सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुठल्या घटना.. माझ्या तर कानावरही नाहीत Sad
खरंच दुर्दैवी आहे
युपी बिहार तर मला जंगलराजच वाटते. तेथील कायदा सुव्यव्स्थेची तुलना महाराष्ट्राशी मुंबईशी करणे यासारखे हास्यास्पद दुसरे नसेल

तसे इतर कोण कोण दुसर्‍या कोणकोणत्या पोळ्या शेकत आहेत >>>
इतरांनी शेकल्या ल्या पोळ्या लगेच दिसतील पण भट्ट सिनेमे बनवायचे सोडून पोळ्या शेकत बसलेले दिसले नसेल .
शेवटी काय प्रिंट , वायर आणि भट्ट गॅंग हि लिबरल ची धार्मिक स्थळे !

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-... >>>>>
बातमी देणारा नक्कीच बिहारी पत्रकार असेल ! एक तर इथले एक से एक वकील मुंबई पोलिसांना क्लीन चिट देत सुटले आहे .
आणि हा म टा चा पत्रकार डॉक्टर पेक्षा जास्त ज्ञान असलेल्या कंपाऊंड र प्रमाणे postmortem वर संशय घेतोय Happy

गुंजन सक्सेना बजेट 40 कोटी
नेट फ्लिक्स ला विकला 50 कोटी

म्हणजे प्रोड्युसर - 10 कोटी फायदा
इतर हक्क , उत्पन्न 10 कोटी
एकूण 20 कोटी

तात्पर्य : हिट

हा तर बायोपिक होता , सडक 2 तर सस्पेन्स , द्रामा , थ्रिलर आहे , ज्याला जास्त गिर्हाईक असतात

अनुपम खेर यांनी केली महेश भट्ट यांची पाठराखण
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणावरून निर्माते महेश भट्ट यांची पाठराखण केलीय. अनुपम खेर यांनी 'टाइम्स नाउ' या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. सुशांतच्या मृत्युनंतर महेश भट्ट यांच्यावर आरोप केले जात आहेत. यामुळेच सोशल मीडियावर महेश भट्ट यांच्या 'सडक २' चित्रपटाच्या ट्रेलवरून टीकाही होतेय. तसंच विरोधकांनी मोहीमही उघडल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांची पाठराखण केलीय. यावर आपल्याला काहीही बोलायचं नाहीए. पण आपण आंधळे नाही आहोत, असं म्हणत अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांचे आभारही मानले. महेश भट्ट यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, असं अनुपम खेर म्हणाले.

घरभेदी शोधा, उद्धवराव! | Bhau Torsekar | Pratipaksha >>> चांगलं वाटलं विवेचन. मी हल्ली youtube वर राजकारण संबंधित काही बघत नाही, ह्यांचे व्हिडीओज मोठे असतात त्यामुळे बघितले जात नाहीत, हा बघितला. बरंच पटण्यासारखे आहे.

त्या बिहार पोलिसांना क्वारंटाईन न करता, मुंबईत तपास करु दिला असता तर उठा सरकारची थोडीफार अब्रु वाचली असती व केस सिबिआयकडे गेलीच नसती. आता सुप्रिम कोर्टाने 'सुशांत केसचा तपास सिबिआय करेल' असा निकाल देऊन या तीन तिघाडी सरकारची उरलीसुरली अब्रु देखील काढून टाकलेय.

अशी अब्रू जायला लागल्यावर अशी रोज च सर्व सरकार ची अब्रू जात असते कोणत्या ना कोणत्या प्रकरणात.

रोजच सगळ्या राज्य सरकारांची अब्रू जाते मान्य !
पण हम करे सो कायदा हि वृत्ती घातक . आज पर्यंत कोणतेही महाराष्ट्र सरकार देश पातळीवर इतके बदनाम झालेले नव्हते .
बरं आता निरुपम ला हि कंठ फुटला आहे , हळू हळू काँग्रेस चे एक एक नेते पोपटा सारखे बोलायला सुर वात करून आम्ही बाकीच्या दोन्ही पक्षा पेक्षा वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतील .
आश्चर्य या गोष्टींचे वाटते शरद पवार सारखे ज्येष्ठ अनुभवी नेते मार्गदर्शक असताना तिघाडी सरकार चे निर्णय चुकलेच कसे ?

