दिवाळीला फटाके उडवण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली?

Submitted by आशुचँप on 7 November, 2020 - 11:35

दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे

पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?

आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.

मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.

दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.

हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला>> माझ्या माहितीप्रमाणे फटाक्यांचं हिंदू संस्कृतीशी काहीच संबंध नाही.. चायनीज लोकं फटाके फोडून वाईट शक्तींना लांब ठेवायचा प्रयत्न करायचे.. पण ते होते बिझनेस माईंडेड म्हणून भारतीय बाजार पेठेत फटाके पाठवले विकायला.. १६/१७ व्या शतकात.. त्यामुळे भारतात सगळ्याच धर्माचे लोकं फटाके वाजवतात

हो पण आता परिस्थिती अशी आहे की दिवाळी आणि फटाके अविभाज्य झाले आहेत. फटाके नसतील तर लोकांना दिवाळी असल्याचेच वाटत नाही.
16 व्या शतकात म्हणजे थोरल्या महाराजांच्या वेळीच ना
तेव्हा चायनीज फटाके असण्याची शक्यता कमी वाटते
आपल्या बाजारपेठेत चायनाची घुसखोरी ही 19 व्या शतकात असावी

फटाके जर खरोखर पर्यावरणास जास्त हानिकारक असतील तर दिवाळी च का सर्वच प्रसंगी फटाके वाजवणे पूर्ण बंद करा.
मला वाटतं फटाके निर्मिती करण्यासाठी जे कारखाने आहेत त्यांना रीतसर सरकारी परवानगी आहे.
एवढं जर पर्यावरण प्रेम असेल तर सर सकट उत्पादन बंद करा,आयात बंद करा .
सरसकट फटाके निर्मिती,वितरण सक्ती नी जर बंद केले तर हिंदू ना सुद्धा त्यांच्या धर्मावर अन्याय होतोय असे वाटणार नाही.
दिवाळी मध्ये वाजवू नका म्हणायचे आणि मिरवणुकीत वाजवायचे हे कसले नियम.

हा लेख पहा.

यात लिहिलंय:
By the eighteenth century, fireworks began to become de rigueur in grand scale Diwali entertainments organised by rulers.

महादजी शिंद्यांनी राजस्थातील दिवाळीतील फटाक्यांचे वर्णन केले आणि त्यानंतर पेशव्यांनीही दिवाळीत फटाके वापरण्यास सुरवात केली असे यात लिहिले आहे.

थोडक्यात दिवाळीत फटाक्यांचा वापर राजे रजवाडे यांनी अठराव्या शतकात सुरू केला असे दिसते.

पण त्या आधीही इतर समारंभात वापरत असत.

माफक प्रमाणावर फटाके वाजवायला हरकत नसावी. माझ्याकरता तरी दिवाळी= फटाके, पणत्या, उटणं हेच समीकरण आहे. आमच्या राज्यात दोन वर्षांपूर्वीच फटाके वाजवणं लिगल झालं आहे. तेव्हापासून थोडेफार फटाके आणतो. पण इथले फटाके कानठळ्या बसवणारे नसतात त्यामुळे त्रास होत नाही.
दुसरा बीबी पाहिला मेणबत्त्यावाला. आम्ही तरी पणत्या आणि त्यात मेणबत्त्या घालून पहिल्या दिवशी लावणार(च).

1400AD मध्ये बंदुकीच्या दारूचा शोध लागला तेव्हा पासून च फटाके अस्तित्वात आहेत आणि ते दिवाळी मध्ये वाजवले जायचे.
फक्त ते महाग असल्या मुळे सामान्य लोकांना परवडत नसावेत फक्त राजे राजवाडे च त्याचा वापर करायचे.

