दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.
मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.
दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.
हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे व प्रदूषणामुळे पतंग, फुलपाखरे व इतर असंख्य अगणित कीटक मृत्युमुखी पडतात.>> अशी उदाहरण देऊन मुलांना समजावलं तर मुलं (४ वर्षां पुढील) नक्कीच फटाके वाजवण्याचा हट्ट करणार नाहीत. निखळ आनंद इतर गोष्टींनीही मिळेलच की.. रांगोळी काढणे, किल्ला बनवणे, फराळ खाणे, नवीन कपडे घालणे, शुभ दीपावली म्हणत जो भेटेल त्याला शुभेच्छा देणे.. एखादी गोष्ट नाही मनासारखी मिळाली अथवा नाही दिली गेली तर कुठे काय
बिघडतंय
ईनामदार,
ईनामदार,
तुम्ही दोन गोष्टी वेगळ्या ठेवा.
तुम्ही जे दुष्परीणाम सांगत आहात ते मान्य आहेतच. ते टाळायला हवेतच.
पण स्फोटातून मिळणारया आनंदाला तुम्जी जे विकृत म्हणत आहात तो विकृत नसून नैसर्गिक आहे. आणि तो आनंदच आपल्याला फटाके वाजवायला प्रेरीत करतो.
एक दुसरे उदाहरण देतो. संगीत आपल्याला आनंद देते हे तर तुम्हाला मान्य असेल. आता जेव्हा तुम्ही एकटे शांतपणे गाणे ऐकत असाल तेव्हा तुम्हाला सॉफ्ट मेलोडीयस गाणी आनंद देतात. पण पार्टी वा मिरवणूकीत नाचायचे असल्यस ती गाणी कामाची नाही. मोठ्या आवाजातली पाय थिरकणारीच गाणी हवीत. तो ठराविक ठेका कानावर पडतो तेव्हाच पाय थिरकू लागतात.
आता या नादात आवाज वाढवत कधी त्याचे कानठळ्या बसवणारे संगीत होते ज्याचा ईतरांना त्रास होतो हे आपल्याला समजत नाही. ते टाळायला हवेच. पण ती नाचाची धमाल मस्ती हि काही विकृत आनंदातून आली नसते.
स्फोटातून मिळणारा आनंदही तसाच आहे. जर संगीताचे ठराविक बीटस ऐकून आपले पाय थिरकत असतील तर त्या स्फोटाच्या आवाजातूनही एक उर्जा एक चैतन्य नैसर्गिकपणे अंगात संचारते.
अमेरिकेने जपान वर अणुबॉम्ब
अमेरिकेने जपान वर अणुबॉम्ब टाकला कारण तो त्यांच्यापासून दूर होता
आपले शत्रू शेजारीच आहेत , मग अणुबॉम्ब कसा उडवणार ?
एखादी गोष्ट नाही मनासारखी
एखादी गोष्ट नाही मनासारखी मिळाली अथवा नाही दिली गेली तर कुठे काय
>>>
चाईल्ड सायकोलॉजी.
जी गोष्ट मिळत नाही तीच हवी असणे. तीच सर्वाधिक महत्वाची वाटणे.
फटाकेबंदी पुर्णपणे झाली तर प्रश्नच मिटला. पण जर तुमच्या आजूबाजूचे फटाके वाजवत आहेत तरी आपण सामाजिक भान राखून वाजवायचे नाही हे जसे तुम्हा आम्हाला कळते तसे लहान मुलांना ते समजावणे अवघड.
चार वर्षांच्या पुढील मुलांकडून आपण फार अपेक्षा धरत आहात म्हाळसा.
फटाकेबंदी पुर्णपणे झाली तर
फटाकेबंदी पुर्णपणे झाली तर प्रश्नच मिटला. पण जर तुमच्या आजूबाजूचे फटाके वाजवत आहेत तरी आपण सामाजिक भान राखून वाजवायचे नाही हे जसे तुम्हा आम्हाला कळते तसे लहान मुलांना ते समजावणे अवघड.>> मला तर नेमकं उलट वाटतं.. लहान मुलांना वारंवार आठवण करून द्यावी लागते.. पण त्यांना पटतील ती उदाहरणे दिली तर ते ऐकतात.. मी मुलीला खाली खेळायला घेऊन जाते तेव्हा बरीच मुलं मास्क घालत नाही तेव्हा मुलगी मास्क काढायचा हट्ट करते तेव्हा मला तीला कोरोनाची आठवण करून द्यावी लागते.. त्यानंतर निदान तेवढी संध्याकाळ तरी ती मास्क लाऊनच खेळते. ती ४ वर्षांची आहे म्हणून मी स्पेसिफिकली तोच आकडा लिहीला.
