Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कमीत कमी त्या धाग्याचं नाव
कमीत कमी त्या धाग्याचं नाव सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली! बदलून सुशांतसिंह रजपूत...! खून आत्महत्या तपासणी असं तरी करा
अमीर आणि शाहरुख ला असेच
अमीर आणि शाहरुख ला असेच प्रश्न विचारले होते का हो ? त्यांना पण इथे सुरक्षित वाटतं नव्हते ना ?>>> मला वाटते की या दोघाना तसेच नसिरुद्दिन शाह व शबाना आझमी याना पण हिन्दुस्थानात राहणे असुरक्षित वाटत होते म्हणून कदाचित राउतसारखे महाराश्ट्रप्रेमी भडकले नसतील. राउताना वाटले असेल की हिन्दुस्थान महराश्ट्रापेक्षा वेगळा आहे हे ही कारण असेल.
https://twitter.com/rose_k01
https://twitter.com/rose_k01/status/1301934783816036352?s=09
बॉलीवुड मधील स्टार्स यात ड्रग्स ने धुंद झालेले दिसत आहेत !
सेनेत फक्त संवंग भडकावू
सेनेत फक्त संवंग भडकावू विधाने करणाऱ्या नेत्यांची मोठी फळी आहे पुन्हा सिध्द झाले !
पण सोयीस्कर आक्रस्ताळी विधाने करून जनते मध्ये स्थान निर्माण करता येत नाही .
विधाने करण्याच्या स्पर्धेत मुंबईच्या महापौर सुद्धा अग्रणी स्थानी विराजमान झाल्या आहेत .
देशाची आर्थिक राजधानी आणि जगात मानाचे स्थान असलेल्या मुंबई ला मान खाली घालायला लावणारी विधाने करण्याचे काम सत्ताधारी सेनेची लोक करत आहेत .
असल्या गोष्टींना मुख्यमंत्र्यांनी चाप लावला पाहिजे पण वारा घालणारी लोक दिमतीला ठेवण्याची सवय महागात पडणार !
कंगना इतकी मोठी आहे का की तिच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करण्यासाठी राज्यसभा खासदार आणि अख्खी सेना तुटून पडली आहे?
स्वतःची कपडे का फाडून घेत आहेत हि लोक ?
गलिच्छ राजकारणासाठी सतत युपी बिहार ला नाव ठेवणारी सेना त्याच पंगत ला कधी जावून बसली हे सेनेला कळले हि नाही !
बरं हा विषय जितका वाढवला जाईल तितकी सेनेची चर्चा होणार आणि नामुष्की वाढणार .
कंगना सारख्या फटकळ बाई बरोबर वाद घालण्यात कसला आलाय पराक्रम ?
उद्या जरी महिला आघाडीने कंगना ला दोन तीन लगवल्या तर राऊत ची इज्जत वाढणार आहे का ?
बरं यांचा हाच जोश मात्र त्या वेळी थंड पडला होता ज्या वेळी करिश्मा भोसले हि मराठी मुलगी मस्जिद वरील भोंग्यांचा त्रास होतो ( सर्वोच्च न्यायालय चा निर्णय असताना ) म्हणून एकटी भिडली होती ! त्या वेळी सेनेचे सगळे वाघ बिळात जाऊन बसलेच होते उलट शांतता नष्ट केली म्हणून पोलीस कडून तिला नोटीस पाठविण्याचा पराक्रम सेनेने पार पाडला !
आणि हे राऊत पुन्हा मराठी माणूस वरून ज्ञान पाजायला मोकळे !
हे जर खरं असेल तर फारच भयंकर
हे जर खरं असेल तर फारच भयंकर आहे.
Sushant Case: The Mystry of Four Deaths Related to Rhea and Sushant | Anju Pankaj | Capital TV : https://www.youtube.com/watch?v=XDbq1lOjLFE
पत्रकार किती गोंधळ घालतात.
पत्रकार किती गोंधळ घालतात. एनसीबी स्वतःहून मिडीयासमोर आली आहे तर रीप्लाय देणाऱ्या ऑफीसरना नीट बोलू देत नाहीत, सगळं थोडी मिडियासमोर ओपन करणार आत्ता. नुसता प्रश्नांचा भडीमार.
