Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मग मोदी शहा भागवत काय करताहेत
मग मोदी शहा भागवत काय करताहेत ?
ऋन्मेष लब्बाडा,
ऋन्मेष लब्बाडा,
बाफा पेटावा म्हणून डिप्रेशन वर फोडून काढायची पद्धत चांगली असे म्हणतोयस ना!!
सुशांतने आत्महत्याच केली
सुशांतने आत्महत्याच केली त्यामुळे हा विषय ताबडतोब बंद करा असं छातीठोकपणे दमदाटीच्या सुरात सांगणारे , त्याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली तर rattle होणारे व तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित आहात असा आरोप करणारे पण सुशांतला कधीही प्रत्यक्ष न भेटलेले ट्रोल्स एका बाजूला आणि त्याच्यासोबत 7 वर्षे असलेली, त्याच्यावर जीवापाड प्रेम केलेली मुलगी दुसऱ्या बाजूला आहे व तिला त्याचा मृत्यू संशयास्पद वाटतो आहे.
सिम्बा माझा बाफ आहे का?
सिम्बा माझा बाफ आहे का?
मी दुसरयाच्या धाग्यावर का शतकी प्रतिसाद बनवू
ते मी माझ्या धाग्यावर करतो असा आरोप सहसा होतो ना
पण सिरीअसली हल्ली मुलांचे लाड करताना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करताना त्यांना पराभव पचवायचे कसे हे समजूच दिले जात नाहीये. आधीही ते कोणी मुद्दाम शिकवायचे नाही. पण पुर्वीच्या पॅरेंटींग पद्धतीत ते मुले आपसूक शिकायचे.
मोदी शहा भागवत संताजी धनाजी
मोदी शहा भागवत संताजी धनाजी सारखे दिसतात रात्रंदिवस डोळ्यासमोर वाटतं. अच्छा खौफ पाल रखा हैं मियां.
त्यांना पराभव पचवायचे कसे हे
त्यांना पराभव पचवायचे कसे हे समजूच दिले जात नाहीये. आधीही ते कोणी मुद्दाम शिकवायचे नाही. पण पुर्वीच्या पॅरेंटींग पद्धतीत ते मुले आपसूक शिकायचे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 13 August, 2020 - 1 >> सहमत!! पण भरमसाट वाढलेल्या लोकसंख्येमुळे पालकच आपल्या पाल्यांना लोटत असतात रॅट रेसमध्ये. छोटीमोठी हार पचवायला खरंच शिकणं खूप आवश्यक आहे.
पण पुर्वीच्या पॅरेंटींग
पण पुर्वीच्या पॅरेंटींग पद्धतीत ते मुले आपसूक शिकायचे.>>>>>
सुशांत वयवर्षे 28 30 म्हणजे त्याचे जे काही झालंय पूर्वीच्या पद्धतीनेच झालंय भाऊ
डिप्रेशन चा मेंदूतील केमिकल
डिप्रेशन चा मेंदूतील केमिकल imbalance बरोबर संबंध असतो वगैरे ऐकलेले कधीतरी,
लबाड गंमत असली तरी गंभीर
लबाड गंमत असली तरी गंभीर प्रतिसाद देत आहे. पूर्वी आत्महत्या होत नव्हत्या असे म्हणायचे आहे की काय? बापाने मारले, शाळेत बाई ओरडल्या, परीक्षेत नापास, अश्या कारणांसाठी कधी आत्महत्या झाल्याचं नाहीत का आतापर्यंत? मला आठवते की थ्री इडियटस ह्या चित्रपटाच्या यशानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची लाटच आली होती. त्याही आधी बायका आडात उडी मारायच्या . त्याही आधी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी यांनी नदीत उड्या घेतल्या होत्या. अधेमधे कधीतरी मीरेने विषप्राशन केले होते.
गंभीर प्रतिसाद पूर्ण. आता चालू दे.
