दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.
मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.
दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.
हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे
आता तुम्ही गोड पदार्थांचे
आता तुम्ही गोड पदार्थांचे उदाहरण घेतले त्यात मी कसेतरी यमक बसवले आहे. गोड मानुन घ्या. भावना समजुन घ्या.
रुंम्या वर लड कश्याला लावली
रुंम्या वर लड कश्याला लावली रे
>>>
माझा नेट हॅंग झालेला. त्यामुळे मी अजून दोनेक वेळा सेव्ह दाबले. पण त्याचे ईतके कसे तयार होते ते समजत नाही. मागेही एकदोनदा असे झालेले.. आणि दुर्दैवाने दुसरयांच्याच धाग्यावरचे प्रतिसाद वाढलेले
याचा एक वेगळाच त्रास
याचा एक वेगळाच त्रास
पण मेल हिंदी मराठीत का लिहित
पण मेल हिंदी मराठीत का लिहित नाही?>>>
छान प्रश्न.
आमचे मेल्स हे जर्मनी, फ्रान्स, इंग्लड, तैवान, अमेरिका येथिल सप्लायर्स आणि भारतभरातील ग्राहक यांच्यामध्ये असतात. बरेचदा इकडून आलेला मेल तिकडे फॉरवर्ड करणे अथवा उत्तर देताना कस्टमर आणि सप्लायर दोघांना मार्क करून लिहिणे वगैरे प्रकार असतात. एकाच भाषेत जास्तीत जास्त पक्षी मारायला इंग्रजी वापरतो. तैवान, जर्मनीवाल्या सगळ्यांनाच नीट इंग्रजी येत नाही, ते गुगल ट्रान्सलेशन वापरतात. भारतातील अनेकजण मेल वरून सगळे कळले नाहीतर फोन करून हिंदी, मराठी, तेलुगू (तेलुगू मला नाही येत, माझ्या कलीगला येते) या भाषेत बोलून शंका निरसन करून घेतात.
Diwali : A Nightmare For
Diwali : A Nightmare For Stray Animals
. Use noiseless crackers as much as possible
. Do not light crackers near stray animals
. Report any fire cracker inflicted cruelty to Animal Welfare NGOs
“I don’t want to impose an emergency by banning firecrackers. But I am placing my trust in you. Diwali is the festival of lights and you must avoid crowds and pollution," said Chief Minister Uddhav Thackeray.
Team

PFA MUMBAI UNIT - II
१२६
१२६
वरच्या चर्चेशी असंबद्ध असा
वरच्या चर्चेशी असंबद्ध असा प्रतिसाद देतेय, त्यामुळे आधीच माफी द्यावी अशी याचना करतेय
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात>>>
हल्ली हे हिंदुद्वेषी एकाच व्यक्तीचे/पेपरचे/संस्थेचे मोहरम,इद कुर्बानी, ख्रिसमस इ सणांच्या वेळचे भाष्य व दिवाळीच्या वेळचे भाष्य ह्या दोन्हीचे स्क्रीनशॉट्स एकत्र देऊन बिचाऱ्या त्या सर्वधर्मसमभावी मंडळींना उगीच कानकोंडे करतात त्याचे वाईट वाटते.
बाकी धागा आवडला, नंतर गाडी नेहमीप्रमाणे रुळावरून घसरायच्या आधीच्या काही प्रतिसादातून चांगली माहिती मिळाली, धन्यवाद.
आणि फटाके नकोतच हेमावैम. घरी कुत्रा होता तेव्हा तो किती घाबरायचा हे बघितले आहे, तो बेडरूममध्ये लपून बसायचा, तरी फटाके दूर कोणी फोडायचे, आम्ही फोडत नसायचोच. दिवाळीत सलग चार पाच तास, चार पाच दिवस, सर्वत्र फटाके फुटत असतात, मिरवणुकीत किंवा इतर वेळी असे होत नाही. कुत्र्यांना किती भयंकर त्रास होत असणार.. बाकी प्रदूषणाचे जाऊदे, फटाक्यांपेक्षा वाईट प्रदूषण आपली गाडी करते हे कोणी लक्षात घेत नाही.
मी ८ वर्षांपुर्वी पुण्यात
मी ८ वर्षांपुर्वी पुण्यात दिवाळी साजरी केली अन त्यानंतर कधीही पुण्यात दिवाळी साठी थांबायचं नाही असा निश्चय केला. त्या आधिही गावीच दिवाळी साजरी करायचो अन त्यानंतर देखील. पण पुण्यातली दिवाळी बघुन ऊर अक्षरशः दडपून गेला अन त्यानंरच्या प्रत्येक दिवाळीत मी कमीत कमी अथवा आजिबातच फटाके न वाजवता दिवाळी साजरी केली.
