाला नको असेल?
तुम्ही काही करू नका, कॉम्प्युटर सगळे करेल, तुम्हाला हवे तस्से करेल,
तुम्ही जागचेही न उठता फक्त टिचक्या मारा.
तीही नसेल मारायची तर बोला. बोलायचेही श्रम नकोत तर पापणी लववा.
अरे काय? कुठवर? कुठे कुठे?
काही क्षेत्रात गरज असेल या प्रगतीची, ठीक, पण अत्र-तत्र-सर्वत्र "इतक्या टोकाला जाण्याची" गरजही आहे का?

या सर्व सोय, सुविधा, सुखासीनता, काही न करता सग्गळे आपोआप, आयते होणार; याची भूल पडणारच.
मग सवय --- मग चटक --- मग अवलंबित्व --- मग नाईलाज --- मग परतीचा मार्ग बंद.
कारण हे टप्पे पार करताना आपण मुळात ज्याबाबत जितके सक्षम आहोत, ते गमावलेले असणार.
आयुष्यात काय गमवून ही चैन कमावली आपण हे कळेल तेव्हा उशीर झालेला असेल.

वरचे मुद्दे १-६ मान्य आहेत. इतके बदल होणारच.
पण सजीवांच्या शतकांच्या सहस्रकांच्या प्रवासात गुंफून झालेत ते. मार्केटच्या लालसेने लादले गेलेले नाहीत.
कौशल्ये बदलणे, विकसित होणे आणि मारली जाणे यात फरक आहे?

आपल्यासाठी तंत्रज्ञान असावे; तंत्रज्ञानाच्या सॅच्युरेशनमुळे उद्भवलेल्या कु-परिस्थितीच्या तालावर नाचण्यासाठी आपण नव्हे. माझा मुद्दा तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून निर्माण होणारी नवी सृष्टी हा नाही. ते होऊ दे. पण संयमाने.

तंत्रज्ञानाचा अनावश्यक ठि़काणी, अमर्याद, अनैसर्गिक, अपायकारकही वापर करून; वरून हेच ते सुख जे तुम्ही शोधत होतात, हे बिंबवू नये कोणी.

<< ते स्किल गेलं म्हणून हळहळायचं का? >>
खरं आहे तुमचं म्हणणं. पाढे पाठ करायची काय गरज आहे? काल दुकानात गेलो, 12.67 बिल झाले, 20 ची नोट दिली, तर उरलेली रक्कम कॅल्क्युलेटर वापरून मला पटकन देण्यात आली, डोक्याने आकडेमोड करायची काय गरज आहे?

तुमचे उदाहरणात खालील चुका आहेत म्हणून ते मला अजिबात महत्त्वाचं वाटत नाही.

१. हे घडलं तेव्हाची त्या आईची शारिरीक मानसिक परिस्थिती. उदा. अवेळी विमानप्रवास करुन आलेली असेल तर कॉग्निटिव्ह स्किल्सवर मर्यादा येतात... हे एक आपलं उदाहरण. .. काय होती? हे वन ऑफ उदाहरण असू शकेल का?
२. ती आई चहा/ कॉफी/ सूप किंवा इतर गरम करुन जरा निवल्यावर खायच्या/प्यायच्या गोष्टी व्यवस्थित खाते/ पिते का? उत्तर बहुदा हो असावं.
३. भारतात राहणार्‍या लोकांचा फारिन रिटर्न्ड लोकांना वागविण्याचा चष्मा आणि फारिनच्या लोकांचा केलेल्या सिली मिस्टेकवर 'आपल्याला ना बाबा आता अशी सवयच राहिली नाही' अशा टुमण्याचा जप. हे सगळ्यात जास्त शक्यतेचे कारण असावे. अगेन असेलच हा दावा नाही.
४. पेय गरम करणे आणि ते पिणे/ पाजणे हे स्किल जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशात विसरले गेले असेल असं जाणवण्याचे तुमचं एक उदाहरण सोडलं तर मला प्रसंग आलेले नाहीत. यच्चयावत माणसे रोज दोन तीन वेळा अन्न गरम करुन घेणे, पेये गरम करुन घेणे करतात. अर्थात मी त्यावर सांख्यिकीतदृष्ट्या लक्षणीय ठरेल असा कुठला अभ्यासही केलेला नाही.
५. गरम/ थंड संवेदना ही पंचेद्रियांची अगदीच मूलभूत संवेदना आहे. त्यावर या वन ऑफ उदाहरणाने घाला गेला या निष्कर्षावर येणे हे अनुमान आधी काढून मग त्यासाठी पुरावा शोधण्यासारखे झाले.
६. सगळ्यात महत्त्वाचं हे असं फक्त एकदाच घडलं का? दुसर्‍या कुठल्या सेटिंग मध्ये अशा प्रकारचं बिहेविअर झालं का? हे असं या फक्त एका व्यक्ती बाबत झालंय का? त्या सेटिंग मध्ये वाढलेल्या आणि नंतर सवय न राहिलेल्या आणखी अशा किती व्यक्तींच्या बाबतीत असं झालं?
७. असं झालेल्या व्यक्तीने त्यावेळी इतर कोणते निर्णय घेताना काही वेगळं बिहेविअर केलं का?
८. हे रिपीटेबल आहे का?

