चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर के दर्शन अज्जिबात नाही आवडला. कन्सेप्ट इतका चांगला होता. ९०ज मधला काळ खरतर चांगला उभा करता आला असता. प्रौढ व्यक्तीने शाळेचा युनिफॉर्म घातल्यावर ती लहान मुलासारखी दिसेल हेच मुळात न पटण्यासारखे आहे. शेवटचा नातवाचा आणि आजीचा दारु पिण्याचा सिन अगदीच इमॅच्युअर आहे. ना धड इमोशनल ना विनोदी.

जितेंद्र कुमार , पंचायत मध्ये खुप आवडलेला. त्यामुळेच 'चमन बहार' दिसल्यावर लगेच पिक्चर बघायला घेतला. अक्षरशः इतका वाईट मुव्ही गेल्या कित्येक वर्षात बघितला नाही. जितेंद्र मुळ आशा वाटुन शेवटपर्यंत मधून मधून फोर्वर्ड करत बघितला. कारण उगाच वाटत होत कि काहीतरी ट्वीस्ट येईल आणि मुव्ही नक्की चांगला असेल.
मुळात टीन एजर मुलीला कंटिन्युअस बघत बसणे , पाठलाग वगैरे करणे तेही तिच्या वयाच्या डबल असलेल्या पान पट्टी वाल्याने ,हेच इतके क्रीपी आहे . आणि त्याचा तो स्वभावाने किती चांगला आहे ,त्याचे किती प्रेम आहे त्या मुलीवर अस दाख्वून ही 'हिरोगिरी' अ‍ॅक्सेप्टॅबल असल्याचे का दाखवित असतील ? आणखीणच प्रोत्साहन असल्या हिरोजना.

रात अकेली है आवडला. नेहमीची मर्डर मिस्टरी आहे असे वाटत असताना पुढे पुढे वेगळे धक्के बसतात. नॉर्मल मर्डर मिस्टरी मध्ये बर्‍याच मोठ्या सामाजीक प्रश्नावर भाष्य केलेले आहे. कुठलेच कॅरॅक्टर हे चांगले वाईट न दाखवता त्यांचेही थोडे ग्रे शेडस दाखवले आहेत त्यामुळे तो खरा वाटतो.

अगदी खिळवून ठेवणारा आणि फास्ट झालेला आहे.

त्यात सि आय डी मधल्या अभिजितला पाहून खूप बरे वाटले. मस्त काम केलेले आहे त्याने. एका सीन मध्ये नुसत्या डोळ्यांनी जरबेचा अभिनय जबरदस्त केलेला आहे.

जितेंद्र कुमार , पंचायत मध्ये खुप आवडलेला. >>> त्यामुळे मी शुभमंगल ज्यादा सावधान बघायला घेतला.
अतिशय उथळ आहे. वाईट्ट

सि आय डी मधल्या अभिजितला पाहून खूप बरे वाटले. >>>> या लोकांनी CID सोडून कधी कुठे काम केलयं का असा प्रश्न पडायचा . पण दया सिंघममध्ये होता आणि हल्ली Johny Gaddar बघितला त्यात दिसला. अभिजीतला कधी कुठे पाहिल्याचं आठवत नाही.

जितेंद्र कुमार , पंचायत मध्ये खुप आवडलेला. >>> त्यामुळे मी शुभमंगल ज्यादा सावधान बघायला घेतला.
अतिशय उथळ आहे. वाईट्ट>>>>>
स्वस्ती, अगदी तेच लिहिणार होते. भंकस मुव्ही आहे शुभमंगल सावधान. त्यातले 'शु' वगैरे करण्याचे सिन तर अक्षरशः काहीही नसताना उगाच काहीतरी विनोदी कलात्मकता दाखवायची म्हणुन दाखविले आहेत. उथळपणाचा कहर.
गे कपल्सचा घोर अपमान आहे हा मुव्ही आणि डायरेक्टरला धरून बदडले पाहिजे.

रात अकेली है , मै +१
शकुन्तला देवी अतिशय उथळ , अजिबात नाही आवडला.

रात अकेली बघितला. नाईव्हज आऊट सारखीच थीम वाटली. ओके ओके आहे.
शकुंतला देवी पण ओके. फार भारी काही नाही.
३१ दिवस प्राईमवर बघितला. तो थोडा बरा आहे. शशांक केतकरचा.

