Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ही लोक म्हणजे कोण ? इन जनरल
ही लोक म्हणजे कोण ? इन जनरल बंगाली, बिहारी की रियाच्या घरचे?>>
साधना, तुम्हाला मी ती माहिती देत नाही, शोधून बघा सापडेल तुम्हाला. नसेल शोधायची तर नका शोधू अर्धवट माहितीवर टीका टिप्पणी करायलाच धागा आहेच.
फिजिक्सवर विश्वास ठेवणार्यावर काळ्या जादूचा प्रभाव पडला.>> बरं विश्वास ठेवत नसेल तरच काळ्या जादूचा प्रभाव होतो का.
काय बोलताय याचा क्षणभर थांबून विचार करा आणि मग बोला>>कसं आहे ना जो तो assumptions करतोय आणि तेच खरं मानून चालतोय, पण बाकीच्यांनी काही बोलले तर मात्र गंमत वाटते.
तुम्हाला रियावर विश्वास ठेवायचाय नक्कीच ठेवा, ती खरी वाटतेय, घरचे खोटे वाटतायत, तर असू दे, पण तुम्हीच कसे बरोबर बाकीचे कसे गंमत करतात हे जरा जास्तच होतंय.
तुम्हाला गम्मत वाटते तर नक्कीच हसून मजा घ्या.
Submitted by vijaykulkarni on
Submitted by vijaykulkarni on 27 August, 2020 - 23:29 >> +१
आता पुढे काय होणार असा अंदाज
आता पुढे काय होणार असा अंदाज आहे?
येते 8-10 दिवस सुशांत व त्याच्या घरच्यांबद्दल, अंकिताबद्दल निगेटिव्ह बातम्या समोर आणल्या जातील का?
कोणी राजकारणी मानभावीपणे राजीनामा तर देणार नाही ना?
देशात विद्यार्थी चळवळ किंवा भाषिक अस्मितेचा मुद्दा पेट(व)ला गेला तर सुशांतचा विषय मागे पडेल का?
आणि हो ती काळी जादू मी माझ्या
आणि हो ती काळी जादू मी माझ्या मनाने सांगितलेले नाही, जे ऐकले ते लिहिले. मी इथे लिहिले म्हणजे माझा विश्वास आहे /नाही याचा संबंध येतच नाही. त्यामुळे मी कशी अंधश्रद्धाळू वगैरे किंवा ती जादू कशी खरी खोटी यावर चर्चा नको.
सुशान्तने अमीरच्या पीके
सुशान्तने अमीरच्या पीके मध्ये काम केलं, तेही पाकिस्तानी तरुणाचं ; केदारनाथमध्ये लव्ह जिहादचा संदेश दिला आणि पद्मावतच्या वेळी स्वतःच्या नावातलं राजपूत काढत असल्याचं सांगितलं म्हणून त्याच्या नावाने बोटं मोडणार्या लोकांचा जीव आज सुशान्तसाठी तुटत असेल यावर माझा तिळमात्रही विश्वास नाही.
देशापुढल्या अक्राळविक्राळ समस्यांवर (करोनाचे विक्रमी आकडे, हँड ऑफ गॉड मुळे खड्ड्यात चाललेली इकॉनॉमी, भारताच्या हद्दीत ठाण मांडून बसलेला चीन ,उत्तर प्रदेशातल्या गुन्ह्यांच्या रोजच्या बातम्या) कोणतेही उपाय नाहीत म्हणून हे पद्धतशीरपणे योजलेले डायव्हर्शन आहे.
सुशान्तशी आपल्याला काही देणं घेणं नाही. खान मंडळी, महेश भट्ट यांना झोडपायला निमित्त हवं म्हणून आम्हे लिहितो असं एका सदस्याने इथे एकापेक्षा जास्त वेळा लिहिलं आहेच.
घातलेला हा धूळफेकीचा पडदा आहे.
स्थलां तरित मजुरांच्या
स्थलां तरित मजुरांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत एजी / एस जीं ंनी व्हायरल फेस बुक पोस्ट्समधला फेक मजकूर न्यायालयात वाचला. मजुरांचे हाल मीडिया रंगवून सांगते आहे, असं म्हटलं.
आता काय चाललं आहे?
गेलेल्याचा आदर ठेवतो असं म्हणत त्याच्या मृतदेहाचे फोटो टीव्हीवर दाखवलेले चालतात आणि त्याला न्याय मिळण्यासाठी भांडतोय असा दावा करणारे याचे समर्थन करतात.