बाकी टेट्रा पॅक मध्ये स्ट्रॉ खुपसुन तसंच दूध प्यायचं असतं. मायक्रोवेव्ह करण्याजोगे दुधाचे टेट्रापॅक कधी बघितले नाहीत. पण असतील काही स्पेशल असं धरुन चालतो.
बरं ते मूल जनरली किती वेळा दूध सांडतं?
दूध सांडण्याची आमची पिढीजात परंपरा आहे म्हणून विचारतोय. स्पिल प्रूफ कप द्या, स्ट्रॉ घालून टेट्रा पॅक द्या, साध्या कपात द्या, ग्लासात द्या. दूध सांडतंच.
असे अनेकोनेक प्रश्न अनुत्तरित असताना धाडकन चार वर्षांत कौशल्याचा र्‍हास झाला हे अनुमान काढणे चुकीचेच नाही तर बेजबाबदार ही आहे.

कारवी, तुमच्या प्रतिसादातील पुढचा सगळा भाग हा 'एकतर हे नाही तर ते टोक' असा आहे. आहे ते सगळं सोडून टेक्नॉलॉजीच्या भजनी लागलेलं मला तरी दिसलं नाहिये अजुन. त्यामुळे मला तरी तो स्टॉमन वाटून त्यावर काही बोलत नाही.

यावर फक्त एक शेवटची कळकळीची विनंती पालकांना कराविशी वाटते ती म्हणजे सात/ आठ वर्षाच्या मुलांना कोडिंग शिकवाच शिकवा. टेक्नॉलॉजी जी आजूबाजूला आहे ती कशी चालते याचा एक बर्ड आय व्ह्यू तरी त्यांना मिळू द्या. त्यासाठी पैसे देऊन व्हाईट हॅट का तत्सम करायची काही गरज नाही. एमआयटी ने स्क्रॅच लँग्वेजची निर्मिती मुलांना कोडिंग कळावे/ रस निर्माण व्ह्यावा म्हणुनच केलेली आहे, आणि ते नि:शुल्क आहे. इतरही अनेक प्लॅटफॉर्म असतील. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं.
वर साधनाने लिहिलंय ते निसर्गाची जवळीक आणि कोडिंग हे वैरी नाही तर हातातहात घालून चालणारे आणि आपल्या आजूबाजुला असलेले सवंगडी आहेत. मुलांच्या बाजुला निसर्ग जसा आहे तशी टेकनॉलॉजी ही आहे. त्यांना ती कशी चालते ते कळू द्या.

>>ते स्किल गेलं म्हणून हळहळायचं का? तर मला वाटतं नाही. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल... समस्येची उकल करुन मात करण्याचे कौशल्य आत्मसात केले की अशी हरवलेली कौशल्ये गरज लागेल तेव्हा परत मिळवणे शक्य होते/ होईल. >> असं ते संपूर्ण वाक्य आहे. मेंदूचा वापर करू नकाच्या अगदी संपूर्ण विरुद्ध लिहिलं आहे मी. एक स्किल गेलं तर आणखी चार मिळवा, आणि गेलेलं स्किल परत मिळवण्याची धमक ही.
मेंदू, हात पाय बंद करुन 'ठेविले अनंते' केलंत तर काय होईल उघडच आहे.