अभिजीतला कधी कुठे पाहिल्याचं आठवत नाही. >> तो खरं तर बरेच ठिकाणी आलेला आहे. आता ह्रितीकच्या सुपर ३० मध्ये होता. सत्या मध्ये होता, लक्ष्य मध्ये पण होता. तो मधून मधून इकडे तिकडे दिसत राहिला.

आदित्य श्रीवास्तव त्याचे नाव (अभिजित इन सीआयडी).

सत्या मध्ये खंडेलकर. रामु, अनुराग कश्यप यांच्या त्या फेजमधल्या सिनेमात होता तो.

त्याचा सगळ्यात भारी अभिनय 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये बादशाह खानचा! जबरदस्त.

Bandit queen ने डेब्यु केलेले वा पहिली महत्वाची भूमिका असलेले कलाकार सगळे जबरदस्त आहेत.
निर्मल पांडये, सीमा बिस्वास, आदित्य श्रीवास्तव, सौरभ शुक्ल, गजराज राव.

शकुंतला देवी बघायला सुरुवात केली पण नाही आवडला. एखाद्या कार्टून सारखे खोटे , लाउड आणि चीजी कॅरेक्टर वाटते ते. पूर्ण पाहिला नाही.

Hotstar वर लुटकेस पाहिला. हलका फुलका छान आहे. काहीतरी लाईट पहायचे असल्यास उत्तम पर्याय. कुणाल खेमू तसाही अवडतोच, निरागस वाटतो. यात पण चांगले काम केले आहे. One time watch

भारतात नाइव्ज आऊट एअरटेल एक्सट्रीम वर आहे. प्राईमवर नाही. एअरटेल मोबाईल कनेक्शन असेल तर फुकट बघता येईल.

गुन्जन सक्सेना -द कारगिल गर्ल बघितला, गुन्जम सक्सेना विषयी आधि काही माहिती नव्हती त्यामूले उत्सुकता होती. मुव्ही ठिकठाक आहे, युद्धाच चित्र्करण माफक आहे, जेवढ दाखवलय त्यातही युद्धाचा थरार जाणवत नाही.
मुख्य भुमिका करणारी व्यक्तीच गन्डलेली असल्याने चित्रपट अतिशय निराशा करतो, जान्व्हवी कपुरचा मी पाहिलेला हा पहिलाच चित्रपट ( सैराट ची कॉपी बघितली नव्हती) तिचा चेहरा अजिबात एक्स्प्रेसिव्ह नाही,एकच मठ्ठ चेहरा घेवुन ती वावरत राहते, तिच्यात पोटेशियल असेलही पण गुन्जन सक्सेनाची जिद्द, मेहनत, आर्मित जायचच ही धडपड कुठेही दिसौन येत नाही.
सलकलाकार सगळेच उत्तम आहे (त्यानेही मुख्य पात्र म्हणजे पात्रच आहे हे अजुन ठळक जानवत )पन्कज त्रिपाठी आर्मी ऑफिसर न वाटता बरेली की बर्फी मधुन थेट उचलुन इकडे आणलाय अस वाटत.

मी सारा अली खान चे केदारनाथ आणि सिंम्बा बघितलाय बरी वाटते ती.
जान्हवी कपूर चा धडक बघूनच बास असे झाले.

मी पण काल पाहिला गुन्जन सक्सेना. कथा आधी काहीच माहित नव्हती त्यामुळे यात दाखवलंय ते काय खरं आहे काय खोटं ते माहित नाही.
तरी पण कथा बरी आहे, नॉट बॅड असेच म्हणेन. आर्मीतला जेन्डर बायस, त्यावर ही आख्ख्या बेस वरची ही एकटी स्त्री पर्फॉर्मन्स च्या जोरावर कशी मात करत असेल या उत्सुकतेने मी सिनेमा पूर्ण पाहिला. पण प्राजक्ता वर म्हणतेय तसंच मुख्य झान्वी च्या अ‍ॅक्टिंग च्या अभावामुळे घोळ होतो. अगदीच माठ चेहर्‍याने वावरलीय. सहकलाकार मात्र चांगले अ‍ॅक्टर्स आहेत सगळे.
तो लेडीज बाथरूम नसणे, त्यामुळे युनिफॉर्म चेन्ज करून हजर व्हायला उशीर होणे हा प्रसंग हिडन फिगर्स वरून इन्स्पायर झालेला वाटला.
अजून खटकलेल्या एक दोन गोष्टी म्हणजे - पाय्लट होण्याची इतकी इच्छा असून त्याला लागणार्‍या अगदी बेसिक पात्रता, इतर रिक्वायर्मेन्ट हे तिथे फॉर्म सबमिट करायला जाईपर्यन्त तिला माहितच नसतात? ( दहावी की बारावी की पदवी वगैरे.) तसंच ती कारगिल च्या वॉर फ्रन्ट वर कामगिरीवर असताना तिचा भाऊ (आर्मीत असला तरी) एअर फोर्स मधे नसतानाही त्यांच्य कन्ट्रोल रुम मधे सहज आत जाऊन लाइव्ह कॉन्वर्सेशन ऐकत उभा राहणे.

