सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी म्हणालो एखाद्या धाग्याचा फायदा कित्येकांना होतो.
माझा धागा काढायचा हेतू मग तोच असो किंवा आणखी काही. त्याने खरेच फरक पडावा का?

माझे सोडा
ईनजनरल बोलूया

समजा....

जर एखाद्या धाग्यामुळे कोणाचे भले होत असेल, कोणाचा फायदा होत असेल, कोणाला तेथील चर्चेतून आणि प्रतिसादातून उपयुक्त माहिती मिळत असेल आणि त्याचे अप्रत्यक्ष श्रेय धागाकर्त्याला मिळत असेल तर तुम्ही तो धागा उडावा किंवा ते अप्रत्यक्ष श्रेय धाग्याकर्त्याला मिळू नये यासाठी प्रयत्न करणार का?

तर येस्स करणार...
कारण हे हुमायुन नेचर आहे. अपवाद वगळता आपण सारेच असे वागतो. आपल्याला कोणालाही सहजपणे मिळणारे श्रेय द्यायचे नसते भले ते अप्रत्यक्ष का असेना.
त्याच प्रमाणे श्रेय एकालाच जात आहे असे दिसले तरी ते देखील हुमायुन नेचरला खटकते.

उदाहरणार्थ... आज धोनी निवृत्त झाला त्याचेच घेऊया
धोनी सगळेच आयसीसी चषक जिंकला. भारतीय कसोटी संघाला ईतिहासात पहिल्यांदाच नंबर एक बनवले. पण एवढे भले मोठे श्रेय त्याला कसे देणार?
मग ते श्रेय संघाचे... जणू काही त्यालाच वेगळा संघ मिळाला होता

पण परदेशात व्हाईटवॉश खाल्ले त्या अपयशाची जबाबदारी सर्वस्वी त्याची. तेव्हा त्याच संघाने अगदी सचिनसह माती खाल्ली ते मात्र नजरेआड

आशूचॅम्प धागा सुशांतवरच राहिल्यास आवडेल मला
आधीच ईथे काही जणांना त्याच्या आत्महत्येची केस आणि हा धागा क्लोज करून हवाय
माझी त्या हेतूला हातभार लावायची जराही ईच्छा नाही. माझ्यावरच चर्चा करायला वेगळा धागा काढूया किंवा माझा एखादा मागे पडलेला धागा वर काढा.
पण ईथे नको _/\_

माझ्यावरच चर्चा करायला वेगळा धागा काढूया किंवा माझा एखादा मागे पडलेला धागा वर काढा.>>>>>>

म्हणजे तेच मला टीआरपी द्या, माझ्या धाग्यावर बोला, ते वरती राहू देत
नाना पाटेकर सारखा आरशात बघून आरती पण करतोस का रे घरी Happy

इथे चकटफु काम होते>>>
आणि पुस्तक घ्यायच का नाही हे वाचक ठरवू शकतो
इथे म्हणजे इच्छा असो व नसो
प्रत्येक धाग्यावर हे महाशय आपली टिमकी वाजवत येणार
लांबलचक असंबद्ध प्रतिसाद देणार
लिहिलेले वाचणार नाहीत, वाचलेलं समजून घेणार नाहीत
लोकं त्रासणार हा आनंद तर अजून वेगळा

महेश भट्टला लोक हिंदू विरोधी का म्हणतात ?

1. राज मध्ये बिपाशा बसुला तो हिंदू अध्यात्मिक आशुतोष राणा मदत करतो ,

2. अजून एक राज 2 की 3 , त्यात बिपाशा बसू व्हिलन आहे , अजून एक व्हिलन आहे , त्याला इम्रान हाश्मी गणपतीच्या मूर्तीच्या हातातील शस्त्र घेऊन ठार करतो

3. आलमोस्ट सगळ्या भूतप्रेत सिनेमात शेवटी हिंदू मंत्र , देव वगैरे दाखवले आहे

मग ह्यात हिंदू विरोधी काय आहे ?

महेश भट्ट वर नेपुटीझम चा आरोप म्हणजे अगदीच हास्यअसपद दावा आहे

आशिकी राहुल रॉय , अनु अग्रवाल
राज बिपाशा , दिनो मारियो
सडक संजय दत्त ,
जिस्म - जॉन अब्राहम
दिल है के मानता नही - आमिर खान नुकताच उगवला होता

त्यांच्या पिक्चर मधून नवीन कलाकार , संगीतकार पुढे आलेत

महेश भट्ट वर नेपुटीझम चा आरोप म्हणजे अगदीच हास्यअसपद दावा आहे.