शौविक आणि मिरांडाला सात दिवसांची NCB कोठडी. कैजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
दोन दिवसांत मुंबईचा प्रवास पाकव्याप्त काश्मीर ते जय यशोदामाता. जय महाराष्ट्र जय मुंबई.
पोलीस सत्ताधारी पक्षाचे
पोलीस सत्ताधारी पक्षाचे प्यादे बनून काम करीत असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.
http://lokmanthannews.blogspot.com/2018/06/blog-post_173.html
पण हा आरोप करणार्यांना कोणी दोष देणार नाही कारण हा आरोप झाला तेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार होते.
हे जर खरं असेल तर फारच भयंकर
हे जर खरं असेल तर फारच भयंकर आहे. >>> हम्म्म. बघुया CBI, NCB वगैरे मुळापर्यंत जातायेत का. खरं असेल तर सर्वच पाळेमुळे खणून काढायला हवीत.
जोशी काकांच्या कोहिनूर
जोशी काकांच्या कोहिनूर हॉस्पिटल मध्ये admin dept सांभाळत आहेत रिया चे पप्पा !
पण एवढ्याशा कारणा साठी सेना मैदानात उतरेल असे वाटतं नाही .
शिवाय जोशी काकांची गाडी सेनेने साईड ट्रॅक ला लावलेली आहे .
उरली सुरली कसर भरून काढायला
उरली सुरली कसर भरून काढायला राखी सावंत ने उडी घेतली आहे,
सुशांत ने तिच्या स्वप्नात येऊन तुझ्या पोटी जन्म घेईन असे संगितले आहे म्हणे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=148669046740767&id=100047930...
(No subject)
संजय राउतांना आवरायची गरज आहे
संजय राउतांना आवरायची गरज आहे .त्त्यांच्या वक्तव्याचा निषेध.
उगाच तिला एवढा भाव देताहेत लोक.
पोस्टर आले
पोस्टर आले
कमलीणीची रुदाली लागली
https://www.deccanherald.com
https://www.deccanherald.com/state/karnataka-politics/ragini-dwivedi-cam...
कर्नाटक- ड्रग प्रकरणी अटक झालेली रागिणी द्विवेदी 2019 मध्ये भाजपची प्रचारक होती.
काँग्रेस ला २०१४ मध्ये चार
काँग्रेस ला २०१४ मध्ये चार पाच प्रवक्त्यांनी
मिळून वायफळ बडबड करून बुडवले , पण सेनेला एकटे संजय राऊत सेनेला बुडवणार हे निश्चित !
Ncb स्वतंत्र संस्था आहे ती
Ncb स्वतंत्र संस्था आहे ती खास ड्रग साठी च बनवली आहे.
तिला spl Adhikar आहेत.
त्यांची मुंबई मध्ये ब्रंच आहे.
किती ड्रग माफिया वर त्यांनी कारवाई केली .
आता फक्त नाटक चालू आहेत .
जे पकडले त्या मधील काही लोकांना लगेच जामीन पण मिळाला.
कोणाकडेच ड्रग सापडले नाही बाकी लोक पण 8 ते 10 दिवसात सुटतील.
ड्रग माफिया वर काहीच कारवाई होणार नाही .
त्या बिहार च्या डी जी पी ने
त्या बिहार च्या डी जी पी ने रिया ची औकात काढली तेंव्हा बॉलीवुड मधील लिबरल डी जी पी वर जाम खवळले होते !
पण आता राऊत साहेब नी आज कंगना च्या बापाचा उद्धार आणि तिला हरामखोर म्हणाले ,
मग आता बॉलीवुड लिबरल नी पुन्हा एकदा " selective outrage " दाखवले .
राऊत नेहेमीच उत आणतात.
राऊत नेहेमीच उत आणतात. त्यांना नाही का महिला आयोगाची नोटीस आली, एव्हाना यायला हवी होती.
