दिवाळीला फटाके उडवण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली?

Submitted by आशुचँप on 7 November, 2020 - 11:35

दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे

पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?

आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.

मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.

दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.

हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) ट्विटर आयडी ब्यान झाला ह्याचे समर्थन मला करायचे नाहीच आहे. खोटे कोण बोलते आणि कोण नाही ह्याची सत्ता ट्विटर कडे असावे असे काय मला वाटत नाही*.

२) कायदा मोडला कि नाही ह्याचा काही प्रश्नच नाही. मायबोली जितकी प्रायव्हेट संस्था आहे तितकीच ट्विटर पण आहे. ट्विटरला नाही आवडले केले ब्यान**.

३) alt news
https://www.altnews.in/trueindology-truefraudology-debunking-goldmine-fi...

------------------------------------------

*- कधीकधी लिबरल सारखा बोलतो. पण चुकूनच.
**-का बॅन केली मला माहित नाही. खोटे बोलणे हा निकष नसून इतर काही कारण असावे. ट्रम्प धडाधड खोटे बोलतो, त्याला कुठे बॅन केलंय ? किंवा, हे दोन्ही निर्णय संपूर्ण आर्बीट्ररी असू शकतात, कारण, ट्विटर संपूर्ण खाजगी संस्था आहे.

एखादी गोष्ट हिंदूंसाठी धार्मिक/सांस्कृतिक व्हायला वेदांत/पुराणांत असायला हवी असं काही नाही ना? आपण दिवाळीत किल्ला करतो, ते कुठे पुराणांत लिहिलं आहे? ज्या गोष्टी आवडल्या त्यांना लोकांनी सणांचा भाग बनवले. आता वाईट बाब अशी आहे की, ज्या गोष्टी अनिष्ट आहेत, त्या सोडून द्यायला लोक तयार नाहीत. तिथे कायद्याची जबरदस्तीच हवी. धर्म कुठलाही असो. कायदा अशक्त झाला तर अश्या गोष्टी सोकावतात.

खासदार रीता बहुगुणा जोशी यांची 8 वर्षीय नात सोमवारी रात्री फटाके उडवताना कपडे पेटल्यामुळे होरपळून मरण पावली Sad मी आत्ताच ही बातमी वाचली

Pages