सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्णव गोस्वामीचे पिता भाजपाचे उमेदवार म्हणून उभे होते व निवडणुकीत पडले होते , तेंव्हा बहुतेक तिथे सोनिया गांधींनी सभा घेतल्या असाव्यात 1998

म्हणून तो गांधींच्या नावाने ओरडत फिरत असतो

सैन्यातली नोकरी हा प्लस पॉईंट असूनही , वाजपेयी लाट असूनही व सोनिया परदेशी असूनही ते हरले होते

रियाची मुलाखत पाहिली...खूप खोटारडी वाटली.. तद्दन ड्रामेबाज... आणि आज तकने रियाची मुलाखत घेतली म्हणुन रिपब्लिक भारतचा झालेला तिळपापड पाहून खूप हसू आले.. बाकी जर रियाने जर अर्णब गोस्वामीला मुलाखत दिली असती तर जास्त मजा आली असती... पण तिच्यात एवढी हिम्मत कुठून येणार.. आधीच्या लोकांचे interviews पाहूनच हादरली असेल बिचारी...

सुशान्तच्या कुटुंबाच्या वकिलाने गायब करोडो रुपयांच्या प्रश्नावर पळ काढला असं वाचलं.

आता खरंच ऐकवत नाहीयेत याबाबतचे अपडेटस.
ड्रग वगैरे चे चॅट खरे असतील तर आजारी, मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असलेल्या माणसाचा अत्यंत वाईट प्रकारे फायदा घेणार्‍या एका हडळसदृश स्त्री चं चित्र डोळ्यापुढे येतंय.
अगदी ते सर्व खोटं असलं तरी रोजच्या बातम्या तो शेवटी शेवटी काय अवस्थेत असेल, किती दु:खी असेल यावर सारखे अंडरलाईन करतायत.
एकदाचे सर्व तपास करा आणि रिझल्ट जाहीर करा. बाकी रोज रोज चे अपडेट बघवत नाहीत आता.

{आधीच्या लोकांचे interviews पाहूनच हादरली असेल बिचारी..}
हो ना. अर्णवपुढे मु़ंबइ पोलीस, सीबीआय, इ डी काहीच नाहीत.

मुंबै पोलिसांनी अर्णवची चौकशी केली तेव्हा तेच घाबरले होते.

शेरलॉकलाच बोलवा आता केस सॉल्व्ह करायला ! बाकीचे प्रश्न मागेच पडलेत आता तसे .

एकदाचे सर्व तपास करा आणि रिझल्ट जाहीर करा.

मला फार काही होप्स नाहीयेत. आपल्यासमोर जे येतंय ते हिमनगाचे टोक म्हटले तरी हिमनग तर आपल्याला दिसतच नाहीये. रीयासाठी जी सपोर्ट सिस्टीम उभी राहिली आहे ते पाहता तिच्यामागे मोठया ताकदी उभ्या असाव्यात.
मी माझ्यापुरतं या बॉलिवूड आणि क्रिकेट लॉबीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे कारण मी तितकंच करू शकते.

रीयासाठी जी सपोर्ट सिस्टीम उभी राहिली आहे ते पाहता तिच्यामागे मोठया ताकदी उभ्या असाव्यात.>> अगदिच! नाहितर सतिश मानशिन्दे ज्याची फी लाखामधे आहे ती या जेमतेम १-२ मुव्ही (तेही फ्लॉप) केलेल्या मुलिला कुठुन मिळणार आहे, पैसा आणि ताकद आहेच यामागे राजकिय पाठबळही असणार नाहितर सिबी आय ला जे ६-७ दिवसात शोधता आल ते काय मुबै पोलिसाना ५० दिवसात शोधता नसत आल ते त्याना पहिल्या झटक्यात कळल असणार पण पहिल्यापासुनच ही आत्महत्याच आहे,डिप्रेशन आहे हेच बिबवण चालल होते कारण ते तसच प्रोजेक्ट करायच हे ठरलेलेच होत.