>>----- हा मुद्दा होता.<<
मला तर तो सगळा एपिसोड सवय मोडल्याचं कारण पुढे करुन धांदरटपणावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न वाटतो. आम्हि त्याला एफओबी सिंडरोम म्हणतो. मी मुंबईत असताना माझा एक टीम मेंबर सहा महिने शिकागोला राहुन आल्यावर आमच्या बरोबर इंग्रजी जाउद्या, हिंदी सुद्धा अमेरिकन अ‍ॅक्सेंटमधे झाडायचा. आज त्याची आठवण झाली, आणि डोळे पाणावले... Proud

अमितव यांचे प्रतिसाद आवडले.

२००३ खाजगी कालेजात फ्री सीट्स संपुष्टात आल्या. त्यावेळी सिओईपीची फी १८००० होती, ती २००७/२००८ पर्यंत २४००० का ३०००० झाली होती. २००३मध्ये खाजगी फिया सरसकट ७००००च्या वर गेल्या होत्या, त्यावर अनेक ठिकाणे तक्रारी, आरडाओरड झाली आणि काहींनी फिया ५०००० पर्यंत आणल्या होत्या. ते एखाद वर्षच टिकलं आणि फिया पुन्हा वाढत गेल्या.

यावर फक्त एक शेवटची कळकळीची विनंती पालकांना कराविशी वाटते ती म्हणजे सात/ आठ वर्षाच्या मुलांना कोडिंग शिकवाच शिकवा >> हो अगदी! फक्त आत्ता जे भारतात चाललंय की कोडिंग हेच सर्वस्व आहे, ते पटत नाही. नवीन कौशल्य शिकणं उत्तमच आहे आणि त्याने पाठांतर वगैरे कौशल्ये कमी होणार असतील तर फारशी हळहळायची गरज नाही. काळानुसार लागणारी कौशल्ये शिकावीत व न लागणारी नाही शिकली तरी हरकत नाही. एकच कौशल्य हे कालातीत आहे, हे पाठांतराच्या बाबतीत जितके चूक आहे, तितकेच कोडिंगबद्दलही.

आमच्या रत्नाला फ्री युट्युब चॅनल वरून किंवा मी शिकवून हळुहळु कोडिंग शिकणार का विचारलं मागच्या महिन्यात."तुमचा अगदी आग्रह असेल तर शिकू शकते" उत्तर आलं.मग म्हटलं राहूदे, आमच्या वर इतके उपकार नकोत.तुला मनापासून उत्साह वाटेल तेव्हा शिक.
स्क्रॅच मस्तच आहे.

तंत्रज्ञानाचा अनावश्यक ठि़काणी, अमर्याद, अनैसर्गिक, अपायकारकही वापर करून; वरून हेच ते सुख जे तुम्ही शोधत होतात, हे बिंबवू नये कोणी.
>> mast.
People have become like farmer who runs to get land and collapses. Aso!

हे खरंच घडलंय
"खाऊ शकते" "शिकू शकते" अशी उत्तरं घरातून ऐकली की फार डोकं सरकतं
तुम्हाला एखादी गोष्ट हवीय किंवा नकोय
एखाद्याने 2 वेळ विचारलयावर तुमच्या डोक्यात 'आपल्याला कदाचित भूक आहे, हे खायला चालेल' असा लाईट पेटतो का?स्वतःचे काही विचार, गरजा यांच्याशी कनेक्ट आहे की नाही?करायचं नाही तर नाही करायचं म्हणावं

पण हे दोन वेळा का विचारावे लागले? एकदा विचारुन नाही सांगितल्यावर परत विचारल्यावर समोरचा माणुस कदाचीत मन राखायला हो खाऊ शकतो/चालेल म्हणत असेल?

हा माझा स्वानुभव आहे. आईला करून खाऊ घालणे / असेल ते खाऊ घालणे याची भयंकर हौस आहे.
हे खाणार का?
नाही अजिबात भूक नाही.
मग ते खाणार का?
नको खरंच.
मग हे तरी खा!
नको गं.
हे पण नको?