एस टी स्टँड किंवा रेल्वे
एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशन वर अचानक गोंधळ होतो, पाकिट मार , पाकिट मार.
एका तरुणाला काही लोक बुकलून काढत असतात. काही बघेही आपली हात साफ करून घेतात.
तो खरेच पाकिटमार आहे का? मतिमंद असेल का? त्याने खरेच पाकिट मारले असेल का? पोलिस येइपर्यंत थांबणे योग्य ठरेल का? मारहाणीत तो मरणार तर नाही ना? याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते.
हेही फार वेगळे नाही.
साधना तुमच्या दोन्ही
साधना तुमच्या दोन्ही प्रतिसादातील प्रत्येक वाक्याशी सहमत. मलाही पहिल्यापासून वाटते की ही आत्महत्याच असावी/आहे. ज्याने नैराश्य आणि इतर मनोविकारांचे रुग्ण जवळून बघितले असतील, त्यांचे मूडस swaying अनुभवले असेल त्यालाच समजू शकेल की वर वर अतिशय हुशार, कलांमध्ये प्रवीण, उत्कृष्ट स्मरणशक्ती असणारे लोक क्षणार्धात कसे हिंसक, आक्रमक ho ूूूूूूूूूूूूूूूू शकतात. त्यांचे शरीर सुरुवातीला तगडे असते. अंगात जोर असतो. ते त्याला समजवायला जाणाऱ्या माणसाला ढकलून देऊ शकतात, त्याला इजा करू शकतात.एखादी गोष्ट आवडली तर ती मिळवण्यासाठी कोणत्याही अकल्पनीय थराला जाऊ शकतात. मुख्य म्हणजे जगासमोर ते मुखवटा धारण करतात आणि आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा आणि ती जपण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे प्रतिभा असते. काही जण उत्कृष्ट चित्रे काढतात, काही जण उत्कृष्ट गातात. ते जेव्हा स्टेज वर उत्कृष्ट परफॉर्मनस देत असतात तेव्हा बॅक स्टेज laa त्यांची आई त्याची पँट उतरवायला किंवा चुरीदारची नाडी बांधायला उभी असते. परफॉर्मन्स संपल्यावर त्यांचे अवसान गळते. लोक प्रशंसा करण्यासाठी गराडा घालतात. त्याने फुगून जाऊन आई वडिलांना क:पदार्थ लेखतात. असे अनेक असमतोल असतात जे सहजासहजी इतरांना कळत नाहीत. ही मुले/ माणसे इतरांसमोर कसलेही हट्ट करतात. पालक मुलाची ही सवय मोडण्यासाठी शांतपणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रयत्न करीत असतात तर बघ्यांपैकी एखादा पटकन जाऊन ती गोष्ट आणून देतो आणि मग ते मूल/ माणूस शांत झाल्यावर जितं मया म्हणून पालकांना जाणवूn देऊ बघतो की ते त्यांचे पालकत्व निभावत नाही आहेत, त्यांना मुलाला नीट सांभाळता येत नाहीये आणि ते मुलाला बिघडवत आहेत.
हज्जार गोष्टी आहेत. लोकांनी अनभिज्ञ असणे हा त्यांचा गुन्हा नाही, पण माहिती नसताना मौन न राखता तारे तोडणे, शेरे ताशेरे मारणे हा नक्कीच नैतिक गुन्हा आहे.
प्रतिसादांची सर्व पाने वाचताना प्रत्येक वेळी ह्या भावना मनात आल्या पण लिहायचे टाळले. आता सर्वांचे सर्व लिहून झाले असावे, आणि फारशी राजकीय चर्चा होणार नाही म्हणून, आणि मुख्य म्हणजे साधना यांचे प्रतिसाद वाचल्यावर लिहावेसे वाटले.
धन्यवाद साधना.
गम्मत आहे आता १-२ वेगवेगळी
गम्मत आहे आता १-२ वेगवेगळी उदाहरण देवुन न्याय मिळेपर्यत थान्बा म्हणणारे याच धाग्यावर काही पान मागे जावुन बघितल तर हि आत्महत्याच आहे पण कुटुन्ब स्विकारत नाहीये मग मयुरी देशमुखच्या सासुचा दाखला देवुन बघा कशी स्विकारली आत्म्हत्या अस पाहिजे सान्गत होते.
