दिवाळीला फटाके उडवण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली?

Submitted by आशुचँप on 7 November, 2020 - 11:35

दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे

पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?

आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.

मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.

दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.

हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा धर्म ओघवता आहे

कायद्यानुसार 10, 20 वर्षाचे पुरावे जरी दिले तरी ती प्रथा आहे असे मानले जाते

आता दिवाळीत जसे कॅडबरी सेलिब्रेशन, वेष्टनात गुंडाळलेले चॉकलेट्स इत्यदी गिफ्ट दिले जाते तर याचे खरे मूळ पुन्हा ख्रिसमस वगैरे पर्यंत जाते.
>>
ईत्यादी मधे काय काय आहे?
वगैरे मधे काय काय आहे?
दिवाळीतल्या चॉकलेट्सचा संबंध ख्रिसमसशी नसुन, कंपन्यांच्या मार्केटींग डिपार्टमेंटशी आहे.

फटाक्यांचे देखील थोडेफार असेच.
>>
म्हणजे किती टक्के? असेच म्हणजे कसेच?

सारासार विचार करणारे फटाक्यांना विरोध करतीलच
>>
विरोध करणे न करणे याचा, प्रथा कधी सुरु झाली याच्याशी काय व कसा संबंध आहे?


.
Here is a painting from Rajasthan depicting celebration of Dīpāvali by Krishna and Radha using firecrackers.

From Rajasthan school of art (c. 1700 CE)

Ancient Indians used Gunpowder long BEFORE Mughal invaders were even BORN.

Ancient Indians used Saltpetre (Agnichurna), the major constituent of gunpowder, to make firecrackers (ulkah) on Diwali.
.
"Gunpowder originated in Ancient India"- Indologist Dr. Gustav Oppert

.
While it is true that use of Gunpowder in matchlocks proliferated in the middle ages

Ancient Indians used Saltpetre (Agnichurna) in mining and warfare.

It was already mentioned by Kautilya in Arthashastra as a weapon of war (4th century BC) long BEFORE Mughals were born
.

.
https://twitter.com/TIinExile/status/1327477391787114497

Proud

शुद्धीवर आले वाटतं , दारू उडवा

तुम्हीच दिवाळीचे फटाके म्हणून मायनिंग , युद्ध , चाणक्य ह्यांचा इतिहास सांगत बसले

म्हणून मीही राफेल उडवले

वाहवा! ठराविक मंडळींनी लगेच प्रबोधिनी मध्ये बसून ऐतिहासिक पुरावे बनवलेले दिसत आहेत. शीघ्रकलेचे कौतुक करावे तितके कमीच. फटाक्यांचा इतिहास ह्यावरचे लेख आणि ह्यांची चित्रे याचा गुगल वर शोध घेतला असता आठ दिवसाहून जास्त जुनी दिसत नाहीत. इतकी वर्षे यावर चर्चा होत आहे ह्या विषयावर पण आजवर कधी यांचे पुरावे दिसले नाहीत. यावर्षी मात्र पावसाळ्यात कुत्र्याची छत्री उगवावी तसे भराभर इन्टरनेट भर उगवले सगळीकडे पुरावे. कोण म्हणतोय कृष्ण आणि राधा फुरबाजे उडवत होते तर अजून कोण म्हणतोय इटालियन प्रवाशाने भारतातल्या फायरवर्क बाबत लिहिले आहे. अरे भोंदू भामट्यानो जगातले पहिले फटाके इसवीसनपूर्व दोन हजार मध्ये चीन मध्ये बनवले गेलेत असे विश्वसनीय इतिहास सांगतो आणि जगातल्या कोणीही इतिहासतज्ञांनी ह्याला आक्षेप घेतलेला नाही: https://www.americanpyro.com/history-of-fireworks

तुमचे महाभारत इसवीसनपूर्व तीन हजार वर्षापूर्वी घडलेले आहे असे तुम्हीच म्हणता. त्या कृष्णाला कुणी आणून दिले फुरबाजे त्यावेळी? आणि गर्लफ्रेंडच्या खांद्यावर हात टाकून सार्वजनिक जागेत उभारण्याची पद्धत होती का त्या काळात?

