Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बालीश ट्रोल्स कडे दुर्लक्ष
बालीश ट्रोल्स कडे दुर्लक्ष करणे उत्तम. मी तर प्रतिसादही वाचत नाही. असो.
सुशांत च्या बहिणींनी मुंबई पोलिसाना दिलेले स्टेटमेंट त्यांना भावाच्या आजाराची कल्पना होती हे स्पष्ट करते.
मी फेसबूक वर नाही. ट्विटर वरही कधीतरीच जातो.
आज सहज तिथे जाऊन SSRWarriors सर्च केलं आणी I was traumatized.
या लोकांना खरेच हळूवार मानसिक समुपदेशनाची गरज आहे.
I feel bad for them, many are of my children's age.
शिवाय सु सु स्वामी त्यांचे गुरु आहेत.
असो, माणूस चंद्रावर गेलाच नाही असे मानणरे खूप लोक अमेरिकेत आजही आहेत.
ते बैठका, अधिवेशने वगैरे घेतात. ते मान्य नसले तरी क्यूट वाटते कारण त्यात कुणाचेही चरित्र्यहनन नसते.
These are hungry vultures.
चारित्र्यहनन नसते???
चारित्र्यहनन नसते???
म्हणजे चंद्रावर जाणारे अंतराळवीर, तत्कालीन अमेरिकन प्रशासन याना साफ खोटारडं ठरवणं यात चारित्र्यहनन नाही? की चारित्र्य फक्त बायकांचं असतं!
आजतक च्या पत्रकाराने मस्तपैकी
आजतक च्या पत्रकाराने मस्तपैकी शिव्या&रट्टे खाल्ले
https://twitter.com/i/status/1301073741711986688
सनवजी, संत्रं सोलायचा प्रयत्न
सनवजी, संत्रं सोलायचा प्रयत्न करतो, पटतय का बघा.
समजा एखादा मुलगा (वा मुलगी) चंद्रावर जाऊन आला किंवा त्याने चंद्रमोहीमेत सहभाग दिला.
त्याचे ९०% लोक कौतुक करतील, १०% लोक चंद्र मोहीम झालीच नाही, हे सारे खोटे आहे असा दावा करतील.
त्यातही त्या मुलावर प्रत्यक्ष आरोप नाहीत.
त्या मुलाच्या आईला थोडेसे वाईट वाटेल. पण किती?
आता समजा एका मुलीने आत्महत्या केली आणी तिचे कुटुंबीय त्या धक्क्यातून सावरत आहेत तोच एखादा थर्ड क्लास राजकारणी तिच्या मृत्यू विषयी किळसवाणी टिप्पण्णी करेल, ती ही मेडिया समोर, पोलिसात नव्हे. त्यांना किती वाईट वटेल ?
किंवा एखाद्या मुलीवर "विष कन्या", "गोल्ड डिगर", अशी लेबल्स कोणत्याही पुराव्याविना लावली जात असतील तर त्या कुटुंबाला किती वाईट वाटेल ?
चंद्रावर जाणारे अंतराळवीर, तत्कालीन अमेरिकन प्रशासन यांच्यात महिला नसतातत हे तुमचे गृहितक misogyny चे उदाहरण आहे.
आजतक च्या पत्रकाराने मस्तपैकी
आजतक च्या पत्रकाराने मस्तपैकी शिव्या&रट्टे खाल्ले
त्यांना त्याचे पैसे मिळतात,चॅनल ला टीआरपी मिळते.
प्रश्न त्यांचं नाही.
बुध्दी गहाण ठेवून न्यूज चॅनल chya तालावर फेर धरणाऱ्या मूर्ख लोकांचा आहे
कशाबद्दल खाल्ले रट्टे ?
कशाबद्दल खाल्ले रट्टे ?
असेच बदडले पाहिजेत !
असेच बदडले पाहिजेत !
च्यानल कुठलेही असो , अती होत चालले आहे .
स्टुडिओ बाहेरचे जग त्यांना वडिलोपार्जित च वाटतं असते .
वटवृक्ष.
वटवृक्ष.
चॅनल वरचे अँकर काय विचित्र हावभाव करतात ,काय त्यांचा तो आवाज डोक्यात जातो.
निर्लज्ज माणसं सर्व तिथेच जमा झाली आहेत असे वाटते.
