सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा खरं बोलतोय की पैसे घेऊन खोटं बोलतोय ते आपापल्या सोयीने ठरवा.>>
बरोबर.‌प्रत्येकजण आपल्या सोयीनेच ठरवत आहे. असो. मी जे लिहिले होते त्याचा अर्थ समजून घ्या. मी ' त्यांनी पैसे घेतले' असे म्हटले नाहीये.

लोक रीयाबद्दल बोलत आहेत. जे समोर आलं आहे तेही बोलायचं नाही का? त्यापलीकडे कोणी बोलत नाहीये >>>
त्यापलीकडे??? अहो, बऱ्याच खालच्या लेव्हलला जाऊन बोलले जात आहे. तुमच्या वाचण्यात आले नसेल तर सुखी आहात तुम्ही. Happy
असोच.
चालू दे.

हे ट्विट बघा. हा खरं बोलतोय की पैसे घेऊन खोटं बोलतोय ते आपापल्या सोयीने ठरवा.

ओह, एक रँडम माणूस. मला वाटले खरा डॉक्टर असेल. फेक न्यूज. अर्थात फार आश्चर्य वाटले नाही.

>रियाला नावं ठेवू नका म्हणणारे, सुशांतच्या नावाने मुक्ताफळं उधळतच आहेत, या धाग्यात मागची काही पानं बघा.
नेहेमीप्रमाणे स्ट्रामॅन. मी कधी मुक्ताफळं उधळली आहेत? आणी एखाद्याने उधळली असतील तरी हे समर्थनीय आहे का ?
अर्णब, हिंदुस्तानी भाऊ आणी शुभम मेहेता एकाच माळेचे मणी आहेत.

अॅम्ब्युलन्सवाला, लिफ्टवाला, किल्लीवाला, इतर नोकर वगैरे लोक दबावाखाली आले असणारच. ते तरी बिचारे काय करणार? जगायचंय त्यांना. बायकामुलं आहेत त्यांनाही. त्यामुळे त्यांच्या साक्षींना फारसा अर्थ रहात नाही.

विकु,
तुमचं outrage हे सिलेक्टिव्ह आहे. रीयाला पाठीशी घालण्यासाठी तुम्हाला हे innocent until proven guilty , respect for women वगैरे मुद्दे सोयीचे पडताहेत म्हणून वापरत आहात.
अदरवाईज इथे विरोधी विचारांच्या महिलांबद्दल जी भाषा वापरली जाते, विरोधी विचारांच्या नेत्यांबद्दल प्रूव्ह न झालेले आरोप पुन्हा पुन्हा कसे केले जातात हे वाचतो आम्हीपण.

कोणाचा अपमृत्यु झाल्यास त्याच्या कलेवराचे फोटो छापू नयेत असा एक संकेत कोणे एके काळी होता. पण आता हातात मोबाईल असलेला प्रत्येकजण पत्रकार, वकील, डॉक्टर, पोलीस, जज, फासावर चढवणारा वगैरे सगळे काही असल्यामुळे त्याला कसलेच संकेत लागू होत नाहीत. त्यामुळे सुशांतच्या कलेवराचे फोटो आज नेटवर आहेत. त्यात त्याचे पाय व हात व्यवस्थित दिसताहेत, त्यावर मोडल्याच्या खुणा दिसत नाहीयेत. गळ्याभोवती खूण दिसतेय तेवढीच. त्याची एक बहीण तेव्हा घटनास्थळी होती. पाय मोडून त्याला मारले असेल तर तिला तरी नक्कीच कळले असणार.

मी कधी मुक्ताफळं उधळली आहेत?>> मी तुमचे नाव लिहिलेय का?
आणी एखाद्याने उधळली असतील तरी हे समर्थनीय आहे का ?>> सिलेक्टिव्ह रीडिंग. त्याच प्रतिसादातलं पहिल वाक्य वाचा.
Selective outrage आहे त्याबद्दल मी लिहिलंय. रियाचं चारित्र्यहनन वाईट तितकेच सुशांतचेही.

सनव, तुम्ही जे वर लिहिलेय त्याच्याशी पूर्ण सहमत.

इथे मायबोलीवरच सर्व पक्षांच्या नेत्यांबद्दल, त्यांच्या नातलगांबद्दल, त्यांच्याबद्दल इथे लिहीणार्या आईडीबद्दल इतके जहाल लिहिले जाते की शेवटी त्याची परिणीती आईडी ब्लॉक करण्यापर्यंत होते.

