दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.
मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.
दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.
हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे
>>शस्त्रिय काल नसून सत् श्री
>>शस्त्रिय काल नसून सत् श्री अकाल असतं असं नम्रपणे निदर्शनास आणून देतो Happy
>>>
ओके
कधी वाचले नव्हते. ऐकलेच होते. ते सुद्धा चित्रपटात.
मी अधार्मिक आणि नास्तिक असल्याने या संबंधित जनरल क्नॉलेज कमीच आहे<<
आय्ला ऋन्म्या, स्वस्तात सुटलांस(
सुटतोयस). नाहितर तुझा हा गफला "आईने अकबरी" च्या तोडीचा आहे.स्वस्तात काय त्यात
स्वस्तात काय त्यात
लोकांनी उगाच माझ्याबद्दल हवा निर्माण करून ठेवलीय की मी चुका मान्य करत नाही.
जिथे एखाद्या विषयावरचे मत मांडायचे असेल तिथे मी माझा मुद्दा मला शक्य तितके पटवून द्यायचा प्रयत्न जरूर करतो.
पण एखादी शुद्धलेखनाची चूक वा सामान्य ज्ञानाच्या अभावामुळे होणारी चूक मान्य करण्यात कसला आलाय कमीपणा
जगी कोण असा पर्रफेक्ट आहे
जय जय रघुवीर समर्थ !
ऋन्मेssष, पूर्णपणे सहमत.
ऋन्मेssष, पूर्णपणे सहमत.
जरा ते आयडी नाव थोडे सोपे कराल का? पण नको, कारण त्यामुळे तुमची ओळख बदलेल.
शेवटी धागा भरकटलाच.
शेवटी धागा भरकटलाच.
नाहितर तुझा हा गफला "आईने
नाहितर तुझा हा गफला "आईने अकबरी" च्या तोडीचा आहे. >>
आई ने अकबरी इनॉसंटली घडले होते.
शस्त्रीय काल हे बहुतेक मुद्दाम लिहिलेले आहे, हुमायून नेचर सारखे.
पूर्वी ऑर्कुटवर आणि त्याही आधी irc chat वर मीही अशा काही गमती जमती करायचो, बाई दवे हे मी सुद्धा बऱ्याच पूर्वीपासून वापरले आहे.
आईने अकबरी चा काय म्याटर आहे
आईने अकबरी चा काय म्याटर आहे ? लिंक द्या कि वं नवसदस्यांला.
आईने अकबरी. चौथ्या
आईने अकबरी. तिसऱ्या प्रतिसादापासुन वाचा.
हॅहॅहॅ
हॅहॅहॅ
शस्त्रीय काल हे बहुतेक
शस्त्रीय काल हे बहुतेक मुद्दाम लिहिलेले आहे
>>>
सिरीअसली? आय मीन मी मुद्दाम बरेच चुका करतो गमतीजमतीत .. स्टाईल् आहे आपली.. पण हे कित्तेकांना माहीत नसेल अचूक शब्द काय आहेत ते.. कारण हे कधी वाचनात येत नाही. मला तर आता ही पोस्ट लिहितानाही पुन्हा मूळ शब्द विसरायला झालेय
आणि हो, त्याचा अर्थ काय हे सुद्धा किती जणांना माहीत आहे हे बघणेही रोचक ठरेल
या धाग्याशी संबंधित वाटली
या धाग्याशी संबंधित वाटली म्हणून एक वाईट बातमी.
https://www.saamana.com/bjp-mp-rita-bahuguna-joshi-granddaughter-passed-...
बाप रे .. वाईट बातमी
बाप रे .. वाईट बातमी
शेवटी धागा भरकटलाच. Happy
शेवटी धागा भरकटलाच. Happy
>>>
अहो झाली की दिवाळी... आता काय तुळ्शीच्या लग्नापर्यण्त खेचायचाय का
अरे बापरे.. फारच दुर्दैवी
अरे बापरे.. फारच दुर्दैवी बातमी
फटाक्यांनी फार अपघात घडतात दरवर्षी असे.. संबंधित व्यक्ती प्रसिद्ध असल्याने बातमीत आली. दुर्दैवाने कित्येक मरतात असे जिथे वाह्यात प्रकारे फटाके उडवले जातात.. पण मोठ्या माणसांकडे पुरेशी काळजी सुरक्षा घेत असतील असे वाटते तिथेही हे असे घडते घडू शकते हे लक्षात येते याने
ऋन्मेष, आहेस की गेला आयडी?
