दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे
पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?
आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.
मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.
दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.
हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे
स्फोट घडवून आनंद मिळवणे हि
स्फोट घडवून आनंद मिळवणे हि विकृती आहे. याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही.
>>>>
+७८६
मागच्याच आठवड्यात परमाणू चित्रपट पाहिला. पोखरणला स्फोट घडताच काही विकृत त्यात आनंदाने नाचू लागले.
खेड्यापाड्यात असंख्य लहान
खेड्यापाड्यात असंख्य लहान मुले पूर्वी कुत्र्याच्या शेपटाला फटाके बांधून ते जीवाच्या आकांताने केकाटत धावत सुटे त्याची मजा घेत.
>>>>
संस्कार !
ते मुलांवर योग्य नसले तर दिवाळीच काय रोज बागेतही मुले फूलपाखरांच्या शेपटीला दोता बांधून विकृत आनंद घेऊ शकतातच. म्हणून मग गार्डनच बंद नाही ना करता येणार...
लहान मुलांना आनंद होतो असे
लहान मुलांना आनंद होतो असे म्हणणे म्हणजे समस्येला इमोशनल बगल वाटते बुवा. होत असला आनंद तरी पण करू नये. फक्त पर्यावरणासाठी नाही, तर लोकांसाठी. माझ्या आईला दमा आहे आणि दिवाळीत काय अवस्था असते हे डोळ्यांनी पाहतोच. असा बऱ्याच लोकांना त्रास होतो.
बाकी काही वर्षांमध्ये इसपार या उसपार परिस्थिती येऊ घातली आहेच, फटाकेच नाही तर इतर बाबीसुद्धा.
असो.
इनामदारांच्या माग कोणतरी लड
इनामदारांच्या माग कोणतरी लड लावली वाटते लय फडफड करतंय
दीपावली हा प्रकाशाचा सण आहे.
दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. +११
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण..अंधारावर उजेडाची मात..म्हणजेच वाईटावर चांगल्यांचा विजय..त्याचे प्रतिक म्हणून दिवे लावणे..
ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, रस्त्यावर कचरा करणारे फटाके उडवण्यामागे काय लॉजिक आहे?
सणाचा मुख्य उद्देश आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आचरणात आणणे..आपण काय करतोय, हे सोडून बाकी सगळ्या वाईट गोष्टी करतोय..कुणाच्या लक्षातच येत नाही कि या चुकीच्या गोष्टी आहेत...चुकीचे करणे नॉर्मल कन्सीडर केले जाते आजकाल.
पोखरणला स्फोट घडताच काही
पोखरणला स्फोट घडताच काही विकृत त्यात आनंदाने नाचू लागले.>>>>>>
भारतीय सैनिक आणि शास्त्रज्ञ यांना विकृत म्हणल्याबद्दल काही कारवाई वगैरे होऊ शकते का?
आजकाल सण म्हणजे नवे कपडे, नवी
आजकाल सण म्हणजे नवे कपडे, नवी कार, नवी टु व्हीलर, सेल्फी मैनेजमेंट आणि सोशल मिडियावर शेअर करणे इतकेच आहे..वीच आर ऑल मटेरीअल्स्टिक..
पुढच्या पीढीला कळणारच नाही कि नक्की सणांचा उद्देश काय आहे..
पोखरणचा अणुस्फोट आणि दिवाळीचे
पोखरणचा अणुस्फोट आणि दिवाळीचे फटाके यांची तुलना
नाही म्हणजे काहींच्या काही तुलना आहे.
वादासाठी वाद घालायाचा आहे हे मान्य करून सुद्धा तुलना गंडलेली आहे
(आता यावर एक फाफटपसारा स्पष्टीकरण येईल ही कल्पना आहे
)
सेल्फी मैनेजमेंट आणि सोशल
सेल्फी मैनेजमेंट आणि सोशल मिडियावर शेअर करणे >> मी तर सण असो वा नसो, दिवसाला १०-१२ सेल्फिज प्लस मुलींचे फोटोज काढून वाॅट्सॲप वर टाकत असते.. आज पर्यंत त्यातून काही वाईट तर नाही घडलं इनफॅक्ट ज्यांना फोन करायला सहसा कधी वेळ मिळत नाही असे कित्येक मित्र मैत्रिणी/नातेवाईक स्वतहून मेसेजेस करून विचारपूस करतात.. जी गोष्ट कोणासाठी त्रासदायक नाहीए ती करण्यात काय प्राॅब्लेम आहे
@ आशूचॅम्प.
