माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुकिंग रेंज वर पोळ्या भाकऱ्या करण्याचा 1 महिन्याचा भयंकर अनुभव आहे.पोळ्या काही काळाने जमतात पण गॅस आणि तवा वाली मजा येतच नाही.
कुकिंग रेंजवर भाकऱ्या 'जाऊदे नको त्या आठवणी' कॅटेगरी आहे

खरंय ☺️
बर्नर ची कूकिंग रेंज असेल तर छान

सुगरण मंडळींनो मदत करा. तुम्ही उकडवणे/वाफवणे जसं मोदक, कोथिंबीर वडी कुकरमध्ये कसं जमवता? मी शीटी काढून मग कुकर १५-२० मिनिटं ठेवते. माझा प्राॅब्लेम पदार्थात पाणी जाऊ नये यासाठी काय करावं हा आहे. मी जो पदार्थ वाफवायचा तो खाली आणि त्यावर आणखी एक डबा (त्यात काही सटरफटर जसं मका/बटाटा घालून) ठेवते. तरी थोडं पाणी जातंच पण डबा तसाच ठेवला तर मोठाच घोटाळा होतो. पाणीच पाणी जातं. खरं कायकरतात? माझ्याकडे त्या साइजचं झाकण/ताटली नाही. मिळणार पण नाही (मी देशात डबा घेऊन जाऊ शकेतो) हाॅकिन्सचा मोठ्ठा कुकर यासाठी वापरत आहे. कुणाला काही सुचत असेल तर कळवा. पुढच्या वेळी उपयोगी पडेल.
धन्यवाद Happy

कोथिबिर वडी,मोदक हे सगळ इडली पात्रात जास्त चान्गल वाफवल जात, कुकर मधेच ठेवायच असेल तर सगळ्यात सोप म्हणजे घट्ट झाकणाचा डबा वापरणे त्याने पाणी अजिबात आत जात नाही, गॅस हाय ठेवतेयस का? एकदा दणकुन वाफ आली की गॅस मिडियम करायचा स्लो पण स्टेडी वाफ आली पाहिजे

अगदी अगदी मी तेच लिहायला आले होते. इडली पात्र बेटर राहील अश्या वस्तुंना. ते नसले तरी वांधो नथी. मोठ्या पातेल्यात पाणी घेउन ते उकळायला ठेवा, त्यावर फिट होईल अशी चाळणी घ्या शक्यतो स्टीलची, आणि त्यात उकडाय च्या वस्तु ठेवा मोदक दिंडे, मोमो व वरुन झाकण ठेवा . मॅक्स १२-१३ मिनिट्स मध्ये कायपण मस्त उकडून निघेल.

माझी चकती इतकी उंच नाही. ती पाण्यात बुडून थोडीच वर येते. इडली कुकर पण कसा वापरू? त्यात एका मोठ्या गोल भांड्यात एक स्टॅंड जातो. आईकडे वाट्यांचा होता. हा तसा नाही.
गॅसचे प्रयोग झालेत पण आठवत नाही. पुढच्या वेळी करेन तोवर आणखी उपाय रिसर्च करावे लागतील. धन्यवाद पुन्हा एकदा Happy

आता घरातल्या प्रत्येक भांड्याची मापं काढावी लागतील. Lol तरी नशीब कोणे एकेकाळी आईने स्टीलची चाळणी दिलीय. पाहाते बसते का कुठे. नाहीतर लाडकी दुकानं सुरू झाली की हिला कडेवर घेऊन फिरेन. बस गं बाई करत Lol

तुम्ही हे असे कोलॅप्सिबल्/अ‍ॅडजस्टेबल स्टीमर का नाही वापरत? कुठल्याही उभट भांड्यात बसतो हा. कारण रुंदी आपोआप अ‍ॅडजस्ट होते. मी इं.पॉ. मधे स्टीम करते.
steamer.png

मीही कुकरमध्ये को.वडी अशीच वाफवते.एक मोठी खोलगट डिश पाण्याने भरून त्यावरच्या भांड्यात जे काय उकडवयचे असेल ते ठेवा.जे झाकण थोडेफार बसत असेल ते लावा.कुकरची वाफ फक्त 11 ते 13 मिनिटे येऊ द्या.जास्त वेळ ठेऊ नका.

उकडीचे मोदक मायक्रोवेव्हमध्ये वाफवता येतील.

एकदा कुकर नसताना आईने कोथिंबीर वडीचं मिश्रण सुती कापडात भरून ते एका चाळणीवर ठेवून चाळणी एका मोठ्या तपेलीवर ठेवून कोथिंबीर वड्या वाफवल्या होत्या.

मी ढोकळा वाफवायला एका मोठ्या कढईत खाली एका बाउलमध्ये पाणी + वजन भरून त्यावर ढोकळ्याचा (कुकरचा डबा) ठेवतो.