ऋन्मेष, आहेस? की गेला आयडी?
तो कुठला जातोय इतक्यात
तो कुठला जातोय इतक्यात
आपल्याला पोचवून मग जाईल
Submitted by ऋन्मेऽऽष on 17
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 12:47 >>
ओके नसशील लिहिले मुद्दाम. मी "बहुतेक" असे म्हटलेय ना.
पण मुद्दाम लिहायला मूळ शब्द नक्की काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे माहीत असायलाच हवे असे थोडीच आहे. मला ही पहिल्यांंदा ऐकला तेव्हा कळलेच नव्हते. तरी सासरी अकाळ अशी गंमत केली होती, मग कुणाला तरी विचारले त्याने सांगितले सत् श्री अकाल आहे ते म्हणुन. अर्थ ही सांगितला होता बहुतेक आता लक्षात नाही.
मला ही पहिल्यांंदा ऐकला
मला ही पहिल्यांंदा ऐकला तेव्हा कळलेच नव्हते. तरी सासरी अकाळ अशी गंमत केली होती, मग कुणाला तरी विचारले त्याने सांगितले सत् श्री अकाल आहे ते म्हणुन.
>>>>>
एक्झॅक्टली
तुमच्याबाबत कोणाला तरी विचारणे झाले जे माझ्याबाबत झाले नाही.
यामागे दोन कारणे असू शकतात
१) शस्त्रिय काल हे बरोबर असावे हे माझ्या मनमेंदूने मान्य केले असावे.
२) कधी स्वत:ला हे वापरायचे नसल्याने पडताळून पाहण्याची गरज भासली नसावी.
किंबहुना आपण आजही असे कित्येक चुकीचे शब्द डोक्यात फिट करून जगत असू ज्याची आपल्याला कल्पनाही नसावी.
मायबोलीवर असाच एक गाण्यांचा धागा आहे ज्यात गाण्यातले शब्द आपण कसे चुकीचे ऐकलेय यावर लिहायचे होते. हजारो पोस्टी पडल्या आहेत त्या धाग्यावर..
म्हणजे ते सारे ऋन्मेष आहेत का?
ऋन्मेष, आहेस? की गेला आयडी?
ऋन्मेष, आहेस? की गेला आयडी?
>>>
छे. मी फटाक्यांच्या अनुभवावर नवीन धागा काढला. आता चार दिवस सुट्टी आहे. चार धागे अजून काढेन. तुम्हीही जरूर लिहा त्यावर
मी फटाके वाजवले नाहीत. फारतर
मी फटाके वाजवले नाहीत. फारतर ६-७ वर्षापर्यंत वाजवले असतील. ते पण थोडे फुलबाजे चक्री पाउस फक्त. मोठे फटाके कधीच नाहीत. मी नाही. माझ्या मोठ्या भावंडांनीही नाही.
बेताची परीस्थिती हे मुख्य कारण.
पण आता आम्ही मुलाना फटाके घेउ शकतो पण घेत नाही. मुलगी लहान होती ६ वर्षांची तोपर्यंत फुलबाजे चक्री पाउस. मग बंद केलं तिला समजावून. आता ह्या वर्षी मुलाला पण सेम. मुलं पण हट्ट करत नाहीत हे एक बरंय.
म्हणजे ते सारे ऋन्मेष आहेत का
म्हणजे ते सारे ऋन्मेष आहेत का? Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 14:37 >>> एवढेच म्हणेन की माझ्या पोस्ट्स तू नीट वाचल्या नाहीस किंवा नीट वाचल्या असशील तरी आकलन चुकलंय.
1. तू मुद्दाम लिहिलं असण्याची मी फक्त शक्यता वर्तवली. तू सांगितले: नाही लिहिलं मुद्दाम, तर मी म्हणालो, ओके, नसशील लिहिले.
2. मुद्दाम कसे लिहिले नाही हे सांगताना तू तुला नक्की मूळ शब्द काय हे माहीत नव्हते, अर्थही माहीत नाहीय वगैरे म्हणालास. तर यावर मी म्हणालो, कुणाला मुद्दाम लिहायचे असेल तर मूळ शब्द आणि त्याचा अर्थ माहीत असणे गरजेचे नाही. हा वेगळा मुद्दा झाला ज्याचे मी एक उदाहरण दिले. त्याचा वरील 1 शी संबंध नाही.
