दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि गाण्यात वेगवेगळे कपडे घालून हिरोबरोबर फॉरीन लोकेशन ला पळणे सोडून बिचारीला मोसंबी कापावी लागतेय?<<<<
म्हणून लगेच बोट कापून घेते ती! म्हणजे मोसंबी कापणेच काय, स्वैपाक वगैरेही कामे वाचतात. Proud

हो ना. नाहितर तिन्ही वेळी भांडी घासून असे नाजुक सुंदर हात राहिले असते का Happy

गुड वन श्रद्धा सोडवलेस कोडे.

Lol श्रद्धा एकदम करेक्ट आहे. त्यापेक्षा "अरे देवा" मोमेंट म्हणजे ती म्हणते मेरा गला सूख रहा है आणि लग्गेच तो मोसंबच कापायला घेतो... पाणीबिणी काही नाही... ब्लड शुगर लो झाली तर हा बाबा थेट पुरण घालणार बघ!!!

आता हा उडणारा प्राणी कोण बघावे लागेल.त्याने हिरवा शर्ट हिरवी पॅन्ट घातलीय?हे म्हणजे तिरंगा मधल्या राज कुमार च्या पिवळ्या कॉर्डरॉय सूट पॅन्ट पेक्षा पण अति झाले हां.

मिल गये दिल अब तो खुलके मिल जरा - मिथुन, अमृता सिंग. हॉटेलवाला सेमच होता होय! Proud मला तो आधी का कोण जाणे, अक्षयकुमार वाटला. म्हटले, आडवळणाने हॉटेलवाला क्लु दिला असेल.

ओह
एकदम खंगरी सियोना.
मी आपली मिथुनच नसेल म्हणून सुनिल शेट्टी ची भयंकर भयंकर गाणी गुगल केली.

सियोना काही बर्फातून बाहेर येत नाहीत...
छान आहे पण क्लिप -- पांढर्‍या बर्फावर हिरवा तो; हिरव्या गवतावर पांढरी ती

सुनिल शेट्टीची फार गाणी बर्फात नाहीत. असली तर वाळवंट नाहितर समुद्र किनारा.

आता दे पुढचे अनु

गाणी प्रसिद्ध
चित्रपट पाहिल्यास बरेच दिवस मानसोपचार घ्याल
आमच्या फॅमिली मेंबरांनी तिकीट काढून पाहिला.नंतर बरेच महिने कळवळून प्रत्येकाला 'हा पाहू नका' असे सांगत होते.
नायक नायिकेचे गेल्या 4-5 वर्षातच लग्न झालेय(एकमेकांशी नाही)
IMG_20201130_181811.jpg

बाई तरी नायिका आहे. पुरुषाचं माहित नाही.
या चित्रपटात बरेच कलाकार असल्याने २ नायिका २ नायकही असू शकतील. मनाची तयारी ठेवा.
या पिक्चरनावामध्ये पिक्चर पाहून झोपाल याचा इशारा आहे.

कसले अवघड कोडे होते अनु. ती हिरॉईन कोण हेच माहित नाही. श्रद्धा ने उत्तर दिले आहेच. हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब थियेटरला पाहिला म्हणजे कमाल आहे बुवा.

आता हे घ्या सोपे कोडेScreenshot_20201130-212133_YouTube.jpg

कारवी आता बर्फ नाही मुंबईचा समुद्र

जिंदगी की यही रीत है - मिस्टर इंडिया? त्यात आहे असेच फुगे लावलेली बोट. पण ती मुलं नाही दिसत आहेत बोटीत so am not sure.

पागल दिल मेरा???? नॉट शुअर त्यात पब्लिक बरेच आहे... क्ल्यू द्या...

बोट..म्हणजे उगीचच कहो ना प्यार है आठवतोय
पण त्यात बोटीवर खूप गर्दी आहे.
मी खूप खूप क्लू देणार होते Happy मुख्य क्लू म्हणजे परदेशात रिक्षा.
त्याच्या आत श्रद्धानेच सोडवून टाकलं.

हा कर्झ आम्ही ऑफिसमधल्या पब्लिकने वेस्टएण्डला पाहिला होता काय धमाल आली होती .. ठेतरातल्या सगळ्या पब्लिकनेच खूप कमेंट्स मारून एन्जॉय केला होता Happy

ले चले डोलियों मे मध्ये हिरो- हिरॉईन दोघेच आहे... पण ते जरा भारी बोटीत आहेत. प्रश्नाला अपग्रेड करून हे उत्तर घ्या चालवून... Wink Happy

Pages