दिवाळीला फटाके उडवण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली?

Submitted by आशुचँप on 7 November, 2020 - 11:35

दिवाळी ला फटाके फोडण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली
याचे काही संदर्भ आहेत का?
शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे, तोटे वगैरे चे उल्लेख आहेत, पण दिवाळी ला नाही
नंतरही पेशवाई काळातही दिवाळी फटाके उडवून साजरी केल्याचं काही आढळत नाही
बहुतांश ठिकाणी दसऱ्याला रावणाच्या पोटात फटाक्याची दारू भरून तो पेटवल्याचे आढळते.
आतिषबाजी प्रामुख्याने लग्नाच्या वरातीत दिसून येत असे

पण लक्ष्मीपूजनाला लवंगीची माळ लावणे किंवा नरक चतुर्दशीला भल्या पहाटे आसमंत दाणाणून सोडणे याची सुरुवात केव्हापासून झाली?

आणि या सगळ्याचा संबध आपल्या थोर हिंदु संस्कृतीशी कधी जोडला गेला. आता म्हणजे दिवाळी फटाकेमुक्त करा म्हणणारे थेट हिंदुद्वेषी च्या गटात गणले जातात आणि लगेच मोहरम, इदची कुर्बानी, ख्रिसमस चे दाखले दिले जातात. या सगळ्यांनीच कृपया मला सांगावे आपली संस्कृती समजावून. तसे काही उल्लेख असतील तर तेही सांगावेत.

मी बरेच शोधले. त्यात दोन संदर्भ कळले एक म्हणजे १९४० च्या सुमारास शिवकाशी ला दिवाळी दरम्यान आतिशबाजी चे कार्यक्रम होत असत आणि वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जात. हळूहळू ते तुफान लोकप्रिय होत गेलं आणि लोकांनी तिथून फटाके विकत घ्यायला सुरुवात केली. बघता बघता शिवकाशी हे फटाक्यांचे मुख्य केंद्र बनले आणि आजही आहे बहुदा.

दुसरा संदर्भ चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची मारामारी होत असे. त्यात नारळात, पोफळीत शोभेची दारू भरवून विरुद्ध गावच्या लोकांवर मारली जात. तालमीतले जवान, म्हातारे कोतारे यात उत्साहाने भाग घेत आणि ही लुटुपुटुची मारामारी बघायला गावागावहून लोक येत असत. अनेक जखमी होत पण कुणी माघार घेत नसे. शेवटी १९४२ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने ही प्रथा बंद पाडली. नंतर स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा चालू केली पण पूर्वीइतका जोम नसल्याने आपोआपच अस्तंगत झाली.

हे दोन्ही संदर्भ १९४० नंतरचे आहेत. त्याआधीचे कोणाकडे असतील तर कृपया सांगावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवर अरे तुला आणि तुझ्या कीबोर्ड ला
टीआरपी चा घाव अंमळ जास्तच खोलवर बसला आहे असं दिसतंय Happy

मराठी साईटवर कशाला वापरायलाच पाहिजे इंग्रजी? इंग्रजी सगळ्यांना पूर्ण येत नाही. कामाच्या ठिकाणी वापरावी लागतेच हे सरळ ठोकुन देत आहात. आम्ही कामाच्या ठिकाणी हिंदी जास्त वापरतो, काही लोकांना इंग्रजी अजिबात समजत नाही. मला स्वत:ला इंग्रजी फार कमी येते.
इथे कुणी इंग्रजी पोस्ट लिहिली अथवा लिंक दिली तर कित्येकदा मला ती पूर्ण समजत नाही तेव्हा मी गुगल ट्रान्स्लेशन वापरतो.
तेव्हा स्वत:हूनच अमुक भाषा चालते अमुक भाषा बोललीच पाहिजे वगैरे ठरवून, वरुन स्वत: तेलुगु की कानडीत लिहुन दुस~यांना Anti Marathi ठरवत आहात, मी इंग्रजी साठी गुगल भाषांतराचा वापर करतो, तसा माझ्या त्या हिंदी फॉरवर्ड्साठी गरज असल्यास तो करावा असा सुचवले असता त्याला उद्धटपणा म्हणत आहात. सगळं तुम्हीच ठरवत आहात. मागे सुद्धा स्वत:च ठरवून hypocrite का काय म्हणाला होतात.
आता तुम्हालाच सगळं काय ते ठरवून लोकांना लेबलं लावत बसायची असेल तर लावत बसा बुवा.

ठीक आहे मानव. I didnt mean it to be personal. I was talking about MR, not against you personally.
How about using only MR on MR website? will that solve all problems and conflicts you listed above? Shall we do that? do you agree?

हा घ्या ताजमहाल.. आता लक्ष्मीबाॅम्ब येऊद्यात Happy
आम्ही अधूनमधून लवंगी फेकत जातो

टीआरपी चा घाव अंमळ जास्तच खोलवर बसला आहे असं दिसतंय Happy
>>>

छे हो.. जे सर्वांना ठाऊक आहे तेच तुम्ही ओरडून सांगता. टीआरपी धागे हि कुठल्याही संकेतस्थळाची गरज आहे. ज्याला तुम्ही आरोप म्हणता ते मी कौतुकाने मिरवतो Happy

अभि_नव तुम्ही आणि मी कोण आहोत ठरवणारे?
ते मायबाप ऍडमिन आणि वेमा आहेत ना. त्यांना सांगा.
मला काहीच प्रॉब्लेम नाही इथे इंग्रजी, कानडी, तेलुगू, जपानी, हिंदी वापरायला. मी कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही.