देवकी यांनी सांगितलेली पद्धत बरी वाटते. कारण त्यांनी सध्याच्या परिस्थीतीशी जुळवून घेता येईल असा उपाय दिलाय.
कोलॅप्सिबल्/अ‍ॅडजस्टेबल स्टीमर, पण टेम्प्टिंग आहे पण पसारा वाढवत नाही सध्या. ईम्पॉ नकोय मला. पुन्हा ते आवडणारे आसले तरी नेहमी केले जाणारे आञ्टम्स नाहीत. भरत यांचा उपाय सध्या नाही करणार. मागच्या आट्।वड्यात एक मावे कुकिंग्मध्ये भांडं फोडलं आहे ऊप्स
Thanks a lot for all the thoughts Happy

मी सध्या आई बाबांकडे नागपूरला आहे, अगदी विरजणाची तंतोतंत पद्धत वापरून अमुल ताजा दूधाचं दही लावतोय. टपरवेअरच्या डब्यात तयार झालेल्या दह्याची वरती छान पांढरीशुभ्र कवडी असते, चवही सुरेख (मला आवडते तशीच गोडसर आंबट) असते. मात्र कवडीखाली पाणी जमलेले असते. दही खातांना पाणचट वाटते, जणु वाटीत ताकच चमच्याने खात आहोत असे वाटते. तुलनेने मुंबईला घट्ट दही लागते. तर माझे काय चुकत असावे ज्यामुळे दही पातळ लागत आहे? किंवा दही घट्ट व्हायला काही युक्ती सुचवा.

मी आताच कोथिंबीर वडी केली कुकरमध्ये.मी कुकरमध्ये मावणारा डब्बा किंवा सोबत आलेल्या डब्यात थोडेसे पाणी घालून (वजनसाठी) घालून त्यावर चाळण ठेवते आणि त्यावर वडी ठेवून सरळ दोन शिट्या काढते. चाळणीमुळे पाणी पदार्थावर जमा न होता डब्यात जाते.

IMG_20200705_103607-1606x1203.jpg

दिसायला बरा दिसतोय पण घट्ट झाला. खाताना घास लागत होता. इनो कमी झालं असेल का? थोडासा चिकूपणा करुन अर्धा चमचा इनो शिल्लक ठेवला. बाकी रेसिपी नीट फॉलो केली होती.

खपला तसा चुपचाप. पण पुन्हा करेन तेव्हा चुकायला नको.
साखरेचे पाणी टाकले होते. ते पूर्ण मुरेपर्यंत वाट बघायला हवी होती बहुतेक.

दिसतोय मस्तच.
घट्ट झाला तर तुकडे लहान साईझ करून सढळ हस्ते फोडणी टाकली की चांगला लागतो

फार भारी दिसतोय पण. संपला ना मग जाऊदे. नाहीतर म्हणणार होते शेव खमणी बनवा म्हणून.
माझ्याकडे पण हा प्रॉब्लेम होतो कधीतरी.

खमणी प्रकार आज पहिल्यांदाच बघितला रणवीर ब्रारने केलेला. आधी माहीती असता तर बात ही क्या थी. असो. मौके और भी आएंगे. आमचं पाककौशल्य लक्षात घेता. Wink

भटुरे करताना पिठ नक्की किती घट्ट भिजवायच, आज छोले आणि पुरी न करता लेकिच्या फर्माइश वर भटुरे केले, चविला, टेक्षर सगळ छान जमल पण पुरी सारखे टम्म मात्र फुगत नव्हते एक दोन मोठे बबल येत होते, कुणाल कपुरच्या रेसिपीने केले होते, त्याने सान्गितले तसच प्रमाण घेतल होत
त्याने सैलसर भिजवायला सान्गितल होत तस केल मग लाटताना भटुरे इलॅस्टिक सारखे परत जागेवर येवुन मुळ रुप धारण करत होते.
मुलाना आवडले तो प्रश्न नाही पण चुक्या किधर हे कळत नाही तोवर भुन्गा.

आज घरी रसगुल्ले करत होते, (कबीताज किचन चा video पाहून)पनीर चांगलं 15 मिनिट मळून, व्यवस्थित गोळे करून घेतले,कुठेही भेग नव्हती. सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. साखरेच्या पाण्यात घालून 8 मिनिटे उकळवल्यार रसगुल्ले आकाराने मोठे तर झाले पण त्यांना थोड्या भेगा पडून त्याचे काही कण पाकात विरघळायला लागले. काय चुकलं कळत नाहीये नीट. त्यांनी सांगितलं होतं तसं पनीर मळताना नंतर ते फुटू नये म्हणून थोडा मैदा घातला होता त्यात, तरी ते कण पाकात बाजूला आले, काय करू ??
नक्की कुठे आणि काय चुकलं?

Pages