माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा टोमॅटो, दही वगैरे बरोबर वाटला तर तेव्हढी वाईट चव येत नाही. पण एक दोनदा अशीच कडू चव आल्याने हल्ली नुसता कांदा वाटत नाही.

काल बेसनाच्या वड्या केल्या होत्या. चवीला उत्तम झाल्या पण बऱ्याच शुष्क, कोरड्या झाल्या. काय चुकलं असू शकतं? पहिल्यांदाच केल्या होत्या. गोडाचा वड्यांचा फार अनुभव नाहीये. मी एक वाटी बेसन, अर्धी वाटी साजूक तूप, ३/४ वाटी मिल्क पाऊडर, एक तारी पाकासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असे प्रमाण घेतले होते. मला मऊ वड्या हव्या आहेत. माझं काय चुकलं?

हो

मला वाटते , तूप नसेल तर कमी पडते तितके तेल घेतले तर चालते

पारंपारीक ईडली आणि चटण्या या धाग्यात लिहिल्याप्रमाणे प्रमाण घेऊन इडली केली पण दोन्ही वेळा नाही जमली. पीठ भिजवताना घट्ट असते . एक तर फरमेन्ट होत नाहीये प्लस नंतर पातळ होतंय. काय चुकतंय ? फरमेन्ट होण्यासाठी काय करायचे ? इडली रवा भिजवताना पाण्याचे प्रमाण काय असावे ?
इडली रवा वापरून इडली करायची पहिलीच वेळ आहे . नेहमी तांदूळ वापरते . पण आता रवा संपेपर्यंत तरी इडली जमावी असा वाटतंय Happy

जमेल Happy
तांदूळ इडलीपेक्षा जास्त सोपी आहे इडली रव्याची इडली.
इडली रवा भिजवताना रवा भिजेल आणि वर बोटाची दोन पेरं इतके पाणी टाका..सेम फॉर उडिद/उडिद डाळ साठी... सकाळी अकरा वाजता वेगवेगळे भिजवा....संध्याकाळी पाच- सहा वाजता फक्त उडिद/उडिद डाळ कमी पाण्यात बारीक वाटुन घ्या.
रव्यातील सगळं पाणी काढून टाका.. आणि ग्राईंड केलेली उडिद रव्यात मिक्स करा..एका बाजुने हाताने फेटा.
रात्री अकरा-बारा पर्यंत बाहेर ठेवा... मग फ्रिजमध्ये..
सकाळी इडली करा ..अगदीच घट्ट असेल पीठ तर किंचित पाणी टाका पळीतून पात्रात पीठ पडण्याइतके.

आम्ही नेहमी इडलीला २:३.५ उडीद आणि (उकडा+ साधा) तांदूळ घेतो. छान होतात.
उकडा संपला होता म्हणून उडीद आणि पोहे घेतले. पाणी अंमळ जास्त पडलं वाटताना (वसूलीभाई फंडा वापारुन भिजवताना वापरलेलं सर्व पाणी वाटताना टाकलं.)
डी-डे ला इडल्या करताना पहिल्या घाण्याचा दारुण उपमा झाला. दारुण, द्रवरुप आणि पूर्ण साचाभर पसरलेला चिक. पब्लिक ला भूक असल्याने त्यांनी उपमा म्हणून तो पोडी टाकून आवडीने गरम खाल्ला. मग पातळपणा काढायला सरळ मोदक पिठी चे पीठ ढकलले २-३ चमचे आणि पुढच्या बॅचेस चांगल्या झाल्या.
मला स्वतःला पोहे पेक्षा (उकडा+साधा तांदूळ) हे कॉम्बो जास्त सूट होते.

धन्यवाद मृणाल !!
परत एक शंका .. रात्री अकरा-बारा पर्यंत बाहेर ठेवा... मग फ्रिजमध्ये >> एवढ्या वेळात फरमेन्ट होते का ? नाही झाले तरी पण तरी इडली fluppy होते का ? कारण तांदळाची इडली पीठ जर फेरमेन्ट नाही झाले तर सपाट होते .

@ mi_anu
मग पातळपणा काढायला सरळ मोदक पिठी चे पीठ ढकलले २-३ चमचे आणि पुढच्या बॅचेस चांगल्या झाल्या >> आता जर परत पीठ पातळ झाले तर हा उपाय लक्षात ठेवेन Happy
मला स्वतःला पोहे पेक्षा (उकडा+साधा तांदूळ) हे कॉम्बो जास्त सूट होते. >> मलाही .. या रवा इडलीने वात आणला नुसता Sad

रवा बारिक आहे कि कसा?
एवढ्या वेळात फरमेन्ट होते का ? नाही झाले तरी पण तरी इडली fluppy होते का>>>>>>>>
रवा इडली चे दिसत नसले तरी फरमेन्ट होते.. इडल्या सॉफ्ट फ्लपि बनतात..
तांदूळ इडलीसाठी करेक्ट फरमेन्टेशन गरजेचे आहे.. रात्रभर फरमेन्टेशन करू शकतो पण मग दुपारी जरा उशिरा म्हणजे दोन वाजता भिजत घालावे.. सहा-सात ला ग्राईंड करून ओव्हर नाईट फरमेन्टेशन करावे..अशा इडल्या पण चेंज म्हणून करते मी कधीतरी..