विकु, Neil Armstrong चंद्रावर
विकु, Neil Armstrong चंद्रावर गेला. त्याआधी त्याने त्या विषयातील (aeronautical engineering) शिक्षण व भरपूर ट्रेनिंग वगैरे घेतलं होतं. आता जर चंद्रावर जाणं हा hoax म्हटला तर आर्मस्ट्राँग एकतर अत्यंत खोटारडा ठरतो(जर तो या नाटकात सामील असेल) किंवा इतका बिनडोक की आपण चंद्रावर उतरतोय की कोथरूडला चांदणी चौकात हेही त्याला कळलं नसेल! दोन्ही केसमध्ये हे त्याचं 'चारित्र्यहनन' ठरत नाही का?
स्वाती तोरसेकर, ही कालची
स्वाती तोरसेकर, ही कालची पोस्ट आहे
मिळालेल्या प्रत्येक मुद्द्याचा उपयोग आपल्या सुप्रिम लीडर ची प्रतिमा चमकवण्यासाठी /विरोधकांवर ठपका ठेवण्यासाठी कसा करून घेता येईल या कडे यांच्यासारख्या सेलेब्रिटी भक्तांचे लक्ष असते आणि नॉन सेलिब्रिटी भक्त हेच काम विविध फोर्मस वर आपापल्या कुवतीप्रमाणे करत असतात. माबो वर हे काम कोण करते हे या धाग्यावर दिसले आहेच.
>>>>>>>>>
#SSR प्रकरणाच्या तपासाचा रोख कुठे वळला आहे ह्याची थोडीफार कल्पना आता प्रेक्षकांना येऊ लागली आहे.
त्यामधील अंमली पदार्थांच्या तस्करीच्या तपासावर सीबीआयने लक्ष केंद्रित करून त्यामध्ये नार्कोटीक्स ब्यूरोला सामिल करून घेतले आहे.
अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी अफूची पैदास - मग त्यातून विविध अंमली पदार्थ बनवणारे छोटेखानी भूमिगत कारखाने - त्याची ने आण - वितरण - दोन नंबरचा पैसा - त्याला जोडून हवाला - छुप्या शस्त्रास्त्राचे आंतरराष्ट्रीय खरेदी व्यवहार यामध्ये सामिल होणाऱ्या स्थानिक टोळ्या आणि हेच जाळे वापरून घडवले जाणारे दहशतवादी हल्ले हे एक परस्परावलंबी व परस्परांशी सहकार्य करणारे जगड्व्याळ जाळे आहे. यामध्येच बाॕलीवुडच्या प्रख्यात नट मंडळींनाही अंमली पदार्थाच्या ने आण वितरण खरेदी आदि व्यवहारात टोळीप्रमुखांनी कसे खुबीने आणि दहशतीने वापरले आहे हे श्री आर व्ही एस मणी यांच्या लेखातून व मुलाखतीतून पुढे आले आहे. हे जाळे जागोजागच्या राजकीय शक्तींच्या आधाराने आपले काम फत्ते करत असते.
हेच जाळे वापरून भारताला लक्ष्य बनवण्याचे काम केवळ पाकिस्तानने नव्हे तर चीनने देखील केले आहे. हे जाळे इतके प्रभावी सामर्थ्यवान आहे की त्याच्या कचाट्यातून आमची सुरक्षायंत्रणाही सुटलेली नाही. कारण त्यांना लक्ष्य बनवणारी आयएसआय मुख्य सूत्रधार असून आजही यामध्ये तेच सर्व सूत्रे हलवत आहेत याचे स्पष्ट संकेत दिसतात.
#SSR निमित्ताने मोदी सरकारने यांच्या मुळाशी हात घालण्याचा चंग बांधला आहे. पण माध्यमांनी आणि काही तज्ञ मंडळींनी पहिल्यापासून याला केवळ खूनप्रकरणाचा रंग दिल्यामुळे जनतेवर आज तपासाच्या रोखामुळे आश्चर्यचकित होण्याची पाळी आली आहे. किंबहुना भले मोदी सरकारने इथे दाऊदला जरी पकडून आणले तरी राज्यात ठाकरे सरकार पडले नाही व कुटुंबावर कारवाई झाली नाही तर मोदींच्याच चाहत्यांच्या जिभेवरची चव जाईल की काय आणि त्यांना मोदीही पुचाट वाटावेत अशी मानसिकता बनवण्यात माध्यमे यशस्वी झाली आहेत असे दिसते.