बाकी, भामट्यांची विश्वासार्हता जगजाहीर आहे. आजवर म्हणत होते संस्कृती पाच हजार वर्षे जुनी. तर कालपरवा, स्वत:ला गुरु म्हणवून घेणारा एक बाबा अमेरिकेत का इंग्लंड मध्ये बरळला. म्हणे ऋषीमुनींनी पंधरा हजार वर्षापूर्वी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. अरे? नक्की काय, पाच कि पंधरा? एकदा सगळे मिळून ते कोण सरसकट चालक त्यांना सोबत घेऊन नागपुरात बसून ठरवा बुवा कि संकृती नक्की किती जुनी आहे आणि पुरावे पण लगेहात तयार करून ठेवा. मूर्खांच्या झुंडी बनवायला उपयोगी येतील.

बाकी सुज्ञ लोकांनी मात्र ह्या भामट्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका: https://www.deccanchronicle.com/lifestyle/viral-and-trending/151017/the-...

दिवाळीची दारू , युद्धातली दारू , बाटलीतली दारू
इथे सगळे कोकटेल बनले आहे

फॉरेन्सिक मेडिसिन उघडून फायर आर्म इंजुरी परत वाचावे लागेल

आज नरक चतुर्दशी आहे
सकाळी थोडे फटाके फुटले नाही तर आपला धर्म बुडेल
हो ऊ द्या आतिषबाजी Happy

आज लक्ष्मीपूजन आहे ना??
आमच्या इथे स्वस्त मिळतात ना फटाके(फटाक्यांचा स्त्रोत शिवकाशी जवळ असल्याने)... सकाळी 5.30 वाजल्यापासून सुरूच आहे.. मुलं आवाजाने घाबरून उठली.. तीन वर्षाची लेक अजूनही भेदरून बसली आहे..

https://thewire.in/history/how-the-mughals-celebrated-diwali

मोघल दरबारात दिवाळी जश्न ए चिराघन म्हणून साजरा करीत

Mughals continued celebrating Diwali with feasts and fireworks. It became a part of the cultural ethos that Mughals had developed in Hindustan. In fact, the Mughal successor states of the 18th century too continued parts of similar ideas they had built their empire on. Apart from the fireworks depicted in Mughal paintings, we hear of the akash diya (the lamp in the sky), which was lit on a high pole during the Jashn-e-Chiraghan (festival of lights).

सोमीवर फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली?
इथे दिवाळी, नाताळ, नववर्ष, लग्न असल्या कुठल्याही समारंभांंची गरज नसते. मनात येईल तेव्हा वायू, जल, ध्वनी प्रदूषण विरहित धमाके उडवता येतात.

हॅप्पी फटाकावली.

अरे तुम्ही सगळ्यांनी लहानपणी फटाके फोडलेत ना... मग आता पुढच्या पिढीला पण तो आनंद घेऊ द्या की...

+७८६

आणि मी आता असाच धागा काढायच्या विचारात होतो. बालपणीच्या फटाक्यांच्या आठवणींचा...
तेव्हा प्रदूषणाची पातळी वेगळी होती कबूल. पण आता फटाके लिमिटेडच वाजवायचे असल्यास मोठ्यांना बंदी घाला आणि लहानांना वाजवू द्या.