@ आशूचॅम्प.
दिवाळी फटाके फोडून साजरी करणारया आबालवृद्धांना विकृत म्हणल्याबद्दल काही कारवाई वगैरे होऊ शकते का?
असो,
तर विकृती स्फोटातून मिळणारया आनंदात नसून स्फोट घडवायच्या हेतूत आहे हे संबंधितांना कळले तरी पुरेसे आहे
पोखरणचा अणुस्फोट आणि दिवाळीचे
पोखरणचा अणुस्फोट आणि दिवाळीचे फटाके यांची तुलना Uhoh
>>>>
जेव्हा आपण एखादे उदाहरण देतो तेव्हा ती तुलना च नसते. किंबहुना ते मुद्दा पटवणे असते. ईथे मुद्दा हा की स्फोटातून मिळणारया आनंदावर ती विकृती अवलंबून नसते तर त्या स्फोटाच्या उद्देशावर अवलंबून असते. जर तुम्हाला खरेच फटाके फोडणारे विकृत वाटत असतील तर मग हे उदाहरण देणे गरजेचे होतेच.
लहान मुलांना आनंद होतो असे
लहान मुलांना आनंद होतो असे म्हणणे म्हणजे समस्येला इमोशनल बगल वाटते बुवा
>>>>>
यूह आर नॉट गेटींग माय पॉईंट
फटाक्यांचे समर्थन कोणच करत नाहीये. ते बंद व्हावेत असेच मी म्हणतोय. पण पुर्ण बंदी न आणता लिमिट आणणार असाल तर लहानांना ते वाजवायला द्यावे अशी ईच्छा आहे ईतकेच. जर पुर्ण बंदी आणली तरी स्वागतार्हच आहे. कारण वर माझ्या एका पोस्टमध्ये दिलेच आहे.
ईथे मुद्दा हा की स्फोटातून
ईथे मुद्दा हा की स्फोटातून मिळणारया आनंदावर ती विकृती अवलंबून नसते तर त्या स्फोटाच्या उद्देशावर अवलंबून असते>>> हे तुम्हीच लिहिताय ते बर. पोखरणकच्या स्फोटाचा उद्देश दुसऱ्यांना त्रास देणे नसून सामरिक शास्त्रात deterrent नावाची संज्ञा वापरली जाते त्यासाठी केला होता. पोखरणच्या मागे हजारो शास्त्रज्ञ , तंत्रज्ञ , राजकीय डावपेच यांचे योगदान होते. एकेकाळी तिसरे जग म्हणून मानल्या गेलेल्या भारतासाठी तो एक अभिमानाचा क्षण होता आहे नी राहिल . कृपया त्याला विकृत म्हणून निव्वळ वादासाठी वाद घालायला वापर करू नका.
स्वतःच्या सो कॉल्ड संस्कृती धर्माभिमानीसाठी , पैशाच्या माजसाठी , कुठल्यातरी आनंदासाठी फटाके फोडणारे वेगळे आहेत , त्याची तुलना पोखरण्याच्या मेहनतीबरोबर करू नका ही विनंती. दुसरा मुद्दा सापडतो का ते बघा.
आशुचँप.... +1
आशुचँप.... +1
स्वतःचा मुद्दा पटवण्यासाठी देखील देशाच्या सैनिकांचा व शास्त्रज्ञांना विकृत म्हटलेले अजिबात पटण्यासारखे नाही. Very very disrespectful. संताप !!
कारवाई होत नसेल तर खेदजनक आहे .
पोखरणकच्या स्फोटाचा उद्देश
पोखरणकच्या स्फोटाचा उद्देश दुसऱ्यांना त्रास देणे नसून सामरिक शास्त्रात deterrent नावाची संज्ञा वापरली जाते त्यासाठी केला होता
>>>>
एक्झॅक्टली! हेच तर मी म्हणतोय.