फक्त स्वतःच अमुक भाषा चालते तमुक म्हणजे अँटी मराठी, तमुक उद्धट हे ठरवणं टाळता आलं तर पहा, सूचना आहे, आग्रह नाही.

लिखाण कुठल्या भाषेत करता?
मेल वगैरे... इंग्रजीत. पण काही निबंध वगैरे लिहायचे नसतात, बहुतेक टेक्निकल असते. तेवढी येते इंग्रजी.
सेल्स संबंधित काही खास वाक्ये अस्खलित इंग्रजी येणाऱ्यांकडून तयार करून ठेवलीत ती वापरतो.

अभि_नव तुम्ही आणि मी कोण आहोत ठरवणारे?
>>
वाचक. readers. customers. consumers. etc.

मला काहीच प्रॉब्लेम नाही इथे इंग्रजी, कानडी, तेलुगू, जपानी, हिंदी वापरायला. मी कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही.
>>
छान. धन्यवाद.

फक्त स्वतःच अमुक भाषा चालते तमुक म्हणजे अँटी मराठी, तमुक उद्धट हे ठरवणं टाळता आलं तर पहा, सूचना आहे, आग्रह नाही.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 9 November, 2020 - 19:51
>>
नक्कीच. या पुढे बदल करतो. तुम्हीही सामान्य मराट्।ई वाचकाला न समजणारी हिंदी भाषा मराठी माध्यमावर टाळाल अशी आशा करतो.

मी मराठीच वापरतो. कधी केव्हातरी अशी एखादी फॉरवर्ड, अथवा विनोद वगैरे हिंदी अथवा इंग्रजी असतात, कधी किंचित संस्कृत लिहितो. तेवढे चालायचंच.
तुम्हीही इंग्रजी वापरायला माझी हरकत नाही.

छे हो.. जे सर्वांना ठाऊक आहे तेच तुम्ही ओरडून सांगता. टीआरपी धागे हि कुठल्याही संकेतस्थळाची गरज आहे. ज्याला तुम्ही आरोप म्हणता ते मी कौतुकाने मिरवतो>>>>>>

बघ लोकांना उगाच वाटतं मी तुझ्यावर आरोप किंवा टीका करतो म्हणून
तुझं कौतुकच करतो म्हणजे मी दर वेळी
तरी मला तुझ्याकडे दुर्लक्ष कर म्हणून सांगतात
म्हणलं आजारी माणसांना आधार द्यावा म्हणतात

वाढत्या प्रदुषणामुळे करोना वाढण्याचा धोका असून, त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. राज्यातही सरकारनं सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मज्जाव करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, पुणे व ठाणे या दोन शहरांमध्येच पर्यावरणस्नेही ( Green crackers) फटाके फोडण्यास आजच्या आदेशाने परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बघ लोकांना उगाच वाटतं मी तुझ्यावर आरोप किंवा टीका करतो म्हणून
>>>>

लोकांना काय वाटते याची मी आयुष्यात परवा तेरवा केली नाही..
तु
म्हीही
करू नका

to make a point
> कोणता

जिलब्या चांगल्या की गुलाबजाम?

वाढत्या प्रदुषणामुळे करोना वाढण्याचा धोका असून,
>>>
दिवळीलांच बरे हे आठवले
तरी बर्र् दरवर्षी कोरोना नसतो

जिलब्या चांगल्या की गुलाबजाम?
नवीन Submitted by रॉनी on 9 November, 2020 - 21:04
>>
नाही, आपल्या कडे चांगल्या दर्जची ताजी जिलेबी व गुलाबजाम असताना, लोकांना काय हौस असते परकी "चिंधी" मिठाई खाण्याची, हा पॉईंट.

वर्ष २०३०:

(लवंगी माळ पेटवत) दिवाळीतच ... खॉक खॉक ssss खॉक.... बरं .... ख्याक ख्याक खॉक खॉक.... बरं खॉक sss ख्याकखोख्याखोखुख्याक sss सुचतंय.

तेवढी येते इंग्रजी.
सेल्स संबंधित काही खास वाक्ये अस्खलित इंग्रजी येणाऱ्यांकडून तयार करून ठेवलीत ती वापरतो.
>>>>

पण मेल हिंदी मराठीत का लिहित नाही?
ज्याला मेल लिहायचाय त्याला आपली भाषा येत असेल तरी ती परकीय भाषा का वापरावी..
ऑफिशिअल मेल ईण्ग्रजीतच हवा हि भानगड काढलीच कोणी हे समजत नाही..
आणि जरी असेल एखादा परदेशी व्यक्ती त्या मेलमध्ये तर त्याने शिकावी आपली भाषा.. आपण शिकलोच ना त्यांची

Pages