आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिताली मयेकर आहे ती, सिद्दार्थ चांदेकरची होणारी बायको. मालिका बघावीशी वाटत नाही, अतार्किक वाटते.

अरुंधती आणि अनिरुद्ध मधला प्रसंग चांगला होता, फक्त ते समोरासमोर न बोलता एकाने दुसऱ्याला पाठ दाखवणे आणि संवाद बोलणे काही पटत नाही. फसवे प्रोमो चालूच आहेत. सासू सासरे आपलीच बाजू घेतील आणि आपल्याशिवाय राहूच शकणार नाहीत हा अति आत्मविश्वास वाटतो अरुंधतीचा. सहानुभूती सगळ्यांना वाटेल तिच्याबद्दल कारण तिने स्वतःला त्या घरासाठी वाहून घेतले आहे. संजना मध्येच प्रचंड जाडी वाटते. देविका ही होसूमीह्याघ मधल्या जान्हवीची बॅंकेतली मैत्रीण आहे हे मला तुनळीवरचा व्हिडीओ बघून कळले, तिला मी ओळखलेच नाही.

फसवे प्रोमो चालूच आहेत. सासू सासरे आपलीच बाजू घेतील आणि आपल्याशिवाय राहूच शकणार नाहीत हा अति आत्मविश्वास वाटतो अरुंधतीचा. >>+१
होना समोरासमोर बोलतच नाहीत. जे दुसरीकडे बघत बोलतात किंवा ऐकतात त्यांच्याशी बोलूच वाटत नाही.
आज अरूंधतीने मंगळसूत्र घालायलाच नको होते. (तसे केल्याने ते मंगळसूत्र काढून टाकणे, जाळायला जाणे याला काही अर्थ राहत नाही.) कोणी विचारले तर सरळ अनिरूद्धवर सोडून द्यायचे.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रकार आहेत हे सगळे. आमची हिरोईन किती सोशिक, रडवी, त्याग करणारी हेच दाखवायचं असतं प्रत्येक सिरीयलला. नवरा कितीही शेण खात असला तरी बायकोने सतत high on morals बनत फिरायचं हा संदेश देणार्या सिरियल्स.
स्टिरिओटाईप ब्रेक करायचं वगैरे काही डोक्यात येतच नाही या़ंच्या. सतत ते माझं घर,माझा संसार,माझी माणसं. नवरा सगळं वार्यावर सोडतोय ते चालतंय.कसे काय ते व्हिलन्स जास्त हुशार आणि मेन कॅरॅक्टर बुद्धु असंच असतं सगळ्या सिरियल्समधे.

फसवे नाहीतर काय. मंगळसूत्राच्या प्रसंगात प्रोमो मध्ये सासू सासरे बसलेले दाखवलेत पण प्रत्यक्षात ते बाहेर निघून गेले. आता अरुंधती संजनाला सुनावते तेही खोटंच असणार कारण संजना तर चालली घर सोडून.
मंगळसूत्र परत घातलेलं बघून अगदी चीड आली. ह्यासाठीच केला होता हा अट्टाहास असं वाटलं. असं तर मग अरुंधती माफ पण करून टाकेल सासू सासरे दुखावले जातील म्हणून. वरून अनिरुद्ध आणि संजनाला मदत पण ऑफर करेल, फारच चांगली आहे ना ती Proud

सासू सासरे आपलीच बाजू घेतील आणि आपल्याशिवाय राहूच शकणार नाहीत हा अति आत्मविश्वास वाटतो अरुंधतीचा.+११
तिची सासू कधीही तिच्या विरोधात जाईल असं मलाही वाटतं.
फसवे प्रोमो- कायमच असतात
अरुंधती संजनाला सुनावते तेही खोटंच असणार कारण संजना तर चालली घर सोडून>> तिने समोरचे घर सोडले म्हणजे ती गौरीकडून स्वतःच्या घरी रहायला गेली आहे. अरुंधती जाते तो तिचाच फ्लॅट आहे. बघूया प्रोमोप्रमाणे काही दाखवतात का.