इनामदारांनी जे फुलपाखरांचं उदाहरण दिलं ते जर मुलांना सांगितलं तर ते नक्कीच ऐकतील..मुलांना फटाक्यांपेक्शा फुलपाखरं जास्त आवडत असावीत.
चार वर्षांच्या पुढील
चार वर्षांच्या पुढील मुलांकडून आपण फार अपेक्षा धरत आहात म्हाळसा.>> मी म्हणेन तुम्ही मुलांना अंडरएस्टिमेट करत आहात
कारण तिचे ईतर मित्र फटाके
कारण तिचे ईतर मित्र फटाके वाजवत होते.
कोरोनामुळे यावेळी आपण फटाके वाजवणार नाही हे तिने स्विकारलेले. पण ईतरांना वाजवताना बघून आपण का नाही हे तिच्या वयाला समजावणे अवघडच. आता भाऊबीजेला ती पुन्हा एवढेसे तोंड करून आली तर तिला चक्र पाऊस एकेक बॉक्स द्यायचा हे तुर्तास ठरवलेय.>>परीला ते कोरोनाचं कारण देण्याऐवजी फुलपाखरांविषयी सांगून बघा.. ती नक्कीच चेहरा नाही पाडणार इनफॅक्ट सोसायटीच्याच काय तर शाळेच्या चॅनलवर इतर मुलांनाही पटवून सांगेल
मास्कचे उदाहरण ईथे लागू होणार
मास्कचे उदाहरण ईथे लागू होणार नाही. ते आमच्याकडे पोरे मोठ्यांना आणि येणारया जाणारया लोकांना आठवण करून सांगतात मास्क लावा. मास्क लावल्याने ते त्यांचा कुठला आनंद गमावत नाही किंवा त्यांना कदाचित त्याची गंमतही वाटत असेल.
फटाक्यांबाबत तीन चार वर्षांच्या मुलांना कदाचित फटाक्यांची अवडही तितकी डेव्हलप झाली नसण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यासाठी या निर्बंधाचा स्विकार करणे जडजात नसावे.
आणखी एक म्हणजे प्रत्येक ठिकाणचे कल्चर वेगळे असते. जे फटाके उडवण्यालाही लागू. काहींना त्यामुळे फटाक्यातील आनंद आसपास दिसतो आणि कळतो काहींना यात कसला आनंद आलाय असे वाटते. तुमच्या आजूबाजूचे कल्चर कसे आहे यावर देखील पोरांना किती समजावू शकतो हे ठरावे.
जी गोष्ट मिळत नाही तीच हवी
जी गोष्ट मिळत नाही तीच हवी असणे. तीच सर्वाधिक महत्वाची वाटणे.>> अशी सायकाॅलाॅजी तुम्हाला सगळ्याच वयोगटात सापडेल.
मास्कचे उदाहरण ईथे लागू होणार नाही. ते आमच्याकडे पोरे मोठ्यांना आणि येणारया जाणारया लोकांना आठवण करून सांगतात मास्क लावा>> बघा मी म्हटलं ना..तुम्ही उगाच अंडरएस्टिमेट करत आहात लहान मुलांना. ते तेवढं फुलपाखरांचं उदाहरण देऊन बघा.. परी समजदार आहे..तुम्हालाही समजाऊन सांगेल
ती समजदार नाही, स्मार्ट आहे.
ती समजदार नाही, स्मार्ट आहे. ती तिचा फायदा कश्यात आहे ते बघून समजूतदारपणा दाखवते.
असो, अश्या वन टू वन वैयक्तिक उदाहरणांनी चर्चेला काही लाभ होत नाही.
सांगायचा मुद्दा हा की आज रात्रीचा चिकन केप्सा अंगावर आल्याने मी चकल्या बनवायचा प्लान कॅन्सल केला आहे. त्यामुळे जमल्यास कॉफी घेता घेता बालपणीच्या फटाक्यांच्या आठवणी लिहाव्याश्या वाटतात का बघतो
परमाणू चित्रपटातील भुक्कड
परमाणू चित्रपटातील भुक्कड सैनिक आणि भुक्कड शास्त्रज्ञांना विकृत म्हटलं म्हणून स्क्रीन शॉट घेऊन रीतसर तक्रार कुठे केलीत आणि त्याची कुणी दखल घेतली तर मेरा भारत महान! तो महान आहे याची पुसटशी जाणीव भावना दुखावू निदर्शने बघून आलेली अर्थातच आहे.