ह्या जमातीची संख्या अतिशय नगण्य आहे.
लोकांवर ह्यांच्या कमेंट च काही फरक पडत नाही.
प्रतेक जन वेगळा विचार करतो

महेश भट्ट ?
चित्रपट सृष्टी सोडून भरपूर कारणे आहेत .
एकदा विचारसरणी लक्षात आली की पब्लिक ला पराचा कावळा करायला संधी मिळते आणि पब्लिक ती संधी सोडणार नाही .
सिनेसृष्टीतील लोकांनी राजकीय भूमिका घ्यायला सुर वात केली की रसिक त्यांना घाट दाखवायला कमी करणार नाहीत.

पत्रकार परिषद घेवून जकिर नाईक सद्गुणी असल्याचे भट्ट सांगतो आणि
मुंबई हल्ला आर एस एस पुरस्कृत असल्याचे जावई शोध लावतो . असले उथळ विचार करणारे मग स्वतःहून कुठे तरी अडकतात .
नेपोटिजम चा आरोप करणाऱ्यांची संख्या कमी दिसत असेल तरी ते हिमनगाचे टोक असू शकते .
लोकांना सुशांत च्या मृत्यू शी हि काही घेणे देणे नाही , पण रिया ला मांडीवर बसवून शाहणपणाचे डोस पाजनाऱ्या भट्ट ला पूर्वीच्या उथळ विचारांची फळे भोगावी लागणारच ......

त्याने काय होते

मी बघणार आहे

ह्यांच्या जीवावर इंडस्ट्री चालली असती तर मोदी , तासकंद फाईल्स , मनमोहन सिंग सुपर हिट झाले असते

ह्यांच्या जीवावर इंडस्ट्री चालली असती तर मोदी , तासकंद फाईल्स , मनमोहन सिंग सुपर हिट झाले असते >>

योग्य मुद्दा ब्लॅककॅट.

ह्यांच्या जीवावर इंडस्ट्री चालली असती तर मोदी , तासकंद फाईल्स , मनमोहन सिंग सुपर हिट झाले असते >>>>>
अगदी योग्य मुद्दा ! काही वादच नाही .

मी ताशकंद फाइल बघितला पण मनमोहन सिंह आणि मोदींचे सिनेमे नाही बघितले .
या पुढाऱ्यांच्या मूव्ही ला गर्दी व्हावी अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे !!
घटका भर मनोरंजन करवून घेण्यासाठी पब्लिक पैसे घालवत असते आणि त्यात जर काही नतदृष्ट जाणून बुजून द्वेष पसरविणारे भट्ट सारखे माफिया चे मूव्ही असतील तर ते १०० % फाट्यावर मारले जातील .
भट्ट माफिया टीम चे मूव्ही रिलिज होण्याअगोदर विरोधी वातावरण तयार होणार , दिसेलच येत्या काळात .
बहुसंख्य लोकांच्या भावनांशी खेळण्याचा फटका गेली तीस पस्तीस वर्ष काँग्रेस खात आहे , इथून पुढे बॉलीवुड माफिया खाणार !!
ऑनलाईन सेल मध्ये एक मिनिटात चायनीज फोन घेणाऱ्या त भाजप समर्थक असतात ( सध्या पर्याय नसल्या मुळे ) यात काहीच शंका नाही , पण म्हणून तेच लोक भट्ट गॅंग च्या मूव्ही ला गर्दी करतील याची शाश्वती नाही !!!
शिवाय samsung ने चायनीज कंपन्यांवर मात केलेली नजरेतून निसटले नसेलच !!
बदल १००% होणार , फक्त थोडासा वेळ जाईल .

.

भट्ट चा कोणता सिनेमा हिंदू विरोधी आहे ?

राम मंदिर , 3 तलाक , 370 उठल्यापासून दंगलीला कारणे सापडेणाशी झालेत,

झाकीर नाईक , मुंबई स्फोटा बद्दल ते काय बोलले माहीत नाही , पण त्यानंतर त्यांचे ढीगभर मुवि येऊन गेलेत , त्यावेळी तर काय नाय झाले

राम मंदिर , 3 तलाक , 370 उठल्यापासून दंगलीला कारणे सापडेणाशी झालेत >>>>
कोणाला ?
म्हणून बँगलोर झाले का ?

Sushant Singh Case: Truth About The Mystery Girl | Dr. Manish Kumar | Capital TV : https://www.youtube.com/watch?v=E80T1u2MQmg

लै झोल है ! ग्लोवस घातलेले दिपेश सावंत आणि ती बाई, क्राईमसीन क्लीन करणारे पोलिस ... मला आरुषी तलवार केस आठवतेय. क्राईमसीन असाच झोल करून सगळ्यांसाठी खुला ठेवला होता आणि तपासात अत्यंत बाळबोध, ठळक तृटी होत्या.

https://youtu.be/Iot0eF6EoNA
सड़क २ चे ६ लाख लाइक आणि १.१ करोड़ डिसलाइक झाले आहेत .
भट्ट ची चाहते मंडळी जा लवकर आणि लाइक्स वाढवा .