या प्रकारात बहुत करून "नको नको नको त्रिवार नको" असा शेवट होतो तर कधी नको मन मोडायला म्हणुन तिसऱ्या / चौथ्या राउंडला बरं चालेल असं म्हटलं की "होती भूक तर कशाला नखरे करत होतास?" असा निष्कर्ष निघतो. Lol

माझ्या मुलीला 4 थ्या इयत्ते मध्ये Scratch programming सुरू झाले.

7व्या इयत्ते मध्ये html programming आणि 10व्या इयत्तेला Java येणार आहेत.

इतके सगळे शाळेच्या अभ्यास क्रमातच येणार असेल तर आणखी नवीन काय शिकवायचे?

तरी बरे अजून फॉरेन भाषा (जर्मन,फ्रेंच, जपानी) नाही अजून. नाहितर त्याचाही क्लास लावा(कारण आमच्या घरात कोणालाही येत नाही)

मापृ
इतके वेळा नाही विचारले हो Happy पब्लिक ने अगदीच 'माता न तू वैरीण' म्हणू नये म्हणून 2 वेळा विचारते.स्वतःची भूक लक्षात न घेता सगळे खात असताना काही नाही काही नाही करून कोणतीतरी अगदी महत्वाची मीटिंग चालू असताना चिठ्ठीवर 'आई मला खूप भूक लागली' असं मिंग्लिश मध्ये लिहून देणे वगैरे चालते
(विषयांतर होते, त्यामुळे थांबते)

त्यापेक्षा आयांना "पोरगा/पोरगी भूक लागली तर मागेल की खायला" हा विचार रुजवणाऱ्या ऍपची जास्त गरज आहे.

आपलं आपण घेऊन, खाऊन ताट सिंक मध्ये विसळून ठेवण्याचे, टेबल / फरशीवर खरकटे सांडले असेल तर ते काढुन पुसण्याचे मार्गदर्शन करणारे ऍप.

घेऊन खातात स्वतः.
त्यांना जे छान चटपटीत वगैरे वगैरे ताजं गरम वाफळतं बनवून अपेक्षित असतं ते आपण बिझी असताना बनवून देणारं ऍप
बाकी डबे भरलेले असतातच Happy
मूळ मुद्दा हे सगळं 'तुला काय खायला पाहिजे/नंतर खायचं असेल तर त्यासाठी काय करून देऊ/काय तयारी करून ठेवू' हे प्रश्न ज्या स्लॉट मध्ये विचारलेले असतात त्या स्लॉट मध्ये नीट उत्तरं द्यावी.(किंवा मग अश्या स्नॅक्स टाईम ला तयार असलेले मुख्य जेवण खावे)
वर्क फ्रॉम होम करणारी बाई हे 24 तास काहीही बनवणार असलेलं कँटीन नसतं.

अमितव यांचे प्रतिसाद आवडले आणि पुर्णपणे पटले. त्यांच्या चिकाटीचे कौतुक वाटते.

>> तंत्रज्ञानाचा अनावश्यक ठि़काणी, अमर्याद, अनैसर्गिक, अपायकारकही वापर करून; वरून हेच ते सुख जे तुम्ही शोधत होतात, हे बिंबवू नये कोणी.
तंत्रज्ञान आणि चंगळवाद यात गल्लत करत आहात. नफेबाज कंपन्यांनी चुकीचा संदेश बिंबवणे हे आसाराम बापु किंवा नित्यांनंद स्वामी यांनी आध्यात्माला बदनाम करण्यासारखेच आहे. तंत्रज्ञान (आध्यात्म) वाईट नाही, त्याचा अनावश्यक ठिकाणी, अपायकारक वापर करणारे नफेखोर वाईट आहेत.
लहान मुलांना प्रोग्रामिंगची तोंडओळख करुन देणे वाईट नाही पण व्हाईटहॅट ज्युनियर वाल्यांनी त्याचा जो बाजार मांडलाय तो चुकीचा आहे.
प्लास्टीक सर्जरीची गरज भाजलेले, अपघात झालेले यांना आहे, निव्वळ सौंदर्यवृद्धी (?) साठी नाही
अर्थात ही माझी वैयक्तिक मते आहेत. ज्यांना प्लास्टीक सर्जरीचा वापर नाकाचा/ओठांचा आकार बदलायला करायचा आहे ती त्यांची मर्जी. दुसर्‍यांच्या प्रायॉरिटीज काय असाव्यात हे ठरवणारा मी कोण?

