खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१ अमा.
ऋन्मेष, कसंतरीच वाटतय तो फोटो पहायला. मला पाहील्यावरती ताबडतोब डोके दुखल्यासारखे वाटले. Sad

ऋन्मेष नविन धाग्याचा विषय मिळाला.

डीपी कसा वाटतो? असा धागा काढ. त्यात डीपी बदलायचा असेल / नवा लावायचा असेल तेव्हा तिथे आधी फोटो देऊन मत विचारता येईल.

ओके बदलला फोटो
आणि स्त्री पुरुष समानता राखत बायकोलाही घेतले Happy

@ मानवमामा, हो तो डीपीचा धागा त्या दिवशीच नोट केलेला काढायचा. बरे झाले आठवण करून दिलीत Happy

आता आजच्या मेनूकडे वळूया Happy

पनीर टिक्का खतरी आहे...

हे अंड्याचे कालवण माझे ऑलटाईम फेव्हरेट.. गरमागरम भातवर तूफान लागते.. फोटो ईतर अंड्याच्या प्रकाराईतका आकर्षक येत नाही, पण चव भन्नाट, कारण कालवणात उतरते.

ऋन्मेष, तुमच्या अंडा बिर्याणीचे फक्त वर्णन ऐकले होते आज दर्शन पण मिळाले... एकदम चमचमीत,तोंपासु दिसतेय Happy

वा

दोन कोबीच्या आहेत..
एक मिरची घालून तर दुसरी मसाला घालून

अरे वा चकल्या
दिवाळीच्या तयारीला लागलात??

नारळाच्या वड्या मस्त दिसत आहेत.

IMG_20201108_170542.jpg

व्हेज मोमो
Veg_Momo.jpg

कस्टर्ड पासून जेली
Jelly-1.jpgJelly-2.jpg

जपानी डिश - by daughter
Japanese_Dish-1.jpgJapanese_Dish-2.jpg

मोमोज आणी कस्टर्ड मस्त. मला कधी पासुन बनवायचे आहेत मोमो पण मुहूर्तच लागत नाही आहे.
जेली अगर अगर घालुन बनवली का?
लेकिची जापनीस डिश पण मस्त.

जपानी डिश गोड आहे.. Happy
किती वर्षाची आहे मुलगी?

कुळीथाची पिठी, कोथिंबीर वडी, मेथीची भाजी आणि भात
>>>
हि तर कोकणची दावत.. गरमागरम पिठी भात नुसते भाजलेल्या पापड लोणच्यासोबतही खातच राहावे.. त्यात कोथिंबीर वडी असेल तोंडी लावायला तर काय बात !!

चकली बघून दिवाळी अगदीच तोंडावर आलीय हे जाणवतंय..
लोकहो,ज्यांना ज्यांना वडी आणि इडली आवडली असे कळवले त्यांना धन्यवाद..
असेच येऊन द्यात दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे करायला हुरूप येईल..

Pages