असंबद्ध गप्पा

Submitted by विस्मया on 2 November, 2009 - 23:25

कित्येकदा आपल्याला असंबद्ध बोलणारे लोक भेटतात आणि मग वैताग येतो. पण असे असंबद्ध बोलणे किती अवघड आहे याची कल्पना नाही येणार. ठरवून असे असंबद्ध होण्यासाठी एक खेळ खेळूयात. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाला भलतेच उत्तर द्यायचे आणि पुढच्यासाठी एक वेगळा प्रश्न सोडून द्यायचा.

उदा.
काय सरकार स्थापन होतंय कि नाही ?
- छे हो, काल सचिनला बाद दिले गेले नसते तर मग जमलं होतं..
मॅच पाहिली ना शेवटपर्यंत ?

बघा ना, शेवटपर्यंत मराठीचा मुद्दा कुणी घेईल याचा भरवसा राहिलेला नाही.
तुम्हाला काय वाटतं ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण कोण जागे आहेत ?
चला या चहा घ्यायला...
50535472508_8857df23e7_b.jpg

रात्रभर जागून लिहीलाय हा भाग. आता चालले झोपायला.

वा वा वा!! मोगँबो खुश हुआ.
रा.भू तू कोरी पोस्ट कशी टाकतेस ते लवकर सांग नाहीतर मी मुक्ताबाईसारखी "रा.भू पासष्टी" लिहायला घेणार आहे.

अस्मिता. , त्यांच्या हॅशटॅग मधे एक शब्द लिहायचा राहिलाय..

#हळवाची संसार..... दुसऱ्यांचा

आणि अजून एक हॅशटॅग त्यांनी मांत्रिकी व्यवसायाचे गुपित म्हणून दिला नाहीये..

#हळवे करुन सोडावे... इतर जन

Biggrin

छोले का
पुरी काय
कोशिंबीर काय
आमरस काय >>>>>> नमी नमी
किमी किमी

खास चहासाठी शुक्रिया.

#हळवाची संसार..... दुसऱ्यांचा Biggrin असं लिहायची गरज नाही. हळवाची संसार ही अ.ग. वरची एक स्टार्ट-अप आहे. आता स्टार्ट-अप म्हणजे बघा उबरचा सीइओ कुठे जायला उबर बोलवत नाही. तो त्याची त्याची गाडी घेऊनच जातो. तेव्हा स्टार्ट-अपच्या सर्व्हीसेस आपण वापरायच्या नसतात.
(हां, आता अ.ग. वरच्या स्टार्ट-अप डुबवायच्याच असतात. म्हणून यथावकाश 'दुसर्‍यांचा' अ‍ॅड करूया)

ये सर्किट, बोल्ले तो #हळवाची संसार क्या है बोल्ले तो? भोत सुनेरैला हू इसके बारे में. ये लडकी लोग इधर क्या बोल रैले आपुन को समज मैइच नई आ रैलाय बाप. आपुन इनके पोष्टि पढ़कर येडे जैसा देखते रैता ए.

जमलं की मला कोरी पोस्ट टाकायला.
कोऱ्या प्रतिसादात फक्त I किंव B वर क्लिक करून सेंड करा.

I

गबिएपु तर पोलीस निघाले. लगेचच मोडस ऑपेरेंडी शोधून काढली. Lol
आता मोगँबो ताई माझ्या पासष्टीचं गुपीत फोडणार नाही. Proud
मी सर्वांना विनंती करते की मी पासष्ट वर्षांची हडळ आहे हे गुपीत (जे तुम्हालाही माहीत नाही) ते गुपीतच राहू द्या. Wink

कसली भारी चुडैल आहे. Lol
कुणाची बायको झाली तर रोज जादू बघायला मिळेल त्याला Lol

आयएएस चा प्रश्न :
चुडैल आणि डायन यात काय फरक असतो ?

चुडैल कडे पण जादू असते आणि तिचे पाय नसून पंजे असतात.
पण डायनची जादू वेणीत असते आणि तीचे पाय उलटे असतात.
दोघी सुंदर असतात.
मला एवढंच माहिती आहे Lol