चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिटल वुमेन बघितला.कोणतेच कास्टिंग क्लिक झाले नाही.जो जो वाटत नाही, ऍमी सुंदर सोनेरी कर्ल्स वाली ऍमी वाटत नाही, प्रोफेसर भ्यार(उच्चार सांगा) खूप तरुण घेतलेत
मार्मी पण मार्मी वाटत नाही.
चांगली पुस्तकं डोक्यात बसण्याचा हा तोटा असतो.प्रत्येक पात्राचं, जागेचं वर्णन डोक्यात खिळे मारल्या सारखं पक्कं बसलेलं असतं.

पण जोच चुकली त्याचं काय Happy
काळे तपकिरी आणि दाट केस असलेली, थोडी गोंधळलेली, टॉम बॉईश जो.
आणि ऍमी चे काय Happy
तिला पुस्तकात निळ्या डोळ्यांची सोनेरी कुरळ्या केसांची मुलगी दाखवलंय.
फक्त तो मेग चा जॉन तेवढा डोळ्यांना बरा वाटला.
पुस्तकात मुख्य 4 पात्रांच्या या अगदी वेगळ्या वर्णनाने, त्यानाच्या वेगळ्या फीचर्स ने पात्रं ओळखली जातात.
पिक्चर मध्ये त्या चौघी एकत्र दिसल्या की बराच वेळ आठवावं लागत होतं कोण कोणती बहीण आहे ते

प्रोफेसर भ्यार(उच्चार सांगा) खूप तरुण घेतलेत...बाअर आहे जर्मन म्हणून बहुतेक. मलाही कास्टिंग आवडली नाही. कथेत Back and forth जाण्याने डोक्याचे भजं झालं (पुस्तकाचे पारायणं केलयं तरी ) शिवाय घटनेची नात्यांची भावनिक तीव्रता हरवली असेही वाटले.

लाल कप्तान बघितलाय का कोणी ? मी पाहिला . आवडला. त्या काळच वातावरण , कपडेपट , लोकांची मानसिकता उत्तम प्रकारे व्यक्त केलं गेलेय पडद्यावर. सैफ अली खानने चांगलं काम केलेय .

लाल कप्तान बघितलाय का कोणी ? मी पाहिला . आवडला.
>> मस्त होता मुवी त्याला इथे वाईट रिव्ह्यु का मिळाला नाही माहित.
वेष्भुशा आणि वातावरण एकदम सही.

Laal kapitaan opening monologue of saif is too good. Please watch that. When a person is born yamraaj ka bhainsa starts walking towards him the day the bhainsa reaches is his last day on earth. Saif is really good. Over kkkk kiran Wink

Laal kapitaan opening monologue of saif is too good. Please watch that. When a person is born yamraaj ka bhainsa starts walking towards him the day the bhainsa reaches is his last day on earth. Saif is really good. Over kkkk kiran
>>
अमा एकदम! हा डायलॉग मि विसरलेले पण तेव्हा भरी वाटलेला!. आणि शेवटी पण त्याचा मस्त उपयोग केलेला आहे.

लिटिल विमेन वरच्या सग्ळ्या प्रतिसादांना अनुमोदन. casting महा गंडलंय. casting director नी एकदा पुस्तक नीट वाचायला हवे होते.

जान्हवी कपूर सगळ्याच प्रसंगात एकाच एक्सप्रेशन मध्ये आहे. ट्रेलरवरूनच निराशा झाली. नंतर reviews मिळाले तेही भयंकर वाईट. नेपोटीझम ह्या इंडस्ट्रीला आणि खऱ्या कलाकारांच्या कलेला खाऊन टाकणार आहे भविष्यात हे स्पष्ट दिसतंय

फारएण्ड, असं एका पोस्टीत संपवू नै... स्वतंत्र धाग्यावर डिट्टेलवार पिसं काढावीत आणि आम्हाला खळखळून हसण्याची संधी द्यावी. Wink

अमा , हो तो डायलॉग भारी आहेच आणि पटला देखील .

निलिमा , हो ना चित्रपट चालला का नाही ह्याच आश्चर्य आहे .
करेक्टड फॅक्ट दाखवलेत . संजय भन्साळी टाइप नाचगाणी दाखवलेत नाही याबद्दल अनेक आभार दिग्दर्शकाचे.
इमॅजिन , भर युद्धरम्य बुंदेलखंड वातावरणात नर्तिका नाचतेय , ते ही irrelevant ..

अ‍ॅमी एकदमच गंडली आहे लिट्ल वुमेन मध्ये.
Emma Watson मला आवडते पण मेग म्हणून नाही पटली.
पुस्तकाची मजा वेगळीच.>>> सहमत

Emma Watson अ‍ॅमी म्हणून चालली असती. चित्रपटात जी कोण आहे ती पुस्तकातल्या प्रतिमेसारखी अजिबात नाहीये. जो बरी आहे पण जो म्हटल्यावर डोळ्यासमोर Katherine Hepburn किंवा अलीकडचीच Winona Ryder येते Happy

The Twillight saga सगळे पाच पार्ट पाहिलेत का कुणी?
मी पहिले तीन पार्ट the twillight,new moon and eclipse पाहिलेत. चौथा आणि पाचवा भाग पाहायचा आहे.
कुठे मिळेल सांगू शकेल का कुणी?

Twillight saga परवा परवापर्यन्त नेटफ्लिक्स वर होते. आता बहुतेक हुलू वर आहे. प्राइम वर रेन्ट चा ऑप्शन पण आहे.
शेवटचे दोन भाग, त्यात पण शेवटचा फारच बोर आहे. मीम्स-वर्दी Happy

A moment to remember.
South Korean movie
बघितलाय का कुणी? छान आहे मला आवडला.
(काजल,अजय देवगणचा एक सुपरफ्लॉप सिनेमा होता, त्या कथेवर.नाव आठवत नाहीये)

हो हो तोच..

ओरिजिनल कोरियन सिनेमा-द बेस्ट इमोशनल लव स्टोरी आय हैव एवर वॉच्ड.

इथे कुणी कोरिअन ड्रामा (केड्रामा ) पंखे आहेत का? netflix वर अतिशय सुंदर कोरिअन मालिका उपलब्ध आहेत.

इथे कुणी कोरिअन ड्रामा (केड्रामा ) पंखे आहेत का? netflix वर अतिशय सुंदर कोरिअन मालिका उपलब्ध आहेत. >>>>>>> मी आहे. Happy

सायकल नावाचा मराठि मुव्ही नेटफ्लिक्स वर पाहिला, ओल्ड इरातला हलका-फुलका मुव्हि आहे अगदी एका ओळिची कथा फार न ताणता फुलवलि
रुशिकेश जोशी, दर्शन वैगरे हुकमी कलाकार छान.

Pages