खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. धन्यवाद.
पीठ, थोडासा रवा, मीठ, हळद, ओवा, कसूरी मेथी, कुटलेले मिरे, तीळ. एकदम पातळ लाटून फोर्कने टोचून तळल्या. छान लागतात.

गुलाब चिरोटे काय मस्त दिसताहेत, मी पहिल्यांदाच पाहिला हा प्रकार. खाऊ नका ते, शो केस मध्ये ठेवा. Happy

धन्यवाद सगळ्यांना. रेसिपी रुचिरा पुस्तकातली आहे.
मानव शोकेस मध्ये बुरशी येईल थोडे दिवसांनी त्यामूळे खाल्लेलेच बरे.. Lol

सर्व पदार्थ सुरेख!
गुलाबाचे चिरोटे....असे चिरोटे आई बनवायची.फक्त रंग न घालता करायची. पांढरा गुलाब.
चिरोट्याची लाटी उभी न लाटता आडवी लाटायची की असे चिरोटे होतात.

चिरोटे मस्तच दिसतायेत
आमच्याकडे आज-उद्याचा घाट आहे Happy . साबा मस्त करतात . मी अजून learning licence वर

धन्यवाद सगळ्यांना, मनमुक्ता तयार चकली भाजणी आणून त्या पाकीटावर दिलेल्या सुचने नुसार पिठ भिजवले होते.

गुलाबाचे चिरोटे मस्तच दिसत आहेत.
मला केप्रची चकली भाजणी दिसली ती घेतली. खारट लागते आणि चकल्या मऊ पडल्यात. ओव्हनमधे थोडावेळ गरम करून कुरकुरीत होतील का बघेन.

Pages