Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे बघावा हा पिक्चर? सोनी
कुठे बघावा हा पिक्चर? सोनी लिव्ह नाहीये माझ्याकडे
हो स्वरदा मस्त आहे. माझे मन
हो स्वरदा मस्त आहे. माझे मन तुझे झाले मध्ये आधी हिरोची acting सुपर्ब वाटली, होतीच. ही आवडली तरी अभिनय सुरुवातीला so so वाटला पण नंतर तिचा अभिनयाचा ग्राफ इतका उंचावला की बास रे बास, छा गयी. आदिती सारंगधरपण फिकी पडली तिच्यासमोर.++++++१११११११ माझे मन तुझे झाले शुभ्राला मुलगा झाला तिथपर्यन्त पाहिली होती. नन्तर कण्टाळा आला. सोडून दिली बघायची. मालिका तशी चान्गली होती, पण शुभ्राच लग्न तिची आई ज्या प्रकारे ठरवते, ज्या कारणामुळे ती तिचे लग्न जबरदस्तीने लावून देते ते पटल नाही.
लुडो बघितला, भरपुर कलाकार,
लुडो बघितला, भरपुर कलाकार, भरपुर अतरन्गी सिच्युएशन तरी मस्त आहे, पहिले १५ मिनिट व्हेग वाटतो पण मुव्हिमधे एकूण एक सीन महत्वाचे आहेत कारण सगळे एकमेकाशी अजिबात घेणदेण नसुनही कनेक्टेड आहेत.
सगळ्यात भारी अर्थात कालिन भय्या उर्फ पन्कज त्रिपाठी, राजकुमार राव ने काम केलेय. अभिषेक बच्चन बरोबरची लहान मुलगी फार गोड आहे.
कुठे पाहिला ते लिहीत जा नं...
कुठे पाहिला ते लिहीत जा नं....
नेटफ्लिक्स वर
नेटफ्लिक्स वर
वेलकम होम पाऊण पहिला. निम्मा
वेलकम होम पाऊण पहिला. निम्मा बघेपर्यंत छान वाटलं. हॉरर पेक्षा क्राईम च वाटला. फार अंगावर येतो पुढचा निम्मा भाग. इतका की रात्री बघत होते त्यामुळे शेवट नाही पाहिला झोप डिस्टरब होईल म्हणून. त्या माणसाला पत्र्याच्या शेड मध्ये जखमी करून डांबून का ठेवलं कळलं नाही , बहुतेक तो प्रेरणाची डिलिव्हरी करणारा डॉ होता का?
स्वरदा थिगळे आणि सगळ्याच कलाकारांनी काम अप्रतिम केलय.
रक्तरंजित फार दाखवलंय, सिम्बॉलीक दगड वगैरे उचलून फक्त आवाज दाखवायला हवा होता . दृश्य किळसवाणी वाटतात.
त्या दोघी जनगणना करायला
त्या दोघी जनगणना करायला पहिल्यांदा येतात तेव्हा प्रेरणाच दार उघडते आणि झटकन कोणी दुसरं तिथे येत ही नाही तेवढ्यात प्रेरणा पटकन खरं दोघी मुलींना का सांगत नाही सुटकेसाठी , का तिने झाला प्रकार कायमस्वरूपी स्वीकारलेला असतो?
ल्युडो बघितला. एकदम मस्त.
ल्युडो बघितला. एकदम मस्त. अतरंगी आहे, प्रचंड गुंतागुंतीचा आहे, मात्र बोरिंग अजिबात नाही.
सगळ्यात जास्त आवडला तो अभिषेक बच्चन! एक क्रूर, रागीट गुन्हेगार ते एक इमोशनल माणूस, बाप ह्या सगळ्याच छटा तो जबरदस्त दाखवतो. शेवटी त्याच्या मुलीला भेटतानाचा सिन तर क्लास! ती लहान मुलगीही मस्त आहे त्याच्यासोबतची...
पंकज त्रिपाठी as usual जबरदस्त वाटला.
अनुराग बसुने पुन्हा एकदा कमाल केलीये!
ओहो. लुडो चीच वाट बघत होते.
ओहो. लुडो चीच वाट बघत होते. राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी साठी बघावाच लागेल.
मी एक ख्रिसमस मुव्ही
मी एक ख्रिसमस मुव्ही बघितल्यावर पुढची सगळी ख्रिसमस मुव्हीची सजेशन्स यायला लागली. मग एक दोन तीन करत डझनभर ख्रिसमस मुव्हीज पाहून झाल्यावर आता दुसरी सजेशन्स येतच नाहीत.
काही म्हणा या सीझनमध्ये ख्रिसमस मुव्ही पहायला मजा येते, डोळ्यांना ट्रीट असते. इतरवेळी ते टिपिकल स्टोरी असणारे मुव्हीज अतिसामान्य वाटतात. पण या सीझनमध्ये फील गुड मुव्हीज म्हणून बघायला मला आवडतात.
ख्रिसमस मुव्हीजची यादी टाका
ख्रिसमस मुव्हीजची यादी टाका ना इथे.
