खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिरोटे मस्तच...
कुझुमी काय काय आहे ताटात??

डीनर- मेथी ठेपले
IMG_20201111_212004.JPG

दिवाळी फराळ सगळ्यांचा सुंदर .
मेथीपुर्या मस्त कुरकुरित दिसतायत. दोघींचे चिरोटे गुलाब देखणे अगदी.
वृषाली , मी असं करते -- दही बऱ्यापैकी घट्ट घेऊन त्यात हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, धने पावडर, पनीर टिक्का मसाला ( मी इथल्या लोकल सरोवर कम्पनीचा वापरते) मिसळायचे, त्यात तुकडे घोळवून 10 मिनिटं ठेवायचे, मग मी कधी मावे ला ग्रील मोड ला लावते 10 + 10 मिनिटं बाजू पालटून किंवा सरळ नॉन स्टिक पॅन मध्ये थोड्या काही थेंब तेलावर परतून घेते. पण मला पॅन वर परतलेले आवडतात. कलर छान येतो.

गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या

20201111_185408_compress1.jpg

भारी..फराळ एकेक.. दिवाळी सुरू झाल्यासारखी वाटली
आमच्याकडे फायनली आज लाडवांना हात टाकला..
मला सुट्टी पडली की चकल्या पडायला सुरुवात होईल

काझुमी, काय मस्त ताट असतं तुमचं.
सगळ्याचेच पदार्थ खरे तर.
पण तुमचे काल का परवाचे ताट बघून खुपच खायची इच्छा झाली ..

धन्यवाद झंपी
मी अजूनही स्वयंपाक शिकत आहे मम्मीकडून
माशांचे कालवण, चिकन, इन शॉर्ट नॉनव्हेज जेवण नाही जमत मला.

1D384DB9-E4C3-4F37-9582-853D0EBAC6FE.jpeg

साधं जेवण - भरली भेंडी, बालुशाही, खमंग गाजराची कोशिंबीर, कोबीची भाजी, मोरंबा, घडीची पोळी, डाळ

मृणाली मेथी धपाटा आणी दही yumm combo .
Kazumi मिसळ मस्त दिसत आहे.
वर्णीता शंकरपाळ्या सुरेख झाल्यात.
म्हाळसा किती सुंदर ताट.

मृणाली मेथी धपाटा आणी दही yumm combo .
Kazumi मिसळ मस्त दिसत आहे.
म्हाळसा किती सुंदर ताट. >>> + 1
म्हाळसा >> कुरकुरीत किंवा कुटकुटीत होत नाहीत , ह्या खुसखुशीत होतात. छान लागतात. 1 वाटी दूध, 1 वाटी गूळ, पाऊण वाटी तूप ,त्यात बसेल तितकी कणिक. गोळा घट्ट नाही ,सैल नाही, मध्यम.
दुधाऐवजी पाणी घातलं आणि पातळ लाटून तळल्या तर त्या कापण्या . पण त्या मऊ नाही कुटकुटीत लागतात. कुडुम कुडुम.

धन्यवाद अमुपरी, वर्णिता

वर्णिता, मस्त शंकरपाळे..
कझुमी मिसळ लयभारी..
म्हाळसा ताट छान आहे..

कुळीथा चे पिठले आणी भाकरी मस्त मेन्यू.
मृणालिनी horse gram म्हणजे कुळीथ.
कुळथाची पिठी बाजारात मिळते विकत जसे बेसन मिळते.
नाहितर कुळीथ मंद आचेवर भाजायचे आणि मिक्सर ला बारिक पिठ करायचे.
आमच्या कडे हे पिठल लसुण ओली मिर्ची कांदा तेलात परतवून त्यात पाणी ओतायचे आणी म मिठ हळद घालायचे. पाण्याला उकळी आली की म त्यात पिठी घालायची किंवा पिठी पाणी पेस्ट करुन घालायचे. वरुन कोथिम्बीर घालायची आणि शिजवायचे.
बरोबर ना Mazeman.
समुद्र मेथी मी पण हे पहिल्यांदा एकले

धन्यवाद Mrunali, Amupuri, Sonalis, varnita
आमच्याकडे याला कुळीथाची पिठीच म्हणतात. मागे कधीतरी फोटो पण टाकलेला मी..
पिठी गरम गरम असेल तरच खायला मजा येते.

समुद्री मेथी कमी कडू असते ना?

सेम पिंच जाई. गरम भात आणि पिठलं असलं की बाकी काही नसेल तर चालतं.

मृणाली >>> समुद्री मेथी जनरली वाळूत लावतात. काही जण बारीक मेथीपण म्हणतात. गुगलवर पाहीलं तर मायक्रोग्रीन्स म्हणत होते पण नक्की माहीत नाही. उद्या बाजारात दिसली तर फोटो टाकेन. साधारण वितभर उंचीची रोपं असतात. मुळं खुडून टाकतात आणि बाकी सगळी भाजी वापरतात. आम्ही कांदा, मिरची, हळदीच्या फोडणीवर करतो. कधीतरी भिजवलेली मुगडाळ टाकतो. आणि शेवटी ओलं खोबरं.

कुळीथ म्हणजे हॉर्स ग्राम. ते भाजून, भरडून त्याचं पीठ करतात. पूर्वी आज्जी घरीच जात्यावर करायची. आता कोकणात, मुंबईत विकत मिळते.

आमच्याकडे पिठलं लाल तिखटाचं करतात ते असं:
एका खोलगट तव्यात तेलावर लसूण मस्त लाल करायची. थोडं जिरंही परतायचं. त्यातच कांदाही भाजून घ्यायचा. त्यात १-२ फुलपात्रं पाणी ओतून उकळू द्यायचं. पाणी उकळलं की हळद, तिखट, मीठ आणि कोकम घालून परत उकळी आणायची. आता त्यात कुळथाचं पीठ घालायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. ३-४ मिनीटं परतून दणदणीत वाफ येऊ दिली की पिठलं तयार. भाकरीशी खायचं असेल तर थोडं घट्ट होऊ द्यावं. शेवटी ओलं खोबरं ऐच्छिक आहे.

अमुपरी म्हणतात तसं ओली मिरची घालूनही पिठलं करतात. बाय द वे, अमुपरी तुमच्या छप्पन भोगची थाळी पाहूनच जीव दडपला. एवढे पदार्थ मी एका आठवड्यात पण करणार नाही.

Mazeman, जाई, सेम पिंच. आज आमच्याकडे पण पिठलं भात, पण बेसनचं, मिरची ठेचा घालून .

Mazeman Happy
काय tempting चीज़ बॉलस आहेत.
गरमा गरम तुप चकोल्या .
20201113_142958.jpg

मंजुताई मला पण बोलवा न जेवायला.. कारलं मला आवडतं आणि भाकरी ऑटाफे Happy

अमुपरी चकोल्या पण मस्तच...

Pages