संजनाला मदत पण ऑफर करेल, फारच चांगली आहे ना ती >>> अगदी
तसेही ती म्हणते मला दुसरे काही येत नाही, इतके दिवस जे केलंय आताही मी तेच(पण तोंडपाडून) करणार.
आता राग-राग खेळून झाल्यावर सवत माझी लाडकी म्हणत संजनाला आपले करेल. मग संजनाला कंटाळा आल्यावर ती अनिरुद्धला सोडून जाईल आणि अरुंधती रां वा उ का हेच आपल्या जीवनाचे ध्येय/कर्तव्य आहे, असायला हवे या समजुतीत जगेल.
तिला जर दुसरे काहीच करायचे नसेल किंवा करता येत नसेल तरी चालेल. तिने तेच करावे. पण आता अनिरुद्धला पाठीशी घालू नये. घरावर स्वतःचा किती हक्क आहे ते अनिरुद्धला दाखवावे.

आज मी जो एपिसोड ऐकला त्यावरून अनिरुद्धला चहा न देणे, त्याला न विचारता बाहेर जाणे अशा फुटकळ गोष्टी अरु करत आहे. असे किती भाग खेचणार काय माहीत.

हो.कुठेही मेलोड्रामा,लेक्चरबाजी ,फार रडारड,आरडाओरडा नाही.
साधे संवाद आहेत.अरुंधती तर मस्त काम करतच आहे पण मला संजनाही आवडली.तीही छान रिअँक्ट करत आहे.

Saddhya serial khup masta suru aahe, Like the fact that her father in law is on her side. Everyone has acted really well, including Aniruddha and Sanjana.

मी रीसेन्ट्लीच बघायला सुरवात केलिये आणी आवडतिये, सगळ्याचा अभिनय आवडतोय, परवा अरुने म्हटलेले दयाघना गाणे एकदम टचिन्ग

अरुंधती ची नणंद कोण घेतली आहे. गोड आहे.>> पूनम चांदोरकर आणि केदारच्या भूमिकेत आशिष कुलकर्णी आहे.

आत्ताच्या काही भागांत जयंत सावरकर हे सदाशिव(तात्या) म्हणून आले आहेत. जबरदस्त अभिनय.
मधुराणी छान गाते.

संजना आणि तिच्या नवर्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम असतो?>> तो career मध्ये अनिरुद्ध इतका successful नसतो. दारू पितो. पोटा पाण्यासाठी जास्त काही उद्योग करत नाही.संशयी असतो. त्यांचे पटत नसते आणि संजना आणि अनिरुद्धच्या मैत्रीमुळे आणखी problems वाढले असतील.

नवीन संजनाचा अभिनय पण चांगला आहे.

मैद्याचा ब्रेड आणि बटर हा हेल्दी नाश्ता आहे Uhoh अनिरुद्धची चिडचिड फार विनोदी असते. तो ना घर का ना घाट का झालाय. निखील गोड आहे.

तो career मध्ये अनिरुद्ध इतका successful नसतो. दारू पितो. पोटा पाण्यासाठी जास्त काही उद्योग करत नाही.संशयी असतो. त्यांचे पटत नसते आणि संजना आणि अनिरुद्धच्या मैत्रीमुळे आणखी problems वाढले असतील. >>>>>> ओहो, अस आहे का. धन्स कमला.

करिअर मध्ये सक्सेसफुल नसणे हे कारण कैच्याकै आहे. हा, पण दारु पिणारा आणि सतत संशय घेणारा नवरा संजनाला आवडत नाही ते चुकीच नाही वाटल मला. तिच विबान्स करण मात्र चुकीच आहे. खर तर अरुने संजनाबरोबर तिच्या नवर्यालाही झापायला हव होत. तो जर सजन्नाशी नीट वागला असता तर तिचा पाय घसरला नसता.

पण अरूंधती अनिरूद्धशी नीट वागत होती ना तरी तो चुकलाच कि. मग संजनाच्या नवऱ्याला दोष देऊन काय फायदा. संजना नाही तर दुसरी कोणी मिळाली असती अनिरूद्धला. तो तर इतका गया-गुजरा आहे कि अजूनही त्याला घरात अरू आणि बाहेर संजना हवी आहे.
लग्नाचा जोडीदार कसाही असो किंवा स्वत:चे मन जरी संसारातून उडले असेल तर आधी जोडीदाराला बंधनातून मुक्त करावे आणि मग काय करायचे ते करावे. पण मग मालिकेत काय बघणार आपण? अरूंधतीचे यश आणि अनिरूद्धला शिक्षा/पश्चाताप बघण्यासाठी ही मालिका.