मेंदूतील सेरेटोनीन केमिकल कमी
मेंदूतील सेरेटोनीन केमिकल कमी झाल्यावर नैराश्याची लक्षणं दिसतात असं विज्ञान म्हणते. मानवी मन हे भावनांचा खेळ चालणारं मैदान आहे. दिवसातून अनेक भावना तरंग उठत असतात. काही लोक अतिसंवेदनशील असतात आणि एकच विचार घेऊन बसतात. नकारात्मक विचार, भावनांचे व्यवस्थापन हे रुग्णालाच करणं शक्य आहे. औषधं पूर्णपणे मदत करु शकत नाहीत. डॉ. लोक जास्त करून सिडेटिव्ह औषधं देतात. विचारचक्र थांबवण्यासाठी. पण शरीर सुध्दा अत्यंत स्लो होऊन जाते. माणूस इतरांत मिसळू शकत नाही आणि आणखी एकांटी पडतो. सतत समस्येवर विचार करून करून समस्या संपवण्यासाठी जीव देतो. काहीही करून त्रास देणाऱ्या विचारांपासून सुटका करून घ्यावी वाटते मग जीवनाची किंमत मोजावी लागली तरी चालेल इतका टोकाचा निर्णय घेतो. हे सर्व माझं वैयक्तिक मत आहे.
पाहिला तो व्हिडिओ थोडासा.
पाहिला तो व्हिडिओ थोडासा. "सुशांत अतिशय हुषार व टॅलेंटेड होता, त्याला डिप्रेशन चा आजार कसा असेल ?" हा प्रश्न
"अमूक मुलगी इतकी गोरीपान व सुंदर होती, तिला कँसर कसा होऊ शकेल?" सारखाच अज्ञानमूलक आहे.
एखाद्याबरोबर इतकी वर्षे रिलेशन मध्ये असणे व "जिवापाड प्रेम" करणे हे मेडिकल क्वालिफिकेशन नाही.
खरे तर वर दिलेले आशुतोष भाकरे च्या आईचे पत्र इतके ग्रेसफुल आहे.
पोलिसांना आपले काम करू द्यावे. पण दर आठवड्याला ( करन, रिया, ई. ई. ) एक बकरा हुडकून चारित्र्यहनन करू नये.
विजय कुलकर्णी, +१११११
विजय कुलकर्णी, +१११११
विजय कुलकर्णी
विजय कुलकर्णी
ह्यांचे मत योग्य आहे
सुशांत प्रकरणावरुन माणसानं
सुशांत प्रकरणावरुन माणसानं संगत कशी निवडावी हे लक्षात येते. अंकिताच्या मनात सुशांत विषयी प्रेमच आहे. पण रियाच्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया सुशांतला दोष देणाऱ्याच होत्या.
सुशांत वयवर्षे 28 30 म्हणजे
सुशांत वयवर्षे 28 30 म्हणजे त्याचे जे काही झालंय पूर्वीच्या पद्धतीनेच झालंय भाऊ Happy
>>>>
पहिली गोष्ट म्हणजे मी सुशांतला डोळ्यासमोर ठेऊन ते लिहिले नव्हते. चर्चेच्या संदर्भानुसार कॉमेंट होती.
दुसरे म्हणजे एकाच काळात समाजात वेगवेगळे स्तर असतात. उदाहरणार्थ आजकाल शहरी मध्यमवर्गीयांमध्ये मुलामुलींचे मैत्रीसंबंधात आपसात बोलणे, बाईकवरून फिरणे याकडे खवचट नजरेने बघितले जात नाही जे आधी समजले जायचे. . पण तेच एखाद्या ग्रामीण भागात आजही हा कुजबूजीचा विषय असू शकतो, याऊलट आमच्यासारख्या हायफंडू लोकांमध्ये मैत्रीणीला बाय करताना हग करणेही कॉमन समजले जाते जे अजूनही वर उल्लेखलेल्या मध्यमवर्गीयांना पचवायला जड जाते. तर काळ हा नुसता एकच पॅरामीटर कामाचा नाही.
एखाद्याबरोबर इतकी वर्षे
एखाद्याबरोबर इतकी वर्षे रिलेशन मध्ये असणे व "जिवापाड प्रेम" करणे हे मेडिकल क्वालिफिकेशन नाही.>>>>
Bang on ...
हे लोकांना कळेल तर शपथ
अंकिताने त्याला सोडून कित्येक वर्ष झाली, हा आजार त्यानंतरचा असू शकतो, किंवा त्या नंतर आजार जास्त गंभीर झालेला असू शकतो.
अंकिताच्या मनात सुशांत विषयी
अंकिताच्या मनात सुशांत विषयी प्रेमच आहे.
