दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर डेंजर आहे हे Happy
आपण सगळे खूपच एक्स्पर्ट झालोत
प्रत्येकाने स्वतःला एक एक डेअरी मिल्क बक्षीस देऊन टाका.

नाही.
हा प्राणी ज्या ऑकवर्ड प्रकारे स्ट्रेच करतोय त्यावरून ओळखा.

नाही. पण पंजाबी आहे.
नाचासाठी विशेष प्रसिद्ध नाही.दिसायला चांगला आहे पण फार पिक्चर्स नाहीत
यात नायिका हाताने साप पकडते.

अरे बिचारा रात्रभर हात वर करून उभा आहे.... सोडवा त्याला.
खुराना का? पण फार पिक्चर्स नाहीत -- हे लागू नसावे त्याला?
नूतनचा मुलगा?

दंडवतच!!! दोघींना... संजय कपूरला दिसायला चांगला म्हणून क्ल्यू द्यायचा आणि त्यावरून गाणे ओळखायचे...

ही ही ही Happy
बराय की दिसायला. भावासारखाच आहे. भाऊ मला आवडतो त्यामुळे हाही दिसायला चांगला म्हणायला हरकत नसावी.
आत्ती नही वाला क्लु होता डोक्यात पण मग कोडं फारच सोपं झालं असतं.

त्याचा तो पांढरा डबल ब्रेस्ट सूट, लहान मुलासारखं बोट हलवत आत्ती नही करुन नाचणं आणि त्याचा त्यातला नाच आयकॉनिक आहे.
आणी नायिकेचे हाताने साप पकडणे पण.
कारवी Happy रात्रभर हात वर करुन उभा.. लोल.

ऑकवर्ड डान्स टोटली! या सिक्वेन्समध्ये तो अगदी ही स्टेप, मग ही, मग ती पूर्ण करून ही असे गृहपाठ केल्यासारखा नाच उरकतो. Proud मला त्याचा 'लक बाय चान्स'मधला रोल आवडतो पण... 'हम भी ऍक्टर रह चुके है...' Lol

आम्ही अतिशय कनवाळू आहोत. साधारण डबल चिन नसलेल्या आणि चेहरा गोल नसलेल्या कोणाही पुरुषाला 'दिसायला चांगला' म्हणून टाकतो.

Pages