म्हणूनच उद्देश महत्वाचा.
अन्यथा सैनिकाने युद्धात घेतलेला बळी सुद्धा मर्डर समजला जाईल.
पलटी मारू नका आता. भारतीय
पलटी मारू नका आता. भारतीय शास्त्रज्ञ आणि सैनिकांना विकृत का म्हणताय मग उद्देश महत्वाचे आहे मग ?
>>>>जर पुर्ण बंदी आणली तरी
>>>>जर पुर्ण बंदी आणली तरी स्वागतार्हच आहे. कारण वर माझ्या एका पोस्टमध्ये दिलेच आहे.
ओके.
फटाके उडवणारे विकृत असतात असं मला पण वाटत नाही. तिथे फुल्ल सपोट. म्हणजे काही लोकं असतात, रस्त्यावर गाड्यांवर वैगेरे फटाके फेकणारे, पण सरसकट नक्कीच नाही. फार लांब कशाला जा. मी लहानपणी फटाके उडवायचो, I'm pretty sure मी काय तेव्हा विकृत नव्हतो.
स्वतःच्या सो कॉल्ड संस्कृती
स्वतःच्या सो कॉल्ड संस्कृती धर्माभिमानीसाठी , पैशाच्या माजसाठी , कुठल्यातरी आनंदासाठी फटाके फोडणारे वेगळे आहेत ,
>>>>
फटाके हे पैश्याचा माजी दाखवायला आणि धर्माभिमान राखायला फोडले जातात हाच विचार तर बदलायचा आहे.
गरीबांकडेही फोडतात फटाके, ते कसला माज दाखवताहेत पैश्यांचा? वा कसला धर्माभिमान आला आहे त्यांना..
नक्कीच काहीतरी आनंद येत असेल त्या आतिषबाजीतून.. ज्यांना येत नाही त्यांनी लगेच ईतरांना विकृत ठरवावे का?
नीट वाचा . गरीब लोकांकडे माज
नीट वाचा . गरीब लोकांकडे माज दाखवण्याइतपत पैसे असतात
काहीही
माज आणि फुकाचा धर्माभिमान वगैरे दाखवणारी लोक वेगळी आहेत . उगगाच कायच्या काय फाटे फोडायचे आपले.
पलटी मारू नका आता. भारतीय
पलटी मारू नका आता. भारतीय शास्त्रज्ञ आणि सैनिकांना विकृत का म्हणताय मग उद्देश महत्वाचे आहे मग ?
>>>
ते उपरोधाने होते हे काहींना कळलेय. तुम्ही योग्य वाटेल ते समजू शकता
आणि हो. ते तरी उदाहरणादाखल होते. उपरोधाने होते.
पण फटाके फोडणारी सामान्य जनता आणि लहान पोरे यांना विकृत म्हटल्याने कोणाचा संताप होत नसेल तर ते जास्त खेदजनक आहे.
आता इथे गीता वाचून काहीही
आता इथे गीता वाचून काहीही उपयोग नाही .अंगाशी येताच उपरोध वगैरे बहाणे सुचायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा चालू देत. अडमीन जर हा बाफ वाचत असतील तर योग्य कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे.
फार लांब कशाला जा. मी लहानपणी
फार लांब कशाला जा. मी लहानपणी फटाके उडवायचो, I'm pretty sure मी काय तेव्हा विकृत नव्हतो.
>>>
मी सुद्धा हे केले आहे. ताजमहालची माळ सुट्टी करून एकेक फटाका हवेत उडवून फोडायचो. पण मोकळ्या जागेत. यात कसला माज. बरेच मजेशीर प्रकार करून फटाके फोडायचो. कोणालाच त्रास द्यायचा कधी उद्देश नसायचा. वा चुकून तो होतोय हे कोंणी लक्षात आणून दिले तर ते टाळायचो.
मुळात माज असणे वा नसणे हा संस्कारांचा भाग आहे. फटाके उडवणे हे एक माध्यम आहे त्यात तो आहे वा नाही हे दिसते ईतकेच.
