खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे पदार्थ एकदम भारीच दिसतायत.. बुधवार सार्थकी लागला.. खाऊगल्लीत आल्यासारखे वाटले.. >>>>> +१०००

Lovely आकाशी रंगाचा गुलाबजाम केक सही दिसतोय माऊमैया...>>>>+१.
बाकी भेळ,आप्पे,थालीपीठ्,केक पाहून तोंपासु!

साधी सुकी भाजी आहे गं..
फोडणीत मोहरी,चणा डाळ,दोन हिरव्या मिरच्या, हळद आणि मिरची पावडर,मीठ, दुधी, एक टोमॅटो टाकून शिजवले पाणी न घालता.
कोल्हापूरी तिखट टाकले थोडे यावेळी(आईकडून आणलेले)
नेहमी करते तेव्हा फक्त मिरची पावडर टाकते,असाच रंग येतो.

हो तोच.. मला आवडतो.. बीटा केराटिन असतंय त्यामध्ये.त्वचेसाठी आणि डोळयांसाठी खूप फायदेशीर..

Kazumi,mrunali.samad पदार्थ छान आहेत
आम्ही भोपळ्याचे घारगे बनवतो

@लावण्या व अनामिका, यम यम!!! मी आत्ता पातेल्यात बशी उपडी टाकून निवांतपणे दूध आटवतेय. बशी असली की पहावं लागत नाही. चांदीच्या वाटीत छानच. किती सुंदर आहे चांदीचे ते लहान पात्रं. रांगोळी सुरेख.
___________
वर्क इन प्रोग्रेस-
https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3cGW89dESXY2_pxkW4uCWzuuxPmZEAP7u17KKO2aMXTfmdEs83l81yDu8sCO4NKHNFgGaXuswggd3QWY2TsX3xizrh-VJQjLlXB8GP1nOCmApTBCTCUHyS3S-7jp_q1xLMOSEaL_EBjVVUOi5_zDhlcqw=w1099-h824-no?authuser=0

मी आत्ता पातेल्यात बशी उपडी टाकून निवांतपणे दूध आटवतेय. बशी असली की पहावं लागत नाही.
अशी बशी किंवा पातेल्यात ठेवलेला भाजीचा चमचा, ग्लास रॉड हे अँटिबंपिंग एजंट म्हणुन काम करतात. म्हणजे पातेल्यातल्या पदार्थाला उकळी तर येईल पण ये उतु जाणार नाही.

मसाला दूध मस्तच....

आणि बशी उपडी टाकण्याची आयडीआ माहीत नव्हती. चमचा उभा ठेवायचे. पण नंतर तोच गरम होऊन मला चटके बसायचे. पुढच्या वेळेपासून बशीच ठेवणार.

IMG_20201031_105223.JPG
उपमा डोसा-आजचा नाष्टा

कालचा रेड सॉस पास्ता
IMG_20201031_110019_0.JPG

Pages