सोनालीताई +11

संजना ही सुद्धा एक विचित्र बाई आहे. तिने घरच्यांशी भांडून शेखरशी प्रेमविवाह केलेला असतो. निखिलला trauma नको म्हणून ती आधी शेखरला घटस्फ़ोट मागत नाही. (Parents separate झाले तर trauma होत नाही का Uhoh ) परवाच कळले ती राहते त्या घराचं down payment शेखरने गावच घर आणि जमीन विकून केलं आहे आणि त्यामुळे त्याचेही नाव त्या घरावर आहे(संजना हप्ते भरते.)

अनिरुद्ध नालायक माणूस आहे. त्याला बायको म्हणून अरुंधती होती तशीच (चार-पाच नाष्टे बनवणारी, करिअर न करणारी ) स्वतःच्या तालावर नाचत राहणारी पाहिजे आहे आणि करिअरवाली संजना timepass म्हणून वापरतो. अरुंधतीला तुला बाहेरचं जग कसं कळत नाही असे म्हणून complex देतो आणि संजनाला तुला घरचं अरुंधतीसारखं करता येत नाही म्हणतो.

मैद्याचा ब्रेड आणि बटर हा हेल्दी नाश्ता आहे .....:-)

हो ना...
आधी म्हणते..मला सकाळपासून घरात कामाला माणसं आवडत नाहीत....आणि दुसर्‍याच क्षणी निखिल ला म्हणते, "कामवाल्या मावशी आल्या आहेत...त्या तुला हवं ते करुन देतील खायला...."
डायलॉग्ज हे लोक अर्ध्या झोपेत लिहीतात का?

Uhoh

पण अरूंधती अनिरूद्धशी नीट वागत होती ना तरी तो चुकलाच कि. मग संजनाच्या नवऱ्याला दोष देऊन काय फायदा. >>>>>>>> ++++++ १११११११

संजनाला जोडीदार निवडताच येत नाही. आधी शेखर, आता हा अनिरुध्द. दोन्ही युझलेस आहेत. अरुइतकी तिसुद्दा तेवढीच व्हिक्टिम आहे.

हि सिरियल आणि मानबामध्ये साम्य आहे, स्टोरीवाईज. फक्त एकीकडे कॉमेडी आहे, दुसरीकडे हा विषय सिरियसली दाखवला आहे. मानबाच्या मानाने हि सिरियल उजवी आहे.

मालिका फारशी बघितल्या जात नाही. पण कालच एका मैत्रिणीशी बोलणं झालं म्हणून पुढचे विचार:

मुळात अरुंधतीलाच नायिका का म्हणावं? पूर्वापार चालत आलेल्या अश्या मालिकांमधून रांधा वाढा उष्टी काढा एवढंच करणाऱ्या स्त्रिया महान नायिका ठरवल्या जाणं फार विघातक आहे. संसार आधी मग इतर सारं ह्याचा पिअर प्रेशर इतका वाढलाय की कालच्याच नव्हे तर आजच्या स्त्रिया सुद्धा ह्या दुष्टचक्रात घुसमटून चालल्या आहेत tbc

मी पण ही मालिका कधी कधी पाहतो ( नाईलाजाने). अजिंक्यराव प्रतिसाद प्रचंड पटला. मुळातच अरुंधती रोज सकाळी उठून 5 प्रकारचा नाष्टा बनवते आणि संजना ब्रेड बटर देऊन कामाला जाते ह्या वरून चांगला आणि वाईट कसे ठरवू शकतात?
आता जे लिहीत आहे ते प्रचंड वादग्रस्त असू शकते. अनिरुद्धचे 12 वर्षां पासून एकाच बाईशी विबास आहे. ह्या वरून तो बाहेर ख्याली आहे असं म्हणता येत नाही. अनेक बायकांशी समंध ठेवतो त्याला बाहेरख्याली म्हणतात ना. कदाचित असं होऊ शकत असेल की अनिरुद्धची IQ भूक भागत नसेल म्हणून त्याला संजना सारख्या मैत्रिणीची गरज भासली असेल. अशी उदाहरणे बघितली आहेत आसपास. म्हणजे नवरा तळमळीने आपल्या आवडत्या विषया बद्दल बोलत असतो ( संगीत, विज्ञान ) आणि बायको विचारते उद्या डब्यात गवार देऊं की मेथी? अशा वेळी नवऱ्याची जी अवस्था होते त्याचा तो जाने. जश्या इतर गरजा असतात तशी IQ गरज पण असते. काही बायका मेथी गवार च्या पुढे जात नाहीत.

Pages