माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई तरी कायमच नुसती साखर , ओले खोबरं तरी पांढरी शुभ्र.>> एकदा करून फोटो टाका नं ताई. खुपच कौतुक वाचले त्यांच्या बर्फीचे.
प्रमाण पण द्या.

नुसती साखर , ओले खोबरं तरी पांढरी शुभ्र.>>>> +१.

माझ्या आईकडे गूळ+ ओखो+वेलची,यातच खमंग वडी व्हायची.मला स्वतःला अशीच वडी आवडते

zampi मला टेम्प्टशन झाले ..म्हणून म्हणतेय ..आणि मी अमा नाही आहे.. श्रवु आहे.. माझी आई पण बनवायची..आता ती ८० आहे .. तर नाही जमत तिला ..आणि माझे डाएट.. म्हणून मला टेम्पशन होते आहे.. तुम्हाला जर राग आला असेल किंवा वाईट वाटले असेल तर दोन्ही साठी मीच सॉरी..

श्रवु, अहो तुम्हाला प्रतिसाद न्हवताच तो.
तुम्ही कशाला सॉरी? आणि तुमचा राग नाहीच. सो रेलॅक्स.

ज्याने जसे लिहिलय, तसा प्रतिसाद.
तुम्हाला हवी असेल रेसीपी तर विचारते आईला.

का तुम्हाला दुसर्‍याचे कौतुक बघून नेहमीच त्रास होतो?>> शक्य नसेल तर राहु द्या मला काही त्रास नाही. पारंपारिक रेसीपी एक कलेक्षन होते तयार म्हणून विचारले होते. माफी असावी परत नाही विचारणार.

मी उद्या करणार आहे. मी पण थोडे दूध घालते कारण मउसर टेक्षचर छान वाटते. थोडे दूध, थोडी - दोन चमचे मिल्क पावडर आणि मी मिल्क मसाला घालते.

तुमचा हेतु तसा दिसला नाही म्हणून जसे वाटले तसे लिहिले.
जर तुमचा विचारण्यात खरच खोडसाळपणा न्हवता तर, माझ्याकडून सुद्धा माफी. इथेच विषय संपवते.

धन्यवाद zampi .कृती.. नको.. मंद आचेवर खूप ढवळावे लागते..हात भरून येतो.. वरून डाएट ची ऐशी कि तैशी..फक्त डोळ्यांनी खाऊन समाधान मानेन..

अरे कोण ते डाएटच्या गोष्टी करतय:राग: इथे लॉकडाउन मध्ये अडीच किलो वजन वाढवलय मी चला बर सगळ्यांनी छान छान खाऊ करून खा.

हो ना, एकतर बाहेरून मागवून खाणे पण बंद केलय, शेजारी पाजारी पदार्थ शेअर करणे पण बंद कोरोणामूळे, मायबोली पदार्थांचे फोटो बघूनच समाधान मानावे लागतय.

साइज कमी करायला size resizer app वापरा किंवा सरळ फोटोचा screenshot घ्या. त्यानेही साइज कमी होईल. अगदी kb मधे हवी, नाहीतर फोटो अपलोड होणार नाहीत.

मग अजून एक पर्याय आहे

फोटो चे नाव निळे केले की खाली स्क्रोल करा

खाली ते चित्र दिसेल
त्यावर बोटाने चार पाचदा क्लिक करा

मग बेक जाऊन लिहायच्या विंडोत आले का बघा

Screenshot_2020-08-06-22-43-52-652_com.android.chrome.png

वरच्या हिरव्या इन्सर्ट फाईल ला क्लिक करा किंवा खालच्या चित्रावर बोटाने दोन तीन चार पाचदा क्लिक करा
एकदा करून बऱ्याचदा ते होत नाही

Pages