हडळसदृष्य स्त्री वगैरे शब्दप्रयोग निषेधार्ह व misogyny व vigilante justice बद्दल चे obsession दाखवणारे आहेत असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
संपूर्ण तपास करून ती दोषी असेल तर जरूर अगदी कठोर शिक्षा द्या पण असे घाई घाईने निष्कर्ष काढणे धोक्याचे आहे हे वारंवार सिद्ध होऊनही पुन्हा तीच चूक करणे अयोग्य आहे.
रॅन इंटरनेशनल स्कूल. विध्यार्थ्याची हत्या झाली. पोलिसांनी एकाच दिवसात केस 'क्रॅक' केली. बस चालकाला खुनी म्हणून मेडिया समोर सादर केले गेले. मारहाणीच्या खुणांला "लातों के भूत बातोंसे नही मानते" असे उत्तर दिले गेले. "चालकाला आमच्या तब्यत द्या, जाहीर फाशी द्या, तेही आत्ताच्या आता" वगैरे मागण्या झाल्या. वकिलांच्या संघटनेने आरोपीची केस कोणीही घेणार नाही असा ठराव केला. मृत विद्यार्थ्याच्या आईबाबांनी सुदैवाने सी बी आय चा अग्रह धरला. अगदी मुख्यंअंत्र्यांनीही "केस सोल्व्ह झाली आहे, आता सी बी आय कशाला?" वगैरे सांगितले. तरीही ठाम राहिल्याने सी बी आय आली व खून दुसर्‍याच मुलाने केला असे सिद्ध झाले.
"मुले पळविणारी टोळी आली" अशा व्हाट्स अ‍ॅप मेसेजेस वर विश्वास ठेवून निरपराध लोकांचे लिम्चिंगही झाले आहे.

अरेच्या!

सुशान्तला न्याय मिळावा म्हणून गळा काढणारी मीडिया अगदी उदात्त हेतूने काम करते. पण रियाला संधी दिली
तर मग यामागे दुसराच कोण ?. बरोबर बरोबर.

आणि सुशान्तच्या नावाखाली पोलिटिकल बॅकिंग घेऊन प्रचार केलेला चालतो. तेच, समजा रियाने केलं असेल, तर का चालत नाहीए?
आता मनासारखं सीबीआय कडे गेलंय प्रकरण तर मीडियाला शांत
का बसवत नाही?
त्या फुड डिलिव्हरी वाल्याला, सेक्यूरिटी आणि तिच्या वडिलांना का धरलं मीडियाने?

जसे तिच्यावर आरोप होतात, तसा तिलाही आरोप करायचा हक्क नाही का?

मी 'चित्र उभं राहतंय' म्हटलंय.बरं हडळ शब्द आपण काहीकाळ बाजूला (किंवा मनात) ठेवू.एका स्वार्थी,कनिंग आणि fair weather friend व्यक्ती चं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आहे.
मीडिया रोज नवे नवे चेहरे उभे करतं आहे.ती दोषी नसेलही.
कदाचित खरा चेहरा कधीच समोर येणार नाही किंवा कदाचित कोणी चेहरा नसेलही.
पण माझ्या पुरता मीही महेश भट्ट चे चित्रपट आणि या स्त्री चा काही चित्रपट आल्यास तो ott किंवा थिएटर मध्ये बघण्यावर निर्बंध घातलाय.

अय्या! रीयाचे समर्थक जे लोक आहेत- ते तिचे व्हॉट्सअप समोर आल्यानंतरही तिला जबरदस्त सपोर्ट करत आहेत- प्लीज नोट धिस एव्हरीबडी.

मी 'चित्र उभं राहतंय' म्हटलंय.बरं हडळ शब्द आपण काहीकाळ बाजूला (किंवा मनात)>>>>
>>>>
हडळ अगदी चपखल शब्द शोधला आहे तुम्ही , आणि हि घटना घडल्या पासून तिचे वागणे हडळ सारखेच वाटतं आहे .
" बाबू " , एक महिन्यापूर्वी चा तो सत्यमेव जयते व्हिडिओ , आज तक वर ते बिनधास्त रगील बोलणे , ड्रग डिलर बरोबर चे चाट हे सर्व पाहता रिया हडळ पेक्षा कमी नाही हे नक्कीच !
कुठलाही हिट मूवी न देता हि मुंबई मध्ये तीन फ्लॅट घेते ते देखील आलिशान ?
आणि १७ करोड बँक बॅलन्स असलेला सुशांत भाड्याच्या फ्लॅट मध्ये ? ( असं वाचनात आलंय )
त्या हडळ ने आज तक ला दिलेल्या मुलाखत मध्ये डॉक्टर चे नाव घेवून " ते " औषध सुशांत ला चालू असल्याचे सांगितले .
थोड्यावेळाने डॉक्टर चा खुलासा आला ते औषध सुशांत ला कधीच चालू केलेले नव्हते !
याचा अर्थ सरळ आहे ती केस मध्ये गोंधळ निर्माण करत आहे !

