अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पित्रं आहेत बहुतेक.. आजच एका मैत्रिणीने भरलेल्या पानाचा फोटो पाठवून पित्रं असल्याचे सांगितले म्हणून कळलं.
Happy

ही सत्यघटना फार वर्षांपूर्वी आमच्या गावी घडली होती. त्यावेळी गावात लाईट आली न्हवती त्यामुळे लोकं सात वाजताच जेवण वैगरे आटपून 8 पर्यंत झोपी जात. 9 नंतर गावात सगळी सामसूम होत असे. तेव्हा अमावस्या पौर्णिमेला गावातून एक हडळ फिरायची. मध्यरात्री तिच्या चालण्याचा आवाज लोकांच्या कानी पडायचा. तिच्या हातात काठी असायची. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिची किंचाळी कुठलातरी एकाच गावकऱ्याला ऐकू यायची. ज्याला ती किंचाळी ऐकू यायची त्याचा बरोबर 12व्या दिवशी मृत्यू व्हायचा. एकदा धाडस करून काही गावकऱ्यांनी पाळत ठेवायचं ठरवलं पण कोणालाही काही दिसलं नाही. परंतु जे घरी होते त्यांना त्या हडळीच्या चालण्याचा आवाज ऐकू येत होता. नंतर गावात एकाच्या सांगण्यावरून रात्री मंतरलेले लिंबू त्या हडळीच्या वाटेवर ठेवले. सकाळी बघितलं तर सगळे लिंबू काळे पडले होते. नन्तर गावात लाईट आल्यावर कधीतरी हा प्रकार बंद झाला.

बाप रे भयानक!
गावात एडिसनचा पुतळा बसवायला पाहिजे.

ऐकणाऱ्याला बारोना व्हायचा. बारोना असा रोग ज्यामध्ये रुग्णाचा मृत्यू बाराव्या दिवशी होतो. हि हडळ बारोनाचा विषाणू घेऊन येत होती, कि जो विषाणू तिच्या आवाजामार्फत ऐकणाऱ्याच्या कानात जायचा. गावात वेळीच रात्रीचा हडळॉकडाऊन केला असता तर हि माणसे वाचली असती.

ती हडळ बहुतेक तुमची पुर्वजन्मीची प्रेयसी असेल, (बायको असती तर अजिबात आठवण अली नसती )

मी दुःखात असलो की मला त्या हडळीची खूप आठवण येते > ५ मार्कांसाठी संदर्भासहित स्पष्टीकरण द्याच आता

आमच्या गावी ईर फिरतो रात्रीचा असे बोलतात, मला वाटते मी हे ईकडे आधीही लिहीले आहे.
घोंगडे पांघरलेले असते एका हातात घुंगुरवाली काठी अन दुसर्या हातात लाटण (म्हणजे दिवा) असते. कुणाला जर दिसला तर तंबाखु मागतो.
त्याला तंबाखु दिला अन तो सांगेल तसे केले तर त्रास देत नाही अन्यथा तो माणुस मरतो असे म्हणतात.
तसेच रात्रीचे त्याच्या जागेजवळुन जाताना त्याला नमस्कार केला नाही तर चकवा लागतो अन तो वाटेत भेटतो मग त्याच्या बरोबर बसुन त्याला तंबाखु दिल्याशिवाय सुटका नाही असे म्हणतात.
माझ्या आजोबांना आला होता म्हणे त्यांचा अनुभव. माझ्या पप्पांच्या गावावरुन आजोळी जाताना वाटेत काजुबागेतुन शॉर्टकट आहे तेव्हा अगदी त्या वाटेच्या सुरुवातीला त्यांचे मंदीर आहे. दर शुक्रवारी पुजा पण होते, झोटींग बाबा मंदीर म्हणतात त्याला, ते गावचे राखणदार आहेत असेही गावकरी म्हणतात दरवर्षी डिसेंबर मध्ये मोठी यात्रा होते झोटींग बाबाची. प्रत्येक कुटुंब बकरा किंवा कोंबड देतो त्याला.

हाडळीच्या आशिक ला खूपच हसू आलं,,,हे त्याचं हडळींचे आशिक की काय
हडळ एक आठवण काढणारे 2 Lol (हलके घ्या दोघेपण)

आमच्या गावाबाहेर एक वडाचं झाड होतं. म्हणजे अजूनही आहे. त्या वडावर एक मुंजा आहे अशी गावतल्या लोकांची समजूत होती. रात्री बारा नंतर गावात येणाऱ्या लोकांना मुंजा त्रास देतो, मारतो असं सगळे लोक्स बोलायचे. त्यामुळे रात्र झाली की त्या झाडाकडे कोणी फिरकत नसे. आमच्या गावात एक धाडसी मुलगा राहत होता त्याचा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास न्हवता. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी तो रात्री कोणालाही न सांगता त्या झाडाकडे गेला. जवळ जाऊन झाडाभोवती पाच सहा फेऱ्या मारल्या. कोणीही न्हवतं. तो मोबाईल मध्ये विडिओ शूटिंग पण करत होता. सातवी फेरी मारणार इतक्यात खरोखरच वडावरच्या मुंजाने त्याच्यासमोर उडी मारली. मुंजाला बघून याची बोबडीच वळली. तो पळायला बघणार होता पण पायातलं त्राण निघून गेलं होतं. मुंजा जिवंत असताना बायकोने वडाला सात फेऱ्या न मारल्यामुळे तो मुंजा बनला होता. हा कालचा पोरगा आपली चेष्टा करायला इकडे आलाय असा मुंजाचा गैरसमज झाला आणि मुंजाने त्याला खूपच बदडून काढला. बदडत बदडत त्याला परत सहा उलट्या फेऱ्या मारायला लावल्या. आता त्या धाडसी मुलाचं लग्न झालंय. पण तो बायकोला वटपौर्णिमेला कधीच त्या झाडाजवळ पाठवत नाही. घरीच फांदी आणून देतो.

मुंजा जिवंत असताना बायकोने वडाला सात फेऱ्या न मारल्यामुळे तो मुंजा बनला होता >> अहो बिनलग्नाचा जो मरतो तोच मुंजा बनू शकतो. शास्त्र असतंय शेवटी ते. अब्यास वाढवा थोडा. बाकी तुम्हीच तर नाय ना त्याचे टोले खाल्ले ? Lol

Pages