फर्म्नेट व्हायला एखादी सुकी मिरची वाटलेल्या पिठात घालुन ठेवा.
https://www.youtube.com/watch?v=adOK-4FTnpc हेब्बारच्या ह्या रेसिपीत इडली रवा वापरुनच बॅटर केलय.

आम्ही पण इडली रवा आणी उडद डाळ वापरुन इडल्या बनवतो. चांगल्या होतात. इडली रवा पण मिक्सर ला फिरवतो. पिठ लवकर आंबवण्या साठी कांदा अर्धा अर्धा चिरून पिठात ठेवायचा. आणी इडल्या करताना काढून टाकायचा. 3 वाटी इडली रवा 1 वाटी डाळ 1 वाटी पोहे. घालतो. मिठ इडली करायच्या वेळे ला च घालायचे.

बेसन किंवा इतर पिठं तुपावर परतायची असतील तर आधी जाड बुडाच्या भांड्यात कोरडीच मंद आचेवर परतायला घ्यायची. जरा कढत आणि एक भाज झाली (अंदाजे ५-७ मिनिटांनंतर) चमचा चमचा तूप (शक्यतो पातळ) घालत जावं. पूर्ण पीठ तुपात ओलं होईल इतकं तूप शक्यतो बेसनाला लागतं; तरी या पद्धतीत जेवढं पीठ तेव्हढं तूप लागत नाही कारण पीठ आधी कोरडं भाजल्या (अर्धवट का असेना) जातं.

एक खूप बेसिक प्रश्न.. मला पोळी खूप छान गोल लाटता येते.. पण भाजताना काय प्रॉब्लेम होतो कालाय नाही... मंद आच, मोठी आच थोडीशी भाजून मग पलटण.. असे सगळे प्रकार try केले.. but alas.. माझं काय चुकत असेल..

@ मृणाल
रवा बारिक आहे कि कसा? >> थोडा जाडसर आहे ..
तांदळाच्या सहसा बिघडल्या नाहीतच त्यामुळे हे रव्याच थोडं डोकेदुखी झाली .
पहिला घाणा सपाटाच झाला ,थोडी बेकिंग पावडर टाकल्यावर अगदी fluppy आणि मऊ झाल्या .. पण कलर पांढरा नाही आला .

धन्यवाद प्राजक्ता , Amupari ..
सुकी मिरची , कांदा याचा वापर करून बघेन फरमेंटेशसाठी !!

@ प्राजक्ता
https://www.youtube.com/watch?v=adOK-4FTnpc >> यात तर इडली रव्यातील पाणी अगदी squeeze करून काढलं आहे .. मी फक्त प्लेट लावून जेवढं निघेल तेवढंच काढते त्यामुळेच पीठ पातळ होत असावे . आता असे करून बघते

@ Amupari
3 वाटी इडली रवा 1 वाटी डाळ 1 वाटी पोहे. घालतो. मिठ इडली करायच्या वेळे ला च घालायचे >> मीही याच प्रमाणाने करते फक्त रवा ऐवजी तांदूळ , मिठ इडली करायच्या वेळेसच घालते .

@ anamika_दे - पोळी मध्यम आचेवरच भाजायची .. मंद आचेवर भाजलेली पोळी वातड होते तर मोठया आचेवर भाजलेली अर्थातच करपते .

मला पोळी खूप छान गोल लाटता येते.. पण भाजताना काय प्रॉब्लेम होतो कालाय नाही>> कणीक कशी भिजवता. फार घट्ट. विदाउट तेल मीठ भिजवता आहे का ते चेक करा. मध्यम घट्ट व भिजवून तेलाने मळून पंधरा मिनिटे ठेवा. मग परत मळून घ्या व लाटा. मास्टर रेसीपी मध्ये एक भाग कोल्हापुरी साइडची मोठी पोळी कशी भाजायची ते त्यांनी सांगितले आहे. ते बघून घ्या. फार सारखी पलटायची नाही. भाजताना अर्धा चमचा तेल पसरा.

इडली साठी हे करून बघा. सकाळी दहा वाजता एक वाटी उडीद डाळ साधी नेहमीची भिजत घाला. संध्याकाळी वाटून घ्या. मग त्यात दोन वाटी इडली रवा घाला व मिसळून रात्र भर ठेवा. सकाळी मीठ व दोन पळी तेल घालून सारखे करोन घ्या. व इडली करा. नो बिग डील रिअली. पोहे व इतर काही घालायची गरज नाही.

रवा नारळ लाडू करताना मिश्रण पाकात घातलं पण आता त्याचा दगड झालाय . काय करू . प्लीज काही उपाय सांगा

बत्त्याने फोडून घेऊन मिक्सरमधून काढा आणि मग ते परातीत घेऊन थोडं तूप घालून वळा. माझं ही एकदा असं सेम झालेलं. खाणेबल होतं नन्तर.

घट्ट झाकणाच्या स्टिलच्या डब्यात घालुन कुकर मधे ठेवुन २ शिट्ट्या करा, मिश्रण मौ होइल मग त्यात थोड तुप घालुन, दुधाचा शिपका मारुन लाडू वळा.

Pages