खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास फोटो!
मंजूताई,हा चिवडा तुम्ही आधी का नाही केला? मला ह्या चिवड्याची कृती द्या.पोहे तळले ना? मीही आज तळणीचा चिवडा केला आहे.

नाही गं तळलेला नाही. डायट/प्रवासी पोहे आहेत त्यात मक्याचे पोहे टाकलेत तळून...
मी पण बासुंंदी केली उद्या साठी

मंजूताई जेवणाचे ताट बघुन भुक लागली. फराळ पण मस्त.
किल्ली कोणता पदार्थ आहे. ग्लेझिंग मस्त आलेय साखरेच्या पाकचे.
बासुंदी yummy ..
करंज्या
20201113_201144.jpg

पुढील काही दिवस मधुमेहाच्या होण्याच्या भितीने मी या धाग्यावर येणार नाही. संबंधितांनी नोंद घ्यावी

नाही किल्ली चिरोटे वेगवेगळ्या प्रकाराने करतात.
त्यामुळे तुमचे चिरोटे च असतिल. मला फक्त ते गुलाबा सारखे माहिती आहेत.

दिवाळीत पेटलाय हा धागा...
आज आमच्याकडे करंज्या नाही केल्या तर तडफडून जीव जाईल माझा..

हो amupuri

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा
tenor (1).gif

आमच्याकडे ५ प्रकारचे पोहे करतातआणि त्याचा नैवैध दाखवतात.कांद्याविना तिखट पोहे,गूळ्पोहे,रसातील पोहे,दहीपोहे,दूधपोहे.कालौघात दोनच प्रकारचे पोहे करायला लागले.तिखट आणि गूळपोहे .

mrunali डिशची मस्त डिझाईन आहे आणि पोहेपण

मी टेस्टींगच्या नावाखाली बराच फराळ आधीच पोटात ढकलल्याने आता बस अशी अवस्था आहे

आमच्याकडे दरवर्षी दिवाळीला गोडे पोहे करतात
पण मला आवडत नसल्याने माझ्यासाठी वेगळे कांदेपोहे Wink

f66302c68f558c1edf0dd5be95be2026 (1).gif

अगदी उचलून खायची इच्छा होईल अस ताट सजवलं आहे

0B248EBA-1E3D-410B-B070-097E84309418.jpeg
तिखट कोळंबी रस्सा आणि सुरमई फ्राय.. माझ्यासारख्या तर्रीबाज व्यक्तीला ऐनदिवाळीत सासूकडून मिळालेली एक तिखट भेट.. पण सुरमई बरोबर सुक्क्या जवळ्याची चटणी आणि ओला बोंबील असता तर तोंडाला अजून चव आली असती Happy

समुद्र मेथी म्हणजे वाळूतली मेथी , मुंबईत सर्वत्र मिळते

मेथीचे बी वाळूत पेरतात , थोडेसे मोठे रोप आले 2,4 च पाने आली की खुडून पेंडी करतात , 10 रु ला 5 वगैरे पेंढ्या मिळतात

आणून आधी बादलीभर पाण्यात खळबळ करायची , पेंढ्या वर रहातात व खाली वाळू बसते , वाळू नाही काढली तर भाजीत भरपूर वाळू येते , Sad माझा पहिला प्रयोग जास्त न धुतल्याने असा झाला होता
मग मूळ कापून टाकणे
आणि पांढरे डेठ व हिरवी पाने ह्यांची भाजी करणे

ह्याला बारीक मेथीपण म्हणतात . कडवटपणा भरपूर असतो , मोठ्या मेथीपेक्षा जास्त असतो, पण त्या कडू चविसाठीच पौष्टिक म्हणून खातात

images.jpg

Pages