न रहेगा बाँस न बजेगी बाँसरी या पद्धतीने समस्या सोडवणारे मोदी मात्र पोपटाच्या डोळ्यावरून आपले लक्ष विचलित होऊ देत नाहीत हेच खरे.
@Swati Torsekar
>>>>>>>
Neil Armstrong चंद्रावर गेला.
Neil Armstrong चंद्रावर गेला.>>>> न्हवता गेला तो, अमेरिकेने रशियापेक्षा वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी तसं सांगितलं होतं. त्याची शूटिंग त्यानी फिल्म स्टुडिओत केली होती.
सनव, देव न मानणारे लोक आहेत,
सनव, देव न मानणारे लोक आहेत, त्याने देव मानणाऱ्यांचे चारित्र्यहनन होते का?
आणि देव मानल्यामुळे न मानणाऱ्यांचे चारित्र्यहनन होते का?
चारित्र्यहनन म्हणजे अशा मानणाऱ्यांपैकी एकेकाला टारगेट करून त्याच्या वैयक्तिक बाबीत, कृतीत लक्ष घालून उखाळ्या-पाखळ्या काढणे, विपर्यास करणे, पातळी सोडणे इत्यादि.
तपास अंमली पदार्थ रॅकेट
तपास अंमली पदार्थ रॅकेट उद्वस्त करायच्या मार्गाने गेला तर चांगलंच आहे(पण जर हे व्यसन/या सवयी करणारे अत्यंत बुद्धिमान, उच्चभ्रू लोक असतील तर या पकडलेल्या टोळ्यांची जागा दुसऱ्या टोळ्या घेतील.)
ता तपासातून काहीतरी चांगलं, खरं बाहेर येवो.बाकी व्हूडनिट वर बेटिंग करून कोणाची तरी बाजू घेऊन सोशल मीडियावर तावातावाने भांडत राहण्यात अर्थ नाही.मीडिया मॅनेज होतं, बाजूही विकल्या जातात/प्रेशराईज केल्या जातात.
सिंबा, हे सगळ्यात भारी आहे.
सिंबा, हे सगळ्यात भारी आहे.
सुशांतसिंग प्रकरण पण नोटाबंदीसारखंच आहे. तिथे परिणाम होता, इथे कारण आहे.
१. मानसिक आजार.
२. नेपोटिझ्म
३. दिशाचा खून
४. रिया - पैसा - काळी जादू
५. अंमली पदार्थ.
१ मुळे सोशल मीडियाच्या गल्लोगल्ली मानसोपचारतज्ञ उगवले होते तसं आता डिटेक्टिव्हच पीक आलंय.
दुसरं पीक न्युज अॅनलिस्ट्सचं . बिग बॉस मराठीच्या वेळी या जमातीचा शोध लागला होता. आता आणखीनच फोफावलेत.
यातच तो कॅपिटल टीव्हीसारखा. ज्यांना सगळी न्युज चॅनेल बघणं शक्य नाही, किंवा आम्ही नाही बाई ही आचरट न्युज चॅनेल बघत असं म्हणायचंय त्यांच्यासाठी त्याच चॅनेलवरच्या आपल्या ऑडियन्सला रुचणार्या बातम्या /पुड्या कुठून घेतल्या हे न सांगता स्वतःच शोधल्याच्या थाटात मांडायच्या.
आज हे रत्न गवसलं.
काल मी नंतर उडालेल्या एका ट्वीटची लिंक दिली होती, ते यांचंच होतं.
----------
Eight former IPS officers move Bombay High Court against the "unfair, malicious and false media campaign" against Mumbai Police in the #SushantSingRajputDeathCase
The " #mediatrial " should be stopped, the plea urged the court. [PTI]
The petitioners are former Maharashtra DGPs M N Singh, P S Pasricha, D K Sivanandan, Sanjiv Dayal, Satish Mathur and K Subramanyam, former Mumbai police commissioner D N Jadhav, and former additional DGP K P Raghuvanshi.
The petition, filed on August 31, said a section of news channels have been trying to influence the course of investigation which is being carried out by the CBI, ED and NCB, and airing false propaganda against @MumbaiPolice
However #SushantSinghRajput 's family lawyer Vikas Singh says a malicious campaign relating to his mental health was being run by few TV channels to defame his family and benefit actress #RheaChakraborty , who has been accused of abetting the actor's suicide [PTI]
"The family never said that Sushant died by suicideThe statements were recorded by the @MumbaiPolice
in Marathi. Family also objected to and asked the authorities not to write in Marathi if they want them to be signed. But they were forced to sign the statements," Singh alleged.