कंगना ने तर सगळ्यात भारी सिक्स मारला !
बॉलिवूड मधील सगळ्यांचं ब्लड टेस्ट करा , कोण कोण घेत आणि कोण ड्रग डिलर आहे लगेच बाहेर येईन Happy

व्हॉट्सअप समोर आल्यानंतरही तिला जबरदस्त सपोर्ट करत आहेत >>>>>>
# थोडंसं विषयांतर #

फक्त भाजप आणि हिंदुत्व ला विरोध करण्यासाठी रेडे बनून वेद म्हणणारे आपल्या देशात भरपूर आहेत हो !
ठळक उदाहरणे -----
१ ) या केस मध्ये खान मंडळी , भट्ट ला वाचविण्यासाठी ,
२ ) चीन चे सीमेवर आक्रमण
३) पुलवामा
४) बाला कोट
आणि
५) राममंदिर

काल प्रथमच रियाचा इंटरव्ह्यू पाहिला. तिच्यावर इतके आरोप व आजवर पोलिस, एडी व सीबीआयने इतके तास जबानी घेतलेली मुलगी घाबरलेली असावी असे वाटले होते. पण ती अजिबात प्रेशर न घेता उत्तरे देत होती.

सुशांत ड्रग्स घेत होता असे ती म्हणाली. चित्रपट धंद्यातले बहुसंख्य लोक हे करतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे मला तरी काही वाटत नाही. रात्री बेरात्री शूटिंग, कधीही कुठल्याही कार्यक्रमात जाऊन तिथे उत्साहाने फसफसत असल्यासारखी नाच करणे हे ज्यांना रोज करावे लागते त्यांना ड्रगचा आधार घ्यावा लागतोच.

वर ती असेही म्हणाली की सुशांत त्याला हवे तेच करायचा, कोणी सांगून ऐकायचा नाही. त्याच्या फॅन्सनी त्याचे जे खूप हुशार, विचारी आणि फिजिक्समधला ग्रेट असे जे चित्र उभे केलेय त्याच्याशी हे सुसंगतच आहे. इतका हुशार डोके असलेला माणूस मंद माणसासारखा कोणी सांगेल ते ऐकेल का?

ती त्याच्या फ्लॅटवरून गेली तेव्हा खूप रागावलेली होती असे त्याच्या एका नोकराच्या मुलाखतीत वाचले. काल तिनेही तेच सांगितले. भांडण झाले, त्यात तो स्वतःचे तेच खरे करत होता, म्हणून ती रागाने बाहेर पडली. आजवर किती लोकांची अशी भांडणे झालीत व किती गर्लफ्रेंड्स अशा रागावून गेल्या नाहीत का? ती गेल्यावर त्याने परत फोनही केला नाही याचाही तिला राग आला. त्याला आपली गरज आहे असे तिला वाटले व म्हणून तिने फोन येईल ही अपेक्षा केली. फोनच्या जागी दोन दिवसांनी एक मेसेज बघून तिने रागावून फोन ब्लॉक केला. हे सगळे वागणे मला तरी कुठल्याही सामान्य लोकांसारखे वाटले.

मला तरी ती हडळ वगैरे वाटली नाही किंवा फेअर वेदर फ्रेंड वाटली नाही. तो आत्महत्या करणार हे तिला सोडून जाताना माहीत नव्हते. त्याच्या घरच्यांना तो आजारी होता हे माहीत होते, ती गेल्यावर त्याची बहीण त्याच्यासोबत होती असे ती म्हणते. बहिणीला त्याचे वागणे एकदाही संशयास्पद वाटले नाही का? पण त्याचे घरचे त्याच्या आजाराबद्दल चकार शब्द काढत नाहीत. तेही सोयीस्कर गोष्टी पुढे आणताहेत.