जाई,
जाई,
नेटफ्लिक्सवर christmas लिहिलं तर भरमसाठ मुव्हीज दिसतील. मी पाहिलेल्यापैकी काही -
Christmas wonderland
Christmas Inheritance
Christmas Wedding planner
Christmas made to order
Holidating
My christmas Inn
Christmas with a view
Operation christmas drop
The holiday calendar
Let it snow
Holiday in the wild
Instant family
यातला Airdrop and in the wild हे मुव्हीज म्हणजे डोळ्याला सुख. एवढी बेफाम सुंदर लोकेशन्स आहेत. पण एकूणच या सगळ्या मुव्हीजमध्ये स्मॉल टाऊन, करियरिस्टिक हिरोईन, त्याचं वा तिचं कुटुंब, एक प्रेमळ बहिण, सद्गुणी सामाजिक जाणिव असलेला हिरो, तिच्यासाठी वाट बघणारी मोठी करिअर opprtunity सोडून तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणं ही कॉमन थीम आहे.
थँक्स मीरा
थँक्स मीरा
आवडत्या ख्रिसमस मुविज-
आवडत्या ख्रिसमस मुविज-
होम अलोन,
हाऊ द grinch स्टोल द ख्रिसमस
वर्णिता त्याला कंडिशनिंग
वर्णिता त्याला कंडिशनिंग म्हणतात. ..
एखाद्या गोष्टीची लहानपणापासूनच सवय असेल तर ते चूक की बरोबर हे समाजण्यापालिकडे गेलेले असते.
तिच्यासाठी जेवण मिळणे महत्वाचे असते...
आणि तुम्ही शेवट न पाहता झोपला
आणि तुम्ही शेवट न पाहता झोपला त्यामुळे जास्त डिस्टरब झाला असाल... शेवट चांगला आहे...
वर्णिता अगदी अगदी. बरेच
वर्णिता अगदी अगदी. बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतात.
-स्पॉईलर अॅलर्ट-
>> बहुतेक तो प्रेरणाची डिलिव्हरी करणारा डॉ होता का?
बहुतेक तो वीजमंडळाचा कर्मचारी असावा कारण तो घरासमोरच्या इलेक्ट्रीक पोलवर काही नोंद करताना दाखवलाय
एकंदरीत त्याला जखमी करुन डांबण्याचा किंवा बाळांचा खून करण्यामागचं कारण कळत नाही. एकवेळ ते सगळे मनोरुग्ण/मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत अस मानू. पण मग एरवी एव्हढी निर्दय फॅमिली, तो गोठा(?) जळाल्यावर घळाघळा का रडतात म्हणे?
त्या दोघीपण कमाल दाखवल्यात. एका खुनी फॅमिलीत अडकल्याचं कळलंय, पण सुदैवाने पळून जायची संधी मिळून पळूनही जाऊ शकत आहेत, पण तरीही केवळ मोबाईल त्या घरात राहिला म्हणून पुन्हा त्या घरात जातात.
शेवटी त्या म्हातार्या बाईच्या गळ्यात विळा कोण मारतं ते कळत नाही. प्रणिता मारते का?
ती प्रणिता : तिच्यावर घरातच अत्याचार होत असून ती तशी मोकळेपणी वावरताना दाखवलीय. ती एकदाही त्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही? कधीकधी ती मुलीना मदत करते आहेसं वाटतं तर एकदा एकीचा ठावठीकाणा बोट दर्शवून दाखवून देते की. एकंदरीत कन्फ्यूज्ड कॅरॅक्टर वाटलं.
ते तळघरात कोंडणे प्रकरण बर्यापैकी साइलेन्स ऑफ द लॅम्ब वरुन इन्स्पायर्ड वाटतं.
लहानपणापासून जर एखाद्याला रोज
लहानपणापासून जर एखाद्याला रोज दोन छड्या मारल्या जात असतील.. it becomes part of their life.. ते चूक की बरोबर हे समजण्याच्या पलीकडे जातात ते...
त्या मुलीचे पात्र असे आहे...
स्टॉकहोम सिंड्रोम?
स्टॉकहोम सिंड्रोम?
ल्युडो फुल टीपी आहे. पंकज
ल्युडो फुल टीपी आहे. पंकज मिश्राचा "अॅण्टी-त्रिपाठी" माफिया बॉस, अभिषेक व त्या लहान मुलीमधले संवाद आणि ओव्हर द टॉप राजकुमार राव - हे टॉप पॉइण्ट्स, मला दिसलेले. बाकी अनेक नवीन चेहरे आहेत त्यामुळे चित्रपटाच्या वेगामधे पटकन संगती लागत नाही. पण एकूण वेग कोठेही कंटाळा येउ देत नाही.
मजेशीर आहे
मजेशीर आहे
आम्ही आता 1 तास पाहिला.मग कुटुंबाला आवडेनासा झाला, काही कळत नाहीये, नोटस काढाव्या लागतील म्हणून.मग बंद केला.उरलेला उद्या एकटीने पाहेन.