>>
तिने आपला साखरपुडा की लग्न झाल्यावर की ठरल्यावर काहीतरी ट्बिट केलेले ज्याने सुशांत दुखावला गेला मग तिने ते उडवले असे मागे वाचलेले. खोटे असेल तर प्लीज करेक्ट करा. बाकी कोणाच्या मनात कोणाबद्दल काय आहे फक्त ती व्यक्तीच सांगू शकते.
प्रेम काय असते हे ह्या
प्रेम काय असते हे ह्या बॉलिवूड मधील तारा,तारका ना माहीत तरी आहे का.
त्यांचे काही सांगू नका.
आणि प्रेम आणि बॉलिवूड चे उथळ,निर्बुद्ध लोकांची लफडी ह्यांचे संबंध जोडून प्रेम ह्या शब्दाची इज्जत घालवू नका.
अरेच्या, एक धागा आणि एक id
अरेच्या, एक धागा आणि एक id आत्ताच वेमाघरी गेले असे दिसतंय.
कशाला उडवायचा त्रास घेतात..
कशाला उडवायचा त्रास घेतात.. नवीन रूपाने येतातच सगळे...
पोलिसांना आपले काम करू द्यावे
पोलिसांना आपले काम करू द्यावे. पण दर आठवड्याला ( करन, रिया, ई. ई. ) एक बकरा हुडकून चारित्र्यहनन करू नये.>> तेच तर त्यानी ४०+दिवसात केलेले नाही ना! साधा एफ आय आर सुद्धा दाखल केला नाही तपास काय डोबल करत असणार आहेत?
सुशांतला कधीही न भेटलेल्या
सुशांतला कधीही न भेटलेल्या लोकांचं म्हणणं ग्राह्य धरण्यापेक्षा त्याचे कुटूंब आणि अंकिता यांच्या म्हणण्याला महत्व द्यावं असं मला वाटतं. तपास होऊ द्यावा, जे काही असेल ते बाहेर येईल.
करण जोहरबद्दल इतकंच म्हणता येईल की त्याच्या शोमध्ये सुशांतबद्दल केली गेलेली वक्तव्ये, सुशांतची मुव्ही ड्राइव्ह ओटीटी रिलीज करणे , आपण गेले वर्षभर सुशांतशी संपर्कात नव्हतो असं लिहिणं (म्हणजे ड्राइव्ह 1 नोव्हेंबर 2019 ला रिलीज झाला तर फिल्मच्या रिलीजच्या वेळपर्यंतही लीड हिरोशी काही संपर्क नव्हता?)- हे सर्व पब्लिक डोमेनमध्ये आहे. या फिल्मी ग्रुपमधील पत्रकारांनी सुशांतबद्दल लिहिलेले ब्लाइंड आयटेम समोर आहेत.
रीयाबद्दल माझं आधी काहीच ओपिनियन नव्हतं व तिचं नावही कधी ऐकलं नव्हतं पण जेव्हा तिचे महेश भट्टसोबतचे अत्यंत विचित्र फोटो समोर आले तेव्हा त्याबद्दल मी इथे लिहिलं होतं. अर्थात काही लोकांना ते फोटोही छान वाटतील- ज्याचं त्याचं कल्चर.
सो करण किंवा रीया किंवा इतर कोणावर नेमके काय आरोप असायला हवेत किंवा नकोत ते ओथोरिटीज ठरवतील पण जे पब्लिक डोमेनमध्ये दिसतंय त्यावरून लोक ओपिनियन तर बनवणारच. ते मतही बनवू नये व समस्त बोलीवूडबद्दल छान छानच बोलावं ही सक्ती का?
एफ आय आर सुद्धा दाखल केला
एफ आय आर सुद्धा दाखल केला नाही तपास काय डोबल करत असणार आहेत?
पाहिले fir म्हणजे काय त्याचा अभ्यास करा.
नंतर fir कसा दाखल होतो त्याचा अभ्यास करा.
नंतर उथळ कमेंट करा.
तो मेला त्याच दिवशी त्याचा
तो मेला त्याच दिवशी त्याचा कोण तरी bjp चा खासदार आहे त्यांनी कमेंट दिली.
तेव्हा च हे स्पष्ट झाले होते सुशांत ला न्याय मिळो ना मिळो .
राजकीय फायदा बिहार मध्ये झाला पाहिजे.