कोणी तरी ते ऊटण्याची आंघोळ अभ्यंगस्नान आणि कारटे फोडून ती कडू चव चाखणे या प्रथांचाही शोध घ्या जरा. .
घरचे पहिल्या दिवशीच झोपमोड करून आणि सुट्टीच्या दिवशीही सकाळीच जबरदस्ती आंघोळ करायला लाऊन फार त्रास देतात Sad

चांगला लेख मानव
फक्त मला असे वाटते आहे की ते लंका दहन असल्याने आणि रावण जळत असल्याने तो उत्सव दसरा असावा
असेही त्या काळात दसरा सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात होताच

म्हाळसा - होय याच संदर्भात वाचले होते, मी वरती त्याचा उल्लेखही केलाय पहा.

थोडक्यात ही थोर परंपरा 1940 पासून सुरू झालीय
घरोघरी फटाके आणि धूर

आणि मग असा दावा का केला जातोय की फटाक्यांना विरोध म्हणजे हिंदू सणाला विरोध
हेच हिंदू आणि यांचे पूर्वज 1940 पर्यंत बिना फटाक्यांची दिवाळी साजरी करत होते. मग आता अचानक तो धर्मावर घाला कसा काय व्हायला लागला?

हे म्हणजे त्या नवरात्रीच्या नऊ रंगासारखे आहे
काही वर्षांनी ती सुद्धा धर्माची प्रथा होणार. देवीचे नऊ रंग नऊ रुपे.

अगदी अगदी
हेच मनात आलं
क्या बात है आज चक्क लागोपाठ दोन पोस्ट ला मला तुला सहमती द्यावी लागतेय
त्यात संध्याकाळी मी तू शाहरुख किळसवाणा दिसतोय याला अनुमोदन दिलेलं वाचलं
हे खऱ्यात घडतंय का मी स्वप्न बघतोय Happy

नवरात्रीच्या नऊ रंगाविषयी टोटली सहमत आहे. २० वर्षांपूर्वी तरी हे रंगांची प्रथा नव्हती असं मला आठवतंय. सेलिब्रेशन ला विरोध असण्याचं काहीच कारण नाही. पण त्याचं रूपांतर ‘धार्मिक भावना‘, ‘भारतीय संस्कृती‘, ‘जाओ पहले उस आदमींका साईंन लेके आओ‘ वगैरे गोष्टींत व्हायला नको.

व्हायला नकोय पण होत चालला आहे हे दिसतच आहे
गणपती उत्सव बघता बघता डॉल्बी चा दणदणाट, वेडावाकडा नाच, हिडीस हावभाव, आणि एकंदरीतच धडकी भरवणारा व्हायला लागला आहे
दहीहंडी पण त्याच मार्गाने जात आहे
नवरात्रात तोरण मिरवणुकीवर आता बंदी आणलीय म्हणून नाहीतर तोही
एकूणच सण साजरा करणे म्हणजे धुमाकूळ घालणे आणि उपद्रव देणे याकडे वाटचाल करत असल्याने त्यावर टीका होणारच
आणि हेच कशाला सगळेच दिवस
नव्या वर्षाच्या स्वागताला बेदम दारू पिऊन धिंगाणा केला नाही तर ते स्वागत वाटत नाही
शिव जयंतीला मोठ्याने हॉर्न वाजवत आरडाओरडा करत रॅली काढली कीच ती साजरी केली अस म्हणतात

हे सगळं न करताही उत्सव साजरा करता येतो असं म्हणल की सगळे एकदम संस्कृती खतरे मैं करत अंगावर धावून येतात

