सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुशांतच्या मृत्युमुळे महामहीम अचानक ड्रग रॅकेट खणून काढणार आहेत हे वाचून हसून हसून पुरेवाट झाली. असं काम करतं का सरकार? मला वाटलं वर्षाचं नाहीतरी एका टर्मचं तरी प्लॅनबिन बनवत असतील. ड्रग रॅकेट खणायचंच होतं तर सुशांत जाईपर्यंत विसरले होते का? अचानक आठवण आली, अरे हो, हे तर करायचंच राहिलं मागचे सहा वर्ष. चला आता करून टाकू.
जोकच मारतात अन लोकही खरं समजतात असले बालिश प्रकार.

आता पर्यंत पटत नव्हत पण आता खात्री होत चालली आहे.
देशाचे लक्ष दुसऱ्या फालतू गोष्टी मध्ये वळवून महत्वाच्या विषय bjp झाकत आहे.
निवडणुकी वेळीच सीआरपीएफ वर हल्ला.
नोट बंदी आडून आर्थिक गैर व्यवहार.
चीन चा विषय विनाकारण highlite करून आणि सुशांत केस मध्ये न्यूज वाल्यांना 24 तास तेच दाखवायचे कॉन्ट्रॅक्ट देवून .
लाखो लोकांच्या गेलेल्या नोकऱ्या,बेरोजगारी,अर्थ व्यवस्थेची लागलेली वाट हे मुद्धे चर्चेत येवून च दिले जात नाहीत.
आता जनतेला सावध होणे गरजेचे आहे .
नाहीतर कधी लोकशाही जावून अध्यक्षीय पद्धत येईल हे माहीत पण पडणार नाही.

सनव, देव न मानणारे लोक आहेत, त्याने देव मानणाऱ्यांचे चारित्र्यहनन होते का?
आणि देव मानल्यामुळे न मानणाऱ्यांचे चारित्र्यहनन होते का?

चारित्र्यहनन म्हणजे अशा मानणाऱ्यांपैकी एकेकाला टारगेट करून त्याच्या वैयक्तिक बाबीत, कृतीत लक्ष घालून उखाळ्या-पाखळ्या काढणे, विपर्यास करणे, पातळी सोडणे इत्यादि.

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 September, 2020 -

भारतात किंवा अमेरिकेत असाल, हिंदू किंवा ख्रिश्चन असाल, देव मानत नसाल तर ठीक. विशिष्ट समुदायात देव मानत नाही वगैरे बोलल्यास थेट वरचं तिकीट काढून दिलं जातं. ते एक असो.

माझा मुद्दा इतकाच की आर्मस्ट्राँगसारखा उच्च शिक्षित माणूस सांगतोय की होय मी चंद्रावर जाऊन आलोय. अशावेळी तो खोटं बोलतोय असा दावा करणं हे त्याचं चारित्र्यहनन होत नाही का?

ख्रिश्चन असाल, देव मानत नसाल तर ठीक. विशिष्ट समुदायात देव मानत नाही वगैरे बोलल्यास थेट वरचं तिकीट काढून दिलं जातं. ते एक असो. >>>>>>>>>>
ते तर नेहमीचेच आहे !

सतत ख्रिश्चन , मुस्लिम लोकांची बाजू घेवून हिंदू ना झोडपत राहायचे या एक कलमी आवडत्या कार्यक्रम मुळे भारतातील कम्युनिस्स्टे इश निंदा केसेस कडे दुर्लक्ष करतात !
हिंदू धर्मावर टीका करताना त्यांची जीभ खूपच सैल असते आणि खास करून मुस्लिम बद्दल बोलताना त्यांची अवस्था मात्र जीभा छाटल्या सारखी होते !

Manav,
कुठल्याही गोष्टीचा पुरावा मागितल्याने, किंवा शंका व्यक्त करण्याने थेट चारित्र्यहनन हे माहीत नाही का तुम्हाला?

प्रोफाइल मधली माहिती फेस value वर स्वीकारतो असे सांगितल्याने झालेल्या अलिज्ड चारित्र्यहननाचा डेमो पहिला नाहीका तुम्ही

वर बोकलत यांनी लिहिलेले वाक्य म्हणजे नील आर्मस्ट्राँग चे चारित्र्यहनन आहे का? काहीही !
चारित्र्यहनन म्हणजे काय हे न समजण्याइतक्या तुम्ही टोन डीफ आहात असे वाटत नाही.
विषय कोणताही असो, आपल्या आवडत्या "हिंदु मुस्लीम" विषयकडे नेण्याच्या तुमच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करूयात.
( वरून तसे विषयांतर करायचे आदेश आहेत का? )
आमच्या मिरजेत "सातव्या पंचवार्षिक योजनेत संकरीत ज्वारीचे स्थान" या व्याख्यानादरम्यान एक दहाएक वर्षाचा चुणचुणीत मुलगा अचानक उभा राहिला व "मंदीर वही बनायेंगे" अशा घोषणा देऊ लागला त्याची आठवण झाली.