अनुभव म्हणुन सांगतो. पुण्यात नरकचतुर्दशी अन दिवाळी पाडवा या दोन दिवशी पहाटे अन रात्री एवढे फटाके फुटले की आमच्या ८ व्या मजल्यावरील फ्लॅटमधुन पुण्याची स्कायलाईन तासभरात पुर्ण काळवंडलेली बघायला मिळाली. लगोलग सगळ्या खिडक्या बंद केल्या तरी श्वासोत्सवास करतानाही नाकतुन धुर आत घेत आहोत हे स्पष्ट जाणावत होते. सकाळी उठुन घर झाडले तर फरशीवरुन काजळीयुक्त धूळ निघाली तर घरातुन फिरल्यावर तळपाय काळे झालेले दिसले. एवढ्या प्रचंड प्रदुषणात ५ दिवस रहाण्याचा तो जीवनातील पहिलाच प्रसंग.
त्यानंतर प्रत्येक दिवाळीला गावीच राहिलो. दिवाळी संपल्यावर पुण्यातल्या घरी गेल्यावर फरशीवर काळी धूळ साठलेली असते (इतर वेळी महिना-महिना फ्लॅट बंद राहिला तरी फक्त नॉर्मल रंगाची धूळ असते). अशी प्रदुषणयुक्त दिवाळी पुन्हा कधिही अनुभवायला न मिळॉ हीच प्रार्थना..!
आता सर्व समजवण्याचा पलीकडे
विनाशकाले विपरीत बुद्धी.
एवढ्या प्रचंड प्रदुषणात ५
एवढ्या प्रचंड प्रदुषणात ५ दिवस रहाण्याचा तो जीवनातील पहिलाच प्रसंग.>>>>>
मला हेच कळत नाही फटाक्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांना हे असे गुदमरून टाकणारे प्रकार खरोखरच दिसत नाहीत का मुद्दाम डोळेझाक करतात. बाकीच्याचे सोडा त्यांचे त्यांना तरी सहन कसं काय होतं हे कळत नाही
आम्ही देखील अनेकदा दिवाळी ला संधी मिळाली तर बाहेरगावी जातो रहायला, एकदा तर दांडेली अभयारण्यात गेलो होतो. तिथल्या केअर टेकर ने घरी बनवलेला एक कंदील टांगला होता आणि दारात रांगोळी
अतिशय शांततेत आणि निसर्गाच्या सानिध्यात गेलेली ती एक सुंदर दिवाळी होती
फटाके विरहीत दिवाळीला पूर्ण
फटाके विरहीत दिवाळीला पूर्ण पाठिंबा. बाहेर करतात तसं आपल्या इथेही महानगर पालिकेतर्फे मध्यवर्ती जागी संध्याकाळी शोभेचे फटाके उडवले जागे.
मी मागे मायबोलीवर कुठेतरी लिहिलं होतं बहुतेक. किल्लारी आणि उमरगाचा भुकंप झाला, त्यावर्षी सगळीकडे दिवाळी साधेपणाने आणि फटाके न उडवता साजरी करायचं आवाहन होतं. त्यावर्षी आम्ही फटाके आणले नाहीत आणि त्या बजेटमधून दिवाळी अंक / पुस्तकं विकत घेतली. नाहीतर दरवर्षी लायब्ररीतून आणत असू. तेव्हा तो प्रकार इतका आवडला की मी त्यानंतर कधी फटाके विकत घेतलेच नाहीत, एखादं फुलबाजी आणि अनारचं पाकीट एव्हडच. आमच्या शाळेतल्या पब्लिकला हा प्रकार अजूनही आठवतो, मध्यंतरी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाल्यावर मला कोणीतरी "तुच ना तो दिवाळीत फटाके न घेता पुस्तकं घेणारा (येडा) ? " असा मेसेज केला होता.
हाईट म्हणजे अमेरीकेतही भारतीय लोकं खूप प्रमाणात फटाके उडवायला लागले आहेत! त्यात इथे बहुतांश घरं पूर्ण लाकडी असतात आणि तरीही नीट काळजी घेत नाही. मागे आमच्या कॉलनीत पब्लीकला पुढच्या १० मिनीटांत तुम्ही आचरटपणा थांबवला नाहीत तर मी पोलिसांना फोन करेन अशी धमकी द्यायला लागली होती !
आमच्याकडे टाऊन गेली दोन वर्ष
आमच्याकडे टाऊन गेली दोन वर्ष कॉमन ग्राऊंडवर सामूहिक फटाके उडवणं अरेंज करतंय. ते बरं वाटतं.