मुंबईच्या महापौर...त्यांची
मुंबईच्या महापौर...त्यांची ट्विट्स बघा!
Mrunmayee कंगना सारख्या मुली सरळ सांगुन ऐकणार्या नसतात .चप्पल ने तोंड फोडून घेणाऱ्या पैकी आहे
https://mobile.twitter.com/KishoriPednekar/status/1301934873649668096
आज मुंबई कराणी फोटोला चप्पला मारल्या आहेत .प्रत्यक्षात भेटली तर चप्पल ने फोडुन बडवुन काढतील कारण मुंबई व महाराष्ट्र चा अपमान सहन करणार नाही. तसेच जे पोलीस दिवस रात्र जनतेच रक्षण करतात त्यांच्या वर या उठवळ बाईचा विश्वास नाही
https://mobile.twitter.com/KishoriPednekar/status/1301949744957124608
पुणे पोलिसांकडून सत्तेचा
पुणे पोलिसांकडून सत्तेचा गैरवापर, एसआयटीमार्फत चौकशी करा : शरद पवार
https://www.esakal.com/pune/sharad-pawar-criticized-pune-police-elgar-pa...
"पोलिस यंत्रणाही भाजपाची धुणीभांडी करु लागली आहे. पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांच्या घरातील स्वच्छतागृहाची सफाई करावी." - उद्धव ठाकरे, 2015
https://www.loksatta.com/thane-news/udhav-target-cm-and-bjp-1156125/
हा धागा पुढच्या सहा
हा धागा पुढच्या सहा महिन्यांनी परत वर आणावा
कोणताच ड्रग डिलर वर कोर्टात केस चालू नसेल.
सुशांत चा खून होता असे आरोप पत्र कोर्टात सादर झालेले नसेल.
आणि आत्महत्या च आहे असे समजून केस बंद होईल.
असा माझा अंदाज आहे.
एवढं गाजावाजा चालला आहे ह्याचा अर्थ हा विषय राजकारणाचा झाला आहे बाकी काही तथ्य नाही.
पुडच्या सहा महिन्यात सर्व स्पष्ट होईल च.
तोपर्यंत ज्यांचा वेळ जात नाही त्यांनी कमेंट कमेंट खेळ खेळावा.
आज थोडे विनोदी सकाळी सकाळी
आज थोडे विनोदी सकाळी सकाळी बघावं म्हणून अर्णव गोस्वामी चा रिपब्लिक भारत लाईव्ह बघत होतो.
दोन स्त्रिया आणि 1 पुरुष रिपोर्टर रिया ची न्यूज cover करत होते.
एवढे जोरात बोंबलत होते की खासा बसला त्यांचा.
सर्रास खोटे लाईव्ह बोलत होते .
10 मिन च्या बातमीपत्र मध्ये तीन वेळा तोंडावर पडले.
पुरुष रिपोर्टर बोलत होता 20 मिन मध्ये रिया बाहेर निघत आहे माझी पूर्ण खात्री आहे त्याची जबाबदारी मी घेतो घड्याळ लावा.
ती अर्धा तास होवून गेला तरी निघाली नाही.
त्या रिपोर्टर च चेहरा बघण्यासारखा झाला.
परत तोच बोंबलत सांगत होता स्वतःच्या गाडीत रिया जाईल मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो.
तसे काही घडले नाही परत तो रिपोर्टर तोंडावर पडला.
असल्या बकवास न्यूज चॅनल la परवानगी कशी मिळते.
ह्यांना काही गाईड लाईन्स आहेत की नाही.
जग हसत असेल भारतावर असल्या न्यूज बघून.
चीन तर म्हणत असेल भारतीय न्यूज चॅनल ची ही लायकी तर भारतीय उत्पादन ची काय लायकी असेल.
दारिद्र्य रेषे च्या थोडेसे वर
दारिद्र्य रेषे च्या थोडेसे वर असणाऱ्या लोकांना हिंदी न्यूज चॅनल हाच एक फुकट टाईमपास आहे आणि ते मूर्ख चॅनल वाले फक्त याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून बातम्या ओरडून ओरडून सांगत असतात .