सगळ्यांनीच थोडा विचार करून लिहिले तर सोशल मीडिया किती चांगले परिवर्तन घडवू शकेल. पण तसे होण्याची शक्यता इथे मायबोलीवरच शून्य आहे तर बाहेरच्या जगाचे काय? इथे मूठभर लोक आहेत तरी सामंजस्य नाहीय। Happy Happy

रियाचे ड्रग्जबद्दलचे चॅट्स समोर यायच्या आधी तिच्याबद्दल काहीही वावगं बोललं, लिहिलं गेलं नाहीए? इथे किंवा मीडियामध्ये?

तिच्याबद्दल जे लिहिलं बोललं गेलंय त्याला पद्धतशीर बदनामी म्हणत नाहीत?

अमुक व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त होती असं म्हणणे ही तिची बदनामी होते?

कोणी व्यक्ती मादक पदार्थांचा वापर करते हे म्हणणं हे चारित्र्यहनन? की हे व्यक्तिपरत्वे बदलतं? कंगनानेही मी ड्रग अ‍ॅडिक्ट होते असं म्हटलंय. तिने मला कोकेन घ्यायला सांगितलं असा अध्ययन सुमनचं म्हणणं आहे.

विरोधी पक्षांवर सिद्ध न होणारे आरोप करण्यात आणि त्यांच्या स्त्रीनेत्यांबद्दल अर्वाच्य शब्द न वापरण्यात इथे किंवा कुठेही कोणीही दोषमुक्त नाही. तेव्हा यावरचा आक्षेपही सिले क्टिव्ह आउटरेजच आहे.

रियाच्या इंटरव्ह्युमुळे अर्णव आणि सो कॉल्ड SSRians rattle झालेत हेही दिसतंय.

असो. आता हे दळण पुढे वाढवण्यात अर्थ नाही.

रीयाने दिलेल्या मोठ्ठ्या इंटरव्ह्यूत जेव्हा ड्रग्जबद्दल विचारलं तेव्हा तिने त्याबद्दल मात्र बोलायला नकार दिला. का?बाकी तर भरपूर बडबड केली.
ती स्वतः ड्रग्ज् घेत नव्हती, सुशांत गांजा ओढत असे , ड्रग्जबद्दल बाकीचे डिटेल्स ती सीबीआय चौकशीत सांगणार आहे असे तिने मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे .

मी कधी मुक्ताफळं उधळली आहेत?>> मी तुमचे नाव लिहिलेय का?
हे महान आहे.
मी : सर्व स्त्रीया बावळट असतात.
एक महिला : मला बावळट म्हणताय ?
मी : मी तुमचे नाव कधी घेतलेय ? तुम्ही सिलेक्टिव्ह रीडिंग करताय.

"मुंबई पोलीस नी जो तपास केला आहे तो त्यांनी मीडिया पुरवला नसेल पण तपास रिपोर्ट सील बंद सर्वोच्य न्यायालयात सादर केला होता.
ड्रग विषयी मुंबई पोलिस नी पण तपास केला असेल ह्या विषयी शंका नाही."
हेमंत १३३ यांचा हा प्रतिसाद आणि ह्या धाग्यापुरते त्यांचे सर्व प्रतिसाद अगदी पूर्ण पटले. मुंबई पोलिसांनी मादक द्रव्यांचा दृष्टिकोन लक्षात घेतला नाही आणि त्या दृष्टीने तपास केला नाही, आणि पुढे ही गोष्ट केवळ chat मुळे लोकांना आणि सी बी आय ला कळली असे मानणे हे अगदी बालिश आणि हास्यास्पद आहे. मुंबई पोलिसांवर तपास पूर्ण होऊन आरोप सिद्ध होण्याइतपत आणि कोर्टात आरोपी म्हणून केस दाखल करण्या इतपत पुरावे जमा होईपर्यंत माहिती उघड न करण्याचे दडपण आणि बंधन होते. (ते प्रत्येक पुलिस केसमध्ये असतेच.) तोपर्यंत प्रत्येक जण संशयित असतो आणि गुन्हा दाखल केल्यावर संशयित आरोपी ठरतो. आणि ड्रग्जच्या बाबतीत मुंबई पुलीसपेक्षा अधिक जाणकारी कुठल्याही राज्यातल्या पुलीस बळाला नसेल.