फटाके आपल्या संस्कृतीचा भाग
फटाके आपल्या संस्कृतीचा भाग आहेत हे सांगत असताना true Indology ट्विटर हॅंडल उडालं. आपला फटाका आपल्याच हातात फुटावा तसं
तू मुद्दाम लिहिलं असण्याची मी
तू मुद्दाम लिहिलं असण्याची मी फक्त शक्यता वर्तवली. तू सांगितले: नाही लिहिलं मुद्दाम, तर मी म्हणालो, ओके, नसशील लिहिले.
>>>>
अहो मी कुठे तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकतोय
मुळात ज्याच्यासाठी मी आधीच बदनाम असेल त्यासंबंधित जर कोणी कदाचित म्हणूनही वर्तवलेली शक्यता खोटी असेल, आणि ती शक्यता पब्लिक फोरमवर मांडली असेल, तर ती मला लागलीच खोडून दाखवायला नको का
बाकी आशुचॅम्प यांचा धागा बरेचदा मला आपलाच धागा वाटतो. त्यामुळे जरा चार प्रतिसाद कसे खेचता येतील हे बघतो
फटाके आपल्या संस्कृतीचा भाग
फटाके आपल्या संस्कृतीचा भाग आहेत हे सांगत असताना true Indology ट्विटर हॅंडल उडालं. आपला फटाका आपल्याच हातात फुटावा तसं
>>
लिब्रांडू गॅंगला कसला लिबरलगझम झाला ट्वीटरवर! फुकट आयपीएसला डिवचल!
सती ही प्रथाबिथा नव्हती आणि
सती ही प्रथाबिथा नव्हती आणि बायका अगदी स्वेच्छेने सती जायच्या , तेच फटाके मात्र आमचेच असली रंगसफेदी करणार्यांचं असंच व्हायला हवं.
हो
हो
बायका मोघलांना घाबरून सती जायच्या म्हणे
( महाभारतात माद्री सती गेली , तेंव्हा मोघल होते का ?)
अंताजीची बखर मधले बंगाल सतीचे
अंताजीची बखर मधले बंगाल सतीचे वर्णन वाचून थरकाप उडाला होता.
फटाकेबंदीचे समर्थन केले
फटाकेबंदीचे समर्थन केले म्हणून कर्नाटकातील आयपीएस अधिकारी डी. रुपा यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दिवाळीत फटाके फोडणे ही हिंदू परंपरा नाही. महाकाव्य किंवा पुराणात कुठेही फटाक्यांचा उल्लेख केलेले नाही असे डी. रुपा यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/karnataka-ips-officer-trolled-...
Indology म्हणजे ?
ट्रू इंडोलॉजी भंपक ट्विटर
ट्रू इंडोलॉजी भंपक ट्विटर हँडल होता. सातत्याने थापा लावायचा. Alt News ने बरेच खोदकाम करून त्याचे खोटे उघडे पाडले आहे.
(अर्थात विभोर आनंद वैगैरेंवर विश्वास ठेवणाऱ्यांकडून काय अपेक्षा ?त्यांना तेच आवडणार.)
इंडोलॉजी म्हणजे इंडिया शास्त्र असे काहीसे असावे. म्हणजे भारताची खरी ओळख किंवा माहिती.
भरत, कॉमी, ब्लॅककॅट,
भरत, कॉमी, ब्लॅककॅट,
ज्या ट्विटमुळे TrueIndology चे ट्विटर अकाएंट उडवले, त्यात,
१. कायदा मोडणारे काही होते का? असल्यास नक्की कोणत्या कलमांचा भंग झाला?
२. त्याने जे संदर्भ देऊन फटाके होते असे म्हटले, ते संदर्भ खोटे आहेत हे सिद्ध करणारे इतर पुरावे तुमच्यापैकी कोणी इथे देऊ शकते का? असल्यास.
Alt News ने बरेच खोदकाम करून
Alt News ने बरेच खोदकाम करून त्याचे खोटे उघडे पाडले आहे.
>>
याबद्दल सप्रमाण प्रामाणिक पडताळुन पाहण्याजोगे लिखाण / लिंक / संदर्भ कुठे बघता येतील?
Pages