ही खरंच चांगली संकल्पना आहे
ही खरंच चांगली संकल्पना आहे
ज्यांना हवं आहे त्यांनी मोकळ्या जागी एकत्र जमून आतिषबाजी करावी
अर्थात त्यालाही आवाज आणि वेळेचे बंधन असावं
आणि मग ज्यांना हवं आहे त्यांनी जाऊन फटकेसाहित दिवाळी एन्जॉय करावी, ज्यांना नकोय तेही आपल्या घरी शांततेत दिवाळी साजरी करतील
जसे फटाक्यांचे स्टोल असतात तसा काही जागा राखीव करून घ्याव्यात, महानगरपालिका तिथे आगीचे बंब उभे करू शकेल
हाईट म्हणजे अमेरीकेतही भारतीय
हाईट म्हणजे अमेरीकेतही भारतीय लोकं खूप प्रमाणात फटाके उडवायला लागले आहेत! त्यात इथे बहुतांश घरं पूर्ण लाकडी असतात आणि तरीही नीट काळजी घेत नाही. +१
शिवाय या दिवसात पानगळती झालेली असते व पाने इकडे तिकडे उडत असतात. घराबाहेर रात्रभर पणती लावणेही धोक्याचे असते.
मागे एका कुटुंबाने आपला गणपती इथे नदीत विसर्जित केला तेव्हा एका अमेरिकन महिलेला सापडला. तिने तो घरी आणून ग्रूप वर मेसेज केला की हिंदु मूर्तीचा अपमान होउ नये म्हणून तिने आणला अहे, एखाद्याला हवी असेल तर न्यावी.
वरचे सगळेच प्रतिसाद आवडले.
वरचे सगळेच प्रतिसाद आवडले.
खूप वर्षांपूर्वी फटाक्यांवर अतोनात खर्च करणारे लोक बघून जेव्हा 'पैशाचा धूर' आहे हा सांगितले तर उडवून लावून याला 'हौसमौज' म्हणून पटवून देणारे लोक पाहिलेत. तान्ही बाळं दचकून उठतात, ज्येष्ठ नागरिकांना धडधडते, विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही, प्रदूषण....... अगणित दुष्परिणाम आहेत. Moderation , common sense, सामाजिक जाणीव.. किती साध्या गोष्टी आहेत बरं पण दुर्मिळ झाल्यात. हे सांभाळून सुद्धा सणावाराचा आनंद घेता येतो !!
आशुचँप,
, धन्यवाद.
हा धागा उपयुक्त आहे. शीर्षक बघून हा प्रश्न मला का नाही पडला हाच प्रश्न मला पडला
Submitted by DJ.. on 10
Submitted by DJ.. on 10 November, 2020 - 19:06
>>>
पुण्यातली दिवाळी ईतकी खतरनाक असते ?
फार डेंजर वर्णन होते ते.. ईतक्या ऊंचावर खिडक्यातून ईतका धूर आणि काजळी वगैरे....
आशुचँप, मी तुम्हाला एका
आशुचँप, मी तुम्हाला एका कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवणार होते, पण गेले बरेच दिवस माबोवर आले नव्हते त्यामुळे राहून गेलं.
इंडिगो रुट्स नावाच्या एका संस्थेने श्री. यशोधन जोशी (सॉरी, हे कोण ते मला माहित नाही, मला आमंत्रण आलं ते फक्त तुम्हाला पुढे ढकलणार होते) यांचं ' नभ उतरू आलं !' आतषबाजीच्या इतिहासाचा मागोवा - अस काही ऑनलाइन भाषण ठेवलं होतं. मला आमंत्रण आल्यावर तुम्हाला ताबडतोब पाठवणार होते, पण नन्तर करू म्हणून राहुन गेलं आणि तो दिवस हुकला. तुम्हाला जर recorded कार्यक्रम पहायचा उत्साह असेल तर आयोजकांचा नंबर देते.
साधारण पंचवीस वर्षांपूर्वी मी
साधारण पंचवीस वर्षांपूर्वी मी स्वत:च खूप फटाके लावायचे, बॉम्ब वगैरे कमी तरीही रोज एकतरी लावायचे चार दिवस, लवंगी वगैरे पण लावायचे. अनार, भुईचक्र जास्त लावायचे. मग स्वत:लाच आता नको फटाके असं वाटायला लागलं.