सोशल मीडियावर मी आपला माझाच एक नियम बनवलाय 'सर्व स्त्रीया बावळट असतात.' सारखे जनरल स्टेटमेंट लिहिणार्याबरोबर वाद घालू नयेत, कारण त्यांना काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी 'गाढवापुढे वाचली गीता' प्रकार असतो, त्यामुळे तुमचे चालू द्या.

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या गूगल हिस्टरीमध्ये painless death सापडले असे सांगितले होते, सीबीआयने त्याने हिमाचल, कुर्ग इथे properties शोधत होता हे स्पष्ट केले. मुंबई पोलिसांना साफ खोटे पाडले.

डिप्रेशन सारख्या नाजूक व गुंतातुंतीच्या आजाराबद्दलचे घोर अज्ञान ( की जाणून बुजून दाखवलेले अज्ञान ?) अशी बेधडक विधाने करण्यास उद्युक्त करते. डिप्रेशन मधला तरुण आज "आय ए एस पास झाल्यावर काय कपडे घालावेत" असे गूगल करेल तर थोड्याच वेळात "आत्महत्या करण्याचे सोपे मार्ग" असे गूगल करेल. असे मूड स्विंग हे एक लक्षण आहे. खरे तर सिशांत च्य आत्महत्ये मुळे आजवर न सुटलेल्या या डिप्रेशन च्या कोड्यावर आणखी विचर मंथन होईल, काहीतरी पोझिटिव्ह निघेल अशी आशा होती, पण कसचे काय.

सुशांतला drugs दिलं जायचं किंवा तो घ्यायचा ह्यापैकी काही असलं तरी त्याची एक बहिण अधूनमधून त्याच्याजवळ राहायची तिला हा प्रश्न तरी नक्की विचारला जाणारचना की तुमच्या लक्षात आलं नाहीका किंवा आलं असेल तर तुम्ही त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केलात का वगैरे. आता cbi ने त्याच्या बहिणीला बोलावलं आहे चौकशीसाठी.

रियाचं चारित्र्यहनन वाईट तितकेच सुशांतचेही. >>> बरोबर, दोघांचं किंवा इतर कोणाचेही नको.

विकु तुम्हाला पूर्ण खात्री दिसतेय डिप्रेशन या मानसिक आजारातून आत्महत्या याची. (आधी पण तुमची अशा अर्थाची पोस्ट होती.)

ती शक्यता नाकारता येत नाही, पण तुम्ही त्या निष्कर्षाला कसे पोचलात?

भरतदा +१...
मीडीया म्हणते की रिया च्या मागे खुप मोठे लोक आहेत तेच सुशांत च्या हत्त्येत सुद्धा आहेत पण हे सागत नाही की हत्त्येचा मोटीव्ह काय आहे एव्हाना रियाला सुद्धा काय फायदा आहे ?.माल तरी वाटत नाही की सुशांत फार मोठी संपत्ती मागे सोडून गेला असेल त्याच्या त्या ऑडीयो किल्प वरून तरी तस वाटतं

काल सकाळी उठलो तेव्हा घरात आधीच टीव्हीवर ABP चॅनल सुरू होतं. अचानक आरडाओरडा सुरू झाला म्हणुन पाहिलं. रिया कार मधून जात होती आणि या रिपोर्टर बयेला ती दिसली होती. कॅमेरात ती नीट दिसतही नव्हती. आणि ही बया किंचाळून किंचाळून सांगत होती ये देखो हमने आप को रिया को दिखाया, ये ABP एक्लूजीवपे आपको दिखाया जा रहा है, ये देखीए, ये देखीए!!

जणु कुणी ऍलियन सापडला आहे आणि त्याला कॅमेरात कॅप्चर केलंय.

ही बया किंचाळून किंचाळून सांगत होती ये देखो हमने आप को रिया को दिखाया, ये ABP एक्लूजीवपे आपको दिखाया जा रहा है, ये देखीए, ये देखीए!!

Reporter hya पदासाठी सार्वजनिक नळावर भांडणात वेडेवाकडे हावभाव ज्यांना करता येतो आणि आचरट भाषा ज्यांना अवगत आहे त्याच बायकांना घेत असावेत अशी माझी दाट शंका आहे.

फेसबुकवर रिपोर्टर्स च्या बाजूची एक पोस्ट आहे.तीही डोळे उघडणारी आहे.
या रॅट रेस मध्ये त्यांनाही ओढले जाते.
कुठेतरी सर्वांनीच थोडा विवेक बाळगायला हवाय.