डिलिव्हरी बॉय, कचरेवाला, चावीवाला, स्वयंपाकी याना पकडून कॅमेऱ्यासमोर आणणारी मीडिया संधीसाधू, टीआरपी च्या मागे लागलेली आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या रिया कॅमेऱ्यासमोर आली तर तिला मोठे बॅकिंग आहे म्हणून शक्य हे कसे काय? रियाने आपल्याशी बोलावें म्हणून मिदियाच मागे असणार तिच्या.

माझ्यासाठी तरी ही केस आत्महत्येची आहे. कोण जबाबदार हे त्याने चिट्ठी लिहून ठेवली असती तर कळले असते. पण इंस्टावर भले मोठे मेसेज, कविता, श्लोक लिहिणाऱ्या माणसाला एवढे जमले नाही याचे वाईट वाटते. याला कारण त्याची मानसिक स्थिती आहे असे वाटते.

सीबीआय तपासातून काहीही निघणार नाही. असलेच तर, सगळे पुरावे उलटसुलट झालेले, सगळ्यांची उलटसुलट विधाने नोंदवून घेतलेली.. शिल्लक काय राहिलंय जे सीबीआय तपासणार? तेही समोर जे आहे त्यातूनच निष्कर्ष काढणार ना?

या आधी मीडिया ट्रायल होऊन नंतर जे तपास सीबीआय कडे गेले त्यापैकी किती प्रकरणात सीबीआयला पुरावे सापडून केस व्यवस्थित क्लोज करता आली? वाईट वाटते या संस्थेचे. सर्व लोक मिळून व्यवस्थित चिखल करून ठेवतात आणि मग सीबीआयला बोलावतात, या आणि चिखलात आमच्या खसखशिचा एक दाणा पडलाय तो शोधा.

मला एक कळत नाही जर सुशांतने आत्महत्याच केली आहे तर रिया , पिठाणी, संदीप आणि even मुंबई पोलिस या सगळ्यांचं वागणं इतकं संशयास्पद का आहे?आणि त्यांच्या statements मध्ये फरक का आला?
सुशांतचा मृत्यू आत्महत्यांमुळेच झाला असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे..

मीडिया चा मूर्खपणा चालू आहेच.आणि या सगळ्यात त्याचा पोलीस मेहुणा, कोणीतरी राजकारणात असलेला नातेवाईक हे कोन आहेतच.
इतकं डिप्रेशन, इतके प्रॉब्लेम्स असतानाही सगळं छान आहे असं दाखवून पार्ट्या या लोकांना कराव्या लागतात का?(म्हणजे 'मी आज आजारी आहे, पार्टी रद्द करूया' असं म्हणता येत नाही का)
या सगळ्यातून खरं बाहेर निघावं म्हणजे झालं.

१ ) या केस मध्ये खान मंडळी , भट्ट ला वाचविण्यासाठी - सलमान मोदींच्या काळात सुटला
२ ) चीन चे सीमेवर आक्रमण - कोई आया नही , कसले आक्रमण ? मोदीजी बोलले आहेत
३) पुलवामा - सरकार काम करते
४) बाला कोट - सरकार काम करते
आणि
५) राममंदिर - उद्घाटन झाले आहे , बांधत आहेत

मी ऐकलेल्या latest news नुसार सुशांत कडे कोणतीच पार्टी झाली नाही.. त्याच्या शेजारी राहणार्‍या महिलेने सांगितलं..

इथे काही प्रतिसाद इतके असंबद्ध आहेत की मला धाग्याशी त्याचा काहीही ताळमेळ लागत नाही. असो.
रियाची मुलाखत अगदीच स्क्रिप्टेड वाटली. सगळं वकिलाने लिहून दिलंय, तेवढं बोलली. प्रश्न - ऊत्तरं सगळंच स्क्रिप्टेड. अर्थात विश्‍वास ठेवणारे आहेतच. काहींना त्याच्या घरचे खरे वाटतील, काहींना रिया, ज्याचा त्याचा दृष्टीकोन.
सोशल मीडिया ट्रायलला नावं ठेवत सरदेसाईंनी तेच केले. काय काय पुरावे मिळत आहेत आता, त्यावरून मला आत्महत्या वाटत नाही. त्यांच्या शेजारणीनेसुद्धा ही लोकं काळी जादू वगैरे करतात असे सांगितलेले वाचले.
सीबीआय पाठपुरावा करून खरं काय ते सांगेल अशी आशा करुयात.