रिया मुलाखतीनंतर काही जण
रिया मुलाखतीनंतर काही जण सुशान्तच्या घरच्यांचीही चौकशी व्हायला हवी असं म्हणत आहेत.
साधना, तुझे दोन्ही प्रतिसाद
साधना, तुझे दोन्ही प्रतिसाद पटत आहेत
ट्युलिप अहो इथे कोण सिबीआय
ट्युलिप अहो इथे कोण सिबीआय किंवा मुंबई पोलिसात वरिष्ठ पदावर काम करून ह्या केसची खरी माहिती देतेय? मी वर लिहिलेय की मला इंटरव्ह्यू बघून जे वाटले ते लिहिले. तुम्हाला उद्देशून काहीही लिहिले नाही. इथे लिहिणारे इतर जनही तसेच लिहिताहेत. कोणी सीबीआय किंवा मुंबई पोलिसात आहेत तर कृपया सांगा. म्हणजे फक्त तुमचेच प्रतिसाद वाचू.
काळ्या जादूचे मी ह्यासाठी लिहिलेय की जनरली विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकानी देव, जादू, मंत्र तंत्र यावर विश्वास ठेवू नये असा भारतीय लोकांचा आग्रह असतो. ज्याला विज्ञान कळले त्याला ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध करता येत नाहीत त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे कळायला वेळ लागत नाही. सुशांत गणितज्ञ असता किंवा इतिहासतज्ज्ञ असता तर मला त्याच्या अंधश्रद्ध असल्याचे काही वाटले नसते पण पदार्थविज्ञान उर्फ फिजिक्स ज्याला कळले, निदान ज्याचे समर्थक त्याला कळले असे म्हणतात, त्याला काळी जादू ही अंधश्रद्धा आहे हे कळले नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
आणि तरीही जो काळ्या जादूचा परिणाम होऊन आत्महत्या करतो तो मानसिकदृष्ट्या किती विचलित असेल. हे विचलितपण त्याच्या आजारामुळे आले आहे असे त्याचे डॉक्टर म्हणताहेत ते न मानता त्याच्या परिस्थितीमुळे ते आले असे म्हणायचे म्हणजे परत मानसिक आजारांबद्दल काहीही माहिती नसल्यासारखे आहे.
भरपूर सिगरेट पिणारे काहीजण लंग कॅन्सरने मरतात पण अजिबात न पिणारेही याच कॅन्सरने मरतात. त्यामुळे प्रत्येक वेळी कॅन्सरचा संबंध सिगरेटशी लावता येत नाही तसेच प्रत्येक मानसिक आजाराचा संबंध फक्त भोवतालच्या परिस्थितीशी लावता येणार नाही इतकेच. तो असेलही, नसेलही.
लोकांनी अनभिज्ञ असणे हा
लोकांनी अनभिज्ञ असणे हा त्यांचा गुन्हा नाही, पण माहिती नसताना मौन न राखता तारे तोडणे, शेरे ताशेरे मारणे हा नक्कीच नैतिक गुन्हा आहे. >>>
पूर्णपणे सहमत.
कॉम्बीनेशन :
कॉम्बीनेशन :
मानसिक डिप्रेशन
आजूबाजूचे नकारात्मक वातावरण
सिने क्षेत्रातले राजकारण (ते कोणत्याही क्षेत्रात असतेच)
(बहुधा आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तावरुन) (आता मला परत मिसोजिनीस्ट म्हणणार पब्लिक) गोल्ड डिगर गर्लफ्रेंड
बहीणी आपल्या संसारात/लहान मुलांत बिझी असणं, त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष न दिलं जाणं.
ड्रग्स, नशा वाढवत जाणे, त्यातून घडलेले ओव्हरडोस, भास यासारखे प्रकार
(काही अंडरवर्ल्ड कडून आलेल्या धमक्यांचा कोन असल्यास तो)
पैसे, प्रसिद्धी आणि सोशल मिडीया ट्रोलिंग मुळे अधिक लॉकडाऊन मुळे आलेले वैफल्य
या सगळ्याचा एकत्र परीणाम म्हणजे घडलेली घटना.
सुशांत अगदी व्यवस्थित होता, बाकी सगळे खोटे असे कोणीही म्हणत नाहीये, म्हणू नये.