आताच हे माझ्या डोक्यात घोळत होते कारण मी स्वता शाळेत असतानाच फटाके वाजवायचे सोडले होते. पण मुलीला दरवर्षी चक्र पाऊस फुलबाजे आणून देतो. अपवाद यंदाचे वर्ष. पण आज तिला हिरमुसलेले बघून वाईट वाटत होते. कारण तिचे ईतर मित्र फटाके वाजवत होते.
कोरोनामुळे यावेळी आपण फटाके वाजवणार नाही हे तिने स्विकारलेले. पण ईतरांना वाजवताना बघून आपण का नाही हे तिच्या वयाला समजावणे अवघडच. आता भाऊबीजेला ती पुन्हा एवढेसे तोंड करून आली तर तिला चक्र पाऊस एकेक बॉक्स द्यायचा हे तुर्तास ठरवलेय.
जर ती भाउब्बीज सेलिब्रेशनमध्ये रमली आणि आठवणच नाही झाली तर चांगलेच. पण मोठ्यांना आजही अक्कल नाही आणि लहान मुलांचे मन मारायचे हे पटतही नाही.

नक्की द्या फटाके तिला... तो आनंद वेगळाच आहे... वायुप्रदूषण नको म्हणून मोठे टू व्हिलर किंवा फॉर व्हिलर चालवणे बंद करतात का? मुलांना एन्जॉय करू द्या फटाके...

लहान मुलांना मनाई करूच नये
या वयात ते उडवतात आणि नंतर बंद करतात आपणहून

आणि फटाके पूर्णपणे बंद करा असेही कोणी म्हणत नाहीये
अगदी अति करू नका, थोडी मर्यादा पाळा इतकी साधी अपेक्षा आहे

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2020 - 01:31

प्रदुषणाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी फटाक्यांमुळे होणारे अपघात, भाजणे वगैरे बाबी (काळजी घेऊनही हे अनेकदा घडतेच) पाहता लहान मुलांना यापासून दूर ठेवा. बाकी आधीच्या पिढीने वाजविले म्हणून पुढच्या पिढीने वाजवावे हा तर्क न पटणारा आहे.

आमच्या लहानपणी साधा फोनही आमच्या घरी नव्हती. नातवाकडे स्मार्ट फोन, आयपॅड आणि गेम कोन्सोल सुद्धा आहे. शिवाय त्याच्या बरोबरीच्या अनेकांकडे खेळण्यातली बीएमडब्लू कार, यामाहा / सुझूकी मोटरसायक्ली (१० ते २० हजार रुपयांच्या) अशा महागड्या वस्तू आहेत. माझ्या किंवा मुलाच्या लहानपणी यातले काय होते? अनेकांचे बालपण स्वतंत्र बंगला + अंगण बाजूला सार्वजनिक मैदाने आणि मोठी मोकळी जागा अशा वातावरणात गेले आहे. आता फ्लॅटमध्ये कुठे आले अंगण? कॉमन स्पेसमध्ये गाड्या पार्क केलेल्या असतात. मोकळी जागा फारच थोडी असते. फटाके वाजविताना ठिणग्या पेट्रोल पाईपवर उडाल्या तर काय अनर्थ होईल?

दसर्‍याला रावण जाळला जातो, पण घरोघरी प्रत्येक जण जाळतो का? त्याच धर्तीवर काही ठराविक नेते (मुख्यमंत्री + विरोधी पक्षनेते इत्यादी) व सेलिब्रिटींना (कलाकार + खेळाडू इत्यादी) एकत्र करुन एखाद्या मोठ्या मैदानावर एक फटाके फोडण्याचा मोठा तीनेक तासांचा इव्हे़ंट ठेवावा (आगीचा बंब व इतर सर्व काळजीचे आणि सुरक्षेचे उपाय योजून) आणि त्याचं लाईव्ह शुटींग टीवीवर दाखवावं. नंतर चारपास दिवस पुन्हा प्रसारण करावं. काही काही फटाके खूप महाग असतात अगदी लाख दीड लाख रुपयांचे देखील. प्रत्येकाला परवडणं अशक्य. टीव्हीवर जवळून पाहताना (साऊंड इफेक्ट चे स्पीकर असतील अजूनच उत्तम) फुकटात आनंद मिळेल. दर पंधरा मिनीटांत जाहिरात दाखवली तर अनेक प्रायोजक मिळतील. प्रदुषण अपघात खर्च सारंच टळेल.