दोन चार फुलबाज्या आणि अनार सोडून कुठलेही फटाके कुठल्याही वयाच्या मुलाला देऊ नयेत आणि आवाज न करता आकाशात जाणारी रॉकेट रोषणाई सार्वजनिक ठिकाणी फारतर करावी.
थोर भारतीय संस्कृतीत केशवपन आणि सती अशा पूर्वापार परंपरा आहेत त्या पाळणे जसे अमानुष आहे तसेच फटाक्यांची रेघ कितीमागे खेचता आली किंवा नाही आली तरी आज तो आचरटपणा अमानुष आहे. तो ज्यांना वाटत नाही ते परंपरेचे टुमणे आणि कायकाय छदम् शास्त्रीय कारणे सांगून झोपेचे सोंग घेत रहातील. त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना हॅप्पी दिवाळी.
बालपणीच्या फटाक्यांच्या आठवणी
बालपणीच्या फटाक्यांच्या आठवणी लिहाव्याश्या वाटतात का बघतो >> सौ चूहे खा कर बिल्ली चली हज को मधले चूह् म्हणजे फटाके आणि बिल्ली म्हणजे मी ..म्हणून त्या धाग्यावर प्रतिसादात माझ्याही आठवणी लिहीन
पोखरणचा अणुस्फोट आणि दिवाळीचे
पोखरणचा अणुस्फोट आणि दिवाळीचे फटाके यांची तुलना
>>
करणारे निहायती बेवकुफ है!
या अभिषेक पेक्षा जास्त पालथा
या अभिषेक पेक्षा जास्त पालथा घडा आजतागायत पाहिला नाही
एखाद्याने किती निगरगट्ट असावं याची कमाल मर्यादा आहे
(No subject)
बाशा वगैरे त्रस्त होऊन गेलेलं म्हणताय लोकं!
याही पेक्षा जुने उल्लेख
याही पेक्षा जुने उल्लेख फेसबुकवर येत आहेत
आपल्याला काय? आपण 1940 नंतर
आपल्याला काय? आपण 1940 नंतर प्रथा सुरू झाली हे मान्य केली. आता कोण नोबल पारितोषक विजेता संशोधक आला तरी म्हणायचं हुड.
स्फोटातून मिळणारा आनंदही तसाच
स्फोटातून मिळणारा आनंदही तसाच आहे. जर संगीताचे ठराविक बीटस ऐकून आपले पाय थिरकत असतील तर त्या स्फोटाच्या आवाजातूनही एक उर्जा एक चैतन्य नैसर्गिकपणे अंगात संचारते.
<<
या ऋन्म्याच्या बी डबल ओ डी ए खाली थोडे स्फोट घडवून आणावे म्हणतो. पावशेर उर्जा अन सोबत छटाक भर चैतन्य मोफत!
आरारा वेलकम बॅक
आरारा वेलकम बॅक
आता कोण नोबल पारितोषक विजेता
आता कोण नोबल पारितोषक विजेता संशोधक आला तरी म्हणायचं हुड.>>>>
अगदी बरोबर
फाट्यावर मारणार एकेकाला
तुमच्यापासून सुरुवात
या ऋन्म्याच्या बी डबल ओ डी ए
या ऋन्म्याच्या बी डबल ओ डी ए खाली थोडे स्फोट घडवून आणावे म्हणतो>>>>>

फटाके आदिमानवाच्या काळातही
फटाके आदिमानवाच्या काळातही फोडले जात असावेत. स्वरूप वेगळे असावे.
प्रश्न आहे की दिवाळीला फोडायला सुरुवात कधी झाली?
पण तसे तर दिवाळीला पणत्या लावायला सुरुवात कधी झाली? त्याचा दिवाळीशी संबंध कोणी जोडला? चकल्या लाडू शंकरपाळे करंज्या आणि अनारसे हे पदार्थ दिवाळीचे फराळाचे हे कोणी कधी ठरवले? ईतरवेळी तर त्याच चकल्या बारमध्ये चकणा म्हणून खाल्ल्या जातात. त्याने या फराळाच्या पदार्थाचे पावित्र्य भंग नाही होत का? ते दारात कंदील लावणे कंपलसरी कधीपासून झाले? पहिला कंदिल कोणी लावला असे कैक प्रश्न आहेत..