मला मिरवणूक, ढोल ताशे खूप आवडतात.पण हेही खरं की हे सर्व 24 तास सहन करणं आणि 10 मिनिटं बघायला जाणं यात फरक असतो.
आमच्या मागे स्टेज आहे.सोसायटीची भिंत ही स्टेज चा बॅकड्रॉप आहे.होळीच्या दिवशी तिथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 मोठ्या डीजे सहित पार्टी चालते.पोलीस, नगरसेवक,फोन, आरडा ओरडा, ट्विट काहीही करून उपयोग होत नाही.तुम्हाला पाहिजे ती मजा करा, फक्त आवाज थोडा कमी ठेवा असं अनेक वेळा सांगूनही फरक पडत नाही.घरी ज्येना, लहान मुलं असताना अशीच या आवाजाच्या कुशीत बरीच वर्षं काढली.या हॉल वर लग्न हा बराच सौम्य प्रकार आहे.गाणी वाजवून मनसोक्त नाचून झालं की सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटल म्युझिक मध्ये डिनर बफे असतो. नंतर खाण्याचे परम कर्तव्य झाल्यावर सर्वाना घरी जाण्यातच रस असतो.
सर्व डेसिबेल्स ओलांडलेले असतात.डीजे 'तुमच्या आग्रहाखातर अजून एक गाणं' करत पुढे 15 गाणी वाजवतो.तो एक दिवस तो हादरवणारा आवाज आम्हाला आयुष्याचा भाग बनवावाच लागतो.सर्वात मोठा उपहासाचा भाग हा की या आवाजाच्या 200 मीटरवर हॉस्पिटल आहे.
यावर्षी आम्ही 'नको तो आवाज' म्हणून 5 तास बाहेर गेलो तर करोनामुळे पार्टीच रद्द झाली Happy

एन्जॉयच करतो आता Happy
घरात नाचत नाचत स्वयंपाक, फर्निचर पुसणे, कपडे वाळत घालणे वगैरे करतो.
जर आयुष्याने तुम्हाला भिंती हादरवणारा डीजे दिला असेल तर त्याला आपलेच लग्न समजून नाचावे असे साध्वी अनुमी यांनी मागेच म्हणून ठेवले आहे.

महाग पडेल
तसेही जास्त दंगा वर्षातला एकाच दिवस असतो.

लक्ष्मीपूजन च्या दिवशी मोठ्या मोठ्या दुकानदारांनी १००००- ५००० च्या फटाक्यांच्या माळा लावून 'आवाज कुणाचा ssss' ची जुगलबंदी करणे ही पण एक प्रथा लहानपणी पाहीलिये घराजवळ .

सध्या राहतो तिथे, कोणाचा वाढदिवस असेल तर रात्री १२ ला फटाके वाजवण्याची प्रथा सुरू झालीय.

श्रद्धा हो
लक्ष्मीपूजनाला आमच्याईथले द. मुंबईत देखील गुज्जू दुकानदार आणि व्यावसायिक नुसता धुरळा उडवायचे. अगदी पैश्याची ताकद मिरवल्यासारखे जुगलबंदी चालायची.
त्यामुळे आम्ही लक्ष्मीपूजनाला फटाके उडवायला खाली जायचोच नाही. ते भाऊबीजेला राखून ठेवायचोम्

प्रत्येक माहितीचे काहीतरी केलंच पाहिजे असा नियम आहे का?
एक कुतूहल म्हणून माहिती कोणी गोळा करू शकत नाही का?

कुठं तुलना करताय राव
तो दिवसात जितके धागे विणतो तितके मी महिन्याला पण जमवू शकत नाही
आणि मी माझी चूक मान्य पण करतो
Happy

पुण्यात लक्ष्मी रोड वर सराफांची जुगलबंदी पूर्वी पण होती अस आठवतय. Oscar Wilde च्या `रिमार्केबल रॉकेट' नावाच्या कथेत 'bengal light' असा उल्लेख आला आहे. त्याचा संबंध आप्ल्या बंगालशी असावा का.

प्रत्येक माहितीचे काहीतरी केलंच पाहिजे असा नियम आहे का?
एक कुतूहल म्हणून माहिती कोणी गोळा करू शकत नाही का?
>>>

चुकीची माहिती जमा नका करू! वर लिहिलंय महादजी रावांनी फटाक्यांचे उल्लेख केल्याचे, अन तुम्ही निष्कर्ष काढला 1940 चे

Pages