कोणत्याही पत्रकार, राजकीय विश्लेषक इ चे सगळेच्या सगळे मुद्दे बरोबर असतीलच असं नाही, किंबहुना नसतातच आणि खरं तर तशी अपेक्षा ठेवणं पण योग्य नाही. आपण आपल्याला पटतील ते मुद्दे ऐकावेत बाकीचे द्यावे सोडून.

तसंही पत्रकार, राजकीय विश्लेषक, चॅनेल्स वगैरे ऐकताना / बघताना आपली स्वतःची जी काही राजकीय मतं असतील त्यांना सोईची होतील अशीच मतं जास्तकरून ऐकली / बघितली जातात. मात्र त्याविरुद्ध मतं देखिल जरूर ऐकावीत कारण त्यातून दुसरी बाजू कळते आणि विचारात निदान थोडातरी समतोल साधता येतो.

जेव्हा आपल्या मतांच्या विरोधात मत मांडणारे सगळे अगदी १००% प्रचंड विनोदी, मूर्ख, आक्रस्ताळे, खोटारडे आहेत असं वाटू लागतं तेव्हा तुमची मतं जहाल, कडवी झाली आहेत असा त्याचा अर्थ होतो. हे दोन्ही बाजूंच्या भक्तांना लागू आहे.

@ मामी ,
स्त्री भ्रूण हत्या व बलात्कार चुकिचे आहेत व ते करणारे क्रूर, आक्रस्ताळे व निंदनिय आहेत हे माझे विचार आहेत.
या दोन्हीचे समर्थन कुणी करत असेल तर मी त्यांचीही मते जरून ऐकावीत व ऐकली नाहीत तर माझी मते जहाल व कडवी झाली आहेत ?
नैतीक दृष्ट्या आम्हा दोघानाही एकाच पातळीवर लेखणार ?

ओके. म्हणजे एखादा खोटं बोलतोय, फसवणूक करतोय हे आरोप करणं चारित्र्यहनन नाही, तुमच्यामते, राईट? नवीन माहिती मिळाली.

एखाद्या कृतीवर अविश्वास = चारित्र्यहनन अशी शब्दकोशात नोंद करावी लागेल.

USLegal
Character Assassination Law and Legal Definition

Character Assassination refers to the slandering or vicious personal verbal attack on a person with the intention of destroying or damaging that person’s reputation or confidence. In other words it is malicious verbal assaults designed to damage or tarnish the reputation of a person. Once done, these acts are often difficult to reverse or rectify. Therefore it is likened to a literal assassination of a human life. The damage sustained can last a lifetime or, for historical figures and important personalities, for many centuries after their death.

It involves a deliberate attempt to destroy a person's reputation, especially by criticizing them in an unfair and dishonest way when they are not present. It can also involve exaggeration or manipulation of facts to present an untrue picture of the targeted person, double speak, spreading of rumors, innuendo or deliberate misinformation on topics relating to the subject's morals, integrity, and reputation. It is a form of defamation.
https://definitions.uslegal.com/c/character-assassination/

@ मामी ,
स्त्री भ्रूण हत्या व बलात्कार चुकिचे आहेत व ते करणारे क्रूर, आक्रस्ताळे व निंदनिय आहेत हे माझे विचार आहेत.
या दोन्हीचे समर्थन कुणी करत असेल तर मी त्यांचीही मते जरून ऐकावीत व ऐकली नाहीत तर माझी मते जहाल व कडवी झाली आहेत ?
नैतीक दृष्ट्या आम्हा दोघानाही एकाच पातळीवर लेखणार ?

>> मी जे लिहिलंयत्यात अभिप्रेत असलेला अर्थ लक्षात न घेता त्यावरून तुम्हाला हे मुद्दे लिहावेसे वाटत असतील तर माझं काहीच म्हणणं नाहीये.

जेव्हा आपल्या मतांच्या विरोधात मत मांडणारे सगळे अगदी १००% प्रचंड विनोदी, मूर्ख, आक्रस्ताळे, खोटारडे आहेत असं वाटू लागतं तेव्हा तुमची मतं जहाल, कडवी झाली आहेत असा त्याचा अर्थ होतो. हे दोन्ही बाजूंच्या भक्तांना लागू आहे.>>
मग चुक-बरोबर या काॅन्सेप्टला काही अर्थच रहात नाही. असे लाॅजिक लावले तर दरोडेखोर, बलात्कार्यांचीही काहीतरी बाजु असेलच, असं म्हणणार का?
दुसरं जर असं काही चुक-बरोबर म्हणायचंच नसेल तर कान्ग्रेस लीडर्सना बोलायला कसं चालतं? तेव्हा नाही म्हणत की त्यांचीही काहीतरी बाजु असेलच.