अंगाशी येताच उपरोध वगैरे
अंगाशी येताच उपरोध वगैरे बहाणे सुचायला सुरुवात झालेली आहे
>>>
तो उपरोध होता हे समजत नसेल तुम्हाला तर ईटस ओके
तो तसेही फार कमी लोकांना कळतो.. आणि काही कळून न कळल्यासारखे करतात. पण म्हणून मी वापरायचे सोडत नाही.
अंगाशी येताच कोलांटउड्या
अंगाशी येताच कोलांटउड्या मारणे सुरू !!! टिपिकल मोडस ऑप्रेनडी


परत त्यावर मी मी पणाचे आवरण
पडलो तरी नाक वर
अंगाशी येताच कोलांटउड्या
अंगाशी येताच कोलांटउड्या मारणे सुरू !!! टिपिकल मोडस ऑप्रेनडी Lol
>>>
धिस ईज अगेन ओके. आधीच समोरचा अमुकतमुकच आहे हे डोक्यात असल्यने मुद्दा समजण्याचा प्रयत्न न करणे वा एकाच चष्म्यातून बघणे हे स्वाभाविकपणे घडते. हुमायुन नेचर. मी सुद्धा याला अपवाद नाही.
एक अर्धवट लिहिलेली पोस्ट
एक अर्धवट लिहिलेली पोस्ट राहिली ना या नादात
दिवाळीला घराघरात, दुकानात, रस्तोगल्ली जी वीज जाळली जाते त्यावरही लिमिट यायला हवे. आजही खेड्यापाड्यात पुर्ण वेळ वीज नाही याचे भान हवे लोकांना. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या वीजेच्या दिव्यांच्या वापराने, बदलत्या लाईफस्टाईलने दिवाळीच्या या चार दिवसात आणि त्याच्या पुढेमागेही बरीच जास्त प्रमाणात वीज वापरली जातेय. याचे आकडे शोधायला हवेत. पण तरी प्रत्येकाने या काळात आपल्यापुरते तरी भान ठेवायला हवे.
जाओ उस आदमी की साईन लेके आओ असे नाही करायचेय. कारण फटाके फोडणारे असो वा वीज जाळणारे, आहोत दोन्ही आपणच.
अडमिन करोत व न करोत
अडमिन करोत व न करोत

याचा स्क्रीन शॉट घेतला आहे आणि रीतसर तक्रार दाखल करणार आहे या आयडी वर
उपरोध वगैरे कोलांट्या उड्या मारू देत काहीही
पण भारतीय जवानांना आणि शास्त्रज्ञाना विकृत म्हणणे ही निर्लज्जपणाची परमावधी झाली
अरे कुठे चाललीय चर्चा...
अरे कुठे चाललीय चर्चा...
रोज बागेतही मुले
रोज बागेतही मुले फूलपाखरांच्या शेपटीला दोता बांधून विकृत आनंद घेऊ शकतातच. म्हणून मग गार्डनच बंद नाही ना करता येणार...
>>> योग्य उदाहरण पण चुकीचा निष्कर्ष. फूलपाखरांना त्रास देणे विकृत आहे हे जसे कळते तसेच दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे व प्रदूषणामुळे पतंग, फुलपाखरे व इतर असंख्य अगणित कीटक मृत्युमुखी पडतात. हे सुद्धा कळेल अशी अपेक्षा. मी दिवाळी बंद करायची मागणी केलेली नाही.
पोखरणच्या चाचणीतला स्फोट किंवा खाण/विहिरीतील सुरुंगचा स्फोट. तिथे प्रचंड आवाज झाला म्हणून आनंद व्यक्त केला जात नाही. काहीतरी उपयोगी (productive) कार्य तडीस गेले म्हणून तो आनंद असतो. दिवाळीत फटाके लावून असे काय उपयोगी कार्य घडते ते सांगाल का.
लहान मुलांना काय कळते
लहान मुलांना काय कळते प्रोडकटीव्हीटी वगैरे...
फटाके उडवून फक्त निखळ आनंद मिळतो...
त्यात उपयोगी कार्य शोधायला जाऊ नये...
Pages