तसेच त्या मुलीने खून केला वगैरे असेही आता म्हणायचे नाहीय. सध्या तिच्याबद्दल अगदी खास सहानुभूती बाळगावी असे मनापासून वाटत नाहीये. (तिला बाजू मांडण्याची संधी आहेच.) आणि ती बाळगली नाही म्हणून मॉब लिंचर्स किंवा पाकिटमाराला बदडून जीव घेणार्यांच्या पंक्तीत लगेच मी जाऊन बसावं असंही वाटत नाहीये. ती निष्पाप, व्हिक्टीम, स्केपगोट असेल तर बाजू समोर येईलच.
एकंदर परत एकदा झगमगत्या, वरुन सुंदर चकचकीत दिसणार्या क्षेत्राची अत्यंत कुरुप बाजू समोर आलीय.
साधना तुम्ही मुलाखत बघून
साधना तुम्ही मुलाखत बघून लिहिलेय त्याला मी काहीच नाही म्हणाले, उलट तुम्हाला रिया खरी वाटते तर तो तुमचा दृष्टिकोन असू शकतो हे लिहिलंय. तुम्ही जे काळ्या जादूबद्दल उपहासात्मक लिहिलेय, त्याबद्दल लिहिलंय. सुशांत physics तज्ञ होता, तो काळी जादू करत नव्हता, त्याचा विश्वास नसेलही. पण रिया च्या घरी हे प्रकार चालतात असं शेजारणीने सांगितले तेवढंच मी लिहीलं. असं काही करणारे ते विचित्र लोकं आहेत अशा अर्थी. त्यात त्याच्या समर्थकांचा काहीच संबंध नाही.
त्यात रिया सुशांत वर असं काही करत असेल किंवा त्यामुळेच त्याने काही आत्महत्या केली असं कुठेही म्हंटल नाहिये. तुम्हाला त्यात गम्मत वाटली त्यासाठी तो प्रतिसाद होता.
Submitted by mi_anu on 28 August, 2020 - 11:21 >>अगदी सहमत
लोकांनी अनभिज्ञ असणे हा
लोकांनी अनभिज्ञ असणे हा त्यांचा गुन्हा नाही, पण माहिती नसताना मौन न राखता तारे तोडणे, शेरे ताशेरे मारणे हा नक्कीच नैतिक गुन्हा आहे.>>>हीरा तुम्ही मानसिक अस्वस्थ असलेल्या व्यक्तीबद्दल जे लिहिलंय ते पटलं... पण तुमचं हे वाक्य खटकलं... कारण सुशांत केस मध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या कळाल्यानंतरही लोकांनी त्याला मानसिक आजार होता हे मानून गप्प बसावं, हे नाही पटलं
सुशान्तशी आपल्याला काही देणं
सुशान्तशी आपल्याला काही देणं घेणं नाही. खान मंडळी, महेश भट्ट यांना झोडपायला निमित्त हवं म्हणून आम्हे लिहितो असं एका सदस्याने इथे एकापेक्षा जास्त वेळा लिहिलं >>>>>
व्हय !
व्हय !
मीच लिवल व्हत .
पण आमाला कॉन इचार्तय ?
मीडिया न बॉलावल तर आमी बी रिया अन भट च्या इरोधात लेक्चर ठोकणारच .
सुशांत वर आमचा लैच जीव आस काय न्हाय
पण आतेरिकी ची बाजू घेवून रात्री १२ वाजता न्यायालय उघडायला लावणाऱ्या आणि मुंबई हल्ल्यात पाकिस्तान चा हात हाय हे सिध्द झालं तरी बी आर एस एस वर आरोप करणारा आश्रफ भट्ट सुशांत च्या केस मदी निर्दोश कसा निगल ?
जरा डॉक चालवा की !!!
तो अश्रफ दुबई मदील डाकू लोकाबरोबरं दोस्ती ठेवतो आणि रिया ,जिया आणि सवताच्या मुली बरोबर कसलबी फोटो व्हिडीव काढीत असतो तो माणूस लै गेमाडा असणार हे नक्की !
आणि भरत राव असल्या इकृत माणसाची तुमि कशापाई बाजू घेताय ?
रिया म्हणते तिच्या स्वप्नात
रिया म्हणते तिच्या स्वप्नात सुशांत आला आणि म्हणाला जा टीव्हीवर आणि सांग खरं काय आहे ते. म्हणून ती आजतकवर आली होती.