सड़क २ चे ६ लाख लाइक आणि १.१ करोड़ डिसलाइक झाले आहेत .भट्ट ची चाहते मंडळी जा लवकर आणि लाइक्स वाढवा .>>> ब्लॅककॅट यांच्या म्हणण्यानुसार एव्हड्या डिस्लाईक्सने काहीच फरक पडत नाही. जे पिक्चर सुपरहिट होतात त्यांना एव्हडे डिस्लाईक्स म्हणजे सामान्य गोष्ट आहे. जेव्हा भारताच्या लोकसंखेएव्हडे म्हणजे 130 कोटीच्या आसपास डिस्लाईक्स मिळतील तेव्हा ती चिंताजनक बाब असेल.

लाइक्स किमान निम्म्याने तरी वाढवा Happy
चाहत्यांनी महेश भट्ट ला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही ...

ज्यांनी dislikes दिले आहेत ते सिनेमा बघणार नाहीत असा अर्थ नका घेवू.
भोज पुरी गाण्यांना 10 करोड पर्यंत लाईक असतात ह्याचा अर्थ ती गाणी चांगली असतात असे नाही.
भोजपुरी सिनेमा पण कोटी मध्ये लाईक असतात म्हणून ते सिनेमे सुपरहिट होत नाहीत.
बाहुबली सुपरहिट होतो,
समाज मध्यम वरील लाईक, unlike ह्यांना गंभीर पने घेण्याची गरज नाही ते खरे चित्र नाही.

सड़क २ चे ६ लाख लाइक आणि १.१ करोड़ डिसलाइक झाले आहेत
>>>>

आता ते १.१ करोड लोकं तो चित्रपट कसा बंडल आहे हे सांगायला आवर्जून तो चित्रपटही बघणार
टिकाकारांमध्ये हा फार किडा असतो Happy

मामींनी दिलेला मनिष कुमारचा आणि ट्युलिपनी दिलेला व्हिडियो दोन्ही पाहिले. बरीच नवीन माहिती कळली. Thanks for sharing.
भाऊ तोरसेकरांचा व्हिडियोही पाहिला पण पटलं नाही. जनरल पब्लिकला राज्यातील पक्षीय राजकारणात शून्य रस आहे, फक्त सुशांतबद्दल सत्य हवं आहे. भाऊनी कोणालाच क्लीन चिट देऊ नये.

<लोकांना सुशांत च्या मृत्यू शी हि काही घेणे देणे नाही , पण....>

धन्यवाद. काही लोक महेश भट्ट वरच्या खुन्नसची पोळी शेकत आहेत, तसे इतर कोण कोण दुसर्‍या कोणकोणत्या पोळ्या शेकत आहेत.

जनरल पब्लिकला राज्यातील पक्षीय राजकारणात शून्य रस आहे, फक्त सुशांतबद्दल सत्य हवं आहे.
>>>>

+७८६
फक्त जनरल पब्लिक सोशलसाईटवर कमी लिहीते आणि राजकीय पक्षांचे समर्थक धुमाकूळ घालत असतात त्यामुळे चित्र वेगळे भासते.

काल टाटा स्काय टेक्निशियनच्या कृपेने बहुतेक हिंदी न्युज चॅनेल्स+ रि पब्लिक फुकट आहेत , तसंच ती सबस्क्राइब केल्याशिवाय ही दिसतात ( आताच्या लोकसभा निवडणुकांत उगवलेल्या मोदी टीव्हीसारखी) हा शोध लागला.

रिपब्लिक भारतवर जोरात प्रपोगंडा चालू होता.
१०० बातम्यांत पहिल्या दहा बातम्या याबद्दलच.
का ल तरुण खन्ना नावा चा टीव्ही अ‍ॅक्टर तर धडधडीत खोटं बोलत होता. की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मृत्यूनंतर दोन दिवसांतच आत्महत्येचं प्रक रण आहे म्हणून केस बंद केली. मुंबई पोलिसही तेच सांगत आलेत.

मृत्यूच्या दोन दिवसांतच अनिल देशमुखांनी बॉली वुडमधल्या हेवेदाव्यांचा इथे संबंध असेल का याची चौकशी केली जाईल असं म्हटलं.

पहिल्या पाच दिवसांत रियाची चौकशी सुरू झाली.

तिथे उत्तर प्रदेशात तीन दिवसांत बलात्काराच्या तीन भयंकर घटना घडल्यात. पण त्या ग्रामीण भागातल्या, शिवाय सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या राज्यातल्या. त्यामुळे त्यात न्युज चॅनेलना रस नसावा.

त्या घटना खरंच खूप भयंकर आहेत
पण त्यांच्या साठी कँडल मार्च निघणार नाही त कारण मुली गरीब घरातल्या आहेत.

Pages