InShot_20200903_220432255.jpg

जेव्हा आपल्या मतांच्या विरोधात मत मांडणारे सगळे अगदी १००% प्रचंड विनोदी, मूर्ख, आक्रस्ताळे, खोटारडे आहेत असं वाटू लागतं तेव्हा तुमची मतं जहाल, कडवी झाली आहेत असा त्याचा अर्थ होतो. हे दोन्ही बाजूंच्या भक्तांना लागू आहे.
>>>>>
Submitted by मामी on 3 September, 2020 - 20:56

पूर्णपणे सहमत.
______________________________________________________
{{स्त्री भ्रूण हत्या व बलात्कार चुकिचे आहेत व ते करणारे क्रूर, आक्रस्ताळे व निंदनिय आहेत हे माझे विचार आहेत.
या दोन्हीचे समर्थन कुणी करत असेल तर मी त्यांचीही मते जरून ऐकावीत व ऐकली नाहीत तर माझी मते जहाल व कडवी झाली आहेत ? }}
Submitted by vijaykulkarni on 3 September, 2020 - 21:02
>>>>>
______________________________________________________
{{मग चुक-बरोबर या काॅन्सेप्टला काही अर्थच रहात नाही. असे लाॅजिक लावले तर दरोडेखोर, बलात्कार्यांचीही काहीतरी बाजु असेलच, असं म्हणणार का?}}
>>>>>
Submitted by सुनिती. on 3 September, 2020 - 21:3

कायद्याने जो गुन्हा आहे ते चुकीचेच आहे. तिथे तुमच्या मतांचा विचार केला जाणार नाही.

[मामी] यांनी जे सांगितले आहे ते आहे ते अशा गोष्टींना लागू होते जिथे प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.उदा. राजकारण.

https://medium.com/@SaltPepper/tejinder-singh-sodhis-letter-on-why-he-qu...

One fine day I get a call from someone on the desk (I won’t name that someone, but he was tortured to such an extent by Arnab that he suffered a major heart attack while sitting in the office) to go and hide near the house of the father of Sunanda Pushkar and then at appropriate time, he would tell me what has to be done.

Why hide? They never trusted their staff, so till last moment we weren’t told anything. I went to the house and suddenly I was told to enter the house and shove the mic in the mouth of Ms Pushkar’s elderly father and force him to blame Shahshi Throor for “killing his daughter”, I tried to do so but when I saw her elderly father, I was in tears, he was weak, was not mentally stable, I told the desk, but they told me that Arnab is furious on me and he wants to get the father on camera to say that Tharoor killed his daughter.

I refused and left the place, not before speaking to their man servant who spoke good about Mr Tharoor and Ms Pushkar’s relationship, but that never went on air.

Next day Arnab called me and shouted like anything, he told me that I had let him down, by not getting the father of Ms Pushkar on camera to blame Mr Tharoor.

कुणाल कामराने विमानात अर्णवला पिडलं म्हणून त्याला शिक्षा झाली. रिपब्लिकची वार्ताहर तेजस्वी यादवला विमानातच पिडतानाचा त्याच्याही आधीचा व्हिडियो आहे. अर्थात रिपब्लिकनेच टेलिकास्ट केलेला.

सर्व न्यूज चॅनल चे मालक कोण आहेत आणि त्यांचे इतर उद्योग काय आहेत.
ह्याचा अभ्यास केला की लक्षात येईल 24 तास सुशांत कशासाठी चालू आहे.
सुशांत ला न्याय मिळावा ही तळमळ त्यांची नाही.
बापाला खुश करणे आणि सर्व गैर व्यवहार आरामात चालू राहणे हे त्यांच्या साठी महत्वाचे आहे.
आणि देशातील कोणतीच समस्या,गैर व्यवहाराची चर्चा होवू नये ही सरकार ची ईच्छा आहे.

मागे कोणाकोणाला प्रश्न पडलेला? पोलीस अब्रूनुकसानी ची केस का करत नाहीत म्हणून?
Eight former top police officers of Maharashtra, including the ex Director General of Police (DGP) of Maharashtra and former commissioners of Mumbai Police have moved a public interest litigation (PIL) before the Bombay High Court seeking restraining orders against ‘media trial’ in the Sushant Singh Rajput Death case.

रिया बद्दल बातम्या देण्याबद्दल पण यात आहे

Further emphasising on the right to be presumed innocent until proven guilty, the plea stated it is important in the criminal justice system in India but is “grossly violated by way of the media conducting its own trial and creating an atmosphere of prejudice.”

हेच इकडे लोक आधी पासून सांगतायत, पण छे!! लक्षात कोण घेतो.https://indianexpress.com/article/cities/mumbai/sushant-singh-death-case...

कोंडी व्हायला लागली की नॉन इश्यू काढून गळा काढून रडायचे आणि विषय भरकटवायचा ही काही ID ची मोडस ऑपरंडी लक्षात यायला लागली आहे

LMAO Rofl

Warning : असंसदीय भाषा ऐकू येईल
https://www.facebook.com/
ही संस्कृती फोफवण्या अगोदर सरकार किंवा कोर्टनी कारवाई करावी.
चॅनल ची मान्यता रद्द करून फोजदारी खटला भरावा.

Pages