माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, पण उकडलेले बटाटे गरम असताना गार पाण्यात घातले तर चामट (?) होतात असं ऐकलं आहे. तुमचे नाही का होत? शिवाय गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये असंही ऐकलंय.

वावे मी गरम बटाटे गार (सामान्य तापमानाच्या) पाण्यात दोन तीन वेळा टाकले आहेत, (फ्रीजरमध्ये नाही ठेवले) आता आठवत नाहीय तेव्हा चामट झाले की नाही ते.

गरम पदार्थ फ्रिजर मध्ये ठेवल्याने काय होते? फ्रिजरचे तपमान काही काळाकरता थोडे वाढते, फ्रिजर मध्ये असे थोडे तपमान थोड्या वेळा करता वाढलं तर खराब होणारे पदार्थ /औषधे असतील तर ते खराब होतील. असे पदार्थ कुणाच्या फ्रिजरमध्ये असतील.

फ्रीजवर लोड येतं/फ्रीज खराब होतो: फ्रीज बंद असेल, सामान्य तापमानाला असेल (समजा रात्रभर वीज गेली) आणि मग फ्रीज सुरू केला तेव्हा जेवढं लोड येतं त्यापेक्षा फार कमी लोड चार पाच गरम बटाटे/ अर्धा लिटर गरम दूध ठेवल्याने येईल.

असे काही पदार्थ ज्यांना थर्मल शॉक अजिबात चालत नाही ते खराब होतील. आपले नेहमीचे बहुतेक अन्न या प्रकारात मोडते असे वाटत नाही, पण हे मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. याबद्दल कुणाला माहिती असल्यास सांगावे. दूध खराब होत नाही मी अनेक वर्षे अनेकदा ठेवतो.

हां काचेची भांडी वगैरेना असा थर्मल शॉक देऊ नये.

मग विसरल्या मुळे ते उकळायला लागतं. >>> Lol सेम माझी स्टोरी,

पट्कन होणारा सोपा उपाय - पसरट थाळ्यात लगेच ओतायचं, अर्ध्या मिनिटांत हव्या त्या टेम्परेचरला येतं, मग परत दह्याच्या भांड्यात ओतून विरजण लावायचं.

यावर साधा सोपा सरळ उपाय - चिनी मातीच्या बरणीत/सट घेऊन त्यात रूम टेंपरेचरचं दूध घेऊन ती बरणी तशीच मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून १५-२० सेकंद गरम करणे. अगदी पुरेशी उबदार बरणी, त्यात जस्ट कोमट झालेलं दूध यामुळे दही छान विरजलं जातं आणि आपलं आयुष्य सुखाचं होतं Proud
१५-२० सेकंद हे ३-४ वेळा प्रयोग करून मी सेट केलंय, तुम्ही तुमच्या बरणीचा आकार आणि दुधाचं प्रमाण बघून सेट करू शकता.

चांगली आयडिया प्रज्ञा९. फ्रीज मधून काढलेल्या दुधाला आणि रूम टेम्प.च्या दुधाला किती वेळ ठेवायचे हे नोंद करून घेइन.

विरजण लावण्यासाठी करेक्ट टेम्प दूध मिळवण्यासाठी धावपळ फक्त माझीच होत नाही हे वाचून बरं वाटले

इथे याआधी कडसर तुपाबद्दल लिहिलं होतं.
यावेळेस विरजण बदलले आणि साय पण 15 दिवसापेक्षा कमीच दिवस साठवली - १०/१२ दिवसाची. तूप छान झाले अजिबात कडसर नाहीये.
इथे सल्ला दिलेल्या सर्व माबोकरांना मनापासून धन्यवाद.

मंडळी मदत करा !

दुधाचा एक कॅन जास्तीचा आणला गेला. त्याची डेटही फार जवळची होती म्हणून मग रसगुल्ले करायचा घाट घातला. गेल्यावेळी हेब्बारच्या रेसिपीने अगदीने नीट झाले होते. पण काल काय झालं माहीत नाही! आधी लिंबाचा रस घालूनही दुध फाटेचना. मग अजून थोडं लिंबू पिळून उकळलं तेव्हा ते फाटलं. गाळणीतून गाळलं पण तरी पनीर ओलच राहीलं. मग ते चक्क्याच्या फडक्यात बांधून रात्रभर फ्रिजमध्ये वजन ठेऊन ठेवलं तरीही अजून ते ओलसरचं आहे आणि त्याचे गोळे जेमतेमच वळता आले. तीन चार साखरेच्या पाण्यात घालून उकळले तर ते विरघळतायत !
तर ते पनीर कोरडं करून वळता येण्याजोगे आणि न विरघळतील असे करण्यासाठी काय करावं ? त्यात थोडा मैदा किंवा कॉर्न स्टार्च घालू का ? की आणखी काही ?

थोडा मैदा घालून पहा. अगदी थोडा छेना बाजूला काढून किंचित मैदा घालून, एखादा गोळा वळून पाकात विरघळतो का ते आधी बघ असे सुचवेन. मैदा जास्त झाला तर कडक होतील गोळे. नाहीतर मिश्रणात केशर वेलदोडा घालून सरळ कलाकंद करून टाक. Happy

रणवीर ब्रार च्या पाककृती मध्ये जबरी भुर्ज्या आहेत. पनीर पराठा कुणाल कपूर च्या रेसी पी मध्ये आहे. मी रेसीपी इग्नोअर करून ते डिलेक्टेबल शेफ्स बघते ते सोडा.

