आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देविका मस्त सुनावते अनिरुद्धला. आता अरुंधतीला एकदा पॅनिक अ‍ॅटॅक येऊन गेलाय पण पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार बहुतेक. तिला अजुन एकदा जोरदार धक्का बसल्याशिवाय ती बदलणार नाही.

देविका मस्त सुनावते अनिरुद्धला. आता अरुंधतीला एकदा पॅनिक अ‍ॅटॅक येऊन गेलाय पण पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार बहुतेक. तिला अजुन एकदा जोरदार धक्का बसल्याशिवाय ती बदलणार नाही.>>>>सहमत
विबासं कळले की अजून धक्का बसणार आहे तिला

देविका मला किरण करमरकरच्या बायकोसारखी दिसली, आधी ती अशी दिसायची स्वाभिमानमध्ये. अनिरुद्ध काही फार तरुण दिसत नाही पण. असतो एकेकाला माज. हे पुरुष (गुरुनाथ सुभेदार) स्वतः च्या बायकोला बदलायला का नाही मदत करत. आता ती बाहेरच्या लोकांच्या मदतीने काहीतरी दोन-तीनशे कोटींचा व्यवसाय सुरु करेल आणि मग त्याचे डोळे उघडतील. हे याच क्रमाने जायला पाहिजे का.

एक मिनिट अरुंधति देविका अनिरुद्ध
अनिरुद्ध अरुंधति नवरा बायको आणि देविका स्मार्ट वगेरे अशी अनिरुद्ध ची मैत्रीण आणि वि बा सं का????
अशी आहे ही स्टोरी????

अनिश्का ताई , अनिरुध्द आणि संजनाचे विबासं आहे.संजनाचे पण लग्न झाले आहे. तिला एक मुलगा पण आहे 7-8 वर्षाचा. अनिरुद्ध संजनाचा बॉस आहे.

3ओके फार वर्षापूर्वी मी रोहिणी निनावे ची सेम नावे असलेली कथा वाचली होती
महाराष्ट्र टाइम्स मध्ये डेली सोप सारखी महीना भर आलेली ति कथा
म्हणून मला वाटले की ती हीच गोष्ट की काय

काल आईचा मेक ओव्हर करणार म्हणे तिची मुलगी...आणि प्रत्यक्षात तिला त्याच काकू छाप साडी- वेणीत तयार केले !
संजना नेमकी हे ज्या हॉटेलात जातात तिथेच कशी येते?

काल आईचा मेक ओव्हर करणार म्हणे तिची मुलगी...आणि प्रत्यक्षात तिला त्याच काकू छाप साडी- वेणीत तयार केले !++++अगदी अगदी. जीन्स नको हे मान्य. पण छानसा कुर्ता लेगिंग तरी द्यायला हवा होता आणि केसांचे इस्त्रीशिवाय पण काहीतरी वेगळे छान नक्कीच कराता आले असते.

संजना नेमकी हे ज्या हॉटेलात जातात तिथेच कशी येते?~~~~मलाही हाच प्रश्न पडलाय

काल आईचा मेक ओव्हर करणार म्हणे तिची मुलगी...आणि प्रत्यक्षात तिला त्याच काकू छाप साडी- वेणीत तयार केले..+१००

संजनाला अनिरुध्दने सांगितलं असेल आधी बोलता बोलता..

काल आईचा मेक ओव्हर करणार म्हणे तिची मुलगी...आणि प्रत्यक्षात तिला त्याच काकू छाप साडी- वेणीत तयार केले !>>>>>> तेच म्हटलं कुठे आहे मेकओव्हर, की मी काहीतरी स्किप केलं.

राधाक्काच्या मेकोव्हर वेळी तिने डोक्यावरुन नांगर फिरवला होता. नशिब तसे काही केले नाही.
अगदीच कायापालट नसेल करायचा तरी छान केशरचना करता आली असती, सुंदर साडी नेसून त्यावर सुरेख दागिनाही छान दिसला असता. पण साधी दाखवण्याच्या नादात मंद दाखवतात.
आई काय करते च्या ऐवजी दोन बायका फजिती ऐका ट्रॅक चालू आहे.

इथे मुलांची आजी दाखवली आहे, तिचा मुलगा जीव झाला वेडापिसाच्या production टीम मध्ये आहे, प्रथमेश राजेश पाटकर नाव, त्याची आई अर्चना पांढरे पाटकर. फार पूर्वी अर्चना पांढरे नावाने काही सिरियल्समध्ये होती, दूरदर्शनवर.

इथे मुलांची आजी दाखवली आहे, तिचा मुलगा जीव झाला वेडापिसाच्या production टीम मध्ये आहे, प्रथमेश राजेश पाटकर नाव, त्याची आई अर्चना पांढरे पाटकर. फार पूर्वी अर्चना पांढरे नावाने काही सिरियल्समध्ये होती, दूरदर्शनवर. >>

हो अंजू , पूर्वी "पुढचं पाऊल" या चित्रपटामध्ये नायिका होती अर्चना पांढरे-पाटकर. "एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी " हे गाणं ज्या चित्रपटामध्ये आहे तो चित्रपट. मानसी मागीकरला मारल्यावर नायक ( कि खलनायक !) हुंड्यासाठी तिसरं लग्न करतो ते हिच्याशी . पण ती बंडखोर असते.
अजूनही काही चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

आत्मविश्वास मध्ये होती ती. व्यासंग नाही हो, काही चित्रपट परत परत लागतात टीव्हीवर आणि आत्मविश्वास तर त्यावेळी खूपच गाजला होता.

तो मुलगा रात्रभर संजनाच्या घराबाहेर उभा होता का. लंच डेटचं काय झालं, जेवले का ते नीट की संजनाने तिथे तमाशा केला. संजनाचा नवरा तर चांगला वाटला मला, सेन्सिबल बोलत होता. का पटत नाही दोघांचं.

तो मुलगा रात्रभर संजनाच्या घराबाहेर उभा होता का....>>> नाही. रात्री पाठलाग करून बाबांना संजनाच्या घरी जाताना त्याने पाहिले. मग सकाळी पुन्हा तिकडे गेल्यावर बाहेर पडताना पाहिले. संजनाला सकाळी घरी सोडून येताना पाहिले असे सांगून अनिरुद्धने त्याला खूप झापले. त्यामुळे बाबा रात्रभर तिथे होते असे तो सांगू शकला नाही.
डेटला संजनाने आता मी माझ्या नवर्‍याला एक संधी देणार सांगत अनिरुद्धला खूप जळवले.

आता गुरुजी 'काही दिवसात अरुंधतीला मरणयातना होऊन तिचा पुनर्जन्म होणार' अशी पुडी सोडून गेलेत.

बाप रे! काय व्यासंग आहे तुम्हा लोकांचा! तो पण त्या अर्चना पाटकर वर! >>>>>>, अजून एक माहिती आहे मला.. अर्चना पाटकर म्हणजे जुन्या अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या कन्या आहेत..

अर्चना पाटकर म्हणजे जुन्या अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या कन्या आहेत.. > Ohh मस्त . ठसका आईचा आलाय Happy .
मला पद्मा चव्हाण आवडायच्या आणि अर्चना पण आवडते .

अर्चना पाटकर म्हणजे जुन्या अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या कन्या आहेत. >>> हे नव्हतं माहिती.

इना मीना डिका बद्दल थोडीफार माहिती आहे पण फार विषयांतर होईल म्हणून नाही लिहित.

Pages