मला टाईमपास वाटला.एकदा बघायला मस्त.
वर्णिता त्याला कंडिशनिंग
वर्णिता त्याला कंडिशनिंग म्हणतात. ..>>> हो बरोबर च्रप्स , शेवटच्या 25 मिनिटात नेहाशी बोलताना तिचं आणि त्या म्हाताऱ्या माणसाचं नातं कळतं. आधी ती पण अडकलेली मुलगीच असते असं वाटतं.
दुपारी पाहिला राहिलेला.
-स्पॉईलर अॅलर्ट-
वर्षा, हो ना गोठा जळल्यावर एवढं काय झालं इतकी निर्दयी असताना कळतच नाही.
मोबाईल साठी परत येतात ते पण समजलं नाही.
म्हाताऱ्या बाईला नेहा मारते प्रतिक्षिप्त क्रियेने कारण म्हातारी नेहाच्या पायावर चाकू ने का कशानेतरी मारत असते.
प्रेरणा बोट दाखवून सांगते कारण एकतर ती खिडकीतून सगळं बघत असते हे त्या म्हाताऱ्याला माहीत असतं आणि जर खरं नाही सांगितलं तर परत म्हातारा मारेल या भीतीपोटी सांगते. जेव्हा नेहासाठी कडी काढते तेव्हा कोणी बघायला नसतं तिथे त्यात भोला ही मेलाय, म्हातारा आणि अनुजा टेरेसवर गेलेत त्यामुळं काढली असावी.
चित्रपटाच्या शेवटी ते सत्यकथा असणं, एकूण किती अत्याचार केले गेले हे बघून सुन्न होतं.
**** स्पॉयलर अलर्ट ****
**** स्पॉयलर अलर्ट ****
>>वर्षा, हो ना गोठा जळल्यावर एवढं काय झालं इतकी निर्दयी असताना कळतच नाही.<<
त्यांची गाय असते बांधलेली त्या गोठ्यात.
>>आधी ती पण अडकलेली मुलगीच असते असं वाटतं.<<
ती (अपर्णा) आणि तिची आई (सावित्री) ह्या दोघी त्या घरातल्या पहिल्या बळी आहेत.
सिनेमातले काहि सीन्स अतिशय बिभत्स आहेत, जे टाळता येउ शकले असते. पण सध्या काय आहे, ओटिटि प्लॅटफॉर्मच्या स्वातंत्र्यामुळे शिव्या, सेक्स, आणि बिभत्स सीन्स दाखवले नाहि तर फाउल धरला जातो कि काय, अशी शंका वाटते...
रियल लाइफ स्टोरी असल्याने काहि प्रसंगातले न पटणारे सीन्स बघुन असं खरोखर घडलं असेल का हा प्रश्न सतावत रहातो...
हो सत्यघटना, कुठली ते मेन्शन
हो सत्यघटना, कुठली ते मेन्शन केलंय का सुरुवातीला ? मी मिस केलं असेन मग.
नॉर्मली सत्यघटनेवर आधारीत असला चित्रपट तर त्याचा रेफरन्स कधी, कुठे, किती साली घडली देतात ना सुरुवातीस. यात शेवटी फक्त अत्याचारांचे स्टॅटिस्टिक्स दिलंय.
वेलकम होम मधे नरबळी दाखवलेत
वेलकम होम मधे नरबळी दाखवलेत का (छोटी बाळे), अम्माचा मुलगा घेत असतो का बळी. फार अंगावर येणार असं असेल तर.
पण सध्या काय आहे, ओटिटि प्लॅटफॉर्मच्या स्वातंत्र्यामुळे शिव्या, सेक्स, आणि बिभत्स सीन्स दाखवले नाहि तर फाउल धरला जातो कि काय, अशी शंका वाटते... >>> हो ना. बघवत नाही, ऐकवत नाही. मी पाताललोक बघताना अनेक सीन्स टाळून पुढे गेले.
स्पोईलर अलर्ट - नरबळी प्रकार
स्पोईलर अलर्ट - नरबळी प्रकार नाहीय...
नाही नरबळी नाहीत. तेच ना काही
नाही नरबळी नाहीत. तेच ना काही कारणच दाखवले नाहीये मारण्याचे. पैसा, अंधश्रद्धा किंवा इतर काहीही.
अच्छा. थँक यु च्रप्स, वर्षा.
अच्छा. थँक यु च्रप्स, वर्षा.
वर्षा विचार करा काय कारण असेल
वर्षा विचार करा काय कारण असेल? सिम्पल आहे...
वर्षा विचार करा काय कारण असेल
वर्षा विचार करा काय कारण असेल? सिम्पल आहे...>>> हो ना. तो घाणेरडा आणि विक्षिप्त माणूस कुठला सांभाळणार आहे ती मुलं... एका युट्युब चॅनेल वर स्टोरी पूर्ण सांगितली आहे ती
ऐकूनच अंगावरती काटा आला. पाहू शकत नाही... खूपच भयानक प्रकार.
तरी बरं शेवट वाईट नाही...
Pages