रिया , पिठाणी, संदीप आणि even मुंबई पोलिस या सगळ्यांचं वागणं इतकं संशयास्पद का आहे?आणि त्यांच्या statements मध्ये फरक का आला?
सुशांतचा मृत्यू आत्महत्यांमुळेच झाला असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे..>>>>

दहा चॅनेलवर बघितले तर प्रत्येकजण वेगळे सांगतोय. संशय नक्की कोण निर्माण करतेय? बोलणारे लोक की बोलणाऱ्यांच्या वाक्यातील सोयीचा भाग उचलून तोच बेंबीच्या देठातून ओरडणारे??

इथे काही प्रतिसाद इतके असंबद्ध आहेत की मला धाग्याशी त्याचा काहीही ताळमेळ लागत नाही. असो.>>>
मायबोलीवर नविन आहात का? Proud

चार लाख भाडे असणारा फ्लॅट वन रूम किचन आहे का की शेजारीण डोकावून बघेल आणि तिला कळेल काय सुरू आहे ते.

त्यांच्या शेजारणीनेसुद्धा ही लोकं काळी जादू वगैरे करतात>>>>

ही लोक म्हणजे कोण ? इन जनरल बंगाली, बिहारी की रियाच्या घरचे?

तुम्ही पर्सनल घेऊ नका पण मला गम्मत वाटते हे सगळे वाचून.

रिया त्याच्यासोबत होती, तो संदीप होता, नोकर होते, हे सगळे खोटे बोलताहेत.

अंकिता त्याच्यासोबत नव्हती, मी संपर्कात पण नव्हते म्हणतेय. त्याच्या घरचे म्हणतात आम्हाला आजारपण ड्रग काही माहीत नाही. पण हे सगळे खरे बोलताहेत.

आणि जो प्रचंड हुशार, नासा आणि अजून कुठे जाणारा तो मात्र ह्या खोटारड्यांच्या गर्दीत राहिला. फिजिक्सवर विश्वास ठेवणार्यावर काळ्या जादूचा प्रभाव पडला.

सुशांतबद्दल बोलताना त्याचे फॅन्स एकाच श्वासात त्याच्या फिजिक्समधल्या प्राविण्याचा व त्याच्यावर झालेल्या काळ्या जादूचा उल्लेख करतात तेव्हा हसु येते.

त्या माणसावर प्रेम जरूर करा पण त्या भरात त्याचा इतका अवमान करू नका. काय बोलताय याचा क्षणभर थांबून विचार करा आणि मग बोला.

कधी वाटते की माणसांना नक्की काय हवे असते? सुशांतकडे पैसा होता तो वापरून त्याने काही चांगल्या कामात का नाही लक्ष घातले,झ
कुठेतरी फार्मिंग करणार होता ती चांगली कल्पना होती. ह्या दलदलीतच राहायचे इतके काय आकर्षण होते?

काळी जादू बिदू नाही पण त्याची मान्सिक स्थिती इतकी डिप्रेस असेल तर निगेटिव्ह सूचना/संमोहनाचा भाग असू शकतो.
हुशार माणसं उलट लवकर खचतात. कारण त्यांना समजूत पटवायला कोणताही उपाय सुचवला तरी ते त्यातले निगेटिव शोधून काढतात.जगभराचे वाचन असते. 'याचा मला उपयोग होणार नाही' अशी खात्री आधीच पटवून घेतलेली असते. (यातल्या बर्‍याच जणाना काऊन्सेलर पण विशेष पटत नसतात.)
हे सगळं आणि आजूबाजूला पैश्यांवर केंद्रित माणसं असं घातक कॉम्बीनेशन असू शकतं.

Pages