कोणाकडे आहेत का उत्तरे ?
या ऋन्म्याच्या बी डबल ओ डी ए
या ऋन्म्याच्या बी डबल ओ डी ए खाली थोडे स्फोट घडवून आणावे म्हणतो
>>>>
कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधण्याची हिच ती वृत्ती असावी का
बाकी स्फोटाचा मुद्दा योग्य आहे. सैन्यातही उर्जा भरायला एक फायरींग केली जाते असे पाहिले आहे. हाऊज द जोश. हाय सर.. आणि जो बोले सो निहाल शस्त्रिय काल असे मोठ्याने ओरडल्यावरच आणि सर्वांनी ओरडल्याचा आवाज कानात पडल्यावरच तो जोश अंगात संचारतो.
शस्त्रिय काल नसून सत् श्री
शस्त्रिय काल नसून सत् श्री अकाल असतं असं नम्रपणे निदर्शनास आणून देतो
शस्त्रिय काल
शस्त्रिय काल

तुमच्या कंदिल आणि चकलीच्या
तुमच्या कंदिल आणि चकलीच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीयेत, तरीपण, चकली किंवा कंदील किंवा पणती थांबवण्याची काही गरज नाही, तेव्हा, त्या गोष्टी खरोखर हिंदू संस्कृतीचा भाग होत्या का, हा प्रश्न निरर्थक* ठरतो. तिथे उत्तर होकारार्थी किंवा नकारार्थी आले तरी काही फरक नाही.
----------------------------------------
*-माझ्यादृष्टीने फटाके हिंदू संस्कृतीचा भाग होते की नाही हा पण तितकाच निरर्थक आहे. अगदी शंभर टक्के अविभाज्य घटक असला तरी माझ्या दृष्टीने निर्णयात काहीच फरक पडत नाही.
{{{ जो बोले सो निहाल शस्त्रिय
{{{ जो बोले सो निहाल शस्त्रिय काल }}}
आपण ह्यूमन नव्हे तर हुमायून आहात.
आप तो पुरुष ही नही महापुरुष हो या चालीवर वाचावे.
शस्त्रिय काल नसून सत् श्री
शस्त्रिय काल नसून सत् श्री अकाल असतं असं नम्रपणे निदर्शनास आणून देतो >>
कुणाला समजवताय तुम्ही.
शस्त्रिय काल नसून सत् श्री
शस्त्रिय काल नसून सत् श्री अकाल असतं असं नम्रपणे निदर्शनास आणून देतो Happy
>>>
ओके
कधी वाचले नव्हते. ऐकलेच होते. ते सुद्धा चित्रपटात.
मी अधार्मिक आणि नास्तिक असल्याने या संबंधित जनरल क्नॉलेज कमीच आहे
बाकी हे म्हणजे त्या गणपतीला फिरणारया आरतीच्या मेसेजसारखे झाले
संकष्टी पावावे
असो,
मुद्दा मात्र अचूक !
काही आवाजांनी अंगात जोश संचारतो. चैतन्य सळसळते.
माझ्यादृष्टीने फटाके हिंदू
माझ्यादृष्टीने फटाके हिंदू संस्कृतीचा भाग होते की नाही हा पण तितकाच निरर्थक आहे. अगदी शंभर टक्के अविभाज्य घटक असला तरी माझ्या दृष्टीने निर्णयात काहीच फरक पडत नाही.
>>>
+७८६
हे मात्र अगदी योग्य.
एखादी गोष्ट वाईट आहे तर वाईट आहे मग तिचे संस्कृतीच्या नावावरही समर्थन होत नाही.
जेव्हा मी माझ्या काही मित्रांना दारू पिण्यास मज्जाव करायचो तेव्हा ते देव देखील सोमरस प्यायचे म्हणून दाखले द्यायचे.
अर्थात मी ते खरे खोटे करायच्या भानगडीत कधी पडायचो नाही.
कारण हेच. माझे नत ठाम होते. दारू वाईट आहे तर वाईट आहे मग त्याचा संबंध देव धर्म संस्कृती प्रथा परंपरा कश्याशीही जोडा...
Pages