सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारतीय आणि विशेषतः उत्तर भारतीय लोक्स फार लाऊड आणि नॉईजी असतात. याचा अनुभव परदेशात लगेच येतो +१

Submitted by Hemant 33 on 6 September, 2020 - 12:39>>>. पोस्ट पटली

मै मोदी हूं

सिनेमाचा निर्माता संदीप - मुंबई ड्रग रॅकेट मध्ये संशयित
सिनेमाचा अभिनेता विवेक ओबेरॉय - ह्याचा साला आदित्य अलवा बेंगळुरू ड्रग रॅकेट मध्ये सापडला

सलमान आमिर चा सिनेमा बघितला की दाऊदला पैसे जातात म्हणे,
मग मोदी सिनेमा बघून पैसे कुठे गेले ??

https://www.newslaundry.com/inside-the-online-cult-of-justice-for-SSR
कल्ट्स आणी ब्रेनवॉशिंग चा नवा भाग लिहावा लागणार !

या तथाकथित #JusticeSSR लोकांना उद्देशून वापरलेला वखवखलेली गिधाडे हा शब्द मात्र खटकला.
सोशल मेडिया वर लिहिताना भावनेच्या भरात असे शब्द वापरण्याचा मोह होणे सहाजिक आहे पण तारतम्य जरूर पाळले पाहिजे.
अशी एखादी चूक झाली तर माफी मगण्यात काहीही गैर नाही. माफी मागण्याने आपण लहान होत नाही. सिंबा यांनी गिधाडांची माफी मागावी असे मला वाटते.

रियाची चौकशी आणी संभाव्य अटक "गांजा" साठी आहे !
"गांजा" फार सेन्सेशनल वाटत नाही म्हणून "बड" शब्द वापरला !
सीबीआय नव्हे, ईडी नव्हे तर एनसीबी.
गांजा सर्वत्र सर्रास उपलब्ध आहे. सदाशिव पेठेत एकवेळ जानवी जोड मिळणार नाहीत पण गांजा मिळेल.
गांजाचे कायदे खरेच पाळायचे तर तीन एक कोटी लोकांना तुरुंगत ठेवावे लागेल.
एकेकाळी भारतात गर्भपात बेकायदा होते. याचा अर्थ ते होत नव्हते असा नव्हे, तर ते लपून छपून होत होते.

मुंबई पोलिसांचे हाथ का धरून ठेवले होते ?
त्या संदीप आणि ओबेरॉय का साला ला का नाही अटक केली गेली ?

एकंदरीत तलवार केस प्रमाणेच या हि केस चा तपास बारंगळणार हे नक्की !
उच्चभ्रू लोकात नेहमी आत्महत्याच होतात हो !
दिव्या भारती , सुशांत , जिया खान , सुनंदा पुष्कर , आणि दिशा सलीयन यांच्या आत्महत्याच आहेत .
खून वैगेरे फालतू प्रकार आपल्या सारख्या चांभार चौकशा करणाऱ्या समाजात होतात .

आता पर्यंत तरी सुशांत सिंग च्या हत्या/ आत्महत्या च्या संबंध मध्ये एक पण अटक झाली नाही.
ना त्या आरोप खाली कोणी संशयित म्हणून नाव जाहीर केले आहे तपास यंत्रणेने.
ड्रग च्या संबंधित अटक झाली आहे.
पण ड्रग कोणाकडून च जप्त करण्यात आलेले नाही किंवा सापडले पण नाही.
कस्टडी संपल्यावर त्यांना गजा आड ठेवणे अवघड होईल आणि कोर्ट जामीन देण्याची शक्यता जास्त आहे.

Bhavu तोरसकर ह्यांची कमेंट अयोग्य आहे.
उध्दव एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना धमकी येत असेल तर तो पक्षीय विषय नाही.
मग ब्लॅक कॅट बरोबर बोललेत प्रधांन मंत्री असलेली मोदी च्या हातात भारतीय सेना आहे ,आणि बाकी सशस्त्र दल आहेत ,गुप्त हेर यंत्रणा आहे .
तरी त्यांना धमक्या येतात ना.
सावध असणे गरजेचे आहे.
तोरसकर नी पक्षीय राजकारणात एवढे आंधळे होण्याची गरज नाही.

कोण रे ते गांजा बंद करा म्हणत होते?? आमचा धर्म बुडवायला बसलायत तुम्ही 118987586_3402432279845653_3580509647736778924_o.jpg

हे मंदिर वाले प्रसाद ड्रग डिलर्स कडून घेतात की सरकार त्यांना रेशन वर गांजा उपलब्ध करून देते हे शोधले पाहिजे.
जर इतक्या राजरोसपणे गांजा येत असेल तर ड्रग रॅकेट ची माहिती NCB ला केवळ रिया कडून मिळतेय मानणे फारच नाईव्ह आहे.

जिद्दू , हेमंत +१

तोरसेकर दिवसेंदिवस पारच भंजाळत चाललेत . अंधभक्तीच्या नादात पार वाहवत जातात . बाकी धमक्याचं म्हणाल तर माननीय पंतप्रधानांना पण येतात धमक्याचे मेल वगैरे . पण तेव्हा तोरसेकर भाष्य करताना दिसत नाहीत.

अर्णब तर फुल बाह्या सरसावून आव्हान देतोय ठाकरेंना. पत्रकार आहे का गावगुंड? शिवसेना हे प्रकरण पोक्तपणे हाताळतेय याचंही कौतुक आहे.

थायलंड मध्ये 12 मुल आणि त्यांचा कोच गुहे मध्ये अडकले होते तेव्हा त्या देशातील मीडिया नी किती mature पना दाखवला होता.>>>>>> त्या मुलांना सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम गेली होती त्याचे कव्हरेज बघितले आहे का कोणी???