आमच्या इथल्या एरियात दहा वर्षापूर्वी जेवढे फटाके लावायचे ते प्रमाण आता खूप कमी झालं आहे. दिवसरात्र जबरदस्त लावले जायचे, हल्ली पाच वर्ष अजून कमी झालेत, स्वत:हून लोकांनी कमी केले असावेत असं वाटतं. जवळ हॉस्पिटल्स पण आहेत त्यामुळेही असावं. कानठळ्या बसण्याइतका आवाज नसतो, त्यामुळे बरं वाटतं. माफक प्रमाण आहे, तेवढं ok.
आज नरक/नर्क चतुर्दशी असुनही
आज नरक/नर्क चतुर्दशी असुनही एकही फटाका वाजला नाही. अगदी अपवादाने सुद्धा एकही नाही. आर्मी एरियात रहाण्याचा फायदा. नियम म्हणजे नियम.
खरं तर गोरखा रेजिमेंट जाऊन पंजाब रेजिमेंट आल्यावर धडकी भरली होती की शांत गोरखा लोक जाऊन हे धडाकेबाज शो ऑफ करणारे दिल्ली पंजाबवाले खुप आवाज करतील. पण पूर्ण शांत पहाट होती. समोरच्या आर्मी ट्रेनिंग ग्राउंड पलीकडे क्षितिजरेखा स्वच्छ दिसते आहे आणि हवा पूर्ण शुद्ध आणि ताजी....... बेस्ट दिवाळी :thumbs up:
उद्या आहे ना(आम्ही कोणीही
उद्या आहे ना(आम्ही कोणीही पहाटे उठलो नाहीये)
कॅलेंडर पण कुठेतरी हरवलंय(आता ऑनलाईन बघायलाच हवं)
उद्या उठतात ना पहाटे . इकडे
उद्या उठतात ना पहाटे . इकडे दरवर्षी मध्यरात्री 3 ला एटमबॉम्ब लावतात आणि झोपमोड होते. या वर्षी अति प्रदूषित म्हणून आमच्या शहराचे नाव आहे आणि फटाकेबंदी आहे तरी खुलेआम विक्री चालू आहे गर्दीसहीत.
आर्मी एरियात रहाण्याचा फायदा.
आर्मी एरियात रहाण्याचा फायदा. नियम म्हणजे नियम. >> same here..gurudwara road, camp
मीरा नर्कचतुर्दशी उद्या आहे.
मीरा नर्कचतुर्दशी उद्या आहे.
उद्या आहे नरक च. आणि पहिली
उद्या आहे नरक च. आणि पहिली आँघोळ.
आमच्याकडे पहिला फटाका फोडायची चढाओढ असायची. पोरं चारच्या अंधारात उठून आंघोळ करून मोठाले बॉम्ब फोडून पुन्हा झोपी जायचे.
मीरा नर्कचतुर्दशी उद्या आहे.
मीरा नर्कचतुर्दशी उद्या आहे. >> ओह अच्छा. मग फटाके नसल्याचं आश्चर्य वाटायला नको. उद्या कळेलच.
या फटाक्यांमुळे कोणी
या फटाक्यांमुळे कोणी धनत्रयोदशीला दिवाळीत मोजत नाहीत.
आणि वसुबारस हे नावही कित्येकांना माहीत नसते.
तरी एक बरे हल्ली व्हॉटस्पवर लोकं अमावस्या पौर्णिमेच्याही शुभेच्छा पाठवत असल्याने थोडेफार ज्ञानात भर पडते.
>>>हल्ली व्हॉटस्पवर लोकं
>>>हल्ली व्हॉटस्पवर लोकं अमावस्या पौर्णिमेच्याही शुभेच्छा पाठवत असल्याने...
हॉहॉहॉ. खरंय.
पण अजून मूळ प्रश्न तसाच आहे.
पण अजून मूळ प्रश्न तसाच आहे. दिवालीत फटाके उडवायची प्रथा केव्हापासून चालू झाली?
https://www.india.com/viral
https://www.india.com/viral/firecrackers-ban-is-bursting-firecrackers-re...
https://satyagrah.scroll.in
https://satyagrah.scroll.in/article/110504/fire-crackers-history-in-india
माहितीपर.
आता दिवाळीत जसे कॅडबरी सेलिब्रेशन, वेष्टनात गुंडाळलेले चॉकलेट्स इत्यदी गिफ्ट दिले जाते तर याचे खरे मूळ पुन्हा ख्रिसमस वगैरे पर्यंत जाते. फटाक्यांचे देखील थोडेफार असेच. सारासार विचार करणारे फटाक्यांना विरोध करतीलच आणि सर्वकाळ निर्बुद्ध इथून पुढे दहा वर्षांनी म्हणतील की नवरात्रीचे नऊ रंग देखील धर्माचे प्रतीक आहे.
Pages