हा धागा लवकरात लवकर मागे जावा
हा धागा लवकरात लवकर मागे जावा अशी इच्छा आहे, श्रद्धांजली किती महिने देणार अजून. इथे हा विषय सतत धगधगता राहिला आणि ते वाचून कोण्या निराश व्यक्तीने वेडेवाकडे पाऊल उचलायला नको असं खरंच वाटतयं. इथल्या चर्चेने काय साध्य होणार आहे हेही स्पष्ट नाही. झाले ते अत्यंत वाईटच but time to move on !!
हा प्रतिसाद स्पेसिफिक नाही जनरल आहे.
नैराश्यावर चर्चा करायला स्वतंत्र धागा काढावा हवं तर म्हणजे त्या विषयालाही न्याय मिळेल.
कुणाला दुखवायचा हेतू नाही माझा , तरी कुणाला वाईट वाटल्यास क्षमस्व.
मला एवढंच वाटतं की ही हत्या
मला एवढंच वाटतं की ही हत्या असेल तर depression च्या नावाखाली मारेकरी सुटू नयेत आणि depression मुळे केलेली आत्महत्या असेल तर कोणावरही हत्येचा आरोप येऊ नये. पण सलमान, शाहरूख, करण,आलिया इ. चे समर्थन केले जाऊ शकत नाही.
त्या फोटोत विचित्र काय आहे ?
त्या फोटोत विचित्र काय आहे ? आणी कल्चर चा उल्लेख अस्थानी आहे.
"मी पहिल्यांदाच मुंबईला गेलो तेव्हा लोकल ची तोबा गर्दी पाहिली.
अनेक विवाहित महिला मंगळसूत्र असूनही साडी ऐवजी सलवार सूट घालून होत्या.
काही विवाहीत महिला तर चक्क जीन्स मध्ये होत्या.
मला ते विचित्र वाटलं पण माझ्या मुंबईच्या मित्राला काहीच खटकले नाही,
असो, ज्याचे त्याचे कल्चर ! "
Offensive वाटतय ना ?
प्राजक्ता, मुंबई पोलिसांनी
प्राजक्ता, मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या संदर्भातील या फक्त जून महिन्यातल्या बातम्या आहेत. तुमच्या व्हॉट्स अॅप फॉर्वर्ड मध्ये आल्या नसतील. सावकाश वाचा.
१६ जून चं महा राष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं विधान आहे की त्याच्या मृत्यूमागे प्रोफेशनल रायव्हलरी हे कारण होतं का हे मुंबई पोलिस तपासुन पाहतील.
फोटोबाबत बोलायचं तर कंगना
फोटोबाबत बोलायचं तर कंगना रानावतचे आदित्य पांचोली पासुन महेश भट्ट पर्यंत तिच्या गॉड फादर्स बरोबरच्या फोटोंजचं एक कोलाज ट्विटर वर दिसलं आणि ते फोटो रियाच्या फोटोपेक्षा फार वेगळे नव्हते.
मुंबई पोलीस योग्य तपास करत
मुंबई पोलीस योग्य तपास करत होते.
तपास पूर्ण झाल्या नंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट झाले असते.
आणि हत्या असेल,किंवा आत्महत्या साठी कोणी प्रवृत्त केले आहे अस तपासात काही निष्पन्न झाले असते तर त्या संशयित व्यक्ती विरूद्ध fir झाला असता.
पण हे अर्धवट बिहारी नी मध्येच गोंधळ घातला.
सीबीआय नी तपास करायला पण कोणाची च हरकत नाही.
बिहारी नी गोंधळ घातला तिकड चे पोलिस इकडे आले त्यांना काहीच अधिकार नसताना.
आणि सुशांत केस म्हणजे राजकारणी लोकांचा आवडता अड्डा झाला.
देशातील सर्वात जास्त lawless राज्य,देशातील सर्वात जास्त अयशस्वी राज्य ज्यांना पोट भरण्यासाठी देश भर फिरावे लागते.
त्यांनी मुंबई पोलिस ज्यांची तुलना स्कॉटलंड पोलिस बरोबर होते त्यांच्या क्षमते बद्द्ल मत व्यक्त करावे .
हा सर्वात मोठा जोक आहे.
ह्या सर्वाचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यावर पण होणार.
आधीच ते हिंदी भाषा असलेल्या परावलंबी राज्यांवर नाराज आहेत.
Pages