शेवटी ज्याने त्याने ठरवावे आपण हे चॅनल का पाहायचे !
कितीही ब्रेकिंग न्यूज असेल तरी पाच दहा मिनिटात चॅनल बंद करणे हा सर्वोत्तम पर्याय.
आमच्याकडे लोकल न्यूज चॅनल्सवर
आमच्याकडे लोकल न्यूज चॅनल्सवर हा धुडगूस नाही म्हणे.
तेलुगू शिकलो असतो तर सुखी झालो असतो.
उद्या जर रिया यातून सुटली तर
उद्या जर रिया यातून सुटली तर रिपब्लिक चे एक दोन रिपोटर नक्कीच पागल होतील....रिया कि गाडी जा रही....निकल रही है......टर्न ले रही....रिया.. रिया. रिया
पण बरबटलेल्या , तथ्यहीन न्यूज
पण बरबटलेल्या , तथ्यहीन न्यूज दाखवणे , आक्रस्ताळी पना करणे साऊथ आणि नॉर्थ चॅनल नीच सुरू केले आहे .
त्या मानाने आपली मराठी चॅनल्स खरेच सोज्वळ आहेत .
रिपब्लिकनला शिव्या देणारे तो
रिपब्लिकनला शिव्या देणारे तो चॅनेल बघतातच का असा प्रश्न पडलाय. मी कोणतेही चॅनल्स बघत नसल्याने सुखी आहे.
रिया आरोपी असेल नसेल पण सारखे
रिया आरोपी असेल नसेल पण सारखे ओरडून ओरडून एकाध्या व्यक्ती चे चरित्र हणन करणे योग्य नाही
.
उद्या तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिनी काय वेडे वाकडे पावूल उचलले तर जबाबदार कोण.
कुठे तरी न्यूज चॅनल नी स्वयं शिस्त पाळायची गरज आहे.
संयमित पने न्यूज कव्हर करण्याची अपेक्षा आहे.
सुशांत ला न्याय मिळावा असे सर्व लोकांनाच वाटत.
पण हे जे काही मीडिया चे चालले आहे ते अयोग्य आहे.
ती काय टेररिस्ट नाही..
एवढे हिम्मत वाले हे न्यूज वाले आहेत तर दाऊद किंवा कोणत्या ही gangstar,किंवा टेररिस्ट ची पल पल की न्यूज ध्या,त्यांचा पाठलाग kara.
थायलंड मध्ये 12 मुल आणि
थायलंड मध्ये 12 मुल आणि त्यांचा कोच गुहे मध्ये अडकले होते तेव्हा त्या देशातील मीडिया नी किती mature पना दाखवला होता.
तशी घटना भारतात घडली असती तर भारतीय मीडिया नी तमाशा चा फड लावला असता.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ला.
अमेरिकन मीडिया किती संयमित प्रसंग कव्हर करीत होती.
नाही तर आपली भारतीय मीडिया unmature.
मुंबई वरील अतिरेकी हल्ला, बॉम्ब स्फोट असू, नाही तर आताची सुशांत ची केस असू.
बेजबाबदार पणाचा कळस करत आहे मीडिया.
भारतीय आणि विशेषतः उत्तर
भारतीय आणि विशेषतः उत्तर भारतीय लोक्स फार लाऊड आणि नॉईजी असतात. याचा अनुभव परदेशात लगेच येतो. वचवच-मचमच टाईप असल्याने आपले लोकं काहीसे ऑड वाटतात इतर देशातील लोकांच्या मानाने. हीच प्रवृत्ती आपल्या मीडियात उतरली आहे. तसे नसते तर अशी भिकारछाप वृत्तांकने लोकांनी पसंत नसती केली. हे ब्रेकिंग न्यूज- स्पेशल चर्चा- बॅकग्राऊंड ला वाजणारे हॉलीवूड ऍक्शनपटांतील संगीत त्याच प्रवृत्तीचा एक भाग आहे. नको त्या गोष्टींचा सोहळा करून करून सारा गम्भीरपणा लोप पावलाय बातम्यांतला.
Pages