थोडक्यात काय तर चंगळवादाला शिव्या घाला तंत्रज्ञानाला नको

अरे बापरे! बरीच चर्चा झालीय की इथे.

खुप वेगवेगळ्या आणि चांगल्या गोष्टी बऱ्याच लोकांनी मांडल्या आहेत पण तरीही बरीच चर्चा ही आयटी आणि सॉफ्टवेअर भोवतीच फिरत आहे.

परत एकदा मूळ मुद्द्याकडे येवूया.... आपल्या अभियांत्रिकी शिक्षणसंस्था मुलांना बेसिक शिकवावे, मूलभूत गोष्टींवर भर द्यावा का जे मार्केटमध्ये चालतेय ते शिकवावे या द्वंद्वात अडकलेल्या आहेत.... आणि त्यामुळे काहीच धड होत नाहिये.

मध्यंतरी एका कौटुंबिक कार्यक्रमात गेली अनेक वर्षे मॅकेनिकलला शिकवणारे आणि थर्मोडायनामिक्स मध्ये अतिशय नावाजलेले एक प्राध्यापक भेटले होते..... गप्पागप्पात विषय साहजिकच बदलत्या शैक्षणिक वातावरणावर आला.... ते म्हणाले की मी देखील आता पूर्वीसारखा जीव तोडून शिकवत नाही कारण वर्गातली ८०% टक्के मुले गेल्या कित्येक बॅचेस आयटीत जातायत.... मग कुणासाठी इतका जीव आटवायचा?

कधी कधी वाटते की ज्यांना आयटीत जायचे नाही आहे आणि कोअर इंडस्ट्रीत काम करायचेय अश्यांसाठी कुठल्यातरी कॉर्पोरेटने पुढाकार घेवून इंजिनिअरिंगला समांतर अशी यंत्रणा उभारली पाहिजे (सुरुवातीच्या दिवसाच्या सीडॅकचे व्यापक रुप)
जिथे प्रवेशासाठी गुणवत्ता हा एकमेव निकष असावा आणि तो प्रवेश परीक्षे आणि मुलाखतीद्वारे पडताळून घ्यावा.
मर्यादित प्रवेश असावा..... बेसिक्स, मग त्याचे ॲप्लिकेशन्स, रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट असायन्मेंट आणि मग त्या त्या क्षेत्रातली कटींग एज टूल्स वगैरे शिकवावे.
ग्रूप प्रोजेक्ट असू नयेत (ग्रूपमधली एक-दोन टाळकी काम करतात आणि बाकी लोक हमाली करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.... प्रोजेक्ट व्हायवा ला गेल्यावर मी आवर्जून कुणीकुणी कायकाय केलेय वगैरे डीटेल्स विचारतो.... बहुतांश लोकांनी कामे सोयीस्कररित्या वाटून घेतलेली असतात...... एकदा तर एका मुलाला त्याचे प्रोजेक्टमधले contribution विचारले असता तो म्हणाला की मी सगळे डॉक्युमेंटेशन केले, रिपोर्ट प्रिंट करुन आणले, सगळ्यांच्या रिपोर्टचे स्पायरल बायडींग केले, आपल्या ओळखी आहेत ना खुप म्हणून मला हे काम दिले बाकीच्यांनी ..... इतके निरागस उत्तर मी आजतागायत ऐकले नव्हते) तर मुद्दा काय तर प्रत्येकाला प्रोजेक्टवर काम करता यावे आणि करायला लागावे.
२४/७ कॅंपस ओपन असावे, मुलांनी कॅंपसवरच रहावे, ओपन डोअर लॅब्स असाव्यात.... तर ती इंजिनिअरिंगची चार वर्षे मुले खरच काहीतरी शिकतील.

Pages