आता पर्यंत चे गुन्हे बघितले तर .
ज्याला खून करायचा असतो तो सर्व बाजूंनी विचार करून प्लॅन आखतो जेणे करून पुरावा राहू नये किंवा शंका पण येवू नये.
स्वतःच्या घरात खून करून फाशी दिल्याचा देखावा केल्याची उदाहरणे दुर्मिळ च असतात.
कारण हे काम फक्त आणि फक्त फॅमिली मेंबर,नातेवाईक,किंवा जवळचा रोजच्या बसण्या मधील मित्र च करू शकतो.
बाहेरचा व्यक्ती हे करूच शकत नाही.

Tv reporter che he वागणे.
मानवी हक्क ulanghan ह्या कायद्याच्या चौकटीत येत नाही काj?
व्यक्ती स्वतंत्र वर घाला ह्या व्याख्येत बसत नाही का?

मीडिया जे करते आहे त्याला शेण चिवडणे म्हणतात,
आणि ते इतक्या आत्मविश्वासाने शेण चिवडत आहेत कारण आपण वाढू ते खायला लोक उत्सुक आहेत हे त्यांना माहीत आहे.
मुंबई पोलीस, CBI यांची अधिकृत स्टेटमेंट्स बाहेर आलेली नसताना मीडियाने दिलेल्या अर्धवट माहितीवर विसंबून संस्थावर काम चुकीचे करण्याचा आरोप आणि आधी कोणाला तरी आरोपी ठरवणे हे केवळ थोर आहे.

वर मीडिया ट्रायल वरून कोणाला आरोपी धरू नका म्हंटले आणि केलेल्या आर्युमेंट मधली गॅप दाखवून दिली की म्हणजे तुम्ही आरोपीचा बचाव करताय असा उद्देश चिकटवणे हे सुद्धा थोर आहे.
आता थोडयाच वेळात तुम्ही मीडियाच्य आर्ग्युमेंट मधल्या गॅप दाखवताय म्हणजे तुम्हीपण शेणच चिवडताय असा निर्लज्ज आरोप होईलच.

भरत, विकू मला वाटते आता तुम्ही थांबवेत,
काही id आय ओन इट टू सुशांत वगैरे म्हणून यात उतरले आहेत, त्यांना जीवाला जीव मिळल्याशी कारण आहे. शेवटी ती वखवखलेली गिधाडे आहेत. आपली वखवख कमी करायला त्यांना कसलाही विधी निषेध नाही. दिशाचा मृत्यू कसा वापरला गेला ते तुम्ही पाहिले आहेच.

CBI चे अधिकृत स्टेटमेंट आल्यानंतर हवे तर कँटीन्यू करा.

* दुसरी लहानशी गोष्ट मयुरी देशमुख च्या नवऱ्याच्या आत्महत्ये बद्दल, त्याच्या आईची पोस्ट इकडे देताना का देतोय त्याचे कारण त्याखाली मुद्दाम लिहिले होते, जीव लावणारी माणसे आजू बाजूला असताना आणि पेशन्ट सुधारतो आहे असे वाटत असताना त्याचा तोल गेला, आणि त्याने आयुष्य संपवले डिप्रेशन असणाऱ्या माणसात हे होणे शक्य असते.

मात्र त्या पोस्ट चे इंटरप्रिटेशन " मयुरीच्या सासूने आत्महत्या कशी स्वीकारली तशीच तुम्ही स्वीकारा" असे केले गेलंय (तो id कोण आहे ते मला मागे जाऊन पहायची गरज वाटत नाही)
असल्या बिनडोक इंटरप्रिटेशन ने नरेटिव्ह बदलते म्हणून हे मुद्दाम लिहितोय.

सीबीआय वर सरकार वर्षाला 800 कोटी रुपये खर्च करते.
त्यांचा 1 वर्षाचा हिशोब बघितलं तर त्यांना एक पण केस solve करता आली नाही.
त्यांची साक्षीदार उभे करण्याची पद्धत संशयित आहेत
सीबीआय म्हणजे केंद्राचा बोलका पोपट बाकी 800 कोटी फुकट वाया जातात.

Submitted by mi_anu on 31 August, 2020 - 13:06>> या बाजूने कधी विचारच केला नव्हता. वाईट वाटलं आणि कीव आली की खरंच काय काय करावं लागतं लोकांना.

Pages