काय नाय होत

महाराष्ट्र पोलीस , करोना , गणपती वगैरे जण हिताच्या ड्युत्या करतील

सीबीआय वाले करतील बाकी रिकामी कामे

अखेर न्याय मिळाला. आता सर्व विसरून जा.
आता महाराष्टातील मुंबई पोलीस दल,सीआयडी इ. बरखास्त करून सर्व गुन्ह्यांचे तपास केंद्राने करावे. महाराष्ट्र राज्य केंद्रशासित करावे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात काही लिहू नका. फट म्हणता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल.

Good..

https://twitter.com/JiahKhanJustice/status/1295990330182049792?s=19
जिया खान च्या आई ने सी बी आय चौकशी बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत .
अनुकूल बोलण्यासाठी नक्कीच तीला अर्णव ने पैसे पुरवले असतील .

मल्ल्या,मोदी,कसाब चा बोलवता धनी कोण,दाऊद ह्या आणि अशा अनेक केस सीबीआय कडे आहेत .
काय दिवे लावलेत सीबीआय नी.
कसाब ला महाराष्ट्र पोलीस नी पकडले नसते तर हल्ला कोणी केला हे पण अजुन पर्यंत सीबीआय ला माहीत नसते पडले .
सीबीआय कडे केस गेल्या मुळे सुशांत ला न्याय मिळेल की जी न्याय मिळण्याची थोडी फार आशा होती ती पण नष्ट झाली .

सी बी आय म्हणजे फक्त एक भूत आहे हे सर्वज्ञात आहे .
नोएडा मधील तलवार केस शेवट पर्यंत सी बी आय ने सोडवली नाही इतकी कार्यक्षम आहे .
पण जर महाराष्ट्र सरकार चा बॉलीवूड मधील कुठल्याही केस मध्ये स्वारस्य नाही तर इतक्या दिवस विरोध का करत होते ?

शिवसेना राज्यकर्ता राजकीय पक्ष आहे त्यांचे जोडीदार हे नवीन आहेत.(ह्यांचे संबंध नवीन आहेत पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अती चालू पक्ष)
शिवसेना नी थोडा अंदाज घेवून स्वतःच सीबीआय कडे केस सोपवली असती तर पुढचे रामायण घडलेच नसते.
शेवटी सुशांत ला न्याय मिळावा अशी कोणत्याच पक्षाची गरज नाही .
त्यांची गरज वेगळी आहे

ह्यांचे संबंध नवीन आहेत पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अती चालू पक्ष >>>>

अगदी मनातलं बोललात . शिवसेनेचं पूर्णपणे मांजर करून टाकले या दोन्ही बिलंदर पक्षांनी .
शिवाय बाळासाहेबांचा जो दरारा होता तो उधवरावाकडे बिलकुल नाही त्यामुळे या दोन्ही पक्षांचे बरोबर फावले .
मुख्यमंत्री पद देवून काकांनी ग्रहमंत्री खाते स्वताकडे ठेवून पहिली चाल एकदम भारी खेळली . बॉलीवुड च्या केस मध्ये खर म्हणजे ग्रह खात्यावर टीका झाली पाहिजे पण टीका होतेय फक्त मुख्यमंत्र्यांवर !
आणि खरेच सी बी आय , बिहारी पोलीस यांच्याशी टक्कर घेण्या ऐवजी या इकडे आणि करा तपास !
जावू द्या ना लटकले तर बॉलीवुड मधील माफिया लटक तील , काय गरज होती केस मुंबई पोलिसां कडेच दाबून हसे करून घेण्याची ?
ज्युनिअर मंत्री ला या केस मध्ये ज्या ज्या मीडिया ने जाणून बुजून गुंतवला आहे , ती सगळी मीडिया तोंडावर पडली असती . त्यांचा टी आर पी कोसळला असता , त्यांच्यावर केसेस ठोकता आल्या असत्या .
सुशांत सिंग आत्महत्या केस चुकीच्या पद्धतीने हाताळली गेली हे निश्चित .
त्यात भर अजुन बी एम सी दादागिरी च्याच पवित्र्यात आहे , सी बी आय ला पण नियम लावायला निघाली आहे .
आता पर्यंत झालेल्या शोभे ने अजुन यांचे मन भरलेले दिसत नाही .