तिला सांगा हो सुशांतने आता
तिला सांगा हो सुशांतने आता एकदा आजतकवर येऊन सत्य सांगावे.
नाहीतर तुम्हीच सांगा. तुमच्या ओळखीत कुणी हडळ बीडल असेल तर बघा ती करते का निरोप्याचे काम

हलकेच घ्या हो..
(No subject)
आधीच्या लोकांचे interviews
आधीच्या लोकांचे interviews पाहूनच हादरली असेल बिचारी..}
हो ना. अर्णवपुढे मु़ंबइ पोलीस, सीबीआय, इ डी काहीच नाहीत.>>>@भरत, जरा उशीरा प्रतिसाद देतेय कारण मला खरंतर कुठल्याच वादात पडायला आवडत नाही.. पण का कुणास ठावूक सुशांतसाठी हे पण करतेय... तर मुद्दा असा की मुंबई पोलिस, सीबीआय, इ डी हे अर्णवपेक्षा नक्कीच ग्रेट आहेत पण त्यांनी केलेल्या तपासातील प्रत्येक गोष्ट आपल्या पर्यंत पोचतेच असं नाही.. तसं झालं असतं तर ही केस कधीच solve झाली असती... कारण मुंबई पोलिसांनी exactly कसा तपास केला ते कळलं असतं..राहता राहिला अर्णवचा प्रश्ण तर त्याने सिद्धार्थ पिठाणी आणि संदीपचे घेतलेले interviews पाहून मला तरी ते दोघेही संशयित वाटले.. आणि म्हणुन रियाची मुलाखत त्याने घेतली असती तर जास्त संयुक्तिक झाले असते असं वाटलं... आणि हे लोक जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर अर्णवच्या प्रश्नांना घाबरून का पळतात?
मोक्षु, बरोबर मानसिक आजार
मोक्षु, बरोबर मानसिक आजार होता म्हणजे आत्महत्याच असा निष्कर्ष काढता येत नाही. शक्यता वाढते एवढेच.
मुंबई पोलिस, सीबीआय, इ डी हे
मुंबई पोलिस, सीबीआय, इ डी हे अर्णवपेक्षा नक्कीच ग्रेट आहेत पण त्यांनी केलेल्या तपासातील प्रत्येक गोष्ट आपल्या पर्यंत पोचतेच असं नाही.. तसं झालं असतं तर ही केस कधीच solve झाली असती... कारण मुंबई पोलिसांनी exactly कसा तपास केला ते कळलं असतं>>>
जगातील कुठलेही पोलीस रोज मीडियाला तपास अपडेट द्यायला बांधील नाहीयेत आणि तसे द्यायला लागले तर गुन्हेगार हाती लागणारच नाहीत. तपास पूर्ण झाल्यावरही तो सरकारी फाईलीत बंद होतो. कोर्टात केस उभी होऊन गुन्हेगार कोर्टात सादर झाले तरच सामान्य माणसाला कळते. जे कळते तेही मीडियाने स्वसोयीचे छापलेले तितके कळते.
रोज तासातासाला कोण घरी गेलं,
रोज तासातासाला कोण घरी गेलं, डिलीव्हरी बॉय गेला, ५ तारखेला घरी २ मिनीट थांबलेल्या पोस्टमन ची मुलाखत, टॉयलेट च्या फ्लश चा आवाज आला, दारासमोर १२.५६ ला कुत्रे ३ वेळा भुंकले या लेव्हल चे मायक्रो अपडेट देण्यापासून मिडीयाला कोणीतरी थांबवावे.
तपास लागल्यावर थेट सांगा.
असं कसं, कुत्रे तज्ञ, टॉयलेट
असं कसं, कुत्रे तज्ञ, टॉयलेट तज्ञ यांना बोलावून त्यांची मौलिक मते नको का घ्यायला?
जगातील कुठलेही पोलीस रोज
जगातील कुठलेही पोलीस रोज मीडियाला तपास अपडेट द्यायला बांधील नाहीयेत आणि तसे द्यायला लागले तर गुन्हेगार हाती लागणारच नाहीत.>>exactly, म्हणूनच मुंबई पोलिस, सीबीआय, इ डी यांची तुलना मीडियाशी नाही केलेलीच बरी..