कारगिल च्या वॉर फ्रन्ट वर कामगिरीवर असताना तिचा भाऊ (आर्मीत असला तरी) एअर फोर्स मधे नसतानाही त्यांच्य कन्ट्रोल रुम मधे सहज आत जाऊन लाइव्ह कॉन्वर्सेशन ऐकत उभा राहणे.>>> अगदी अगदी ! तिनही दल देशासाठीच लढत असले तरी ती अस कोणि कुठेही कस जावु शकेल?
दुसर म्हणजे तीच पायलट व्हायच पॅशन प्रुव्ह करताना घरच्याचा विरोध उगाच काहितरी ड्रामा क्रियेट करायचा म्हणु केलाय अस वाटत. जनरली मिलिटरी फॅमिलीत ओपन वातावरण असत, मुलगा असो वा मुलगी डिफेन्स मधे जायला क्वचित विरोध होतो.
१०-१२ आणी पदविधर जान्व्ही सगळी कडे अगदी सारखीच दिसते, जे अगदीच बाळबोध आहे,जरातरी बदल दाखवणे अपेक्षित आहे, हेअर्स, ड्रेसिन्ग स्ताईल याने तो इफेक्ट सहज शक्य होता.
जान्हवी पोस्टिन्ग च्या दिवशी कॉरिडोर मधे ज्या पद्धतिने चालत येते ते बघुन सगळ्या डिफेन्स वाल्यानी कपाळावर हात मारुन घेतला असेल.

खुदा-हाफिझ पाहिला. बरेच लूप-होल्स आहेत. फारच टिपीकल हिंदी मसाला मूव्ही केलाय. सगळे ट्विस्ट्स प्रेडिक्टेबल आहेत. मला प्रेडिक्टेबल वाटले म्हणजे फारच बाळबोध असावेत कारण मला साधे साधे सस्पेन्स आधी उलगडत नाहीत आणी मी ते उलगडायचा प्रयत्न सुद्धा करत नाही.

माधुरीचा 15 ऑगस्ट चित्रपट 15 ऑगस्टच्याच विकेंडला नेफ्लिवर पाहिला.
छान आहे , आवडला.
मृण्मयीने सुरेख काम केलं आहे. आदिनाथ कोठारे हँडसम दिसतो व सहज वावरतो. इतका की तो दुसरा हिरो त्याच्यापुढे कमी पडतो. तो छोटा मुलगा निनाद खूप गोड आहे.
थोडी लांबी कमी करता आली असती पण ठीकच आहे. हलके फुलके मराठी चित्रपट आवडत असतील तर नक्की बघा.

इतका की तो दुसरा हिरो त्याच्यापुढे कमी पडतो. >> तेच तर दाखवाचे आहे. आलेले स्थळ उत्तम आहे. प्रियकरापेक्षा सगळ्या बाबतीत चांगला. शेवटी तोच तिला समजावतो.

गुंजन सक्सेना रोज थोडा थोडा बघत २/३ बघून झाला आहे. हिचे डिस्क्रिमिनेशन संपणार कधी आणि उरलेल्या वेळात ही कारगिल ला जाणार कधी असा प्रश्न पडला आहे.