भाजणे हे आधीच्या पिढीतही होत असावेच. आणि पोरांना फटाके वाजवायला देणे म्हणजे निष्काळजीपणा दाखवणे वा त्यांना फटाक्यांसोबत मोकाट सोडून देणे असे होत नाही. किंबहुना आधी हे व्हायचे पण हल्ली पालक मुलांसोबत जास्त राहतात. साहजिक जास्त काळजी घेतली जाते.

बाकी स्मार्ट फोन वगैरें हा मुद्दाच बाद आहे. कारण त्याच्या विळख्यातूनच तर आजच्या पिढीला बाहेर काढून ईतर मनोरंजनाचे प्रकार दाखवायचे आहेत.

सध्या वाढलेली लोकसंख्या आणि झालेली दाटीवाटी हा मुद्दा योग्य आहे. अपघाताचे प्रमाण यामुळे वाढू शकते. पण मोठ्यांच्या फटाक्यांवर बंदी आणि छोट्यांनाच परवानगी असे केले तर नक्कीच अपघाताचे प्रमाण फार घटेल.

साऊंड इफेक्ट चे स्पीकर असतील अजूनच उत्तम) फुकटात आनंद मिळेल

>>>

हा आनंद लहानपणी स्वत: फोडलेल्या फटाक्यांसमोर फारच कृत्रिम वाटत आहे.
सूचना उत्तम आहे पण कॉम्प्रोमाईजच वाटत आहे. वर मी मुद्दा लहान मुलांच्या आनंदाचा घेतला आहे त्या अनुषंगाने म्हणतोय

ओके
आज चकल्या करण्यात माझा जास्त वेळ गेला नाही तर एक धागा काढतो Happy

फटाके स्वतः फोडण्याचा आनंद असतो.. समोरच्याने शंभर सुतळी फोडले तर बघताना आनंद मिळत नाही, स्वतः एक लवंगी पेटवली तर जास्त आनंद मिळतो... त्या फटाक्याची वात स्वतः पटवणे हे महत्वाचे आहे..
त्यामुळे ते मैदानावर राजकारणी लोकांनी फटाके उडवून सर्वांनी बघणे यात शून्य मजा आहे...

आपण लहानपणी मजा करत होतो म्हणून ते योग्यच होते ह्या मानसिकतेतून आपण बाहेर येणारच नाही आहोत का? तसेच असेल तर मग खेड्यापाड्यात असंख्य लहान मुले पूर्वी कुत्र्याच्या शेपटाला फटाके बांधून ते जीवाच्या आकांताने केकाटत धावत सुटे त्याची मजा घेत. आता ती मुले बाप झाली आहेत. त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हि मजा घ्यायला सांगावे कि हे चुकीचे आहे म्हणून त्यांचे प्रबोधन करावे?

स्फोट घडवून आनंद मिळवणे हि विकृती आहे. याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. ज्याने कुणी प्रथमतः दिवाळीच्या पहाटे फटाके फोडून इतरांना त्रास देऊन विकृत आनंद मिळवण्याचा प्रघात पाडला, ती व्यक्ती एखाद्या मानसिक रोगाने बाधित असण्याची अधिक शक्यता आहे. त्याकाळात याबाबत तितकी जनजागृती नव्हती. ती गोष्ट तेंव्हाच्या लहान मुलांनी नकळतपणे परंपरा म्हणून स्वीकारली असेल. पण म्हणून काय ती सुरु ठेवावी का? कि फटाके फोडून धूर आणि आवाज करून आनंद मिळवणे अयोग्य आहे म्हणून मुलांना सांगणे योग्य राहील? दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. आवाजाचा आणि धुराचा नव्हे. काही विकृत लोकांमुळे त्याची स्फोटावली आणि धुरावली झाली आहे.

Pages