लाइव्ह लॉ या ट्विटर हँडल वरून.
आता आपण असंही म्हणू शकतो की ड्रग धंद्यात आपलंही नाव येईल म्हणून हे पोलिस अधिकारी रॅटल झालेत.
---
बरं त्या संदीप सिंग विथ टु एसेस चं काय झालं पुढे?
----
आत्महत्या असेल तर विम्याचे पै से मिळत नाहीत, अशीही एक थियरी वाचली.
या धाग्यावरची काही निरीक्षणे
या धाग्यावरची काही निरीक्षणे
दुसऱ्यांवर अजेंडा रेटण्याचा आरोप करणारे स्वता तेच करतायत हे त्यांच्या लक्षातच येत नाहिये किंवा आले तरी त्यांना ते मान्य नसावे.
या घटनेला, चर्चेला, मुद्द्यांना हाइप करण्याचा आरोप मिडियावर ठेवणारे आपण स्वत इथे वेगळे काय करतोय?
या धाग्यावरचा ठराविक आयडींचा वावर हा त्या प्रकरणाच्या तपासाला रोज काय नवे वळण मिळते त्या प्रमाणात कमी जास्त होतो.
इथे एखादी संतुलित पोस्ट पडली की लगेच त्याला अनुमोदनच्या पोस्ट टाकून आपण पण कसे तितकेच संतुलित आहोत हे दाखवायची काही ठराविक आयडींमध्ये चढाओढ लागते ज्यामुळे समोरची पार्टी आपोआप वाईट ठरावी
आपल्यापुरती ही चर्चा थांबवत असल्याचा उल्लेख अनेकजण करतात.... त्याहीपुढे जाउन इतर अनेकांना (तुम्ही सूज्ञ आहात असा सूर लावत) चर्चा थांबवण्याची विनंती केली जाते पण थांबत कुणीच नाही
असो
घ्यावासा वाटला तर घ्या.
हा विषय फक्त चार हिंदी भाषा
हा विषय फक्त चार हिंदी भाषा असलेली राज्य आणि आपला महाराष्ट्र विनाकारण उत्तरेच्या गाळात पाय मारत आहे.
दक्षिण भारत,अतीपूर्वेचा भारत,पंजाब, ह्यांना सुशांत कोण हे पण माहीत नसेल.
सुशांत को न्याय देश नाही मागत फक्त चार lawless राज्याचं मागत आहेत.
म्हणून तर हिंदी भाषा नको असे लोक म्हणतात.
हिंदी भाषा बरोबर तिकडच्या गलिच्छ संस्कृती चा पण शिरकाव होतो.
तपास अंमली पदार्थ रॅकेट
तपास अंमली पदार्थ रॅकेट उद्वस्त करायच्या मार्गाने गेला तर चांगलंच आहे(पण जर हे व्यसन/या सवयी करणारे अत्यंत बुद्धिमान, उच्चभ्रू लोक असतील तर या पकडलेल्या टोळ्यांची जागा दुसऱ्या टोळ्या घेतील.)
ता तपासातून काहीतरी चांगलं, खरं बाहेर येवो.बाकी व्हूडनिट वर बेटिंग करून कोणाची तरी बाजू घेऊन सोशल मीडियावर तावातावाने भांडत राहण्यात अर्थ नाही.मीडिया मॅनेज होतं, बाजूही विकल्या जातात/प्रेशराईज केल्या जातात. >>> खरं आहे, आवडली पोस्ट.
अमली पदार्थ रॅकेट नष्ट करायचे
अमली पदार्थ रॅकेट नष्ट करायचे तर ते तसेही होईलच की
त्यासाठी सुशांत मरायची काय गरज आहे ?
Black cat
Black cat
तोरसेकरांच्या पोस्ट मध्ये लॉजिक शोधताय तुम्ही??
आत्महत्या असेल तर विम्याचे पै
आत्महत्या असेल तर विम्याचे पै से मिळत नाहीत, अशीही एक थियरी वाचली.
Submitted by भरत. on 3 September, 2020 - 10:20
हा फार जुना नियम झाला. आता यातही तीन प्रकार आले आहेत.
ग्राहक कुठला विमा प्रकार निवडतो त्यानुसार विम्याचा प्रिमियम कमी / जास्त ठरतो.