तोरसेकर दिवसेंदिवस पारच भंजाळत चाललेत . अंधभक्तीच्या नादात पार वाहवत जातात . >>> हो ना. आजकाल रविश कुमार, राजदीप सरदेसाई सारखे फार कमी निष्पक्ष पत्रकार उरलेत. बाकी सगळे मेले अंधभक्त कॅटेगरीतले!

आजकाल रविश कुमार, राजदीप सरदेसाई सारखे फार कमी निष्पक्ष पत्रकार उरलेत. बाकी सगळे मेले अंधभक्त कॅटेगरीतले!>>>> रविशकुमार , राजदीप उघडपणे खांग्रेस लिबरल आहेत . ताकाला जाऊन तोरसेकरसारख तटस्थपणे भांड लपवत नाहीत . त्यामुळे मग किती सुंदर तटस्थ विश्लेषण वगैरे तोरसेकर भक्तांसारखं गोडवे गायची गरज भासत नाही.
बाकी त्या तोरसेकरला मार्मिकमध्ये संपादकपदाची जागा मिळाली नाही म्हणून रडगाणं गातोय इतकंच

इथे पण काही ताकाला जाउन भांडे लपवणारे तटस्थ आहेत. त्यांच्याबद्दल काय बरे म्हणणे आहे आपले? Wink

आजकाल रविश कुमार, राजदीप सरदेसाई सारखे फार कमी निष्पक्ष पत्रकार उरलेत. बाकी सगळे मेले अंधभक्त कॅटेगरीतले!>> राजदीप बद्दल ठाऊक नाही मात्र रवीश गेली कित्येक वर्षे असाच आहे. ते कसे आहे ना, भक्तीची पट्टी घातलेली असलेल्यांना आजकाल फरक जाणवू लागला आहे इतकंच. Wink

भाउंचा मुद्दा फारच बोचलेला दिसतोय अनेकांना कारण लगेच अ‍ॅग्रेसिव होऊन लेबलं लावणं, पर्सनल लेवला जाणं वगैरे नित्य नैमित्तिक प्रकार अपेक्षित आयडिंकडून झालेत. चिल माडी लोक्स! Lol

काही म्हणा पण आता एनडीटीव्ही संयमित ,दर्जेदार बातम्या देत आहे.
रिपब्लिक सारखा मूर्ख पना आज तक,टीव्ही18 हे करत आहेत.
महत्वाचे झी न्यूज च्य anchor चा आवाज पण सहन होण्या एवढं बारीक झाला आहे.
चला उशिरा का होईना काही चॅनल स्वतः मध्ये बदल करत आहेत.
Aarnav सुधारेल असे वाटत नाही तो स्वतःच ड्रग घेवून बातम्या देत असावा असा दाट संशय आहे.

अर्णव स्वतःला हिंदूंचा कैवारी अँकर म्हणून एक्सपोज करतोय !
तर राजदीप ,रवीश आणि बरखा मुस्लिमांचे हाच काय तो फरक !
केरळ , कलकत्ता मध्ये हिंदू लोकं मारले गेले की राजदीप , रवीश आणि बरखा पूर्ण दुर्लक्ष करतात .
पण तेच एखादा मुस्लिम इतर राज्यात मारला गेला तर तीन तीन दिवस रवंथ करतात .
आता याच सुशांत च्या जागी एखादा मुस्लिम तरुण असता तर या तीन माकडांनी बॉलीवुड डोक्यावर घेतले असते आणि महाराष्ट्र सरकार ने पण थया थाय नाचत तपास पूर्ण केला असता

Proud

यूपीत ढेकणे मेल्यागत साधू मेलेत , कधी बातमी नाही झाली. पण पालघरची झाली

ठाकरेंनी भाजपची सत्ता पाडली , ह्याचा भाजप टीमला राग जास्त आहे , म्हणून पालघर , कोविड , कंगना काहीही कारण त्यांना पुरते

ठाकरे इतके वाईट आहेत , तर भाजपे 35 वर्षे त्यांना का जवळ करून होते ?

सुशांत च्या केस मध्ये हिंदू मुस्लिम असा angle नाही.
महाराष्ट्र मधील आघाडी सरकार आणि जास्त करून सेना अडचणीत यावी हा हेतू आहे.

ठाकरे , सेना विरुद्ध सीबीआय , इ डी , कुठली पोलीस केस वगैरे भाजपे करू शकत नाहीत, तेवढी ताकत नाही

म्हणून भुंकणे सुरू आहे

शिवसेने ने जनतेला फसवून सत्ता घेतली.ठाकरे सरकार विरूद्ध कोणीच काही बोलायचे नाही.संजय राऊत तर कसंही बोलतात त्यांना कोणी बोलणार नाही.दडपशाही चालू आहे.

त्यापेक्षा भाजप,कॉंग्रेस,राष्ट्रवादी परवडेल.

एकदा एका न्यूज चॅनेल ला मुख्यमंत्री उद्धवजी इंटरव्हयू देत होते तर इतके तिरकस आणि विचित्र बोलत होते.एकाही प्रश्नाचे शांत संयमित उत्तर नव्हते.

मुंबई पोलिसांना ड्रग अँगल कसा कळला नाही.मी दररोज आत्महत्या केलेस पाहते अनेकदा पोलिसांनी अचूक कारण नोंदलेले असते.नक्कीमुंबई पोलिसांनी दबाव असणार.पाळेमुळे खोल आहेत.म्हणूनच संपूर्ण बॉलीवूड गप्प होते आणी सरकारसुद्धा

Pages