वरती मैत्रेयी व प्राजक्ताने लिहीले आहे बरेचसे तसेच मलाही वाटले. मिलिटरी प्रोसेस, प्रोटोकॉल्स वगैरेंचा फारसा अभ्यास न करता ढोबळ मांडणी व चित्रीकरण केल्यासारखे वाटते. ती १० वी ते ग्रॅज्युएट सगळी वर्षे सारखीच दिसते हे जबरी आहे. तसेच फ्लाइट स्कूल ला काय क्वालिफिकेशन लागते वगैरे त्या ऑफिस मधे जाईपर्यंत पत्ताच नसणे वगैरे फार विनोदी आहे.

तो भाऊ एअर फोर्स मधे नसतो ना? तिच्या बेस वर तो कोठून उगवतो? मधेच तेथे एक रॅण्डम स्फोट होतो, त्यातून तो तिला- एअर फोर्स ऑफिसरला- "वाचवतो" आणि वर म्हणतो सगळीकडे तुला वाचवायला मी येउ शकत नाही.

आर्मीतले सगळे लोक सैनिकांना मोटिव्हेट करायला जसे बोलतात तसे २४ तास घरीही बोलत नसतील हे ठीक आहे. त्यामुळे पंकज त्रिपाठी चे पुटपुटल्यासारखे बोलणे खटकले तरी प्रत्यक्षात असू शकते. तसेच मिलिटरी मधे सुरूवातीला जेव्हा स्त्रिया सामील झाल्या तेव्हा बरीच अ‍ॅड्जस्टमेण्ट करावी लागली असेल हे ही ठीक आहे. पण ते जसे दाखवले आहे ते अनेकदा उगाचच कायच्या काय वाटते. सिनीयर ऑफिसर बाजूलाच बसलेला असताना त्याच्याबद्दलच गॉसिप करणे, वरच्या रॅन्क मधल्या ऑफिसर ने दिलेल्या सूचनांचे पालन न करता स्वतःच्या मनाप्रमाणे बदल करणे वगैरे उगाच ताणलेले वाटते.

डिस्क्रिमिनेशन दाखवायच्या नादात तिच्या सिनीयर ऑफिसरला बळंच व्हिलन केले आहे. एखाद्या ऑफिसरला स्त्रियांशी बोलता येत नाही म्हणून त्याला वाचवायला इतके उद्योग मिलिटरी मधे कोणी करेल असे वाटत नाही. एकतर त्या ऑफिसरलाच ऑर्डर फॉलो करायला लावतील, किंवा फार फार तर थोडे बदल करून दुसर्‍या कोणाबरोबर तिला पेअर करतील. इथे सरकारी कारणे देउन अनेक दिवस तिला फ्लाइट अवर्स मिळू देत नाहीत आणि त्याचा कसलाही लॉग वगैरे न पाहता उलट तिलाच विचारतात की तू का एअर मधे नव्हतीस. हे कायच्या काय आहे.

तसेच फ्लाइट स्कूल ला काय क्वालिफिकेशन लागते वगैरे त्या ऑफिस मधे जाईपर्यंत पत्ताच नसणे वगैरे फार विनोदी आहे
>>> ट्रू स्टोरी आहे ना... गुंजन ची...

गुंजन सक्सेना सुरु झाला म्हणता म्हणता संपलाच एकदम Uhoh
१ तास ४० मिनिटांचा सिनेमा, त्यात मुलगी म्हणून स्ट्रगल यावरच जास्त फोकस होता, अ‍ॅक्चुअल युध्दातले प्रसंग काही फार ईन्टेन्स नाहीच घेतले !
जान्हवी सोडून बाकीच्यांनी चांगल काम केलय पण इतक्या लहान सिनेमात तिच्यावर पूर्ण फोकस असताना इतरांच्या वाटेला फारच कमी स्क्रीन आलाय !
जान्हवी जुन्या ८० च्या हिरॉइन्स सारखी शोभेच्या बाहुलीचे आणि व्हिलनने झाडाला टांगून ठेवलेले रोल करायला ठिक आहे, उगीच आईच्या कृपेने सगळे फिमेल सेंट्रिक रोल्स मिळतायेत !
रिंकु राजगुरुच्या हिन्दीला गावरान मराठी अ‍ॅक्सेन्ट नसता तर तिने भारी केला असता हा रोल Happy
Btw , तो हिरकणी बघताना सुध्दा मला सो.कु ऐवजी रिंकु असायला हवी होती असं वाटलं !

Pages