आत्महत्या 1 वर्षात असेल तर 0
आत्महत्या 1 वर्षात असेल तर 0 क्लेम मिळतो
नंतर असेल तर बहुदा क्लेम मिळतो,
कारण आत्महत्या करणारा 1 वर्ष थांबत नाही
हा वेटिंग पिरियड नक्की 1 च आहे की कमी जास्त आहे माहीत नाही
हो एक वर्ष आहे
हो एक वर्ष आहे
निदान एलआयसी चा तरी असाच नियम आहे
मुंबई हायवेवर बंद पडलेल्या
मुंबई हायवेवर बंद पडलेल्या गाडीला मदत करायला थांबलेल्या एका व्यक्तीचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबीय मंडळींना विमा रक्कम नाकारली होती(3 वर्षापूर्वी ची केस असेल)
रस्त्यात धोकादायक प्रकारे दुसऱ्याला मदत करायला थांबणे हा त्या व्यक्तीचा स्वतःचा चुकीचा निर्णय होता या मुद्द्याने.
हे पाहता मुद्दाम केलेली आत्महत्या कव्हर करणाऱ्या आणि परतावा देणाऱ्या विमा कंपनी अतिशय कमी प्रमाणात असतील.
टर्म इन्शुरन्स असेल तर काहीच
टर्म इन्शुरन्स असेल तर काहीच मिळत नाही.
इन्व्हेस्टमेंट असेल तर सरंडर वॅल्यु मिळेल.
- हे विम्यात आत्महत्या कव्हर्ड नसेल तर.
https://ahmedabadmirror
https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/cover-story/is-gujarat-...
Dry Gujarat is becoming the most preferred destination for drug cartels with the 1,600-kilometre coastline being one of the key conduits to smuggle drugs due to its vast expanse and large number of unmanned jetties.More and more drugs, both natural and synthetic, have been seized in the state. Charas found on the high seas on the Gujarat coastline or seizure of homegrown cannabis or ganja in Amreli, or pharmaceutical manufacturers producing drugs to sell in African countries, the state has increasingly become a hub for illegal drugs in the past one-and-half years.
ड्रग चा धंदा गुजरातेत वाढत आहे आणि भौ तोरसेकर बोलतात, मोदीजी आता ड्रगवाल्यांचा नायनाट करत आहेत
मोदीजी ड्रग शोधायला चालले , तर मोठे ड्रगवाले गुजरातमध्येच आहेत,
नोटबंदी करून मोदीजी काळा पैसा पकडणार होते, तर देशात सर्वात जास्त काळे पैसे भरणारा गुजरातचाच निघाला
तोरसेकरांकडे ऑकेजनली चांगले
तोरसेकरांकडे ऑकेजनली चांगले मुद्दे असतात पण मी त्यांचे व्हिडिओज पॉलिटिकल पॅरोडी किंवा सटायर या अँगलने ऑकेजनलीच पाहतो. चांगली करमणूक होते.
सुशान्तच्या मृत्यूमुळे
सुशान्तच्या मृत्यूमुळे अंमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त होईल = नोटाबंदीमुळे लेस कॅश इकॉनॉमी आली.
मी खूप वेळा त्यांचे व्हिडिओ
मी खूप वेळा त्यांचे व्हिडिओ शांत मन ठेवून पाहण्याचा प्रयत्न केला !
विषय गंभीर असतात पण त्यांच्या पाल्हाळ लावून बोलण्याच्या शैली मुळे डुलक्या लै येतात .
अर्थात च गंभीर विषयात हि करमणूक कोणीही करू शकत नाही पप्पू शेठ शिवाय !
प्रत्येक वाक्य टाळ्या मिळण्या जोगे असतेच .
तोरसेकर खूप पाल्हाळ लावतात
तोरसेकर खूप पाल्हाळ लावतात म्हणून मीही त्यांचे व्हिडीओज बघत नाही. एक पूर्ण आणि एक अर्धा आत्तापर्यंत बघितले आहेत. पाच सात मिनिटं थोडक्यात म्हणणे मांडले तर ठीक.
स्पीड जास्त ठेऊन ऐकायचे
स्पीड जास्त ठेऊन ऐकायचे त्यांचे व्हिडिओ. मी १.५ चा स्पीड ठेऊन ऐकते पटापट. हातात काहीतरी काम घेऊन मगच ऐकते.
विषय गंभीर असतात पण त्यांच्या पाल्हाळ लावून बोलण्याच्या शैली मुळे डुलक्या लै येतात . >>>
निद्रानाशावर हमखास उपाय!
Pages