किंवा संदेश बनवता येइल श्रोडिंगर कॅट सारखे देवदास सिनेमा त ऐश्वर्या शारुकाला भेटायला प्लेट मध्ये झाकून घेउन येते. म्हटलं तर संदेश म्हटलं तर भेटायसाठी बहाणा!!

चित्र हार में बिजली उड गयी
टेक इट इजी पॉलिसी

पढने पर भी फेल हो गये
टेक इट इझी पॉलिसी.

उरवसी उरवसी टेक इट इझी पॉलिसी
चार दिन की चांदनी ये जवानी पॉलिसी. हे एट टी मध्ये आयका.

छेना पोडा करा.. रेसिपि नेट्वर मिळेल. फाडलेल्या दुधात गोड घालुन ओवनमध्ये भाजणे ही बेसिक रेसिपी. अफलातुन लाग्तो.

अमा...delectable chefs! Lol पण खरंच मस्त आहेत ते.....!!!
पनीर bhurji, कटलेट, पराठा..पुष्कळ ऑप्शन आहेत...रसगुल्ला ट्राय करण्यापेक्षा....

माझ्याकडे सोललेले अळूचे दांडे आहेत>>>
देठी करतात अळूची. तुम्ही त्यालाच भरीत म्हणत असाल कदाचित.

मी भाजीच्या अळूचे दांडे सोलून चिरून भाजीबरोबरच शिजवून घेते. पण वडीच्या अळूचे दांडे टाकून देते, घरी कोणालाच ती देठी आवडत नाही.

आमच्याकडे भाजीच्या पानाचीही ( तेर ) अळूवडी करतात.. थोडी सॉफ्ट असते. तर त्याच पानाची अळूवडी केली आणि देठ काल सोलून ठेवले.. आता नुसतीच ठेचलेला लसूण हिरवी मिरची, खोबरे घालून फोडणीची भाजी केली.. अजून भरपूर आहे. ( सोलायला भरपूर मेहनत आहे)

मी पण भाजीतच टाकते पण वड्या केल्यातर देठी तुरीच्या डाळीबरोबर शिजवून घेते चिंच गूळ गोडा मसाला घालून नेहमीसारखी आमटी करते देठीमुळे काळी होते आमटी. आर्यन असतं खूप त्यात. वाफवून दह्यात कालवून भरीत करते.

देठी करतात अळूची. >>> करेक्ट, आम्हीही देठी म्हणतो त्याला. देठी करायची नसेल तर मी आमटी, कढीत घालते ते तुकडे.

रसगुल्ले करायचा विचार सोडून द्यावा.. >>>> हो तेच केलं शेवटी. Happy नेटवर पण शोधाशोधी केली. घरात खवा होता. मग थोडासा खवा तुपावर भाजला आणि साखर आणि छेना घातला. केशर आणि वेलची पावडर घातली. आचेमुळे आधी ते मिश्रण पात्तळ झालं आणि मग घट्ट होऊन कडा सुटायला लागल्यावर ट्रेमध्ये थापलं. छान कलाकंद / मलाई बर्फी / जे काय म्हणता येईल ते झालय. Happy गोड असल्यामुळे संपायचा काही प्रश्न नाही.

रणवीर ब्रार च्या पाककृती मध्ये जबरी भुर्ज्या आहेत. >>>> भुर्ज्या , पनीर प्राठा वगैरे झालं नसतं नीट.

छेना पोडा करा >>>> हो! छेना पोडा हा प्रकार मला माहित नव्हता. पण काल ते ही दिसलं नेट वर. भारी वाटला. नक्की करून बघणार. तो गंडला तर इथे विचारेनच.. Proud

मुळात ते पनीर / छेना बिघडलं का असेल ? नक्की काचु ?

IMG_20210714_000724.jpg
पनीर बनवताना लिंबाऐवजी white vinegar वापरा. दूध खूप लवकर
आणि व्यवस्थित फाटते. नंतर चक्क्यासारखे फडक्यात बांधून त्यावर वजन ठेवा. पाणी निथळलं कि cling film मध्ये pack करून freeze मध्ये ठेवा. लगेच वापरले तर मऊ असते, साधारण 12 तासात freeze मध्ये मस्त set होऊन वड्या पाडता येतात.
लागेल तसे काढून उरलेले परत घट्ट pack करून
ठेवा. 6-7 दिवस छान राहते. 4 लिटर दुधाचे 670 ते 700 gm पनीर बनते.

मी गव्हाची तिखट धिरडी बनवली होती. कोथिंबीर, दुधी खिसुन , गाजर ाआलं ,लसुण पेस्ट टाकलेली. ही धिरडी शिजण्यास खुपच वेळ लागत होता. कितीही वेळ तव्यावर राहु दिलं तरी ओलसरच रहात होती. काय चुकलं?का अशीच होतात ही? गुळ टाकुन केलेली धिरडी पटापट होतात. खरपुस होतात .

कितीही वेळ तव्यावर राहु दिलं तरी ओलसरच रहात होती.>> दुधी आणी गाजराला पाणि सुटत त्यामूळे ओलसर झाली असतिल, शिजताना झाकण ठेवल होत का?

सुप्रिया...कणकेचे धिरडे असेच होते..जरासे चिकट, लेंजे ....
थोडा कडक- खुसखुशीत पणा येण्यासाठी चमचाभर तांदूळ पीठ, बेसन, रवा...असे मिसळावे...

Pages