त्यात भर अजुन बी एम सी दादागिरी च्याच पवित्र्यात आहे , सी बी आय ला पण नियम लावायला निघाली आहे . >>> म्हणजे त्यांना पण क्वारंटाईन करणार का. कशाला आता अजून हसं करुन घेतायेत.

एबीपी माझा एक व्हीडिओ दाखवत होते काल त्यात सुशांतच्या खोलीचे लॉक खोलणाऱ्या चावी वाल्याची मुलाखत होती. त्याने आधी भरपुर अवांतर बोलून घेतले आणि मुद्द्यावर आल्यावर म्हणाला की लॉक ओपन झाल्यावर दार उघडायच्या आधीच मला त्या लोकांनी घालवून दिलं. त्यामुळे खोलीत काय दिसलं किंवा कोण होतं हेही मला माहित नाही.
कसं शक्य आहे हे? त्याला फुल पढवला आहे. या केस चे पाळंमुळं खूप खोल गेलेले आहेत... आता तरी योग्य पद्धतीने तपास होऊन सत्य बाहेर यावं, अजून काय?

एक शंका मनात येते मात्र माझ्या, मोठी मोठी धुर्त राजकारणी लोकं एखाद्याचा गेम करतात असं आपण ऐकतो तेव्हा स्वतः उपस्थित रहात असतील का, इतके किती पचवत असतात, आपण वर्षानुवर्ष ऐकतो. पण पुरावे नसतात. बरेच जण स्वतः फ्रेममधे येत नाहीत. आपण कथा ऐकत असतो.

इथे नक्की काय झालं ते माहीती नाही, ठामपणे काही म्हणायचं नाही कारण खरं काय खोटं काय हे काहीच मी सांगू शकत नाही, ऐकायला अनेक कहाण्या येतात तेव्हा मनात वरचं आलं.

फक्त एवढंच वाटतं खरं काय ते कळावं, एखादा निर्दोष असेल तर त्याला शिक्षा होऊ नये आणि दोषी असेल तर सुटू नये. आत्महत्या का खून तेही समोर यावं, आत्महत्या असेल तर का केली हेही समोर यावं.

बाकी मी त्याविषयी युट्युबवर काही बघत नाही आणि हिंदी इंग्लिश न्युजही बघत नाही किंवा पेपर वाचत नाही.

>13 जूनला कुठे कुठे पार्टीज झाल्या? कोणाचा बर्थडे होता?
>14 ला सुशांतची न्यूज आली.

करन जोहर, महेश भट च्य नावाने शिमगा करून झाला. रिया चक्रवर्तीची यथेच्छ बदनामी करून झाली.
आता आदित्य ठाकरेचा नंबर आहे का ? असू द्या. पण निदान We owe it to Sushant असे न म्हणता We owe it to BJP असे म्हणा.
ताकाला जाऊन भांडे लपवणे अनावश्यक आहे.

सुशांत च्या दुर्दैवी आत्महत्येनंतर एकूणच डिप्रेशन व मानसिक स्वास्थ्य यावर मोकळेपणाने चर्चा होईल अशी आशा होती.
असो, तुमच्या लाडक्या बिहार डीजीपी नी अखेर "औकात" बद्दल माफी ( कि दिलगिरी ?) मगितली.

अन्जू>> +1 सीबीआय कडे केस गेली आहे.
एबीपी माझा एक व्हीडिओ दाखवत होते काल त्यात सुशांतच्या खोलीचे लॉक खोलणाऱ्या चावी वाल्याची मुलाखत होती>>सापडला का तो चावीवाला. त्याच्या बाबतीत पण पिठाणीने उलट सुलट सांगितलंय.
सीबीआयकडे गेल्यामुळे काही काळं बेरं असेल तर समोर येईल अशी आशा करुयात. अर्थात लगेच नाही, कितीतरी वर्षांची लढाई असेल पण योग्य तो न्याय मिळावा.

Pages