बाकी रियाच्या interview च्या आधी debate घेतली आज तक नी त्यामधे दोन्ही बाजूचे पॉईंट्स आहेत.. रियाने दिलेल्या प्रश्नांची उत्तरं खरी वाटत असतील तर ती पण पहा..
"कारण सुशांत केस मध्ये ज्या
"कारण सुशांत केस मध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या कळाल्यानंतरही लोकांनी त्याला मानसिक आजार होता हे मानून गप्प बसावं, हे नाही पटलं"
माझ्या प्रतिसादातले पहिले एकच वाक्य सुशांत विषयी होते. बाकी संपूर्ण भला मोठा प्रतिसाद मनोरुग्णांचे वर्तन कसे फसवे असते ह्याविषयी होता. आणि मनोरुग्णतेविषयी अथवा या रुग्णांच्या फसव्या वर्तनाविषयी (behavioral patterns )माहिती नसणे हे स्वाभाविक आहे, तो काही गुन्हा नाही, पण अशी माहिती नसताना तारे तोडणे, शेरे ताशेरे मारणे हा नैतिक गुन्हा आहे, हे माझे मत आहे.
एका अतिहुशार tallented
एका अतिहुशार tallented व्यक्तीचा असा शेवट, फार वाईट वाटत. त्याला drugsची सवय लावली गेली असं जास्त वाटतंय (as per रिया फोन chatting) किंवा त्याने लावून घेतली असेल तर हे दोन्ही फार वाईट आहे. बहिण त्याच्याजवळ राहत होती काही दिवस असं वाचलं, तिच्या लक्षात आलं नाही का. त्याला rehab सेंटरला त्याच्या घरच्यांनी नेण्याचे प्रयत्न केले नाहीत का.
तो गेल्यापासून त्याचे बरेचसे व्हिडीओज फिरत होते त्यात त्याचे डोळे तारवटलेले बघून, हा इतकी दारू पित होता का असं मी बहिणीला म्हणाले पण होते, त्याचे असे व्हिडीओज का जास्त दाखवतायेत, नंतर त्याचे चांगले व्हिडीओज पण दाखवले पण मी तरी आधी जास्त नशेत असल्याचे बघितले आहेत.
सुशांत माझा आवडता कलाकार होता, पवित्र रिश्ता मुळे, मी त्याला मानवच म्हणते अजुनही. त्यामुळे मला असे व्हिडीओज बघायचा त्रास व्हायचा. एकच मराठी news channel सुरु असत आमच्याकडे. तिथेच बघितले आणि तेच इथे तिथे दाखवत असतील.
सुशांत माझा आवडता कलाकार होता
सुशांत माझा आवडता कलाकार होता, पवित्र रिश्ता मुळे, मी त्याला मानवच म्हणते अजुनही. त्यामुळे मला असे व्हिडीओज बघायचा त्रास व्हायचा.>>>
आपल्या डोक्यात पडद्यावर बघून त्या कलाकाराची एक प्रतिमा तयार असते. त्या प्रतिमेपासून दूर जायला आपल्या स्वतःलाच आवडत नाही.
आधी ही प्रतिमा कायम फिट्टच राहायची. मीनाकुमारी दारुडी आहे हे तेव्हाच्या सिनेपत्रकात कधी छापून आले होते का देव जाणे. पण आता कोणालाही स्वतःला लपवणे कठीण झालेय, माहीत नसतानाही विडिओ घेतला जातो व तो चर्चेत येतो. भयंकर तापामुळे डोळे लाल व तोल जातोय अशा अवस्थेतील माणसाचा विडिओ कोणी भयंकर दारूने डोळे लाल व तोल जातोय म्हणून दिला तरी कळणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या. सगळ्याच लोकांच्या बाबतीत.
भयंकर तापामुळे डोळे लाल व तोल
भयंकर तापामुळे डोळे लाल व तोल जातोय अशा अवस्थेतील माणसाचा विडिओ कोणी भयंकर दारूने डोळे लाल व तोल जातोय म्हणून दिला तरी कळणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या. सगळ्याच लोकांच्या बाबतीत. >>> खरं आहे . पण त्याचे तसे नव्हते, बहुतेक पार्टीनंतरचे जास्त होते.
मी त्याचा एकही पिक्चर पाहिला नाही किंवा त्याला follow ही करत नव्हते. त्याची आणि अंकिताची जोडी आवडायची आणि ब्रेक अप झालं तेव्हा वाईट वाटलेल्या लोकांमधली मी एक.
Pages